ओल्ड मास्टर

By admin | Published: March 12, 2016 02:46 PM2016-03-12T14:46:12+5:302016-03-12T14:46:12+5:30

फोटोग्राफर म्हणून जडणघडणीच्या काळात माझ्यावर अनेक माणसांचा प्रभाव पडला. कलाकार, चित्रपट दिग्दर्शक, फोटोग्राफर्स हे सारे वेळोवेळी त्यांच्या कामानं मला नवीन दृष्टी देत राहिले. ही सारी सृजनशील माणसं

Old Master | ओल्ड मास्टर

ओल्ड मास्टर

Next
सुधारक ओलवे
 
फोटोग्राफर म्हणून जडणघडणीच्या काळात माझ्यावर अनेक माणसांचा प्रभाव पडला. कलाकार, चित्रपट दिग्दर्शक, फोटोग्राफर्स हे सारे वेळोवेळी त्यांच्या कामानं मला नवीन दृष्टी देत राहिले. ही सारी सृजनशील माणसं, त्यांच्या विचारधारा, जगण्याकडे पाहण्याच्या नजराही परस्परांहून आत्यंतिक भिन्न होत्या; पण त्यामुळे वैविध्याची एक सततची जाणीव त्यांनी माङयात कायमची रुजवली, जोपासली. आजवरच्या प्रवासात ती जाणीव, ती विविधांगी नजर माङयासोबत चालते आहे आणि वेळोवेळी माङया कामातून व्यक्तही होते आहे. 
चित्रकार आणि चित्रंनी माझ्या शिक्षणाच्या प्रक्रियेला एक दिशा दिली. विशेषत: प्रत्येक फ्रेमविषयीची माझी समज वाढवली, मला जगतानाचे वेगवेगळे विषय दिसू लागले. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘प्रकाश’; या प्रकाशाचं फ्रेममधलं महत्त्व, त्याची समज मला या चित्रंतून येत गेली. तसंही छायाचित्रण हा छाया-प्रकाशाचा खेळ असतो असं म्हणतात आणि हा खेळ टिपत जाण्याच्या माङया प्रक्रियेवर तरी ‘ओल्ड मास्टर्स’चा मोठा प्रभाव आहे. आणि त्यातही ओल्ड मास्टर रेंब्रा.
 30 वर्षापूर्वी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकताना मला रेंब्रा पहिल्यांदा भेटला होता. तो अभ्यासक्रम काही पुढं पूर्ण झाला नाही; पण रेंब्राचा प्रभाव मात्र माङयावर आणि माङया कामावर कायम राहिला. रेंब्रा हा एक महान डच चित्रकार.  युरोपातल्या चित्रकलेवर त्याच्या शैलीचा मोठा दूरगामी प्रभाव पडला. तो म्हणत असे,  त्याच्या कलेच्या माध्यमातून अतीव उच्चतम पण तरीही अत्यंत नैसर्गिक अशा हालचाली टिपणं हे खरं ध्येय आहे.  त्याची ही चित्रशैलीच क्रांतिकारी होती. चित्र काढण्याचे अत्यंत बंदिस्त, कर्मठ नियम असलेल्या जगात तो नवा विचार मांडत होता. चौकटीबाहेर जाऊन काहीतरी रेखाटण्याची ¨हमत त्याकाळी रेंब्रानं केली. त्याची बायबलच्या संदर्भानं काढलेली रेखाचित्रं, त्यानं स्वत:ची आणि इतरांची काढलेली पोट्रेट्स यासाठी तो आजही ओळखला जातो.  नाटय़मय इफेक्ट साधण्यासाठी केलेला छायाप्रकाशाचा वापर हे त्याचं प्रमुख वैशिष्टय़. त्याचे समकालीन चित्रकार शैलीच्या जुन्या बंदिस्त चौकटींना आणि नियमांना धरून होते. पण रेंब्रानं मात्र त्या सा:या नियमांनाच आव्हान देत सुंदर निसर्गचित्रं रेखाटली. त्यानं आपल्या चित्रकलेला कुठल्या नियमात बांधलं नाही किंवा आधीच ठरवून त्यावर आधारित चित्रं काढली नाहीत. त्यानं स्वत:च्या पत्नीची, मुलाची चित्रं काढली तीही बायबलमधल्या विषयांच्या धर्तीवर. त्या काळासाठी रेंब्राची ही चित्रं अत्यंत क्रांतिकारी होती.
  इतकी वेगळी, महान, सुंदर आहेत त्याची चित्रं. पण रेंब्राचं आयुष्य मात्र तसं नव्हतं. त्याच्या जगण्याचा प्रवास फार खडतर होता. त्या प्रवासात त्यानं जिवाभावाची माणसं गमावली, आघात सोसले, आणि भरीस भर म्हणून गरिबीतल्या यातनाही सहन केल्या. खरं तर रेंब्रानं पैसा-प्रसिद्धी खूप कमावली पण त्याचा शेवट गरिबीतच झाला. कुठल्या तरी कबरीत तो कायमचा पुरला गेला, हरवून गेला काळाच्या विस्मृतीत.
सह-अनुभूती या शब्दात या महान कलाकाराच्या कामाचं वर्णन कायम केलं जातं. जेव्हा जेव्हा मी कॅमेरा हातात घेऊन माणसांचे फोटो काढतो, तेव्हा तेव्हा हा शब्द माङया काळजात लख्ख जागा असतो. म्हणून फोटो काढणं हा माझा व्यक्तिगत प्रवास तर होत जातोच, पण त्यामुळे मला माणसं, विषय समजून घेणं जास्त महत्त्वाचं वाटत जातं. माझं सारं छायाचित्रण हे प्रकाशात, छायाप्रकाशाचा उपयोग करून मी करत जातो, तेव्हा मनात कुठंतरी रेंब्रा असतोच. त्यानं कलेच्या क्षेत्रवर गारुड केलं होतं.आज इतक्या वर्षानंतरही ते गारुड, छायाप्रकाशाच्या नैसर्गिक हालचालीतली ती जादू अजूनही माङयासारख्यांना प्रभावित करत राहते. प्रेरणा देते!
 
रेंब्राला भेटताना..
अलीकडेच जानेवारीत मी जर्मनीतल्या कासल शहरात होतो. हे शहर त्याच्या स्थापत्यशास्त्रसाठी प्रसिद्ध आहे. बर्गपार्क विलेमशे (इी1ॅस्रं1‘ ह्र’ँी’े2ँँी) हे जगप्रसिद्ध, नितांतसुंदर 18 व्या शतकात तयार करण्यात आलेलं लॅण्डस्केप पार्क याच शहरात आहे. इथंच विलेमशे पॅलेसही आहे. या पॅलेसमध्ये असलेल्या आर्ट गॅलरीत जी चित्रं आहेत, त्यातल्या एका दालनाला ‘द गॅलरी ऑफ द ओल्ड मास्टर्स’ असं म्हणतात.  त्याच भिंतींवर रेंब्राची चित्रं अत्यंत मानानं झळकलेली दिसतात. जे. जे. सोडल्यानंतर सुमारे तीस वर्षांनंतर मी ही मूळ चित्रं पाहत होतो. त्याआधी त्याच्या प्रिण्ट्स पाहिलेल्या होत्या. ही मूळ चित्रं पाहताना वाटलं की, त्या फ्रेममधली माणसं माङयाकडं पाहताहेत. मानवी जगण्याबद्दल, माणसांबद्दल वाटणारा दयाभाव आजही त्या चित्रंमधून पाझरताना जाणवतो, इतका तो ताजा आणि ओला आहे.
 
(छायाचित्रणाच्या माध्यमातून समाजकार्याबद्दल पद्मश्री पुरस्कारप्राप्त छायाचित्रकार ‘लोकमत’ समूहाचे फोटो एडिटर आहेत.)

Web Title: Old Master

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.