मानसिक सरावाची गरज

By admin | Published: May 17, 2014 08:39 PM2014-05-17T20:39:22+5:302014-05-17T20:39:22+5:30

लहानपणापासून योगाभ्यास करण्याची सवय मुलांना लावली, तर त्यांची मनाची शक्ती वाढेलच; पण त्यांना विचार आणि विकारांवर ताबा मिळवणो सोपे जाईल.

Need for mental practice | मानसिक सरावाची गरज

मानसिक सरावाची गरज

Next

 

लहानपणापासून योगाभ्यास करण्याची सवय मुलांना लावली, तर त्यांची मनाची शक्ती वाढेलच; पण त्यांना विचार आणि विकारांवर ताबा मिळवणो सोपे जाईल. मानसिक सराव त्यासाठीच तर आहे.
ळाडूंना क्रीडा मानसशास्त्रची गरज कशी व केव्हा लागते?
- नंदू नाटेकर हे भारतातले जगप्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू. या खेळाचे जादूगार म्हणून त्यांना ओळखले जाई. ते खेळाच्या विकासाबद्दल अतिशय जागरूक होते आणि इतरांनी चांगले खेळावे, यासाठी प्रयत्नशील असत. एका सामन्याच्या वेळी मी त्यांना विचारले, की तुम्ही मानसिक सरावासाठी काय करता? त्यावर त्यांनी मला विचारले, की मानसिक सराव म्हणजे काय? मी चाटच झालो. अर्थात्, एवढय़ा मोठय़ा प्रथितयश खेळाडूला त्याच्या कारकिर्दीत क्रीडा मानसशास्त्रची गरज पडली नसावी, हे एक नवलच होते. क्रीडा मानसशास्त्र हे 
पाश्चात्य देशांमध्ये 197क् ते 198क् या दशकात विकसित झाले. त्यातही या विकासात रशियाचा फार मोठा वाटा होता. 
कम्युनिस्ट वर्चस्वाखालील देश आणि पाश्चात्य देश यांच्यामध्ये ऑलिम्पिक खेळात जास्तीत जास्त सुवर्णपदके मिळवण्याची चढाओढ चालू होती. त्यात रशियन शास्त्रज्ञांनी क्रीडा मानसशास्त्रत संशोधन करून चित्रणाची तंत्रे विकसित केली. या तंत्रंच्या मदतीने रशियन खेळाडूंनी 1972 आणि 1976 या दोन ऑलिम्पिक स्पर्धामध्ये पाश्चात्य देशांवर मोठीच आघाडी घेतली. मग पाश्चात्य शास्त्रज्ञांनीही या तंत्रंचा चांगला अभ्यास करून नवी तंत्रे विकसित केली. अमेरिकेचे आणि युरोपीय देशांचे खेळाडू ऑलिम्पिक गाजवायला लागले. आता चीन आणि कोरियाचे खेळाडूही या सर्वाना चांगलीच टक्कर द्यायला लागले आहेत; पण या सर्व चढाओढीत भारत कुठेच दिसत नाही, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचे महत्त्व अजून आपल्याला कळलेलेच नाही. आपला ङोंडा फडकवून, आपले राष्ट्रगीत तेथे वाजवून भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व सर्वाना पटवून देण्याची ही एक संधी असते, हेच आपल्याला उमगलेले नाही.
भारतीय योगशास्त्र हे आपले मानसशास्त्र आहे. रशियन शास्त्रज्ञांनी चित्रणाचे तंत्र विकसित करताना योगशास्त्रचाच आधार घेतला होता. मनाची शक्ती वाढवण्याची अनेक तंत्रे योगात आहेत. त्यांचा अतिशय चांगला उपयोग खेळाचा दर्जा वाढवण्याकरिता करता येतो. उत्तम खेळाडूला स्पर्धेच्या तयारीत आणि प्रत्यक्ष स्पर्धेमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणींचे योग्य विश्लेषण करून त्यावर उपाय करता येतात. मानसिक सराव तो हाच. याची ज्या खेळाडूला उत्तम कल्पना असेल आणि ज्याने पूर्वीच तयारी केलेली असेल, त्या खेळाडूला जिंकण्याची सर्वात उत्तम संधी असते. एकाग्रता, आत्मविश्वास, धैर्य, धाडस, प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याची तयारी, आव्हान ज्या पातळीचे असेल तेवढा खेळाचा स्तर उंचावणो, अशा कितीतरी गुणांची खेळाडूला आवश्यकता असते. ते सारे मानसिक सरावाने विकसित करता येतात. क्रीडाक्षेत्रत उत्तम कामगिरी करण्याचे आव्हान नुसते शारीरिक नसते, तर ते मानसिकही असते. भारतीय लोक मानसशास्त्रज्ञाकडे जाणो म्हणजे कमीपणा समजतात. परदेशात प्रत्येक प्रथितयश खेळाडू स्वत:च मानसशास्त्रचा चांगला अभ्यास करतो. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा याने क्रीडा मानसशास्त्रचा उत्तम अभ्यास केलेला आहे.
नंदू नाटेकर, प्रकाश पदुकोन हे खेळाडू बॅडमिंटनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले. त्यांच्या वेळी क्रीडा मानसशास्त्र आपल्यार्पयत पोहोचलेले नव्हते; पण प्रकाश पदुकोन स्वत:च एकदा मला म्हणाला, की स्पर्धात्मक बॅडमिंटन खेळत असताना तुमची गाठ पडली असती, तर माझा खेळ कितीतरी उत्तम झाला असता. खेळाचा नुसता दर्जा वाढवून पुरत नाही, तर स्पर्धा खेळत असताना तो प्रकट करण्याचे कौशल्य असावे लागते. ते कौशल्य मानसिक सरावानेच पक्के अंगात बाणते. सर्वसाधारणपणो बालवयातच खेळांची आवड आणि त्यासाठी मेहनत करण्याची तयारी या गोष्टी ध्यानात यायला लागतात. या वयात नुसते खेळत राहायला आवडते आणि स्वत: चॅम्पियन बनण्याची स्वप्ने पडायला लागतात; पण ते कसे साधायचे, हे कळत नाही. पालक ब:याच वेळा त्यांच्या बालकांची गुणवत्ता ओळखतात आणि शक्य असेल, तेव्हा त्याची सरावाची आणि स्पर्धात भाग घेण्याची व्यवस्था करतात. मुलं जिंकायला लागले, की पालकांना आनंद होतो आणि ते हरले, की पालकही काळजीत पडतात. 
पालकांना मिळतील तेवढी बक्षिसे हवी असतात. मुलं आठवी, नववीत आले, की त्याच्या पालकांची अपेक्षा त्याने आता खेळाचा वेळ कमी करून अभ्यासाला द्यावा, अशी असते. दोन्ही करण्याची क्षमता असली, तर मुलाची जास्तच ओढाताण होते. वाढत्या वयात विश्रंती कमी पडायला लागते आणि सामने जिंकायचे दडपण वाढायला लागते. असंख्य गुणवान खेळाडूंनी या टप्प्यावर खेळ सोडून दिलेला आढळतो. मूल लहान असेल, तर त्याची मानसिकता सरावाची आणि शास्त्रशुद्ध नियोजनाची काळजी पालक आणि प्रशिक्षक यांनी करायची असते. क्रीडा मानसशास्त्रचा अभ्यास पालक आणि प्रशिक्षक यांनी केलेला चांगला. कारण, बालवयात या संकल्पनांचे आकलन सहज होत नाही. एखाद्या खेळाडूने कोणताही खेळ तयारीसाठी निवडला, की पालक आणि प्रशिक्षक यांच्याबरोबर त्याचे ते तयार होते. या सर्वानाच क्रीडा मानसशास्त्रच्या पायाभूत संकल्पना माहीत असायला हव्यात. खेळासाठी शारीरिक विकासाबरोबरच मानसिक विकासाकडेही पहिल्यापासूनच लक्ष दिले गेले, तर पुढल्या आयुष्यात येणा:या समस्यांना तोंड देणो सहज शक्य होते.
यासाठी पालक आणि प्रशिक्षक यांनी आपल्या खेळाशी संबंधित असलेली क्रीडा मानसशास्त्रवरची पुस्तके वाचून काढावीत. शक्य असेल तेथे तज्ज्ञ क्रीडा मानसशास्त्रज्ञाशी चर्चा करून खेळाडूच्या मानसिक सरावासाठी योजना तयार करावी. ज्या वेळी अडचण उभी राहील तेव्हाच तज्ज्ञाकडे परत जावे लागेल. आपण आपल्या आरोग्याची काळजी नीट घेतली, तर डॉक्टरांकडे जाण्याची फारशी गरज पडत नाही. तसेच हे आहे. लहानपणापासून योगाभ्यास करण्याची सवय मुलांना लावली, तर त्यांची मनाची शक्ती वाढेलच; पण त्यांना विचार आणि विकारांवर ताबा मिळवणो सोपे जाईल. मानसिक सराव त्यासाठीच तर आहे.
(लेखक ज्येष्ठ क्रीडाप्रशिक्षक व 
सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)
 
 

Web Title: Need for mental practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.