शिक्षणाची नवी पद्धत ABL
By admin | Published: April 2, 2016 02:43 PM2016-04-02T14:43:29+5:302016-04-02T14:43:29+5:30
फळ्यावर काहीच नाही आणि मुलेही रांगेत बसलेली नाहीत. इतकंच काय, त्यांचा वर्गही एक नाही! गटात बसून कार्डाच्या आधारे ती गणितं सोडवताहेत. शिक्षकाची भूमिका फक्त सहायकाची. पुणो जिल्ह्याच्या भोर तालुक्यात पहिल्यांदा हा पथदर्शी प्रकल्प सुरू झाला. आता महाराष्ट्राच्या 3000 शाळांत या पद्धतीने मुले शिकताहेत.
Next
>- ऋषी व्हॅली स्कूलच्या उपक्रमाची परदेशी शाळांवरही मोहिनी!
- हेरंब कुलकर्णी
हा वर्ग कितवीचा आहे?’
‘अहो काका, हा वर्ग नाही, आमची भाषा विषयाची लॅब आहे.’
‘अरे मग शेजारचा वर्ग कितवीचा आहे?’
‘काका ती गणिताची लॅब आहे.’
‘अरे मग तुम्ही शिकता तरी कसे?’
‘असेच.. ही करड सोडवत सोडवत.’
- मुलांशी औपचारिक बोलणं झाल्यावर आम्ही आत गेलो.
मुले गटागटाने बसलेली होती. समोरच्या तक्त्यावर कृती बघून त्याप्रमाणो कार्ड्स घेत होती. ते अपूर्णाकाचे गणित होते. त्यासाठी उपयुक्त साहित्य त्यांनी घेतलं. शिक्षिका दुरून बघत होत्या. चार मुलांचा गट एकत्र बसून ते गणित सोडवताना शेजारचा गट भागाकार करत होता. मुले जिथे अडतील तिथे शिक्षिका फक्त सूचक बोलत होत्या.
फळ्यावर काहीच नाही आणि मुलेही रांगेत बसलेली नाहीत. शिक्षिका केवळ मदत करताहेत. मुले स्वत:च शिकण्यात मग्न.
हे दृश्य आहे पुणो जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील केंजळ या शाळेतील. अॅक्टिविटी बेस्ड लर्निग (एबीएल) पद्धतीने शिकणा:या शाळेतील.. हेच दृश्य राज्यातील आज 3क्क्क् पेक्षा जास्त शाळेत दिसते आहे. सध्या महाराष्ट्रात रचनावादी पद्धतीने शिकविणा:या शाळांची संख्या वेगाने वाढते आहे. ज्ञानरचनावाद हा कृतियुक्त अध्ययन पद्धतीचा गाभा आहे. ज्ञानरचनावाद हा सिद्धान्त असून, कृतियुक्त अध्ययन पद्धती ही त्याची गतिमान बाजू आहे.. मुलांनी स्वत: शिकणो, स्वत:च्या ज्ञानाची रचना करणो व शिक्षक केवळ मदतनीस असणो अशी ही संकल्पना. या संकल्पनेत महाराष्ट्रातील अनेक शाळा शिकत आहेत.
अॅक्टिविटी बेस्ड लर्निग म्हणजे ज्ञानरचनावाद आहे की नाही यावर मोठी चर्चा सुरू आहे. पण मुलांना विशिष्ट टप्प्याटप्याने कृतियुक्त शिक्षण देत रचनावादी सिद्धांताकडे न्यायला या पद्धतीची उपयुक्तता नक्कीच मोलाची आहे. शिक्षक आपल्या प्रतिभेने मुलांना विविध उपक्र मातून जिज्ञासा जागवत रचनावादी पद्धतीकडे नेऊ शकतो.
आंध्र प्रदेशातील कृष्णमूर्तींच्या ऋ षी व्हॅली स्कूलच्या ग्रामीण विकास केंद्राने परिसरातील दुर्गम वस्त्यांमध्ये त्या परिसरातील तरु णांना सोबत घेऊन स्वयंअध्ययन कार्ड्सच्या मदतीने शिक्षण द्यायला सुरु वात केली. मुले स्वत:च या कार्डच्या मदतीने शिकू लागली. हा प्रयोग युनिसेफच्या मदतीने भारतभर अनेक राज्यांनी स्वीकारला. इतकेच काय, परदेशातील अनेक देश हा प्रयोग समजावून घ्यायला येतात.
महाराष्ट्रात शंकर सदाकाळे यांनी लातूरमध्ये नंदादीप शाळांच्या कल्पनेतही यादृष्टीने काही मांडणी केली होती. अलीकडच्या काळात या ऋ षी व्हॅली संकल्पनेवरील ‘एबीएल’ शाळा तामिळनाडू व छत्तीसगडमध्ये सुरू आहेत. या योजनेचा पथदर्शक प्रकल्प पुणो जिल्ह्यात भोर तालुक्यातील 3क् शाळांत सुरू झाला. पुणो जिल्ह्यातील 1165, ठाणो जिल्ह्यात 14क्क् शाळा, कोल्हापूरमध्ये 166 व विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या राज्याच्या सर्व विभागांतील 3क्क्क् शाळांत सध्या ‘एबीएल’ पद्धतीने शाळा सुरू आहेत.
पुणो जिल्ह्यात जिल्हा परिषद अध्यक्ष, शिक्षण सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोर्स ग्रुप कार्यरत असून, त्यांच्यामार्फत पुण्यासह इतर जिल्ह्यातील एबीएल पद्धतीबद्दलचे प्रशिक्षण केले जाते.
काय आहे ‘एबीएल’?
‘एबीएल’चे वेगवेगळे टप्पे आहेत. प्रथम घटक, उपघटक हे पाठय़मुद्दय़ात विभागले जातात. नंतर प्रत्येक कृतीसाठी साहित्य तयार केले जाते. जी कृती करायची ते कार्ड तयार केले जाते. ते कार्ड ओळखण्यासाठी चित्रंचा वापर केला जातो. त्यांना लोगो म्हणतात. कृती व कार्ड यांच्या क्रमबद्ध मांडणीला माइलस्टोन म्हटले जाते. प्रत्येक विषयात असे 1क् ते 15 माइलस्टोन असतात.
या माइलस्टोनची क्र मबद्ध मांडणी म्हणजे अध्ययन शिडी. या कार्डमधील खुणाही मोठय़ा अर्थपूर्ण आहेत. अध्ययन कार्डच्या बाहेरील रंग इयत्ता दर्शवितो. डाव्या कोप:यातील चित्र कृतीचे वर्णन सांगतो. यात मराठी व कला यासाठी प्राणी दाखविले आहेत. गणित व कार्यानुभवासाठी पक्षी दाखविले आहेत, तर इंग्रजी आणि शारीरिक शिक्षण यासाठी वाहने आणि परिसर अभ्यासासाठी दिवे दाखविले जातात. अशा कार्डने मुले शिकत असताना याला जोडूनच कृतियुक्त गाणी, प्रकल्प सीडी दाखवणो, बाहुलीनाटय़, मातीकाम, ठसेकाम, कागदकाम, नाटय़ीकरण यांसारखे उपक्र म आहेत.
इयत्तानुसार वर्ग असण्याऐवजी विषयनिहाय वर्ग केले जातात व त्या वर्गात हे कार्ड ठेवले जातात. त्या विषयाचे शैक्षणिक साहित्यही त्यात ठेवले जाते. विद्यार्थी त्या दिवसाच्या वेळापत्रका नुसार कार्ड घेतात आणि गट करून बसतात, प्रश्न सोडवितात. काही अडले तर शिक्षक मदत करतात. असे दिवसभर सुरू असते.
शिक्षण हक्ककायद्यात सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आले आहे. परीक्षा घेण्यापेक्षा प्रत्येक टप्प्यावर मूल्यमापन करणो अपेक्षित आहे. या पद्धतीत रोजच नव्हे, तर प्रत्येक कार्ड सोडवताना मूल्यमापन होते.
या पद्धतीने शिकविल्याने विद्याथ्र्यात खूप चांगला परिणाम दिसतो आहे. मुले शाळेत उशिरापर्यंत रमतात. अध्ययन कार्ड्स वापरून मुले आनंदाने शिकतात. एकमेकांना कार्ड सोडवायला मदत करतात. कृतीची संधी असल्याने कंटाळा येत नाही. यामुळे शाळेतील अनुपस्थिती कमी झाली. काही मुले पुढच्या इयत्तेचा अभ्यास करतात. या पद्धतीत मुलांना स्वयंअध्ययनाची सवय लागते. शिक्षण हक्क कायद्यात आता शाळा सोडलेल्या मुलांना त्यांच्या वयाच्या इयत्तेत बसवले जाते. अशा मुलांचा मागचा अभ्यास या पद्धतीत भरून काढणो सोपे जाते.
सध्या दप्तराचे ओङो हा विषय गाजतो आहे. या पद्धतीत दप्तराचे ओङो खरोखरच कमी होते याचे कारण मुले कार्डच्या आधारे शिकतात. हे कार्ड म्हणजे दप्तर शाळेतच ठेवले जाते. या नव्या प्रयोगामुळे शिक्षकही खूश आहेत. कारण यात मुले स्वत: शिकतात. शिक्षकाची भूमिका आता केवळ मदतनीसाची राहिली आहे. शिक्षकांना या पद्धतीत मुलांचा फिडबॅक लगेच मिळतो. शिकण्यात मागे पडणारी मुले स्पष्टपणो निदर्शनाला येतात. विद्यार्थी मागे का पडतात त्याची कारणोही स्पष्ट होतात.
जि. प. शाळा, केंजळ!
‘एबीएल’ची प्रभावी अंमलबजावणी बघण्यासाठी महाराष्ट्रातील शिक्षक सध्या पुणो जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील केंजळ शाळेला भेट देत आहेत. आजपर्यंत 15क्क्क् शिक्षकांनी भेटी दिल्यात. जिल्हा परिषद शाळेची इमारतच दीड कोटी रु पयांची आहे. एखाद्या इंग्रजी संकुलालाही लाजवणारी ही भव्यदिव्य इमारत आहे. अवघ्या 1833 लोकसंख्येच्या या गावात शाळेचा पट 191 आहे. अनेकांनी परगावाहून इथ मुले शिकायला नातेवाइकांकडे ठेवलीत. इंग्रजी शाळेकडे ओढा वाढल्याचे म्हटले जाते, पण या शाळेत 45 विद्यार्थी इंग्रजी शाळा सोडून पुन्हा आले आहेत. येथील मुख्याध्यापक जे. के. पाटील हे गावकरी, प्रशासन व शिक्षक यातील प्रभावी दुवा आहेत.
दीड कोटी रु पये लोकसहभागातून उभे करून गुणवत्तापूर्ण शिक्षणातही अग्रेसर असणारे पाटील सरांचे व्यक्तिमत्त्वही अफाट आहे. सध्या अमेरिकेत असणा:या शाळेच्या माजी विद्याथ्र्याने 8क् लाख रु पये खर्चून शाळेच्या आवारातच सौर ऊर्जेचे उपयोजन होऊ शकेल असे ऊर्जा पार्कउभारले आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे व त्यांचा परदेशात असणारा मुलगा यांनी हे पार्क उभे करून दिले आहे. सौर ऊर्जा साक्षरतेसाठी याची खूप मदत होते. केंजळच्या धर्तीवर भोर तालुक्यातील ससेवाडी, नानाची वाडी, हंगवली, नायगाव, पुरंदर तालुक्यातील अक्करवाडी, इंदापूर तालुक्यातील शाळा ‘एबीएल’ प्रकल्पासाठी बघण्यासारख्या आहेत.
शिक्षण हक्क कायद्याची व ज्ञानरचनावादाची प्रभावी अंमलबजावणी ‘एबीएल’मध्ये होते. मुलांना शिकण्याचा आनंद घेत संकल्पना स्पष्ट करणारी ही पद्धती आहे. मुले खूप वेगानं प्रगत होत आहेत. शिक्षकांनाही यात आनंद मिळतो आहे. दप्तराचे ओङो कमी होते आहे. राज्यातील 3क्क्क् शाळा आज हा प्रकल्प राबवत आहेत.
- प्रकाश परब
‘एबीएल’ रिसोर्स ग्रुप प्रमुख
(लेखक शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते आणि प्रयोगशील शिक्षक आहेत.)
herambkulkarni1971@gmail.com