उपेक्षित आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 12:29 AM2019-02-03T00:29:12+5:302019-02-03T00:29:32+5:30

इंग्रजांनी लादलेल्या गुलामगिरीच्या काळात हिंदुस्थानातील पहिले क्रांतीचे बंड पुकारणारे, तसेच इंग्रजांना ‘सळो की पळो’ करणारे व १८५७ च्या राष्ट्रीय उठावापूर्वीही स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार करूपाहणारे एक उपेक्षित आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचा आज, रविवारी स्मृतिदिन...

 Neglected interdisciplinary king Umaji Naik | उपेक्षित आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक

उपेक्षित आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक

googlenewsNext

-डॉ. एन. एल. तरवाळ

इंग्रजांनी लादलेल्या गुलामगिरीच्या काळात हिंदुस्थानातील पहिले क्रांतीचे बंड पुकारणारे, तसेच इंग्रजांना ‘सळो की पळो’ करणारे व १८५७ च्या राष्ट्रीय उठावापूर्वीही स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार करूपाहणारे एक उपेक्षित आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचा आज, रविवारी स्मृतिदिन...

आजच्या दिवशीच ३ फेबु्रवारी १८३२ रोजी इंग्रज अधिकारी कॅप्टन अलेक्झांडर मॅकिन्टोश यांनी उमाजी राजेंना फाशी दिली. अत्यंत राक्षसीपणाने, कू्ररपणे फाशी देऊन त्यांचे पार्थिव पिंपळाच्या झाडाला सलग तीन दिवस लटकविले. लोकांच्या मनात इंग्रजांची व त्यांच्या सत्तेची जरब बसविणे हे त्यामागचे उद्दिष्ट होते. खरं तर इंग्रजांना खूप भीती वाटत होती उमाजी राजेंच्या साहसाची, स्वातंत्र्यलढ्याची, बंडाची.

दि. १५ डिसेंबर १८३१ रोजी उमाजीराजेंना फितुरीने उत्रोळी (ता. भोर, जि. पुणे) येथे पकडले. त्यांना फाशी देणाऱ्या कॅप्टन मॅकिन्टोशने उमाजी राजेंचा खराखुरा इतिहास लिहून ठेवला आहे. २५ आॅक्टोबर १८३३ ला मॅकिन्टोश यांनी त्यावेळचा गर्व्हनर जॉन अर्ल आॅफ क्लेअर यांना ‘अ‍ॅन अकौंट आॅफ ओरिजिन अँड प्रेझेंट कंडिशन दि ट्राईब आॅफ रामोशीज इंक्लुडिंग दि लाईफ आॅफ दि चीफ उमिया नाईक’ असा अहवाल सुपूर्द केला. मॅकिन्टोश यांनी निरपेक्षपणे केलेल्या लिखाणासाठी त्यांचे खूप खूप आभार.

त्याकाळी पूर्ण हिंदुस्थान इंग्रजांनी काबीज केला होता. अशा ह्या राक्षसी इंग्रजांना बंडखोरीने प्रत्युत्तर देणारे व ४१ वर्षे आयुष्यमान लाभलेले उमाजीराजे यांचा जन्म ७ सप्टेंबर १७९१ रोजी भिवडी येथे झाला. स्वतंत्र भारताच्या संकल्पनेचे बीज सर्वप्रथम उमाजीराजे यांनी काढलेल्या १६ फेब्रुवारी १८३१ रोजीच्या जाहीरनाम्यात होते. त्यांनी सरकारप्रमाणे खंड, शेतसारा, वसुली आपणाकडे घ्यायला सुरुवात केली. जिथे इंग्रज दिसतील तिथे त्यांना ठार मारण्याचे आवाहन केले. ते स्वत: साकुर्डीमध्ये जमा झालेला खजिना गरजूंना देत. जबरदस्त शरीरयष्टी, धैर्य, शिस्तबद्धता, चिकाटी, मनमिळाऊपणा, तसेच निर्णयक्षमतेच्या जोरावर त्यांनी इंग्रजांना ‘सळो की पळो’ करून सोडले. त्यामुळेच मॅकिन्टोश म्हणतोय की, जर काळ अनुकूल असता तर उमाजीराजे दुसरे शिवाजीराजे झाले असते.

अशा या आद्यक्रांतिकारकाला राक्षसीवृत्तीने फाशी दिली आणि स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहणारा एक निश्चयी योद्धा काळाच्या पडद्याआड गेला. उमाजीराजेंनी केलेल्या कार्याला, त्यांच्या शौर्याला, तसेच त्यांना कोटी कोटी अभिवादन....
 

(लेखक शिवाजी विद्यापीठात सहायक प्राध्यापक आहेत.)

Web Title:  Neglected interdisciplinary king Umaji Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.