वनमंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 01:06 PM2018-10-06T13:06:41+5:302018-10-06T13:10:53+5:30
निसर्गाचा अविभाज्य घटक असलेला मानवप्राणी मात्र निसगार्पासून दुरावत गेला. आज या नात्यात मोठी दरी निर्माण झाली आहे. पयार्याने पृथ्वीवरील संपन्न जैवविविधता धोक्यात आली.
- यादव तरटे
पृथ्वी हा सजीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह आहे. निर्मितीच्या प्रक्रियेत पृथ्वीवर वेगवेगळे सजीव निर्माण झालेत. उत्क्रांतीनुरूप पृथ्वीवरील सजीवसृष्टीत नियमन व त्यानुरूप बदल होत गेले. मानावासकट संपूर्ण सजीवसृष्टी सहजीवनाचा धागा धरून सुखा समाधानाने नांदत होती. मात्र मानवप्राणी यात बराच पुढे निघाला. वनवासी, ग्रामवासी व नगरवासी असी त्रिस्तरीय वस्तीव्यवस्था निर्माण झाली. यातच मानवप्राणी आपल्या बुद्धीनुरूप इतर सजीवांवर वेगवेगळे प्रयोग करू लागला. कालांतराने खेडी व शहरे निर्माण झाली. निसर्गाचा अविभाज्य घटक असलेला मानवप्राणी मात्र निसगार्पासून दुरावत गेला. आज या नात्यात मोठी दरी निर्माण झाली आहे. पयार्याने पृथ्वीवरील संपन्न जैवविविधता धोक्यात आली. अन्नजाळे व अन्नसाखळी सुध्दा कमालीची प्रभावित झाली. काही सजीव नष्ट झालेत तर काही नष्ट होण्याचा मार्गावर आहेत. मानव व वन्यप्राण्यांच्या सहजीवनाचा हा प्रवास विनाशाच्या उंबरठ्याकडे जातोय ही अनुभूती व्हायला लागली अन माणसांना उशिरा का होईना शहाणपण सुचले. संभावित धोके ओळखून मानव व वन्यजीवन यांच्या सहजीवनाचे महतवा नव्याने पेरण्याची आज गरज निर्माण झाली. माणसाला अनुभूती झाली की, वन्यजीवन जगले तरच आपलं अस्तित्व राहणार^, सबब ‘वन्यजीव संवर्धन काळाची गरज’ असा सूर आवळायला सुरवात झाली. खर तर आपणच आपल्या संवर्धनासाठी उचलेले हे पाउल आहे. यातूनच भविष्यातील ‘दीन’ परिस्थिती टाळण्यासाठी ‘दिन’ व ‘सप्ताह’ साजरे करण्यास सुरवात झाली. म्हणूनच आॅक्टोबर महिन्याचा पहिल्या आठवड्याचं ‘वन्यजीव सप्ताह’ म्हणून बारसं करण्यात आलं.
आज वन विभाग, स्वयंसेवी संस्था व निसर्गप्रेमी ‘वन्य जीव सप्ताह’ साजरा करीत आहेत. मात्र सामान्य माणूस आजही यात कुठेच सक्रिय दिसत नाही. तसेही मानव आणि वन्य प्राणी यांचा संबंध कमी कमी होत चालला आहे. हा संबंध आता फक्त मानव-वन्य जीव संघर्षापुरताच उरला आहे. भारतातील केवळ हत्ती व मानव संघर्षाचा विचार करता, २०१४ ते २०१७ या चार वर्षांत एकूण ७८,६५६ इतक्या संघर्षाच्या घटना घडल्या. यामध्ये तब्बल १०० हून अधिक हत्तींचा बळी गेला. वाघाच्या बाबतीत ३०० हून अधिक घटना घडल्या. महाराष्ट्रातील एकट्या नाशिक वन विभागाचा विचार करता, गेल्या १९ वर्षांत ३० नागरिक मृत्यू, ९८ जखमी, तर ४६१६ एकूण हल्ल्यांच्या घटना घडल्या. पाळीव प्राणी हल्ल्यात ५८२७ प्राणी जखमी झालेत. यासाठी नाशिक वन विभागाने ३ कोटी ७० लाखांची भरपाई दिली. २०११ ते २०१७ दरम्यान एकट्या महाराष्ट्रात दोन लाखांहून अधिक मानव वन्य जीव संघर्षाच्या घटना घडल्या. यासाठी शासनाचा अंदाजे ४० कोटी रु. खर्च झाला. सध्या यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा व राळेगाव भागात वाघिणीने केलेल्या हल्ल्यात १४ लोक मृत पावले. दुसरीकडे वाढती शिकार, अधिवास अवनती व ºहास आणि जंगलतोडीमुळे भारतातील वाघांची संख्या केवळ २२०० इतकीच शिल्लक राहिली. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात चाळीस हजारांहून अधिक वाघ होते. गेल्या शतकात ९७ टक्के इतकी व्याघ्र संख्येत झालेली घट चिंताजनक आहे. केवळ वाघ, बिबट, हत्ती अशा मोठ्या प्राण्यांचाच यात विचार होतो. पक्षी, साप, फुलपाखरे व कीटक यांचा तर अजून विचारही झाला नाही. सन १९५२ मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाला. नुकताच माळढोक पक्षी महाराष्ट्रातून नामशेष झाल्याचे वृत्त आले. तिकडे सारस पक्ष्यांची संख्याही बोटावर मोजण्याइतकी झाली आहे. वाघ ते वाळवी दरम्यान प्रत्येक सजीव कमीअधिक प्रमाणात संकटात सापडला आहे. वन्यप्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण केलंय? याचा विचार आपणच या निमित्ताने करुया. हा संघर्ष कमी करणेसाठी नक्की काय करावे याचा उहापोह अशा वन्यजीव महोत्सवातून होणे अपेक्षित आहे. हारतुरे, कार्यक्रम, छायाचित्रे, भित्तीपत्रके, फेऱ्या व बातम्या यापलीकडे जाऊन प्रत्यक्ष काम होण्याची गरज आहे. पृथ्वीवर जसा मानवाचा अधिकार आहे तशीच पृथ्वी वन्यप्राण्यांची सुद्धा आहे हा शाश्वत विचार आपल्या विद्यार्थी व युवा पिढीमध्ये रुजविण्यात आपण हातभार लावणे गरजेचे आहे. अति वनपर्यटनाचा त्रास वन्यजीवाना होऊ नये यासाठी कडक नियम व त्यांची अंमलबजावणी अपेक्षित आहे. मानव आणि वन्यप्राणी यांचे शक्य असलेले सहजीवन अपेक्षित आहे. म्हनुणच वन्यजीव संवर्धनाच्या विचाराची पेरणी आपण आपल्या मनात करुया. आपले मित्र, नातेवाईक व विद्यार्थी यांच्याशी असलेले निसगार्चे नाते पुन्हा नव्याने घट्ट करण्यासाठी या वन्यजीव सप्ताहापासून सुरवात करूया.