कहत कबीर.

By admin | Published: March 5, 2016 02:32 PM2016-03-05T14:32:11+5:302016-03-05T14:32:11+5:30

एका अजब, अस्वस्थ शांततेचा तो निपचित क्षण. त्या क्षणी मी पाण्यात गटांगळ्या खात होतो. नाकातोंडात पाणी जात होतं. विसर्जित झालेल्या अस्थींची राखही त्या पाण्यातून घशात जात होती

Kabit Kabir. | कहत कबीर.

कहत कबीर.

Next
>- सुधारक ओलवे
 
एका अजब, अस्वस्थ शांततेचा तो निपचित क्षण.
त्या क्षणी मी पाण्यात गटांगळ्या खात होतो. नाकातोंडात पाणी जात होतं. विसर्जित झालेल्या अस्थींची राखही त्या पाण्यातून घशात जात होती. डोळ्यासमोर गच्च अंधारी आली. डोळे आपोआप मिटले गेलेच. ओढ देणा:या त्या थंडगार पाण्यात हात गोठले जात होते, पाय बधीर होत पाण्यात ओढले जात होते. माङया सा:या जाणिवाच थिजल्या. नाकातोंडात गेलेल्या पाण्यानं मेंदूलाही गारठवलं असावं. पाण्यानं माङया शरीरालाच नाही तर मनालाही वेढलं होतं. ना मनात विचार होते, ना भय, ना तगमग.  ‘स्व’ची जाणीव तेवढी, तीही फक्त आपण जिवंत असल्याची जाणीव, शरीरापलीकडची. फक्त आल्यागेल्या श्वासापुरती!
मला लोकांनी पाण्यातून बाहेर काढलं. एका लाकडी बोटीत झोपवलं. नाकातोंडात राखेचं पाणी गेल्यानंसारखी खोकल्याची उबळ येत होती. आणि मध्यरात्रीच्या त्या चांदणभरल्या आकाशाच्या पोकळीकडे पाहत मी बोटीत निपचीत पडून होतो. वाराणसीच्या घाटांवरच्या एका मध्यरात्रीचा हा क्षण. त्या क्षणापूर्वी काही सेकंदच मी एका बोटीतून दुस:या बोटीत जाताना गंगेच्या गारठलेल्या प्रवाहात पडलो होतो.
15 व्या शतकातला जादुई कवी आणि महान संत कबीर, त्याच्या जगण्याच्या, तत्त्वज्ञानाच्या शोधात फोटोग्राफिकल प्रवास करत मी 2क्13 मध्ये वाराणसीला पोहचलो होतो. ज्या कबिराच्या दोह्यानं हिंदू, मुस्लीम धर्मीयांच्या अनेक पिढय़ांचं पोषण केलं, अब्यासक आणि तज्ञांना जन्माची भुरळ घातली त्या कबिराचा शोध घेत मी वाराणसीच्या कबीर चौरा नावाच्या मोहल्ल्यात पोहचलो होतो. कबीराचं कुटुंब या भागात राहत असे असं म्हणतात. आता ती जागा कबीराचं स्मारक आणि त्याकाळाची याद म्हणून जतन केली जाते आहे. कबीराच्या आईवडिलांच्या, निरू आणि निमाच्या कबरीही या भागात आहेत, ‘निरू टिल्ला’ असं त्या घराचं नाव. मृदगंधासारखे वाटणारे कबीराचे अर्थपूर्ण, सखोल दोहे एकेकाळी या वाराणसीच्या गल्ल्यांमध्ये गायले जात.  वाराणसी नावाच्या या शहराला हजारो वर्षाचा इतिहास आहे. आणि त्याच इतिहासातली काही पानं कबीराची आहेत. याच वाराणसीच्या घाटांवर कबीराच्या संतत्वाचा आगाज झाला. विद्वान स्वामी रामनंदांचे कबीर हे शिष्य होते असं सांगतात. कबीराच्या आयुष्यातल्या काही सुरस कहाण्यांपैकी अशीच एक कहाणी म्हणजे हे गुरू-शिष्याचं नातं, जे याच घाटांवर जन्माला आलं. कबीर धर्मानं मुस्लीम. स्वामीजी हिंदू. ते आपल्याला शिष्य म्हणून कधीही स्वीकारणार नाहीत अशी कबीराला भीती होती. म्हणून त्यांनीं एक अत्यंत कल्पक युक्ती लढवली.
भल्या पहाटे कबीर घाटाच्या पाय:यांवर झोपून राहिले, लपून बसले. स्वामीजी स्नानाला निघाले आणि कबीराच्या अंगावर पाय पडल्यानं दचकून एकदम ओरडलेच ‘रामा. रामा.’ त्या क्षणी कबीर उठून उभे राहत म्हणाले, आता मी तुमचा चरणबद्ध झालोय. आता मला शिष्य म्हणून पत्करा. शिकण्याची ही ऊर्मी आणि अफाट इच्छाशक्ती पाहून स्वामीजी चकित झाले आणि त्यांनी कबीरांचा शिष्य म्हणून स्वीकार केला. याच घाटांवर मग कबीराला दिव्यत्वाचा अनुभव आला. गंगेच्या गढुळलेल्या पाण्यात उठणा:या तरंगांसोबत विश्वाच्या चराचरात असलेली शांतता त्यांना स्वत:च्या आत्म्यातही जाणवली. त्यातून त्यांनी निगरुणाकडे जाण्याचं तत्त्वज्ञान सांगत पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्गच दाखवला. आत्मारूपी परमेश्वराला ओळखण्याची आणि स्वत:तलं दिव्यत्व अनुभवण्याचीही शिकवण दिली.
कबिराच्या दोह्यांच्या मी अनेक वर्षे प्रेमात होतोच. ती शिकवण जगताना दिशादर्शन करत होती. कबिराच्या शोधातल्या या आध्यात्मिक प्रवासानं त्या शब्दातली अनुभूती अधिक प्रकर्षानं जाणवली, मनात घट्ट झाली. इतकी खोल रुजली की गंगेच्या प्रवाहात गारढोण अंधारात, गारठलेल्या पाण्यात मी एकेक श्वास घेत धापा टाकत होतो, तेव्हाही ती शिकवण सोबत होतीच.
कबीर म्हणतात ना अगदी तशीच.
परिचय कर तू स्वत:शी, आपणातच सामावणो,
कबीर म्हणो जाण स्वत:ला, निमेल येणोजाणो.
 
(छायाचित्रणाच्या माध्यमातून समाजकार्याबद्दल 
पद्मश्री पुरस्कारप्राप्त छायाचित्रकार 
‘लोकमत’ समूहाचे फोटो एडिटर आहेत.)

Web Title: Kabit Kabir.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.