साहित्य सफर

By admin | Published: June 24, 2016 05:48 PM2016-06-24T17:48:24+5:302016-06-25T14:45:33+5:30

माणसाला जात्याच प्रवासाची ओढ. सुरुवातीला गुहेतल्या विस्तवाभोवती नवलाईची प्रवासवर्णनं तो ऐकत असे. लिहाय-वाचायला शिकल्यानंतर विविध लेखकांची प्रवासवर्णनं तो चवीने वाचायला लागला. कल्पनाशक्तीने निर्माण केलेल्या अतीव सुंदर प्रवासवर्णनातही तो दंग झाला

Literature Travel | साहित्य सफर

साहित्य सफर

Next
>-  डॉ.उज्वला दळवी
 
माणसाला जात्याच प्रवासाची ओढ. सुरुवातीला गुहेतल्या विस्तवाभोवती नवलाईची प्रवासवर्णनं 
तो ऐकत असे. लिहाय-वाचायला शिकल्यानंतर विविध लेखकांची प्रवासवर्णनं तो चवीने वाचायला लागला. कल्पनाशक्तीने निर्माण केलेल्या अतीव सुंदर प्रवासवर्णनातही तो दंग झाला. आता यापुढची साहित्य-सफर अणुगर्भातल्या निरुंद वाटांवरून होईल, जीन्सच्या नागमोडी शिडय़ांवरून घडेल की कॉम्प्युटरच्या बसमधून ते पाहायची उत्कंठा आहे. 
 
 
तराफ्यावरून जाताना संथ, अथांग नदीवरच्या नीरव शांततेत बडबडणं, खिदळणं जमतच नसे. पाठीवर निजून तारे बघत मैलोन्मैल तरंगत वाहवत जाणं तेवढं होई.’
स्वातंत्र्याच्या शोधात घरून पळालेला साधाभोळा आफ्रिकन गुलाम, त्याला मदत करणारा गोरा अमेरिकन निरागस पोरका पोर आणि त्यांच्या दूरपल्ल्याच्या ‘पळ’वाटेत त्यांना आडोसा, आसरा, आधार देणारी मिसिसिपी नदी या तिघांची हेलावून सोडणारी गोष्ट मार्कट्वेनने एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला 'Adventures of Huckleberry Finn' या कादंबरीत सांगितली.
 
हकलबेरी आणि जिम
जात्याच प्रवासाची ओढ असलेला मानव गुहेतल्या विस्तवाभोवती, भिंतीवरच्या हालत्या सावल्यांच्या साक्षीने नवलाईची प्रवासवर्णनं ऐकत असे. नंतर तो लिहाय-वाचायला शिकला. त्याला कधीही न भेटलेल्या लेखकांनी लिहिलेली, त्याने कधी न पाहिलेल्या देशांतली प्रवासवर्णनं चवीने वाचायला लागला. ते प्रवास खरेच असावेत अशी त्याची अट नव्हती. मग त्याच्यासाठी देशोदेशींच्या प्रतिभावंत लेखकांनी आपल्या कल्पनाशक्तीने अतीव सुंदर प्रवासवर्णनं निर्माण केली. त्यातली काही ख:या भूगोलावर आधारलेली होती.  
कालिदासाने आकाशगामी मेघदूताला साधारण नागपूरजवळच्या रामगिरीपासून हिमालयापार अलकापुरीपर्यंतचा शाब्दिक नकाशाच दिला. दशकुमारचरितात दहा कुमारांच्या दहा दिशांच्या प्रवासाच्या निमित्ताने दंडीने वाचकांना सौराष्ट्र ते अंग, श्रवस्ती ते आंध्र अशी सातव्या शतकातल्या उत्तर-मध्य भारताची सैर घडवली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला जेरोम-के-जेरोमने लंडन-ऑक्सफर्ड टेम्ससफरीसाठी गाइड म्हणून लिहिलेल्या 'Three Men in a Boat' या प्रवासवर्णनाने त्याकाळच्या खुशालचेंडू तरु णांच्या विचारांची-जीवनशैलीची मार्मिक टर उडवली.  
जेव्हा वास्तवाचं बंधन झुगारून लेखकांनी कल्पनेला मोकाट सोडलं तेव्हा दिशा-काळ-तर्क या सा:यांच्या सीमा ओलांडून, टापांखाली नवलाईचे प्रदेश निर्माण करत मनोरथाचे घोडे चौखूर उधळले.  
अरबी भाषेतल्या सुरस कथांमधला सिन्दबाद हा हाडाचा प्रवासी. सफरीत कितीही संकटं आली तरीही पुन्हा नव्या सफरीला जायची त्याला अनावर ओढ लागे. त्याला हि:यांनी भरलेली दरी, सोन्याचे गोटे पात्रत असलेली नदी, हस्तीदंताने भरलेली गुहा वगैरे खजिना तर मिळालाच; पण त्याबरोबरच महाकाय पक्षी, हत्ती गिळणारे साप, नरमांस भक्षकही भेटले. प्रत्येक वेळी जीव-धन-सा:यासकट सुटून तो आपल्या गावाला, बगदादला पोचला आणि कृतकृत्य तालेवार झाला.
 
बुटक्यांनी जखडलेला गलिव्हर
एका ख:याखु:या, बढाईखोर जहागीरदाराच्या प्रवास-बातांची खिल्ली उडवायला रास्प नावाच्या लेखकाने 1785 साली फ्रेंचमध्ये निनावी लेख लिहिले. लेखांना नावाच्या कुंकवाचा धनी नसल्यामुळे त्यांच्या प्रकाशकाने, वाचकांनी आणि अनेक देशांतल्या भाषांतरकारांनी त्यांच्यात आपापल्या कल्पनाशक्तीनुसार किश्श्यांची भर घातली. त्या सगळ्या मालमसाल्याची एकत्रित अशी जी रु चकर भेळ बनली ती म्हणजेच ' ADventures of Baron Munchhausen' त्या कपोलकल्पित कथांत कमरेतून कापल्या गेलेल्या अध्र्या घोडय़ावरून केलेली आणि तोफगोळ्यावर बसून केलेली चंद्राची सहलसुद्धा आहे.
काल्पनिक साहित्यात चंद्रलोकीच्या प्रवासाचे अनेक तर्कातीत-विज्ञानातीत किस्से आहेत. बाणभट्टाच्या सातव्या शतकातल्या कादंबरीत नायक-नायिकांचा जन्मजन्मांतरीचा प्रवास तर आहेच; शिवाय पुंडरीकाच्या देहाचा चंद्रलोकापर्यंतचा फेराही आहे. गॉडविनच्या The Man of the Moone (1634) मधल्या गोन्साल्विसने तर चांद्रभाषा, तिथला धर्म आणि एकंदरीत समाजरचना वगैरेंची ‘माहिती’ दिली आहे! त्याच्या चंद्रवाहनाला उंच उडणारे बळकट पक्षी जुंपले होते. बर्जेरॅकच्या Voyge dans la lune (1657) मधला सायरॅनो यांत्रिक वाहनातून चंद्रावर जाऊन तिथल्या चतुष्पाद रहिवाशांना भेटून आला. त्यानंतर तो सूर्यावरही पोचला!
तशा भन्नाट कल्पनाविलासानंतर विज्ञानरंजनाचा काळ आला. एच. जी. वेल्सच्या The first men on the Moon (191) मध्ये नव्यानेच शोधलेल्या वजनरहित पदार्थाचं बनलेलं वाहन वापरून नायक चंद्रावर पोचला. ज्यूल व्हर्नच्या From The Earth to the Moon (1865) आणि Around the Moon (1875) मध्ये तोफगोळ्यावरून माणूस चंद्रापर्यंत पोचवला गेला. त्या तोफेच्या लांबीरुंदीबद्दल शास्त्रोक्त ऊहापोह झाला. Around the Moon  मध्ये नायकाने तपशीलवार चंद्रनिरीक्षण केलं. आर्थर सी. क्लार्कने 1951 साली लिहिलेल्या कथेतला नायक 1978 साली चंद्रावर उतरला. नील आर्मस्ट्रॉन्गने ते विज्ञानस्वप्न 1969 सालीच खरं केलं.
एकोणिसाव्या शतकातला ज्यूल व्हर्न नावाचा भूगोलाचा अभ्यासक आम जनतेला विज्ञान शिकवणा:या एका मासिकात पगारी लेखक होता. त्यासाठी नकाशांचा आणि स्थळांचा अभ्यास करून त्याने ‘असामान्य प्रवासवर्णनां’ची मालिकाच सादर केली. Five weeks in a Balloon हे त्यातलं पहिलं प्रवासवर्णन. त्यानंतर Journey to the Center of the Earth मध्ये पृथ्वीच्या गर्भातला प्रवास आणि Twenty Thousand Leagues under the Sea मधली सागरतळाची पाणबुडीतली दीर्घ सफर (1869) झाली.
 
पाणबुडीतून सागरतळाशी
Around the World in 80 Days मध्ये पृथ्वीप्रदक्षिणोच्या नावीन्यपूर्ण पद्धतींसोबत पूर्वेकडच्या प्रवासाने वाचणारा दिवसही त्याने दाखवला. त्या काळच्या विज्ञानातल्या अभिनव घडामोडींच्या सुरस कहाण्या त्याने त्या भ्रमणगाथांतून सर्वसामान्यांपर्यंत पोचवल्या. ख:या आयुष्यात मात्र व्हर्नची धाव त्याच्या नॅन्टेस गावापासून पॅरिसपर्यंतच, दोनशे मैलांपुरतीच मर्यादित होती! 
त्यानंतर विज्ञानरंजन चंद्रापार गेलं. 
आर्थर सी. क्लार्कच्या ‘स्पेस ओडिसी’मध्ये सूर्यमालेचा फेरफटका मुंबईच्या लोकल प्रवासाइतका सर्रास चालतो, तर त्याच्या ‘रान्देवू विथ रामा’मध्ये सूर्यमालेपारचे खेकडय़ासारखे ‘बायॉट’ गुरूच्या चंद्रामागे लपून पृथ्वीवर करडी नजर ठेवतात. आयङॉक असिमॉव्हही वाचकांना सूर्यमालेचा लोकल प्रवास सर्रास घडवतो आणि अधेमधे दूरच्या आकाशगंगांनाही भोज्जा करवून आणतो. स्टार ट्रेकच्या सहलीही तशाच असतात.
एच. जी. वेल्सने 'The Time Machine' लिहून वाचकांच्या कल्पनेला इ.स. आठ लाख आणि तीन कोटी इतक्या दूरच्या भविष्यकाळापर्यंत नेऊन आणलं. 
विज्ञानरंजनाने त्रिकाल-त्रैलोक्य-गामी प्रवास तर केलाच, पण त्याखेरीज The FantasticVoyageम ध्ये शास्त्रज्ञांनी सूक्ष्मरूपाने मानवी रक्तवाहिन्यांतून मेंदूपर्यंत आणीबाणीची चक्करही मारली. आता यापुढची साहित्य सफर अणुगर्भातल्या निरुंद वाटांवरून होईल, जीन्सच्या नागमोडी शिडय़ांवरून घडेल की कॉम्प्युटरच्या बसमधून ते पाहायची उत्कंठा आहे.
 
कल्पनेतला काही प्रवास धर्माच्या मार्गावरही झाला. Pilgrim's Process मधला, विनाशाच्या शहराहून निघालेला नायक पाठुंगळीवर पापांचं ओझं वागवत पापक्षालनाच्या पायवाटेवरून चालत गेला. तो वाटेत नीतिमत्तेच्या गावातून गेला, नैराश्याच्या दलदलीत फसला, त्याला चुकीची वाट दाखवणारे बेरकी वाटाडे भेटले. शेवटी त्याच्या पापाचं गाठोडं गळून पडलं आणि देवाच्या मदतीने तो मोक्षाच्या ठिकाणाला पोचला. सतराव्या शतकात पापाचा बागुलबुवा करणा:या धर्मसत्तेमुळे त्रसलेल्या बहुजन समाजाला त्या पुस्तकाने मोठाच दिलासा दिला.
अस्तित्वातच नसलेल्या गावांचा प्रवास आणि तिथल्या राजकीय गोंधळाचं यथेच्छ वर्णन हे अविचारी राज्यकत्र्याना शालजोडीतले अहेर द्यायलाही फारच सोयीचं ठरे. जोनाथन स्विफ्टच्या 1726 मधल्या Gulliver's Travels मधला गलिव्हर हा खलाशी दर्यावर भरकटत आधी बुटक्या लोकांच्या, मग प्रचंड मोठय़ा लोकांच्या देशात, त्यानंतर संशोधकांच्या बेटांवर वगैरे पोचला. शेवटी तो तत्त्वज्ञानी घोडय़ांच्या गावाला गेला. प्रत्येक ठिकाणच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीच्या वर्णनातून त्याने त्या काळातल्या इंग्लंडमधल्या स्थितीचं विडंबन केलं.
 
(लेखिका गेली तीस वर्षे सौदी अरेबिया आणि त्याआधी इंग्लंडमध्ये वास्तव्याला होत्या. ‘मानवाचा प्रवास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.)
 

Web Title: Literature Travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.