द्रवरूप सोने
By admin | Published: May 16, 2015 02:20 PM2015-05-16T14:20:56+5:302015-05-16T14:21:33+5:30
भारताने आपल्या पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करून त्यात अधिक संशोधन केले असते आणि मानवी मूत्रपासून तयार होणारी खते वापरून शेतीची नैसर्गिक पध्दत विकसित केली असती तर आजवर लक्षावधी डॉलर्सच्या परकीय चलनातली आयात आपण वाचवू शकलो असतो. फक्त पैसेच नव्हे, तर आपली जमीनही आपण वाचवली असती. ..आपण यातले काहीच केले नाही!
Next
>सहाना सिंग
मानवी शरीरातून बाहेर पडणा:या मूत्रत युरिया आणि नत्र हे शेतीसाठी पोषक घटक असतात. हा प्रयोग मी स्वत: माङया दिल्लीतील निवासस्थानी केला. एका पन्नास लिटरच्या कॅनमध्ये जमवलेले मूत्र बंगल्याभोवतीच्या बागेला खत म्हणून घातले. त्यामुळे माङया बागेतली झाडे जोमाने वाढलेली दिसली. शेतक:यांनीही त्याचा उपयोग करायला हवा.’
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा अनुभव सांगितला आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठली. एका केंद्रीय मंत्र्याने सार्वजनिक सभ्यतेची पातळी सोडून मानवी मूत्रबाबत असे काही उघडपणाने बोलणो अनेकांना खटकले. ‘त्यांच्या अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत योजनेला सुरुंग लागेल’ इथर्पयत अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या. सोशल मीडियावर तर अनेकांनी या वक्तव्याची खिल्ली उडवताना गडकरी यांचा उपहासही केला.
परंतु गडकरींच्या या वक्तव्याची खिल्ली उडवण्यापूर्वी थोडी वस्तुस्थितीही समजून घेणो गरजेचे आहे. आपल्या देशात हजारो वर्षापासून मानवी मूत्रचा उपयोग खत आणि कीटकनाशक म्हणून परंपरेने केला जातो. असे जर असेल, तर मग आधुनिक भारताने या पारंपरिक ज्ञानाच्या जोरावर मानवी मूत्रपासून खते बनवण्यात पुढाकार का घेतला नाही? कृषी सिंचनासाठी आणि उत्तम दर्जाच्या अन्नधान्यासाठी जगाला एक नवा पर्याय का उपलब्ध करून दिला नाही? पाण्याच्या दुर्भिक्षावर उपाय शोधण्यासाठी झगडणा:या जगाला मार्ग का दाखवला नाही, असेच प्रश्न खरेतर विचारायला हवेत. हे काम तर भारताने केले नाहीच, उलट आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पारंपरिक शहाणपणाचे बोट सोडून देऊन आपण पाश्चात्यांनी राबवलेल्या रासायनिक खतांच्या मॉडेलचे आळशी अनुकरण तेवढे केले. त्यासाठी आवश्यक असणारे आणि मुळातच कमी असणारे फॉस्फेट जमिनीच्या पोटातून खरवडून, ओरबाडून काढत राहिलो.
जगात उपलब्ध असलेल्या फॉस्फेटपैकी 90 टक्के साठा चीन, मोरोक्को, अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेकडे असल्याचे मानले जाते. अन्नधान्याची वाढती गरज आणि त्यासाठी लागणा:या खतांसाठी फॉस्फेटची मागणी भविष्यात आणखी जोर धरणार हे अटळ सत्य आहे. अर्थातच अन्नधान्यांच्या किमतीवर त्याचा विपरीत परिणाम होऊन सर्वसामान्यांच्या तोंडात जाणारा घास अधिक ‘महाग’ होणार हीदेखील काळ्या दगडावरची रेघ.
आपल्या देशापुरता विचार करू या. रासायनिक खतांसाठी लागणारे घटक आपण कुठून आणतो?
याबाबतीत आपण अक्षरश: कफल्लक आहोत!
सध्या फॉस्फेटसाठी नव्वद टक्के, युरियासाठी वीस टक्के आणि पोटॅशसाठी तर आपण परकी देशांवर शंभर टक्के अवलंबून आहोत. आपले खिसे रिकामे करून या सर्व गोष्टी आपल्याला आयात कराव्या लागतात. फॉस्फेट आणि पोटॅश आपल्याकडे जवळजवळ नाहीच.
केवळ फॉस्फेट आणि पोटॅशच नाही, नायट्रोजन, पोटॅशिअम आणि इतरही अनेक पोषक घटक, जे शेतीसाठी संजिवक आहेत त्यांना आपणच आपल्या हाताने नष्ट करतो आहोत. नापिकीमुळे एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत असताना दुसरीकडे आपली चाललेली ‘उधळमाधळ’ हा मोठाच विरोधाभास आहे.
- कृषिसंपन्नतेसाठी लागणारे हे सारे दुर्मीळ आणि महागडे घटक मानवी मूत्रत मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. आपण मात्र त्यांना गटारगंगेचा रस्ता दाखवतो आहोत! आपण खातो त्या अन्नात जमिनीतून घेतलेले पोषक घटक असतात. अन्नावाटे ग्रहण केले गेलेले अधिकचे पोषक घटक मानवी मूत्रवाटे बाहेर पडतात.
मानवी विष्ठेत असलेले ( पॅथोजेनिक) जीवाणू आणि त्याच्या तीव्र वासामुळे मानवी विष्ठा थेट खत म्हणून वापरण्यावर अनेक मर्यादा आहेत. तो धोका मानवी मूत्रत नाही. शिवाय त्यात पाणी मिसळले तर त्याचा तीव्र वासही नाहीसा होतो आणि अगदी सहजपणो उत्तम दर्जाचे खत म्हणून त्याचा वापर होऊ शकतो. दुर्दैवानं ‘फ्लश टॉयलेट’च्या ‘मॉडर्न’ जीवनशैलीत सा:याच गोष्टींचा ‘मैला’ करताना आपण मूत्र आणि मल दोन्हीही एकत्र करून सांडपाण्याच्या वाहिन्यांमध्ये लोटून देत असतो. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी हे मलजल आपण मोठमोठय़ा प्लान्ट्समध्ये पाठवतो. त्यासाठी प्रचंड प्रमाणात ऊर्जा लागते, शिवाय या मलजलातून फॉस्फरस आणि नायट्रोजन वेगळे काढायचे झाल्यास आणखी व्यापक, वेळखाऊ आणि महागडय़ा प्रक्रियेतून जावे लागते.
तात्पर्य? - केवळ आपल्याकडेच नाही, जगभरातले मोठमोठे प्लान्ट्स मूत्रतले हे पोषक घटक परत मिळवण्याचा साधा प्रयत्नही करीत नाहीत!
मग आपण काय करतो आहोत?
- रासायनिक खते तयार करण्यासाठी लागणारी फॉस्फरस आणि नायट्रोजनसारखी पोषक द्रव्ये मिळवण्यासाठी आपण भूमातेच्या गर्भात अधिकाधिक खोलवर कुदळ मारतो. महत्प्रयासाने ही पोषक द्रव्ये मिळवतो, त्यातून पिके पिकवतो आणि नैसर्गिक रुपात हाती आलेली सारी पोषक द्रव्ये मलजलातून पुन्हा ‘पाण्यात’ घालवतो. ब:याचदा तर हे मलजल आपण थेट नदी, नाले आणि तलावात सोडून देतो. त्यात असलेल्या फॉस्फेटच्या अधिक मात्रेमुळे मानवी आरोग्य तर धोक्यात येतेच, पण नैसर्गिक परिसंस्थेचेही आपण लचके तोडतो. त्यामुळे पाण्यातल्या प्राणवायूचे प्रमाण घटते आणि मासे, इतर जलचरांच्या जीवनचक्रावर त्याचा परिणाम होतो. एवढे सारे सव्यापसव्य करून पुन्हा आपल्या पायावर आपणच धोंडा पाडून घेण्यापेक्षा मानवी मूत्र आणि विष्ठा सुरुवातीलाच जर एकत्र होण्यापासून वाचवली आणि वेगवेगळी ठेवली तर त्यातले मौल्यवान पोषक घटक आपण सहजपणो मिळवू शकतो आणि कृषिधनासाठी त्याचा थेट वापरही करू शकतो.
मलमूत्रची टॉयलेटमध्येच वेगळी व्यवस्था हा त्यावरचा अगदी साधा आणि सोपा उपाय! जगात काही मोजक्या ठिकाणी त्यासंबंधीचे प्रयोग सुरू आहेत. वेगळ्या केलेल्या मूत्रच्या उपयोगाने शेते पिकू लागली आहेत, तरी अजूनही म्हणावा तसा त्याचा वापर वाढलेला नाही. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे सध्या घराघरांत आणि ठिकठिकाणी अस्तित्वात असलेली शौचालये! शिवाय जगभर सर्वत्र असलेले मलवाहिन्यांचे नि:सारण आणि शुध्दिकरण प्रकल्पांचे जुने जाळे. ही व्यवस्था मोडून नवे पर्याय उभे करणो आर्थिकदृष्टय़ा अवघड आहे, हे तर खरेच!
- पण अशक्य नाही, असे सांगणारे प्रयोग जगभरात होत आहेत (चौकट पहा)
मानवी मूत्र जगभरात शेतीसाठी किती उपयोगी ठरते आहे याचे अनेकानेक पुरावेही आहेत. स्वीडनमध्ये जव, दक्षिण आफ्रिकेत कोबी, पालक, मका आणि टोमॅटो, दक्षिण युरोपमध्ये कोबी, मेक्सिकोमध्ये लेटय़ूस, तामिळनाडूतील त्रिचीमध्ये केळी. अशी अनेक उदाहरणो देता येतील ज्यांनी मानवी मूत्रचा उपयोग करून आपापली शेती समृद्ध केलीय!.
पिवळ्या रंगाचे हे मानवी मूत्र आपल्याकडे घाण आणि दरुगधीचेच प्रतीक मानले जाते, पण खरेतर तर ते लखलखते द्रवरूप सोने आहे! भारताने आपल्या पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करून त्यात अधिक संशोधन केले असते आणि मानवी मूत्रपासून तयार होणारी खते वापरून शेतीची नैसर्गिक पध्दत विकसित केली असती तर आजवर लक्षावधी डॉलर्सच्या परकीय चलनातली आयात आपण वाचवू शकलो असतो. फक्त पैसेच नव्हे, तर आपली जमीनही आपण वाचवली असती.
- सुपीक, समृध्द मातीची रसरशीत जमीन आपल्या पुढल्या पिढीच्या हवाली करता आली असती.
अर्थात, अजूनही फार उशीर नाही झालेला!
दक्षिण आफ्रिकेतला
प्रयोग
मल-मूत्र हे दोन्ही वेगवेगळे होईल अशा प्रकारची स्वच्छतागृहे बांधणो खर्चिक असले, तरी ते व्यावहारिक ठरेल का हे पाहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत एक विस्तृत अभ्यास केला गेला. मानवी मूत्र वेगळे साठवून त्याचा खत म्हणून वापर करून होणारी शेती आणि काहीच खते न देता काढलेले पीक यांच्या जमा-खर्चाचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर या पाहणीत असे दिसून आले की मूत्र साठवणुकीसाठी वेगळी व्यवस्था उभारणो खर्चिक असले, तरीही त्यावर मिळणारे कृषी उत्पन्न पाहता, तो खर्च अंतिमत: वाजवीच ठरतो. शिवाय शेतजमिनीची उत्पादकता वाढते ती वेगळीच!
मानवी मूत्र विकण्याचा
व्यवसाय
पश्चिम आफ्रिकेतील निगर या देशाने याबाबतीत आणखी पुढचे पाऊल टाकले आहे. मानवी मूत्रतून खते तयार करून विकण्याचा व्यवसाय एखादे कुटुंब करू शकेल का, तो किफायतशीर ठरेल का, याचा अभ्यास या देशात झाला. मलमूत्रची स्वतंत्र व्यवस्था असलेले स्वच्छतागृह उभारण्याचा खर्च आणि त्यातून निर्माण होणारे खत विकून मिळणारे उत्पन्न यांचा मेळ लावला तर बांधकामाचा खर्च वसूल होऊ शकतो, असा या प्रयोगाचा निष्कर्ष आहे. या स्वच्छतागृहातून तयार होणारे खत खुल्या बाजारात विकले, तर संबंधित कुटुंब दोन वर्षात कजर्मुक्त होते आणि नफा कमावू लागते.
गाडा आणि
तिचाकी!
काही वस्तुस्थिती-
सर्वसाधारणपणो प्रत्येक व्यक्ती वर्षभरात सुमारे पाचशे लीटर्पयत मूत्रविसर्जन करते.
मानवी मूत्र शेतीतील खतासाठी खूपच उपयुक्त असून त्यात नायट्रोजन पंधरा ते एकोणीस टक्के, फॉस्फरस अडीच ते पाच टक्के आणि पोटॅशिअम साडेचार टक्के असते. हे सर्व किंमती मूत्र वाया जात असल्याने त्याच्या पुनर्वापराला चालना मिळण्यासाठी नाशिकच्या निर्मलग्राम निर्माण केंद्राने त्यावर संशोधन केले.
निर्मलग्राम निर्माण केंद्र
पर्यावरण स्वच्छतेसंदर्भात गेल्या अनेक वर्षापासून मूलगामी काम करणा:या नाशिकच्या निर्मलग्राम निर्माण केंद्रामध्ये मानवी मूत्रचा खत म्हणून वापर करण्याच्या वाटेतले अडथळे दूर करण्यासाठी संशोधन प्रकल्प राबविला गेला.
प्रकल्पाचा उद्देश
मानवी शरीरातून बाहेर पडणारे सारेच घटक रोगराईमूलक आणि किळसवाणो असल्याची मानसिकता सकारात्मकतेत बदलून वाया जाणा:या या धनाचा नागरिकांनी पुनर्वापर करावा यासाठी प्रय} करणो.
मानवी मूत्र गोळा करणो, त्याची साठवणूक आणि त्याची अत्यंत सुलभपणो वाहतूक करण्यासाठीची प्रक्रिया विकसित करणो.
मानसिक अडथळे
मूत्रचा तीव्र वास
मूत्र एका ठिकाणी साठल्यावर सडण्याची सुरू होणारी प्रक्रिया
मानवी उत्सर्जनातून बाहेर पडलेली प्रत्येक गोष्ट ‘अस्पर्श’ असल्याची जागतिक भावना.
प्रकल्प नेमका काय?
मानवी मूत्र खत म्हणून किती उपयुक्त आहे याचा शास्त्रीय अभ्यास करतानाच केंद्राचे प्रमुख श्रीकांत नावरेकर यांनी यांनी मूत्र जमा करणो आणि त्याची वाहतूक यासंदर्भातील अडचणी सुलभ कशा होतील यासाठी काही प्रयोग केले. प्रयोग करताना सुरुवातीलाच काही नियम, संकल्पही आखून घेण्यात आले.
मूत्रची थेट हाताळणी करावी लागणार नाही.
ज्या ठिकाणाहून मूत्र गोळा केले जाईल तो दरुगधीमुक्त असेल.
मूत्र आणि पाणी एकत्र होणार नाही यासाठीची व्यवस्था त्या ठिकाणी असेल.
गाडा आणि तिचाकी सायकल
मुत्रची दरुगधीमुक्त साठवण करण्यासाठी दोन छोटी आणि सुटसुटित अल्पखर्चाची वाहने (तीही इंधन लागणार नाही अशी) तयार करण्यात आली.
हातगाडा- रबरी चाके असलेला एक हातगाडा तयार करण्यात आला. यात प्लॅस्टिकचे तीस लीटरचे दोन कॅन व्यवस्थित ठेवता येतात. मूत्र असलेल्या जमिनीतील टाकीतून हातपंपाने हे मूत्र सहजपणो कॅनमध्ये भरता येते.
तिचाकी सायकल- जास्त साठा जास्त अंतरावर वाहून नेण्यासाठी एक तिचाकी डिझाईन करण्यात आली. या तिचाकीत तीस लीटरचे चार कॅन बसतात.
या वाहनांतून मूत्र नेतानाही त्याचा कुठल्याही प्रकारचा वास येत नाही शिवाय ते गोळा करतानाही थेट हाताळणी नाही.
उपयोग कुठे
करता येईल?
शाळा, कॉलेजेस, बसस्टॅड, बाजार, छोटे गाव. इत्यादि ठिकाणी याचा सहजपणो उपयोग करता येऊ शकेल.
एखाद्या गावात शेती किती आहे, वस्ती किती आहे, किती मूत्र गोळा होऊ शकतें, किती खत लागेल याचा विचार करून वितरण केले गेले तर सर्वानाच त्याचा फायदा होऊ शकतो. अशाप्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या युनिटसाठी त्यात आवश्यक ते बदल करून मूत्रखताच्या वापराद्वारे शेती समृद्ध करता येईल आणि सर्वासाठीच हानिकारक असलेल्या रासायनिक खतांचा वापर कमी करता येईल, जमिनीची सुपिकता टिकवून ठेवता येईल. मोठय़ा प्रमाणातील वापरासाठी मोठय़ा टॅँकरचाही उपयोग करता येऊ शकतो. कंपोस्ट खत तयार करतानाही पाण्याबरोबर मूत्रचा वापर केला, खत तयार झाल्यानंतर त्याच्यात मूत्र जिरवले तर त्या खतात जास्त पोषक घटक असतील.
नाशिकच्या निर्मल ग्राम निर्माण केंद्राने केलेला हा प्रयोग कोणीही करू शकतो.
संपर्क: निर्मल ग्राम निर्माण केंद्र, गोवर्धन, गंगापूर, नाशिक. दूरध्वनी- 0253-2231598.
(लेखिका प्रख्यात पत्रकार/संपादक असून पाणी आणि सार्वजनिक स्वच्छता या विषयातील तज्ज्ञ आहेत. भारत आणि सिंगापूर येथील पर्यावरण संस्था आणि वृत्तपत्रत त्यांनी काम केले आहे. सध्या त्या अमेरिकेत असतात.)