एका तलावाची ‘जीवनदायी’ कथा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 06:00 AM2019-07-14T06:00:00+5:302019-07-14T06:00:05+5:30

केरळ राज्यातला वेल्लायणी तलाव. पाण्याचा भरपूर साठा, कित्येक हेक्टर शेतीला पाणीपुरवठा, स्थलांतरित पक्ष्यांचे निवार्‍याचे ठिकाण. काही वर्षापूर्वी या तलावाला जणू दृष्ट लागली. केर, कचर्‍यानं तो भरला. तलावात भर घालून लोकांनी त्या जागा कब्जात घेतल्या. तलाव जणू नामशेष होत आला; पण....

The live story of the life story of a lake in Kerala | एका तलावाची ‘जीवनदायी’ कथा.

एका तलावाची ‘जीवनदायी’ कथा.

Next
ठळक मुद्दे स्वस्थी फाउण्डेशनच्या पुढाकारातून लोकसहभागामुळे हाच तलाव आता पुन्हा जिवंत होतो आहे.

मोहन पिल्लाई

वेल्लायणी तलाव.
त्नावणकोरच्या राजाच्या राज्यातला नीलमणी. केरळ राज्यातला दुसर्‍या क्र मांकाचा मोठा तलाव.. 
1921 साली 1853 एकरवर पसरलेलं 160 प्रजातीच्या पक्ष्यांचं निवासस्थान. त्यातले काही इथेच राहणारे, तर काही पार सैबेरियापासून दरवर्षी इथे येणारे पाहुणे.. तलावाची सरासरी खोली 20 फूट असल्यामुळे पाण्याचा जणूकाही अक्षय साठा या तलावात होता.
आजूबाजूच्या कित्येक मैल शेतीला पाणीपुरवठा यातून व्हायचा.
या तलावाच्या कुशीत अख्खं शहर वसलं आणि भरभराटीला आलं.
त्नावणकोरच्या राजाने या तलावाच्या स्वर्गीय सौंदर्याचं रोज दर्शन व्हावं म्हणून या तलावाच्या काठावर प्रासाद बांधून घेतला.
पण या नांदत्या तलावाला जणू दृष्ट लागली.
सुरुवात झाली ती 1950-60 च्या अन्नतुटवडय़ाने. त्यावेळच्या केरळ सरकारने तलावाचा काही भाग अधिग्रहित करून त्यात भर घालून तिथे शेती करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यायचं ठरवलं. अन्नाच्या तुटवडय़ावर उत्तर शोधण्याच्या प्रयत्नांपैकी हाही एक प्रामाणिक प्रयत्न होता; पण तो फसला.
काही र्वष त्या भरावावर शेती करता आली; पण नंतर मात्न ती जागा दलदलीने भरून गेली आणि तिथे शेती करणं अशक्य झालं. या प्रयोगात तलावाच्या जवळजवळ दोन तृतीयांश भागाचा बळी गेला. पण खरं नुकसान झालं ते त्याच्याही नंतर. 
यानंतर तिथे खासगी मिळकतीच्या पाटय़ा लागायला लागल्या. त्यांनी तलावाचं पाणी आपल्या जागेत येऊ शकणार नाही, इतकी भर तलावात घातली. अनेकांनी बनावट कागदपत्ने सादर करून या जागा आपल्या नावावरही करून घेतल्या. या खटपटीत तलावाचा एकूण आकार 400 एकरपेक्षाही कमी झाला; पण वेल्लायणी तलावाचं दुर्दैव इथेच संपलं नाही.
काही लोकांनी (बहुदा उदात्त हेतूने) तलावात मत्स्यालायातले मासे आणून सोडले आणि झाडं लावली. वेल्लायणी तलावाच्या पाण्यात त्या माशांची आणि झाडांची बेसुमार वाढ झाली.
त्यापाठोपाठ आले ते आजूबाजूचा मैला वाहून आणणारे ड्रेनेजचे पाइप्स. आणि सगळ्यावर नेहमीप्रमाणे कडी केली ती प्लॅस्टिकने!
हजारो-लाखो लोकांनी वापरून टाकून दिलेल्या प्लॅस्टिकची विल्हेवाट लावणं हा कुठल्याही प्रशासनासाठी कायमच डोकेदुखीचा विषय असतो आणि त्यासाठी आता 385 एकर उरलेल्या बिचार्‍या वेल्लायणी तलावाइतकी सोयीची जागा कुठे शोधूनही सापडली नसती..
आज केरळ पाणी प्राधिकरण 5 लाख घरांसाठी सुमारे 2 कोटी लिटर पाण्याचा उपसा या तलावातून करतं. या पाण्याची प्रयोगशाळामधून वेळोवेळी चाचणी घेण्यात आली, त्याचे निष्कर्ष निराश करणारे होते. अतिशय दूषित असलेलं हे पाणी लाखो लोक पिण्यासाठी, अंघोळीसाठी आणि इतर घरगुती कामांसाठी वापरत होते.
या तलावाचा सुमारे 70 टक्के पृष्ठभाग पाणवनस्पतींनी आच्छादला गेला होता. यापैकी बहुतेक सगळ्या पाणवनस्पती इथल्या परिसंस्थेतल्या नव्हत्या आणि त्यांच्यामुळे होणारं नुकसानही जास्त होतं. बव्हंशी हायसिंथ, साल्व्हिनिया मोलेस्टा आणि कमळ अशा वनस्पतींनी भरलेला हा तलाव चहूबाजूंनी जसा आक्र सत होता तसाच तळाकडूनदेखील उथळ होत चालला होता. या पाणवनस्पतीचं आयुष्य संपल्यावर त्या बुडून तळाशी जातात आणि तिथेच राहतात आणि त्यांचे थर साठत जातात. अशा अनेक कारणांनी आजघडीला या तलावाची सरासरी खोली 6 फुटांवर आली आहे. अर्थातच त्यामुळे त्यातील पाण्याचा साठाही कमी झाला आहे.
एकेकाळच्या नितांत सुंदर वेल्लायणी तलावाच्या मृत्युलेखाची शेवटची काही पानं माणूस आणि नियती मिळून लिहित असताना त्यात प्रवेश केला तो स्वस्थी फाउण्डेशनने. या तलावाला तातडीने वाचविण्याची गरज होती. 
पण अशा सगळ्या ठिकाणी अनेक हितसंबंध गुंतलेले असतात, तिथे काम करू पाहणार्‍यांच्या हेतूंवर शंका घेणारे लोक असतात आणि दुर्दैवाने सरकारी औदासीन्य तर पाचवीला पूजलेलं असतं. त्यामुळेच कितीही तातडीची निकड असली तरी वेल्लायणी तलावाच्या पुनरुज्जीवनाचं काम सुरू करणं सोपं नव्हतं.
अशात केरळला अक्षरशर्‍ बुडवून टाकणारा महाप्रचंड पूर आला. कुठल्याही पाणीसाठय़ापासून मैलोन्मैल अंतरावर असणार्‍या घरांमध्येही दहा-दहा फूट पाणी आलं आणि या पाण्याच्या बिघडलेल्या गणिताबद्दल लोकांनी गंभीरपणे विचार करायला सुरु वात केली. विचार विचारांच्या पातळीवर राहून जाणार एवढय़ात, म्हणजे अतिवृष्टीपाठोपाठ पाचच महिन्यांनी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी मात्न विचारांची जागा कृतीने घेतली.
वेल्लायणी तलाव पुनरूज्जीवन प्रकल्प सुरू करण्यासाठी स्वस्थी फाउण्डेशनसाठी ही योग्य संधी होती. ही संधी साधून स्वस्थी फाउण्डेशनने स्थानिक रहिवासी, सरकार आणि त्यात स्वारस्य असणार्‍या सगळ्या व्यक्ती आणि संघटनांची मोट बांधत एक सर्वसमावेशक प्रकल्पाची मांडणी केली. 
या प्रकल्पामध्ये वेल्लायणी तलावाची स्वच्छता करण्यापासून ते त्या तलावाची कायमस्वरूपी निगा राखली जावी यासाठी वॉटर स्पोर्ट्सर्पयत अनेक बाबींचा साकल्याने विचार केलेला होता. 
या प्रकल्पाचा पहिला टप्पा ‘स्टेट वेटलॅण्ड्स ऑथिरिटी ऑफ केरळ’ यांच्या परवानगीने सुरू झाला. या ऑथिरिटीने वेल्लायणी तलाव पुनरूज्जीवन प्रकल्पाची उद्दिष्टय़े मान्य केली आणि 25 एप्रिल 2019 रोजी हा प्रकल्प राबविण्यास सुरु वात झाली. 
या प्रकल्पाला केरळ राज्य सरकारने 100 टक्के अनुदान जाहीर केलं आहे. कल्लीयुर आणि वेन्गनूरसारख्या पंचायत, त्रिवेंद्रम सिटी कॉर्पोरेशन यांचं पूर्ण सहकार्य या प्रकल्पाला मिळालेलं आहे. केरळ राज्याचा सिंचन विभाग, पर्यटन विभाग आणि महसूल विभागही या प्रकल्पात त्यांचं योगदान देत आहे. या कामाला सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. अनेक सामाजिक संस्था त्यात काम करायला पुढे सरसावल्या आहेत; पण या प्रकल्पाला खरं बळ मिळालंय ते स्थानिक रहिवाशांच्या सहभागामुळे! कारण स्थानिकांचा सहभाग आणि सहकार्याशिवाय कुठलाही प्रकल्प कायमस्वरूपी चालू शकत नाही. आणि ज्यावेळी हे सगळे घटक एकत्न येतात त्यावेळी कुठलाही प्रकल्प यशस्वी झाल्याशिवाय राहात नाही.
वेल्लायणी तलाव पुनरु ज्जीवन प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण झाल्यावर अशाच स्थितीत असणार्‍या इतर तलावांच्या पुनरूज्जीवनासाठी स्फूर्तिदायक ठरेल. कारण या प्रकल्पातून सगळ्यात महत्त्वाचा संदेश जगासमोर जाणार आहे, तो म्हणजे, ‘आपण करू शकतो!’.

****

पहिल्या टप्प्यातील उद्दिष्टे
1.     पाणथळ जागेतील परिसंस्थेचे पुनरु ज्जीवन आणि  सक्षमीकरण करणे.
2.     वेल्लायणी तलावाच्या जैवविविधतेचे रजिस्टर बनवणे आणि त्याचे मॅपिंग करणे.
3.     वेल्लायणी तलावाचे व्हिडीओ डॉक्युमेंटेशन करणे.
4.     कायमस्वरूपी चालू राहातील असे, पाणवेलीची उपयुक्तता वापरणे अशासारखे प्रकल्प राबविणे.

*****

पुनरूज्जीवन प्रकल्पाचा कृती आराखडा
1. वेल्लायणी तलाव परिसरातील प्राणी व वनस्पतींची नोंद ठेवण्यासाठी दर महिन्याचे फोटो रजिस्टर ठेवणे; जेणेकरून स्थलांतर करणार्‍या प्रजातींचीही नोंद केली जाईल.
2. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने परिसर तसेच शाळा व कॉलेजेसमध्ये जाणीवजागृती मोहीम चालविणे.
3. वेल्लायणी तलावातील पाणी जिथे पुरवलं जातं त्या भागातील लोकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टर्सची मदत घेणं, जेणेकरून तलावातील पाण्याची प्रत सुधारण्यावर लक्ष ठेवलं जाईल.
4. तलावातील पाणवनस्पती काढून पृष्ठभाग स्वच्छ करणे.
5.  पाणवनस्पतीपासून खत आणि बायोगॅस बनविण्यासारखे प्रकल्प राबविणे.
6. तलावाच्या तळाचा गाळ काढणे. यामुळे तलावाची क्षमता 200 टक्के वाढेल.
7. हा काढलेला गाळ तलावाच्या कडेला पसरून तलावाला नैसर्गिक परिसंस्थेसारखा काठ मिळवून देणे.
8. तलावात आलेल्या परकीय वनस्पतींना वाढीसाठी मदत करणारी प्रोटीन्स ब्रेकडाउन करून परकीय वनस्पतींची अनियंत्रित वाढ थांबविणे.
9. वेल्लायणी तलावात प्लॅस्टिक टाकले जाऊ नये याची काळजी घेणे. त्यासाठी जैविक कुंपण उभारणे.
10. तलावाच्या बाजूने निसर्ग उद्याने व पायवाटा बनवणे.
11. वॉटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून तलावावर लक्ष ठेवणे व उत्पन्नाचा स्नेत निर्माण करणे.


अनुवाद र्‍ प्रतिनिधी

Web Title: The live story of the life story of a lake in Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.