जय

By admin | Published: May 9, 2015 06:27 PM2015-05-09T18:27:39+5:302015-05-09T18:27:39+5:30

रामायण आणि महाभारत या आर्ष महाकाव्यांविषयी भारतीय मनाला कायम आकर्षण वाटत आले आहे. संशोधक, अभ्यासक आणि समीक्षक यांना या काव्यग्रंथांनी मोहिनी घालण्याचे कारण जसे वेगळे आहे;

Jai | जय

जय

Next
 महाभारताच्या अन्वयार्थाचा रससंपन्न अनुवाद
 
- स्वानंद बेदरकर
 
 
रामायण आणि महाभारत या आर्ष महाकाव्यांविषयी भारतीय मनाला कायम आकर्षण वाटत आले आहे. संशोधक, अभ्यासक आणि समीक्षक यांना या काव्यग्रंथांनी मोहिनी घालण्याचे कारण जसे वेगळे आहे; तसेच ते कवी, पंडित आणि ललित लेखकांसाठी वेगळे आहे. प्रत्येकाच्या मनबुद्धीला आवडेल आणि पुरेल असे एकाहून एक सरस आणि स्वतंत्र रत्न या ग्रंथांमध्ये आहे. त्यामुळेच अत्यंत विपुल प्रमाणात लेखन होऊनही, त्याच्या अनेकनिक आवृत्त्या निघूनही नवे काही शोधण्यासाठी अभ्यासक या महाकाव्याकडे आकृष्ट होतात. त्यापैकीच एक नाव देवदत्त पट्टनायक हे होय. 
इंग्रजी भाषेतील सध्या सर्वात लोकप्रिय आणि अभिजात वा्मयात सर्वदूर पोहोचलेले नाव म्हणून पट्टनायक यांचा उल्लेख केला जातो. पौराणिक ग्रंथांचा, व्यक्तींचा, घटनांचा अन्वयार्थ लावून हजारो वर्षापासून आपल्या हाती असणा:या साहित्याचे नवे दर्शन देवदत्त आपल्याला घडवतात. त्यामुळेच वाचकवर्गात त्यांच्या लेखनाविषयी एक प्रकारचे कुतूहल आहे. मूळ इंग्रजी असणा:या ‘जय : महाभारत सचित्र रसास्वाद’ या शीर्षकाचा त्यांचा ग्रंथ नुकताच पॉप्युलर प्रकाशनने मराठीत आणला आहे. अनुवाद विविधा या संकल्पनेत पॉप्युलरने पट्टनायक यांच्या तीन कलाकृतींचा समावेश केला. त्यापैकी ‘जय’ हा महाभारतावरील ग्रंथाचा अनुवाद नाशिकचे अभय सदावर्ते यांनी शीर्षकातील ‘रसास्वाद’ या शब्दाला अनुसरून केला आहे. त्यामुळेच अनेकार्थानी मराठीतील एक अत्यंत देखणी साहित्यकृती म्हणून प्रस्तुत ग्रंथाचा उल्लेख करायला हवा.
एखाद्या चांगल्या, सवरेत्तम अनुवाद ग्रंथाचे श्रेय कुणाचे? हा प्रारंभिक प्रश्न अनेक अनुवादित कलाकृतींबद्दल निर्माण होतो. अनुवाद कलेला दुय्यम मानत मूळ लेखकाकडे त्याचा सर्व श्रेयमोर्चा वळवताना आजवर आपण अनेक अभ्यासकांना पाहात आलो आहोत; पण असे करणो अनुवादकत्र्यावर अन्याय करण्यासारखे आणि सर्वस्वी चुकीचेदेखील आहे. याचा प्रत्यय ‘जय’ हा ग्रंथ वाचताना येतो. त्यामुळेच या न्याय-अन्यायाची चर्चादेखील या ग्रंथाच्या निमित्ताने पुन्हा करण्याची गरज निर्माण झाली आहे. 
प्रस्तुत कलाकृती महाभारतावर बेतलेली असल्याने कथनाच्या अलीकडे आणि पलीकडे मुळातच अर्थाच्या अनेक जागा आहेत. त्यात पट्टनायक यांच्यासारख्या विद्वान अन्वयार्थकाराने अर्थाचे असंख्य नवे धागे उकलून सांगितले आहे. त्या उकलण्याच्या अंतरंगात उमलण्याचे आपसूक घडलेले प्रातिभदर्शन आहे. ते जर त्याप्रमाणो किंवा त्यापेक्षा काकणभर सरस पद्धतीने मराठीत घडत असेल, तर ते यश अनुवादाचे आहे. ‘जय’ मध्ये असे प्रसंग ठिकठिकाणी घडताना दिसतात. 
‘ब्यूटी’ हा द्रौपदीबद्दल वापरला गेलेला मूळ इंग्रजी शब्द मराठीत ‘सौंदर्य’ असा उल्लेखून झाले असते; मात्र अनुवादक सदावर्ते तिथे  ‘लावण्य’ असा शब्द योजतात. त्यामुळे ‘ब्यूटी’मध्ये नसणारी आध्यात्मिक सौंदर्याची अनुभूती आपल्याला मराठीत वाचायला मिळते आणि आशय अधिक गहिरा होतो. किंवा शंतनू आणि गंगा यांना झालेली मुले गंगा एकामागून एक नदीपात्रत सोडून देते हे शंतनूला असह्य होते; पण वचनात बांधलेला असल्याने तो मौन धारण करण्याशिवाय दुसरे काही करू शकत नाही; मात्र  आठव्या पुत्रलाही जेव्हा गंगा नदीपात्रत सोडून देण्यासाठी घेऊन येते त्यावेळी शंतनूचा बांध फुटतो आणि तो त्वेषाने ‘नो..’ असे म्हटल्याचे मूळ इंग्रजीत आहे. सदावर्ते त्याच त्वेषाला शब्दरूप देऊन ‘कैदाशिणी, थांबव हा तुझा क्रूर खेळ.’ असे लिहितात, 
 अनुवादकाची परकाया प्रवेशाची आपल्याकडची जुनी संकल्पना इथे गुळगुळीत न वाटता घाशीव वाटते हे अलीकडच्या अनुवाद पुराच्या धर्तीवर नवेच म्हटले पाहिजे.
या ग्रंथाचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे महाभारत सांगणो हे याचे उद्दिष्ट नव्हे. महाभारतातील कथांचे विकास टप्पे निवडून त्यावर विवेकाधिष्ठित भाष्य हा या ग्रंथाचा हेतू आहे. त्यामुळे मूळ महाभारतातील एखादी कथा आणि त्या कथेच्या अनुषंगिक किंवा हस्तांदोलीत इतर कथा या ग्रंथात येतात. उदाहरणच घ्यायचे झाले तर द्रौपदी स्वयंवराचे सांगता येईल. द्रौपदीला घरी आणल्यावर तिला न पाहताच ‘तुम्हा पाच भावंडांमध्ये वाटून घ्या’ असे सांगणारी कुंती द्रौपदीला पाहिल्यावरही आपला निर्णय बदलत नाही. उलट एकाच स्त्रीला अनेक पती असल्याबद्दलचे शास्त्र-धर्म मत ती युधिष्ठिराला विचारते. तो होय म्हणाल्यावर ती आपला निर्णय तसाच ठेवते, यामागचे कुंतीचे विचारमहात्म्य संपूर्ण महाभारतात कुठेही येत नाही. त्याचा रहस्यभेद करण्याचा प्रयत्न पट्टनायक या ठिकाणी करतात; तसेच द्रौपदीच्या नशिबी असे का, हे सांगताना द्रौपदीला पूर्वजन्मी मिळालेला शाप आणि वरदान याची मूळ महाभारतातली आणि लोककथेतली अशा दोन्ही कथा ते सांगतात. याचाच अर्थ वाच्यार्थ, लक्ष्यार्थ आणि व्यंगार्थाचे अनेक विवेकी कंगोरे या ग्रंथातील प्रत्येक कथेला आहे. 
मूळ महाभारतातील कथा, त्याबरोबर प्रचलित असलेल्या लोककथा, दंतकथा आणि त्यातून दिसणारे एखादे पात्र, घटना असा मोठा आवाका कवेत घेऊन त्याचा अन्वयार्थ एक-दोन-तीन असा मुद्देसूदपणो लेखक मांडतो, त्यामुळे वाचकाला इथे विचार करायला मोठी जागा मिळते. शक्य तिथे काही कवितेच्या ओळी उद्धृत करून मूळ आशयाला उठाव देण्याचा प्रयत्नही इथे झाला आहे. त्यामुळे असा सगळा पसारा आवरत सावरत मूळ गाभ्याचे अवकाश कवेत घेण्याचे काम अनुवादकाचे होते. त्याला कवेत घेण्याची देखणी किमया अनुवादकाला साधल्याचे दिसते.
अनुवादात कायम एक प्रश्न चर्चिला जातो; तो भाषेचा शब्द हे संस्कृतिदर्शक असतात. त्यामुळे ते त्या त्या  निमित्ताने येणो औचित्याचे ठरते. उगाचच धरलेला भाषिक हट्टाग्रह मूळच्या आशयाला, सौंदर्याला ग्रहण लावतो; तर दुसरीकडे आशयाचे कारण सांगत मूळ कलाकृतीतील शब्द तसेच वापरणो हे अनुवादकाचे शाब्दिक किरटेपण ठरते. त्यामुळे पांडित्य दर्शनाचा आविभार्व आणि शाब्दिक तोकडेपण यातील जो भाषाविवेक आहे; तो अनुवादात अभिप्रेत असतो. प्रस्तुत ग्रंथ हा महाभारतावरचा आहे. त्यामुळे त्यातील पात्रंच्या मुखी असणारी भाषा आजच्यासारखी धेडगुजरी नसणार हे सत्य आहे. त्यामुळे त्या पात्रंच्या स्थानाचा विचार करून, त्यांच्या संस्कृतीचा विचार करून भाषा व्यवहार सांभाळणो म्हणजे तारेवरची कसरत करणो होय. ही कसरत करण्याचा प्रसंग मूळ लेखक पट्टनायक यांच्यावर येण्याचे कारण नाही; याचे कारण आपल्या प्रतिभासामथ्र्यावर ते आशय तोलून नेतात. इथे त्या परीक्षेत अनुवादक उत्तीर्ण झाला आहे.
हे सगळे या ग्रंथाचे चांगुलपण सांगून झाल्यावर टोचत राहणारी किंबहुना सारखी टोचत राहणारी गोष्ट म्हणजे ग्रंथाचे संपादन करण्यात संपादक कमी पडल्याची आहे. भाषेचा चांगला ओघ ग्रंथाला लाभल्याचे वर कौतुक केले असले, तरी अनुवादक भाषेच्या प्रेमात पडल्याचा प्रसंग येतो. जे बलस्थान म्हणून कौतुकास पात्र ठरते ती मर्यादा होते. त्यावेळी संपादकाच्या लाल पेनचे काम सुरू होणो हे कोणत्याही ग्रंथाला सौष्ठव प्राप्त करून देण्याकामी महत्त्वाचे असते, त्या ‘महत्त्वाचा’ विसर काही प्रमाणात का होईना हा ग्रंथ संपादन करताना झाला आहे. त्यामुळे काही शब्दांची असंख्य वेळा होणारी पुनरावृत्ती, समानार्थी वाक्यांमुळे पडणारी भर आणि शुद्धलेखनाचा दिसणारा अभाव हे उत्तम वाचकाच्या नजरेत भरणारे दोष ग्रंथाला वर, आणखी वर नेण्यास अटकाव करतात. त्याकडे लक्ष देणो जरूरीचे होते.
 ग्रंथाची निर्मिती, मांडणी मात्र अत्यंत देखणी झाली आहे. आतील रेखाचित्रंना असणारा स्वत: पट्टनायक यांचा स्पर्श आशयाला प्रभावशाली करतो. एकूणातच नव्या वाचकाला महाभारताकडे पाहायला लावणारा आणि जुन्या चिंतशीलकाला नवी दृष्टी देणारा ग्रंथ अभय सदावर्ते यांच्या अनुवादामुळे मराठीला लाभला आहे.सौंदर्यशाली भाषेचे आणि आशयाचे आव्हान
 
अनुवाद ही एक स्वतंत्र कला आहे; असे मी मानतो. त्यासाठी एक ना अनेक दाखलेही देता येतात. ती एक स्वतंत्र कलाकृतीच असते. महाभारताचा अनुवाद करताना पट्टनायक यांच्यासारख्या प्रज्ञा-प्रतिभासंपन्न लेखकाने वापरलेल्या सौंदर्यशाली भाषेचे आणि आशयाचे आव्हान माङयासमोर होतेच; पण मराठी भाषाही तितकीच सुंदर आहे. याची जाण मनात ठेवून आणि आपल्या पूर्वपरंपरेला स्मरून मी हे आव्हान पेलू शकलो. एक लेखक अनुवादक म्हणून या ग्रंथाने ‘विनम्रता’ आणि तिचे पैलू माङया ओंजळीत दिले आहेत. त्यामुळे अनुवादपूर्ततेनंतर भरून पावल्याची भावना आनंद देणारी आहे. 
मी ज्या घरात जन्मलो, वाढलो, ज्या सवंगडय़ांसमवेत विचारांची देवाण-घेवाण केली आणि ज्या संस्कृत संस्कृतीने मला भाषेचा डौल शिकवला त्या सर्वाप्रती माङया मनात अपार कृतज्ञता उमलून येण्यास ‘जय’ हा महाभारतावरील अनुवाद कारणीभूत ठरला. यापूर्वी मी केलेले अनुवाद शास्त्र या विषयाच्या अंगाने जाणारे आहेत. त्या पाश्र्वभूमीवर हा अनुभव वेगळा होता.
-अभय सदावर्ते (अनुवादक)
 
पुस्तकाचे नाव : जय महाभारत सचित्र रसास्वाद
लेखक : देवदत्त पटनायक
अनुवाद : अभय सदावर्ते
प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन
पृष्ठ : ४४०
 
 

 

Web Title: Jai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.