गैरसमज नसावा
By admin | Published: January 17, 2015 05:37 PM2015-01-17T17:37:17+5:302015-01-17T17:37:17+5:30
गेल्या रविवारच्या मंथन पुरवणीत राजीव साने यांचा पूर्व-गौरव-वादाचे व तशा दाव्यांचे खंडण करणारा लेख प्रसिद्ध झाला.
Next
>गेल्या रविवारच्या मंथन पुरवणीत राजीव साने यांचा पूर्व-गौरव-वादाचे व तशा दाव्यांचे खंडण करणारा लेख प्रसिद्ध झाला. लेखाचे मूळ शीर्षक ‘‘लुप्त’ होऊ शकते ती ‘विद्या’च नव्हे’ असे होते, ते चुकीने ‘लुप्त होऊ शकते ती विद्या कशी’ (प्रश्नचिन्ह नाही) असे पडले, त्यामुळे लेखाचा रोख ‘लुप्त झाली तरी ती विद्या असू शकते’ असा असल्याचा समज तयार झाला. एकूण मांडणीमुळे लेखाभोवतीच्या पूर्व-गौरव-वादी दाव्यांच्या सचित्र चौकटी राजीव साने यांनीच (पूर्व-गौरव-वादाच्या पुरस्कारार्थ) लिहिल्या असाव्यात असाही संभ्रम निर्माण झाला, परंतु प्रत्यक्षात तो मजकूर श्री. साने यांच्या लेखाचा भाग नव्हता.
पूर्व-गौरव-वादाबाबत श्री. साने आणि लोकमत यांची भूमिका गुळमुळीत नाही, ती निषेधाचीच आहे. पृष्ठ मांडणीतील सौंदर्यासाठी केलेल्या करामतीमुळे ती काहीशी धूसर झाली, त्याबद्दल दिलगिरी.
- संपादक