‘आठवणीतले पु.ल.’- पुलंच्या पश्चात जेव्हा सुनीताबाई त्यांना कवितेतून आठवतात...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 06:05 AM2019-01-06T06:05:00+5:302019-01-06T06:05:22+5:30
ग्लोबल ‘पुलोत्सव’ आणि लोकमत ‘दीपोत्सव’ यांची संयुक्त प्रस्तुती
पुलंना जाऊन जेमतेम वर्ष उलटले आहे. अफाट प्रतिभेच्या या सहचराची ‘स्मृती’ साजरी करावी म्हणून पुलंच्या माघारी थकलेल्या सुनीताबाईंनी कवितांची याद काढली आहे ... आणि समोर मोहन वाघ हातात कॅमेरा घेऊन सज्ज आहेत !
- या अत्यंत नाजूक प्रसंगाच्या आठवणी रस-रंग-गंधासहीत टिपणाऱ्या त्या दुर्मीळ चित्रीकरणातून पुढे एक माहितीपट आकाराला येतो : ‘एक कवितांजली’!
मराठी माणसाचे भावविश्व श्रीमंत करणाऱ्या स्मरणरंजनाच्या कप्प्यातला हा एक कसदार ऐवज!- पुलंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ‘एक कवितांजली’ हा माहितीपट रसिकांसाठी उपलब्ध होतो आहे. त्यासोबत आहे पु.ल. आणि सुनीताबाईंनी सादर केलेली आरती प्रभू-मर्ढेकरांच्या कवितांच्या अभिवाचनाची ‘आनंदयात्रा’ !
या दुर्मीळ चित्रफितींसोबत ‘बहुरूपी पु. ल.’ ही छायाचित्रांची दिनदर्शिका म्हणजे नववर्षातला एक संग्राह्य स्मरणसोहळाच! हे सारे एकत्रितपणे उपलब्ध करून देणारा संच म्हणजेच ‘आठवणीतले पु.ल.’
हा संपूर्ण संच लोकमत वृत्तसमूहाच्या ‘दीपोत्सव’ या बहुचर्चित दिवाळी वार्षिकाची प्रस्तुती असून, यावर्षीच्या अंकाची एक प्रतही (शेवटच्या हजार प्रती उपलब्ध असेपर्यंत) या संचासह पु.ल. प्रेमींना मिळेल.
येत्या वर्षात पुलंच्या आठवणी थेट जगभरात उजळवण्याचा हेतू मनी धरून पुण्यात ‘ग्लोबल पुलोत्सवा’ची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. या स्मरणसोहळ्याचा एक भाग म्हणून हा ‘पु.ल. स्मरण-संच’ तयार करण्यात आला आहे.
‘आशय सांस्कृतिक’ आणि ‘पु.ल. कुटुंबीय’ यांच्या सहयोगाने भारतासह जगभरातील एकूण पाच खंडात येत्या वर्षात ‘ग्लोबल पुलोत्सव’ रंगणार असून, त्याचाच भाग असलेला हा ‘पु.ल. स्मरण-संच’ सर्वत्र उपलब्ध असेल.
आठवणीतले पु.ल.
१. मूल्य रुपये 1000. पाच अगर अधिक संचांसाठी सवलत- मूल्य रुपये 800.
२. ‘आठवणीतले पु.ल.’ हा स्मरण-ठेवा घरपोच मिळण्याची व्यवस्था
३. अधिक माहितीसाठी संपर्क -
सुवर्णा : 9850078917, अर्जुन : 7888122100
vasundharaclubpune@gmail.com