माकड मन!

By Admin | Published: December 12, 2015 06:53 PM2015-12-12T18:53:07+5:302015-12-12T18:53:07+5:30

ध्यानात मग्न असताना अचानक ‘घंटी’चा आवाज आला. - दुपारच्या जेवणासाठी! ध्यानाच्या त्या अवस्थेमधून मी आपोआप उठलो आणि जेवणाची तयारी करू लागलो. माझं मन म्हणालं, ‘काय विचित्र आहेस तू! ‘साक्षात्कारा’च्या जवळ होतास, पण जेवणासाठी उठला लगेच!

Mocked mind! | माकड मन!

माकड मन!

googlenewsNext
-धनंजय जोशी
 
मन कसं असतं हे समजायला हवं!
- माकडासारखं!
माझ्या एका शिबिरातली आठवण येते. 
शिबिरामध्ये वेळेचं ध्यान ठेवलं जात असतं. आता प्रत्येकजण मौन पाळत असल्यामुळे वेगवेगळ्या प्रसंगांसाठी (नाश्ता, दुपारचं जेवण, चहा वगैरे) एक घंटा वाजवली जाते. मग त्या त्या वेळेप्रमाणो आपण वागायचं! 
म्हणजे नाश्ताची घंटा वाजली की आपण त्या हॉलमध्ये जायचं आणि न बोलता नाश्ता करून परत आपली साधना सुरू करायची! 
असं किती दिवस? 
- तीन, सात, दहा, नव्वद, एकशे आठ.. दहा हजार!
अशा एकाकी शिबिराला तुम्हाला एक स्वतंत्र खोली असते किंवा एखादी झोपडीपण असते (ङोन शिबिरामध्ये). माङया एका शिबिरामध्ये (दिवसातून वीस-बावीस तास ध्यान करताना) खूप साक्षात्कारींची जवळीक झाली. 
अत्यंत आनंदित स्थिती अनुभवली. त्या स्थितीमध्ये रम्य असताना ‘घंटी’चा आवाज आला. 
- किती वाजता? 
दुपारच्या जेवणासाठी!
मग झालं काय? मी ध्यानाच्या त्या अवस्थेमधून आपोआप उठलो आणि जेवणाची तयारी करू लागलो. 
जेवणाच्या हॉलमध्ये जाताना माझं मन म्हणालं, ‘काय विचित्र आहेस तू! ‘साक्षात्कारा’च्या जवळ होतास तू.. पण जेवणासाठी उठला लगेच! काय वाटतं तुला?’
- मनाची गंमत!
मला दुसरी एक जपानी गोष्ट आठवते.
जपानमध्ये एका माणसानं आपल्या दोन माकडांना नाटकामध्ये कसा अभिनय करायचा ते शिकवलं होतं.
अगदी राजा-राणीसारखं सुंदर नाटक/प्रवेश बसवला होता. 
प्रवेश सुरू झाला.
अॅक्टिंग तर अत्यंत सुंदर, माकडं असूनदेखील! 
.पण कुणीतरी अचानक एक केळं स्टेजवर टाकलं! 
मग त्या नाटकाचं काय झालं ते सांगायला नकोच. 
- आपलं मनही तसंच! 
आला विचार की गेलो आपण त्याच्या मागे! 
आपण असा विचार करत नाही किंवा अधिक महत्त्वाचं म्हणजे आपण ‘बघत’ नाही की हा विचार फक्त ‘अ-कायम’ आहे. मग कशाला त्याच्या मागे लागायचं? त्या डांबराच्या गोळीला हात लावून कशाला आपलीच बोटं काळी करून घ्यायची?.
 
(अमेरिकेतील शिकागो या शहरात वास्तव्याला असणारे 
लेखक ङोन साधक/अभ्यासक आहेत.)
 
joshi5647@gmail.com 

 

Web Title: Mocked mind!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.