‘मौनराग’

By admin | Published: April 29, 2016 10:27 PM2016-04-29T22:27:21+5:302016-04-29T22:27:21+5:30

त्यांच्या लिखाणातल्या दुख:या आणि बोट चेपून काळेनिळे पडलेल्या मनाच्या पात्नांनी मला सातत्याने त्यांच्या लेखनाची वाट पाहायला लावली आहे.

'Monyagra' | ‘मौनराग’

‘मौनराग’

Next
>- सचिन कुंडलकर
 
त्यांच्या लिखाणातल्या दुख:या आणि बोट चेपून काळेनिळे पडलेल्या मनाच्या पात्नांनी मला सातत्याने त्यांच्या लेखनाची वाट पाहायला लावली आहे. 
एखादी जखम दुर्लक्षिली जाऊन त्यातून बारीक रक्त वाहतच राहावे तसे हे लिखाण.  
ते पुन्हा पुन्हा उघडून वाचले तरी 
मनातले कसलेसे जुने दाह 
कमी होतात आणि रडू येऊन
 मोकळे झाल्यासारखे वाटते. 
 एकटेपणाचा आणि अनाथपणाचा 
एक बोचरा शापासारखा गंड 
माङया मनात फार पूर्वीपासून आहे. 
त्यावर काही वेळ फुंकर घालून 
शांत झाल्यासारखे वाटते.
 
जिवंत आणि कार्यरत लेखक वाचकाला आणि आजूबाजूच्या लेखकांना सातत्याने आत्मभान देत असतात. मी आज टेबलापाशी बसून लिहिताना माङयासमोरच्या लाकडी फडताळात महेश एलकुंचवार ह्यांची नाटकांची आणि ललितलेखांची पुस्तके ओळीने समोर उभी दिसताहेत. सध्या दर रविवारी एका वृत्तपत्रत त्यांचे एक सदर चालू आहे. आजही भारतात कुठे न कुठे त्यांनी लिहिलेल्या नाटकांच्या तालमी आणि प्रयोग सतत चालू असतात. मी ज्या गतीने आणि तालाने वाचन करतो त्यापेक्षा कितीतरी जास्त ऊर्जेने आणि कमालीच्या शिस्तीने गेली अनेक वर्षे महेश एलकुंचवार गांभीर्याने आणि सातत्याने लिखाण आणि वाचन करत आहेत. 
माङया अतिशय आवडत्या, जिवंत आणि कार्यरत भारतीय लेखकांपैकी महत्त्वाचे असे हे लेखक. 
गेले अनेक दिवस मी प्रयत्नपूर्वक सध्याच्या कार्यरत लेखकांचे जगभरातले साहित्य वाचत आहे. त्यात फ्रेंच लेखक मिशेल विल्बेक, ब्रिटिश लेखक जेफ डायर, नायजेरियन अमेरिकन लेखक टेजू कोल, जपानी लेखक हारूकी मुराकामी, कॅनेडियन लेखिका मार्गारेट अट्वूड, भारतीय लेखक अमिताव घोष आणि महेश एलकुंचवार हे आहेत.
 महेश एलकुंचवार हे माङया मातृभाषेत मराठीमध्ये लिहितात. जिवंत आणि कार्यरत लेखकांचे साहित्य वाचल्याने मला वर्तमानात जगण्याची सवय लागली आहे. हे वाक्य वाचायला वाटते तितके गुळगुळीत आणि सोपे नाही. ह्याचे कारण मानवी मनाला वर्तमानाचे भान शक्यतो टाळायचे असते. त्यामुळे आपण सातत्याने गोंजारणारे आणि गालगुच्चा घेणारे काहीतरी सतत वाचत किंवा पाहत असतो. उत्तम आणि ताजे साहित्य आपल्याला मोठय़ा गुंगीमधून जागे करते.
 ह्याचा अर्थ असा होत नाही की हे सगळेच्या सगळे लेखक वर्तमानाविषयीच लिहितात. अमिताव घोष, महेश एलकुंचवार तसे करत नाहीत. तरीही माङया काळात हे दोघे सातत्याने कार्यरत असल्याने मला हे लेखक आजच्या जगण्याविषयी अतिशय जागे ठेवत आले आहेत. 
आपण अनेकवेळा तरु ण आणि बंडखोर हे शब्द फार उथळपणो जिथे तिथे थुंकल्यासारखे वापरतो. सोपे करून टाकले आहेत आपण ते शब्द. एलकुंचवार ह्यांचे लिखाण सतर्कपणो वाचले की तरुण दाहक आणि बंडखोर लिखित साहित्य त्यांच्यानंतर मराठीत तयार झालेले नाही हे आपल्या लक्षात येते. एकवेळचे किंवा दुवेळचे लेखक महाराष्ट्रात किलोभर आहेत. बंडखोर, पुरोगामी वगैरे माणसे तर आपल्याकडे रद्दीसारखी आहेत. तरु ण तर महाराष्ट्रात सगळेच असतात. आणि अनेकविध स्त्री लेखिकांनी मराठी साहित्याचे आठवणी पुसायचे पोतेरे करून टाकले आहे. अनेक पुरोगामी वैचारिक साक्षरांना तसेच पत्रकारी पाणचट लिखाण करणा:यांना महाराष्ट्राने लेखक म्हणून उगाच लाडावून ठेवले आहे. त्या लोकांना ह्या चर्चेत नक्कीच बाजूला ठेवायला हवे. 
शिस्त आणि सातत्य ह्या दोन्ही गुणांनी बहरलेले, प्रखर सत्याची आस धरलेले आणि आयुष्यातल्या एकटेपणाचा दाहक मुलामा असलेले ललित लेखन महेश एलकुंचवार ह्यांच्यानंतर महाराष्ट्रात कुणालाही साध्य झालेले दिसत नाही. अजूनही.  शिस्त, सातत्य आणि कामावरचे अतोनात प्रेम ह्या बाबतीत एलकुंचवार अतिशय जुन्या वळणाचे ब्रिटिश आहेत. त्यांच्या मांडणीत, शब्दसंपदेत, लेखन प्रवाहात आणि भावनांच्या आविष्कारात ते जागोजागी जाणवते. त्यांच्या लिखाणातल्या दुख:या आणि बोट चेपून काळेनिळे पडलेल्या मनाच्या पात्रंनी मला सातत्याने त्यांच्या लेखनाची वाट पाहायला लावली आहे. ते कालसुसंगत लिखाण माङो  पोषण करीत राहते. 
लिहायला बसले की लक्षात येते की आठवणींना आणि भूतकाळातील व्यक्तींना लिखाणात आणणो हे किती अवघड आणि जबाबदारीचे काम आहे. त्याचा घाट घालता येत नाही. तो अवघड असतो. आठवले आणि बसून लगेच लिहून काढले असा मराठी साहित्यिक पद्धतीचा तो मामला नसतो. अनेक वर्षे सातत्याने भारतीय रंगभूमीला एकापेक्षा एक चांगली आणि ताकदवान नाटके देऊन झाल्यावर अचानक एका टप्प्यावर एलकुंचवारांनी ललित लिखाणाला आपलेसे केले आणि मला आणि माङयासारख्या अनेकविध वाचकांना सकस, बुद्धिनिष्ठ, ताज्या साहित्याचा नवा झरा मराठी भाषेत आल्यासारखे वाटले. ‘मौनराग’ वाचून मी आतून हलून गेलो आणि लिहिण्याची क्र ाफ्ट ज्याला म्हणतात त्याचा एक ताजा आणि अस्सल असा अनुभव त्या लिखाणापासून मला येऊ लागला. असे म्हणतात की शेतक:याप्रमाणो लेखकानेही वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे पीक घेऊन आपला कस राखून ठेवायचा असतो. आपल्या सवयीचा फॉर्म मोडायचा असतो. तसे काहीतरी एलकुंचवारांनी केले. आणि एकदाच करून ते थांबले नाहीत. गेल्या दशकभरात सातत्याने त्यांनी वैयक्तिक स्मृतींना सुबक आणि तेजस्वी स्वरूप दिलेले ललित लेखन सातत्याने चालू ठेवले आणि ते प्रकाशितही करत राहिले. लेखन आणि प्रकाशन हे दोन्ही स्वतंत्र निर्णय असतात आणि ते दोन्ही निर्णय लेखकालाच घ्यायचे असतात. प्रकाशनाचा निर्णय हा जबाबदारीचा निर्णय असतो. त्याचा एक खासगी ताल असतो. महेश एलकुंचवारांच्या निर्णयामध्ये मला त्यांनी निवडलेला तो ताल ऐकू येतो. तो सातत्याचा ताल आहे. विलंबित शांत चालीने जाणारा. 
प्रकाशन करणो, प्रकाशित करणो ही किती सुंदर क्रियापदे आहेत! प्रकाशित करणो ह्या क्रि यापदाला जी दृश्यात्मकता आहे तिला न्याय देणारे शांत, उग्र आणि तरीही आतून हळवे असे लिखाण एलकुंचवारांकडून सतत येत आहे. एखादी जखम दुर्लक्षिली जाऊन त्यातून बारीक रक्त वाहतच राहावे तसे हे लिखाण. अतिशय खासगी असले तरी त्याला साहित्याचे स्वरूप कष्टाने आणि सातत्याने काम करून दिलेले दिसते. ते पुन्हा उघडून वाचले तरी मनातले कसलेसे जुने दाह कमी होतात आणि रडू येऊन मोकळे झाल्यासारखे वाटते. मला एकटेपणाचा आणि अनाथपणाचा एक बोचरा शापासारखा गंड मनात फार पूर्वीपासून आहे. त्यावर काही वेळ फुंकर घालून शांत झाल्यासारखे वाटते.     
पुण्यात फिल्म इन्स्टिटय़ूटला शिकत असताना पहिल्या वर्षात पटकथा हा विषय शिकवायला  एलकुंचवार आमच्या वर्गावर आले आणि विद्यार्थी म्हणून माङो फार चांगले दिवस त्यांच्यामुळे सुरू झाले. त्यांनी आम्हाला संगीताचे भान दिले. लिखाणाचा आणि संगीत श्रवणाचा मूलभूत संबंध उलगडून दाखवला.  ते एका वर्षासाठी पुण्यात राहायला आले होते. त्यांनी आमच्या लिखाणाच्या वर्गाला एक हसरे, मोकळे आणि जिवंत स्वरूप दिले. त्यांच्या प्रकृतीच्या अतिशय विरु द्ध असे वागून त्यांनी आम्हाला त्यांच्या परिसरात यायला-जायला मुभा दिली. कितीतरी प्रकारचे संगीत त्यांनी आम्हाला सातत्याने ऐकवले. किती वेगळ्या प्रकारच्या दृष्टीने लिखाणाकडे पाहायला शिकवले. शब्दांना दृश्यात्मकता देण्याचा अवघड प्रयत्न त्यांनी आम्हाला न घाबरता अनेक छोटय़ा लिखाणाच्या उपक्र मांमधून करायला लावला. आणि मग वर्ष संपताच ते निघून गेले. 
मी अनेक वर्षांनी ‘डेड पोएट्स सोसायटी’ हा अप्रतिम इंग्रजी सिनेमा पाहिला, तेव्हा मला एलकुंचवारांचे पुण्यातील सान्निध्य आणि त्यांनी मर्यादित काळासाठी निर्माण केलेली जवळीक आणि मैत्री खूप आठवली. तो चित्रपट साहित्याचे विद्यार्थी आणि त्यांचा एक अफलातून शिक्षक ह्यांच्या नात्याविषयी आहे. 
मराठी लेखकाच्या सामान्य स्वरूपाला नाकारून, त्याला एक भारदस्त आणि अप्राप्य असण्याचा जुना ब्रिटिश आयाम एलकुंचवारांनी दिला म्हणून माङो ते माणूस म्हणूनही अतिशय लाडके आहेत. एक शिक्षक, लेखक आणि माणूस म्हणून माङो त्यांच्यावर प्रेम आहे. मी त्यांना मराठी साहित्यातला शेवटचा प्रिन्स म्हणतो, कारण त्यांचे ठाशीव, शिस्तबद्ध आणि मोहक असे काम. आणि ज्याला इंग्रजीत 4ल्लुी’ल्लॅ्रल्लॅ म्हणतात तशी समाजापासून थोडे लांब जाऊन एखाद्या राजपुत्रसारखे राहण्याची सुंदरपणो जोपासलेली प्रवृत्ती. महाराष्ट्रात ती अजुनी नवीन आहे. कारण आपण अजूनही बेशिस्त आणि अघळपघळ समाज आहोत. पण नागपुरात उगाच जाऊन जातायेता एल्कुन्चवारांकडे उठबस करता येत नाही. त्यांचा मोजका सहवास आपल्याला कमवावा लागतो. त्यांनी जोपासलेला हा ब्रिटिश शिष्टाचार मला खूप आवडतो. 
त्यांनी मला खासगीत जर काही माणूस म्हणून बहाल केले असेल तर ते म्हणजे त्यांच्या आणि माङयामधील एक अंतर आणि शांतता. 
 
(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)

Web Title: 'Monyagra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.