पत्रकार रोबोट!

By admin | Published: October 11, 2015 08:09 PM2015-10-11T20:09:49+5:302015-10-11T20:09:49+5:30

काही दिवसांपूर्वीचीच घटना. चीनमध्ये एका रोबोटनं एका मिनिटात तब्बल एक हजार शब्दांचा लेख लिहिला. हा लेख म्हणजे एक ‘बिङिानेस रिपोर्ट’ होता.

Journalist Robot! | पत्रकार रोबोट!

पत्रकार रोबोट!

Next

 सारिका पूरकर-गुजराथी

 
काही दिवसांपूर्वीचीच घटना. चीनमध्ये एका रोबोटनं एका मिनिटात तब्बल एक हजार शब्दांचा लेख लिहिला. हा लेख म्हणजे एक ‘बिङिानेस रिपोर्ट’ होता. अगदी अचूक विश्लेषण करणारा आणि उत्तम!
वाचून कोणालाही आश्चर्य वाटेल, पण गेल्या काही वर्षापासून प्रसारमाध्यमांच्या, वृत्तपत्रंच्या क्षेत्रत ‘पत्रकार रोबोट’ची पावलं वाजायला लागली आहेत. जगात घडलेल्या काही घटना याचीच चाहूल देत आहेत. त्यामुळे कामाविषयी किंचितही कुरकुर न करता, न थकता, कमीत कमी चुका करून, कमी वेळेत ढीगभर काम उपसणा:या रोबोटमुळे तयार होणा:या बेरोजगारांच्या यादीत आता पत्रकारांचाही समावेश होतो की काय, अशी भीतीची लाट जगभरातील प्रसारमाध्यमे, वार्ताहर, पत्रकार, ब्लॉगलेखकांमध्ये पसरली आहे. 
नामांकित कंपन्यांनी तयार केलेले अत्याधुनिक रोबोट लेख, बातम्या लिहू लागले आहेत आणि त्यांचा दर्जाही उत्तम आहे. काही दिवसांपूर्वीच चीनमध्ये एका यंत्रमानवाने चक्क एक व्यावसायिक अहवाल लिहून काढला! ‘ड्रीमरायटर’ नामक या रोबोटने चिनी भाषेतला हा अहवाल अवघ्या मिनिटभरात लिहून काढल्याची बातमी पसरल्यानंतर तिथल्या स्थानिक पत्रकारांच्या गोटात खळबळच उडाली. चीन सरकारचे नियंत्रण असलेल्या वृत्तसंस्थांतून आता आपल्याला नारळ  मिळते की काय आणि आपली जागा रोबोट घेतात की काय म्हणून.
‘ड्रीमरायटर’ने लिहिलेला हा लेख म्हणजे पत्रकार आणि पत्रकारितेसाठी धोक्याची घंटा असल्याची चर्चा आता सुरू आहे. ‘रोबोट जर्नालिझम’च्या युगाची ही नांदी असल्याचेही म्हटले जात आहे. गेल्या काही वर्षात पत्रकारिता - विशेषत: मुद्रित माध्यमातली - प्रचंड बदलली आहे; पण या बदलाबरोबरच ती अधिक साचेबद्ध, सरधोपट होत चालली आहे का? अत्याधुनिक साधनांनी या क्षेत्रत शिरकाव केला खरा; पण त्यामुळे पत्रकारांची सर्जनशीलता कमी होत चालली आहे का? क्रीडा असो, गुन्हेगारी असो वा आर्थिक घडामोडी. या सगळ्या प्रकारच्या बातम्यांचा जणू एक साचा ठरला आहे आणि फक्त त्यातले तपशील बदलत आहेत, असे वाटण्यासारखी परिस्थिती येऊ पाहते आहे का? असं वाटण्याला वाव आहे. त्यामुळे एखाद्या विषयावरची ठरावीक आकडेवारी आणि तपशील मिळवायचा आणि त्याची एक साचेबद्ध बातमी तयार करायची, ही मुद्रित माध्यमात रूढ झालेली पद्धत या रोबोट जर्नालिझमला पूरकच ठरणार आहे. सारख्याच धाटणीच्या बातम्या लिहायच्या असतील तर त्या माणसांनी का लिहाव्यात? रोबोट आहेत की! असा सगळा हा मामला आहे. 
जगातल्या पत्रकारितेच्या क्षेत्रवर रोबोटचे असे आक्रमण होत असताना, दुसरीकडे या रोबोटची धाव उद्योग, खेळ, गुन्हेगारी, हवामान या क्षेत्रंपुरतीच मर्यादित राहील असेही काही तज्ज्ञांना वाटते आहे. उद्योग, बॅँकांकडे त्यांच्या आर्थिक ताळेबंदाची, व्यवहारांची, उलाढालींची भरमसाठ आकडेवारी असते, जी अत्यंत किचकट, डोकेखाऊ असते. खेळांबाबतही असेच असते. जगभरात नाना क्रीडाप्रकारांत दररोज अनेक सामने होतात, त्यांची ढिगाने आकडेवारी तयार होते. तिच्यावर आधारित लेखन, विश्लेषण करणो रोबोटला सहज शक्य आहे; पण सगळ्याच बातम्या, लेख केवळ असे आकडेवारीच्या आधारे लिहिता येत नाहीत. भूकंप, त्सुनामी यांसारख्या नैसर्गिक आपत्ती, सामाजिक स्थित्यंतरे, वैचारिक क्रांती, नेतृत्वबदल, राजकारणातले चढ-उतार, मानवी संवेदना हे विषय हाताळण्यासाठी त्या लेखकाकडे माणुसकीचा ओलावा तर लागतोच; शिवाय अभ्यासही हवा असतो. त्या-त्या गोष्टीचा आगापिछा माहीत असावा लागतो, हेही तेवढेच खरे. सध्या चोवीस तास ब्रेकिंग न्यूजचा जमाना आहे. हे थेट म्हणजे लाइव्ह रिपोर्टिगदेखील रोबोटच्या आवाक्याबाहेरचे आहे, असाही एक मतप्रवाह आहे.  
आणि समजा झालेच रोबोट पत्रकार, तरी नेहमीच्या सरधोपट बातम्यांच्या जबाबदारीतून मुक्तता मिळाल्याने मानवी पत्रकारांना यानिमित्ताने आणखी वेगळे विषय हाताळण्याची, अभ्यासपूर्ण लेखन करण्याची संधीच मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात ‘पत्रकारांऐवजी रोबोट’ असे सरसकट चित्र असेलच असे नाही. कारण मानवी मर्यादेमुळे पत्रकारांना जो वेग गाठता येत नाही आणि जे विषय त्यांना किचकट वाटतात ते हाताळण्यासाठीच रोबोट पत्रकारांची गरज आहे, आणि रोबोट पत्रकार स्वीकारण्यात गैर नाही असा आणखी एक दृष्टिकोन जगभरातले प्रेस क्लब्स बाळगून आहेत. भारतातही यापेक्षा वेगळे चित्र नाही. परिणामी, सगळ्यांनाच आपल्या लेखण्या गुंडाळून ठेवण्याची गरज पडणार नाही, या आशेला वाव आहे. पण त्यांची धार तेज करून घ्यावी लागणार आहे, हे मात्र नक्की.
 
.सेकंदात दोन हजार लेख!
गेल्या वर्षी असोसिएटेड प्रेस (एपी) या जगातल्या सर्वात मोठय़ा अमेरिकन वृत्तसंस्थेने दक्षिण कॅरोलिनाच्या ‘ऑटोमेटेड इनसाइट्स’ या कंपनीशी हातमिळवणी केली. काय होते या कंपनीकडे? तर असाच एक रोबो! या कंपनीने ‘वर्डस्मिथ’ नावाने प्रणाली विकसित केली आहे, जी उपलब्ध आकडेवारी-माहितीचे विश्लेषण अवघ्या सेकंदात करून त्याचा परिपूर्ण लेख तयार करते. ‘असोसिएटेड प्रेस’चे जनसंपर्क अधिकारी जेम्स कोतेकी सांगतात की, ही प्रणाली काही सेकंदांत तब्बल दोन हजार लेखांचा पाऊसच पाडू शकते! या प्रणालीच्या आधारे गेल्या वर्षी चक्क तीस कोटी लेख तयार करण्यात आले. हीच ‘वर्ल्डस्मिथ’ प्रणाली आता ऑस्ट्रेलियन संकेतस्थळांसाठीही लेख, बातम्या पुरवणार आहे. ऑस्ट्रेलियन असोसिएटेड प्रेसदेखील सहज-सोप्या बातम्या आणि स्पोर्ट्स रिपोर्ट्स तयार करणारे रोबो विकसित करीत आहे. अमेरिकेतल्या ‘द लॉस एंजलिस टाइम्स’ या वृत्तपत्रनेही रोबो जर्नालिझमला गेल्या वर्षीच सुरुवात केली आहे. केन श्वेन्के यांनी पत्रकाराची भूमिका बजावणारा एक प्रोग्रॅम तयार केला आहे. काही दिवसांपूर्वी या रोबोने तीन मिनिटांत भूकंपाची बातमी दिली होती.
 
बातम्या लिहिणारा रोबोट
रोबोट कशाच्या आधारावर बातम्या लिहितो? जगभरात तयार होत असलेले पत्रकार रोबो चालतात तरी कसे? - तर आकडेवारी आणि तपशिलाच्या खुराकावर! लेखात उल्लेख केलेला रोबो चीनमधल्या सोशल मीडिया व गेमिंगमधील बलाढय़ कंपनी ‘टेनसेंट’ने तयार केला आहे. या कंपनीला आर्थिक विषयावरील अगदी प्राथमिक स्वरूपाच्या बातम्या मिळवायला अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे या कंपनीने अशा बातम्या लिहिणारा रोबोटच विकसित केला. या रोबोटमध्ये आवश्यक ती माहिती अन् आकडेवारी फीड केली की तो त्याचे विश्लेषण करतो आणि एका उत्तम लेखात रूपांतर करून देतो! 
आपले नाव सार्थ ठरवणा:या या ‘ड्रीमरायटर’ रोबोटने ‘ऑगस्टचा ग्राहक किंमत निर्देशांक’ या विषयावर लिहिलेला चक्क ‘916 शब्दांचा हा लेख एवढा अचूक व वाचनीय आहे, की तो कोणी माणसाने नव्हे, तर यंत्रने लिहिला आहे, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही’, असे चीनच्या ‘साऊथ चायना मॉर्निग पोस्ट’ या वर्तमानपत्रच्या ली वेई या पत्रकाराने कबूल केले आहे. 
 
रोबोटमुळे ‘न्यूज रिपोर्टर’ नामशेष?
‘ड्रीमरायटर’मुळे रोबो जर्नालिझमची चर्चा सुरू झाली असली, तरी याची सुरुवात चार-पाच वर्षापूर्वीच झाली आहे. अमेरिकेच्या शिकागो येथील ‘नॅरेटिव्ह सायन्स’ या कंपनीने असेच एक सॉफ्टवेअर विकसित केले. आपल्याकडे असलेल्या आकडेवारीचे हे सॉफ्टवेअर मजकुरात रूपांतर करते. इंग्लंडमधल्या ‘डेलॉइट’ या वृत्तसंस्थेने आणि अमेरिकेतल्या ‘फोर्ब्सज’ या अत्यंत प्रख्यात नियतकालिकाने हे सॉफ्टवेअर विकत घेतले आहे आणि या संस्था लेखनिर्मितीसाठी या सॉफ्टवेअरची मदत घेत आहेत. येत्या 2क्3क् र्पयत जगातल्या 9क् टक्के न्यूज स्टोरीज् या संगणकाकडून लिहून घेतल्या जातील, असे भाकीतच या ‘नॅरेटिव्ह सायन्स’चे संस्थापक क्रिस्टिन हामंड यांनी वर्तवले आहे.]
 
चीनमध्ये पत्रकार बेकार!
चीनमध्ये रोबोट जर्नालिझम तर स्थानिक पत्रकारांच्या मुळावरच येऊ शकते. कारण तिथल्या पत्रकारांना एखाद्या प्रशासकीय वा अन्य यंत्रणोविरुद्ध अभ्यास, संशोधन करून बातमी देण्याचे (शोधपत्रकारिता) अधिकारच नाहीएत. परिणामी, रोबोटने लिहिलेल्या सरधोपट, रेडिमेड बातम्या, लेख तिथल्या प्रशासनाच्या पथ्यावर पडणार आहेत.
 
(लेखिका ‘मुक्त पत्रकार आहेत.)
queen625@gmail.com

Web Title: Journalist Robot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.