लहान भावाचा राग?

By admin | Published: May 9, 2015 06:52 PM2015-05-09T18:52:17+5:302015-05-09T18:52:17+5:30

संकटकाळी मदत केल्याची शेखी मिरवणा:या भारतावर आणि भूकंपाचे भांडवल करणा:या भारतीय माध्यमांवर नेपाळची जनता खरंच संतापली आहे का?

Little brother's anger? | लहान भावाचा राग?

लहान भावाचा राग?

Next

 राहुल रनाळकर

 
 
 
संकटकाळी मदत केल्याची शेखी मिरवणा:या भारतावर आणि भूकंपाचे भांडवल करणा:या भारतीय माध्यमांवर नेपाळची जनता खरंच संतापली आहे का?
- नेपाळच्या रस्त्यांवर भारतविरोधी मोर्चे निघाले, पण त्यात गर्दी तुरळक होती.
भारतावर संतापलेल्यांपेक्षा भारताप्रती कृतज्ञ असलेले नागरिकच काठमांडूच्या उद्ध्वस्त गल्ल्यांमध्ये मला सतत भेटत होते. 
.. मग भारतावर खार खाऊन आहे, ते नेमके कोण??
 
पाळमधील भूकंपाच्या अवघ्या चार दिवसांनंतरची गोष्ट. काठमांडूत फिरत होतो. पत्रकार भेटले. चर्चा झाली.  ज्येष्ठ भारतीय पत्रकार रामाशीष म्हणाले, ‘बारकाईने पाहा. या देशातली काही वर्तमानपत्रे पाक-पुरस्कृत असतात.’
त्या धावपळीत क्रांतीपूर नावाचे दैनिक खास जाऊन विकत घेतले. रामाशीष म्हणाले, ‘हे तर पक्के पाकिस्तानी दैनिक. भारतविरोधी मोहिमच या दैनिकाने सुरु केली आहे. क्रांतीपूरचे एक इंग्रजी भावंडही आहे ‘काठमांडू पोस्ट.’ 
- क्रांतीपूर दैनिकाच्या स्थापनेच्या दिवशीच हे दैनिक पाक पुरस्कृत असल्याचा आरोप करत 9 पत्रकारांनी सामूहिक राजीनामा दिल्याचेही कळले.
 ‘इंडियन मीडिया गो होम’चे नारे नेपाळमध्ये असताना आणि परत आल्यावरही ऐकले, तेव्हा हे सगळे आठवत होते.  नेपाळमध्ये भूकंपानंतर भारतविरोधी घोषणाबाजी झाली, क्वचित मोर्चेही निघाले. नेपाळ तर भारताचा हितचिंतक किंवा मित्र राष्ट्र. मग असे का झाले? यालाही अनेक पदर आहेत. 
नेपाळ भारताचा मित्रदेश किंवा लहान भाऊ ही भूमिका फार वरवरची आहे. नेपाळ कधीही मनापासून भारतासोबत नव्हता, आजही नाही. 
नेपाळवर चीनचा मोठा वरचष्मा आहे. किंबहुना सगळ्य़ाच प्रमुख देशांची नेपाळवर नजर आहे. नेपाळमध्ये 23 देशांचे दूतावास आहेत. दोन कोटी 68 लाख जनतेपैकी 75 लाख भारतात, 4क् लाख अन्य देशांमध्ये म्हणजे सुमारे एक कोटी 6क् लाख लोक सध्या नेपाळमध्ये राहतात. एवढय़ा जनतेसाठी म्हणजे साधारण मुंबईएवढय़ा लोकसंख्येसाठी नेपाळमध्ये तब्बल दोन हजार वृत्तपत्रे आहेत, आणि एफएम चॅनल तब्बल पाचशे.
एका चिमुकल्या देशात एवढी माध्यमांची संख्या कशासाठी? असा साधा प्रश्न कोणाच्याही मनात डोकावू शकतो. तर ही माध्यमे विविध देशांकडून हेरगिरीसाठी वापरली जातात. तिबेट वाचवण्यासाठी चीनला नेपाळ अत्यंत गरजेचा आहे. त्यासाठी चीन कोणत्याही थराला जाऊ शकतो. तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी यांच्यासह अनेक देशांचा पाठिंबा आहे. चीनला खिळखिळे करण्यासाठी तिबेटचे स्वातंत्र्य अमेरिकेला गरजेचे वाटते. भारताचाही स्वतंत्र तिबेटला अप्रत्यक्ष पाठिंबा आहे. दलाई लामा यांना आश्रय देऊन आणि तिबेटी भिक्खूंना भारतातील मुक्त प्रवेशाने आपण त्यांच्या पाठीशी असल्याचे वेळोवेळी भारताने दाखवून दिले आहे. चीनला हीच सल आहे. त्यामुळेच चीन आता लुम्बिनीमध्ये कमालीचा सक्रिय झाला आहे. लुम्बिनीच्या निमित्ताने भारतात हेरगिरीची कोणतीही संधी चीन सोडत नाही. पाकिस्तान तर चीनचा जिवाभावाचा मित्र. नेपाळची भूमी पाकिस्तानी अतिरेक्यांसाठी अत्यंत सुपीक भूमी मानली जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यूहनीतीच्या दृष्टीने नेपाळ अत्यंत संवेदनशील आहे. भारतासाठी नेपाळचे महत्त्व सर्वाधिक आहे, ते म्हणूनच!
 जेव्हा भारत पाकिस्तान क्रिकेटची मॅच होते, तेव्हा पाकिस्तान जिंकल्यास नेपाळमध्ये फटाके फोडले जातात. आनंदोत्सव साजरा होतो. नेपाळमध्ये भारतविरोधी भावना किती तीव्र आहे, याचेच हे द्योतक! चीन-पाकिस्तान या भावनेला खतपाणी घालण्याचे काम करतात. पण या सगळ्यांमध्ये भौगोलिक जवळीक अधिक असतानाही भारताकडून कधीही नेपाळमध्ये सद्भावना विकसित करण्याचा प्रयत्न झाला नाही. भारत नेपाळला प्रचंड मदत करतो. पण ही मदत चीनवर वरचष्मा राखण्यासाठी  असते, अशी  नेपाळमधली जनभावना  आहे.  अनेकदा  तर  थेट ब्लॅकमेल करून नेपाळ भारताकडून मदत उकळत राहिला आहे. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना नेपाळला 11क्क् किलोमीटर महामार्गाची निर्मिती करायची होती. तेव्हा   ‘तुम्ही निधी देणार? की चीनकडून घेऊ?’ असे थेट ब्लॅकमेलिंग नेपाळने केले होते. भारत लगेचच तयार झाला, आणि भारताच्या निधीमधून या महामार्गाची निर्मिती झाली.
सध्यादेखील अगदी आगपेटी, मीठ, मिरची, तांदूळ या जीवनावश्यक वस्तूंसह असंख्य वस्तूंसाठी नेपाळ भारतावर अवलंबून आहे. चीनमधून नेपाळला काहीही मिळत नाही. पण चीनने नेपाळमध्ये असंख्य माणसे तयार केली आहेत. भारताने काँक्रीट उभारले, चीनने माणसे बनवली. इथेच भारताची मोठी चूक झाल्याचे तज्ज्ञ मानतात.
 सध्या नेपाळच्या प्रत्येक क्षेत्रत चिनी लोकांची घुसखोरी आहे. अगदी टॅक्सी, रिक्शावाल्यांपासून ते छोटे दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, सरकारी कर्मचारी, अधिकारी, राजकीय संघटना, सामाजिक संघटना या सगळ्यांमध्ये चिनी लोकांचा शिरकाव झालेला आहे. चीन अथवा पाकिस्तानविरोधी एकही मोर्चा नेपाळमध्ये निघत नाही. म्हणजे भारताकडून सगळी मदत घेऊनही भारताविरोधी कारवाया करायच्या हा आता नेपाळचा स्वभाव बनला आहे. 
 25 एप्रिलला आलेल्या भूकंपानंतरच्या भारतविरोधी वातावरणात आणि पूर्वी असलेल्या भारतविरोधी वातावरणात मूलभूत फरक मात्र आहे. आता नेपाळ भारतावर चिडल्याचे जे चित्र निर्माण केले जाते आहे, त्यात भारतीय मीडियाची खास करून इलेक्ट्रॉनिक मीडियाची मोठी भूमिका आहे. संपूर्ण नेपाळ जमीनदोस्त झाल्याचे चित्र भारतीय इलेक्ट्रॉनिक मीडियाने जगासमोर मांडले. यामुळे नेपाळमध्ये पुढच्या काळात पर्यटकांची संख्या कमालीची रोडावणार आहे. वास्तविक इलेक्ट्रॉनिक मीडियानेदेखील जे मांडले तो वस्तुस्थितीचा विपर्यास नव्हता. जिथे सर्वाधिक नुकसान झाले, ते छायाचित्रण पुन्हा पुन्हा दाखवले गेले. पण त्यामुळे संपूर्ण नेपाळ ढिगा:यांखाली गाडला गेला आहे, असे चित्र मांडल्याचा आरोप नेपाळमधील काही गट करू लागले. त्यातून भारतविरोधी वातावरणाला खतपाणी घातले जात आहे. पण ही घोषणाबाजी आणि तुरळक मोर्चे चीन आणि पाकिस्तानकडून ‘पेड’ होते, असेही काही गट मानतात. जे तुरळक भारतविरोधी मोर्चे नेपाळमध्ये  निघाले, त्यात पूर्वी मोठा जमाव असायचा. यावेळी ती संख्या 2क्-25 वर आली. 
या मोच्र्याना चिनी आणि पाकिस्तानी माध्यमांनी चांगलेच उचलून धरले. नेपाळमध्ये कसे भारतविरोधी वातावरण तापतेय, हे त्यांना दाखवता आले. वास्तविक, भूकंपानंतर अवघ्या तीन तासांत मदत घेऊन भारतीय  सैन्याची विमाने काठमांडू विमानतळावर उतरलेली होती. एनडीआरएफच्या पथकाने सर्वात आधी बचाव अभियान सुरू केले. जगभरातून जितकी बचावपथके नेपाळमध्ये दाखल झाली, त्यात सर्वाधिक यश भारताच्या एनडीआरएफला मिळाले. ढिगा:यांखालून जिवंत बाहेर काढण्यात आलेल्या व्यक्तींमधील 8क् टक्के व्यक्तींना एकटय़ा एनडीआरएफने वाचवले आहे.  अन्न, पाणी, वैद्यकीय सुविधा, तंबू यांचीही सर्वात आधी मदत भारताने नेपाळमधील दूरवरच्या क्षेत्रंर्पयत पोहोचवली.
याचा परिणाम म्हणजे, भारताबद्दल नेपाळी जनतेच्या मनात आत्मीयता निर्माण झाली. हे चीन आणि पाकिस्तानला रुचणारे नव्हते. भारतविरोधी वातावरणासाठी सतत प्रयत्नशील असणारे हे दोन्ही देश हतबल ठरले, तेव्हाच भारतीय मीडियाचे निमित्त घेऊन भारतविरोधी वातावरण तापवण्याचा प्रयत्न नेपाळमध्ये सुरू झाला. हे वातावरण अधिक प्रखर करण्याचा चीन, पाकिस्तानचा प्रयत्न आहे. नेपाळच्या पर्यटनावर भूकंपाचा परिणाम होणो अत्यंत स्वाभाविक आहे. तथापि, पर्यटनाची गाडी पूर्ववत होण्यास अधिक कालावधी गेल्यास त्याचे खापरही चीन आणि पाकिस्तान भारतावर फोडणार हे निश्चित आहे. एकंदरीत काय, तर भारताने जे स्थान आता मिळवले आहे, ते कायम ठेवून नेपाळमध्ये भारत समर्थकांची मोठी फळी तयार करण्याला प्राधान्य द्यायला हवे. अन्यथा संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेला नेपाळ चीनच्या दहशतीखाली, आर्थिक दबावाखाली येऊन भारतासाठी धोका बनू शकतो. 
 
नेपाळ आणि चीनच्या मधला 
‘हिमालय’
 
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीचे शहर संपादक आहेत. त्यांनी भूकंपानंतर नेपाळमध्ये वास्तव्य 
आणि विशेष वार्ताकन केले ) 

Web Title: Little brother's anger?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.