ड्राय हायवेवरची "ओली-सुकी"!

By admin | Published: April 22, 2017 02:59 PM2017-04-22T14:59:59+5:302017-04-22T15:11:56+5:30

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून पाचशे मीटर परिसरात मद्यविक्री बंदीचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिल्यानंतर प्रचंड उलथापालथ झाली.

"Oli-suki" on the dry highway! | ड्राय हायवेवरची "ओली-सुकी"!

ड्राय हायवेवरची "ओली-सुकी"!

Next

- सचिन जवळकोटे

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून 
पाचशे मीटर परिसरात 
मद्यविक्री बंदीचा निर्णय 
सुप्रीम कोर्टानं दिल्यानंतर 
प्रचंड उलथापालथ झाली. 
काहीजणांचे गल्ले 
‘क्षणाधार्थ रिते’ झाले, 
काही जणांनी नवे ‘पर्याय’ शोधले, 
अनेक जण शुद्धीवर आले, तर 
अनेकांनी ‘रस्ता’च बदलला. 
त्यातलाच एक नेमका रस्ता धरून 
शोध घेण्याचा प्रयत्न केला, 
तेव्हा उलगडत गेली 
एक अनोखी कहाणी ..

स्थळ : शिरवळ. वेळ रात्रीची. फॅक्टरीतलं काम संपवून काही कामगार फाटकाबाहेर आले. तेवढ्यात समोरून येणारी भरधाव कार रस्ता सोडून आत घुसली. कामगारांना उडवून पुढं जाऊन धडकली. पळापळ सुरू झाली. आजूबाजूच्यांनी जखमींना तत्काळ दवाखान्यात हलवलं, पण दुर्दैव. त्यातला उमेश ठोसर नामक तरुण दगावला. 
..यात त्या बिचाऱ्याचा काय दोष होता? दिवसभर काबाडकष्ट करून दोन घास खाण्यासाठी घरी निघालेला उमेश केवळ दुसऱ्याच्या नशेपायी स्वत:चा जीव गमावून बसला होता. आयुष्यभर दारूच्या थेंबालाही न शिवलेला उमेश ज्या कारखाली चिरडला गेला होता, त्या चालकानं मद्यपान केल्याचं वैद्यकीय चाचणीत निष्पन्न झालं होतं. 
‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’चा किस्सा तसा शिरवळ परिसराला नवा नव्हता. इथं आजपर्यंत दारूच्या नशेतील अपघातात अनेकांचा मृत्यू झाला होता. कधी दारू पिऊन ट्रकखाली सापडल्यानं एखादा दुचाकीस्वार जागीच खल्लास झाला होता, तर कधी समोरच्या कारचालकानं मद्यधुंद अवस्थेत उडवल्यानं एखादा पादचारी मृत्युमुखी पडला होता.. परंतु 
५ एप्रिलची ही घटना थोडीशी विचित्र होती. या घटनेमागची परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. 
१ तारखेपासून ‘हायवे’वर ‘दारूबंदी’ लागू झाल्यानं शिरवळ परिसरातील झाडून सारी दारू दुकानं बंद झालेली. बाटलीच्या घोटासाठी तडफडणारी काही तळीराम मंडळी पलीकडच्या भोर गावाला जाऊन ‘घसा ओला’ करून येत असताना नशेत ही दुर्घटना घडलेली. होय.. ज्या गावात गेल्या पाच दिवसांपासून दारूचा घमघमाट पुरता थांबला होता, त्याच रस्त्यावर दारूपायी रक्ताचा सडा पडला होता. ‘हायवे’पासून पाचशे मीटरच्या आतील दारूविक्री बंद करूनही नेमकं साध्य झालं, असा हताश प्रश्न उमेशच्या हतबल नातेवाइकांना पडला होता.
‘ड्राय हायवे’चा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिल्यानंतर १ तारखेपासून लाखो लोकांच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली. काहीजणांचे गल्ले ‘क्षणाधार्थ रिते’ झाले, तर अनेकजण ‘टॉप टू बॉटम’ शुद्धीवर आले. याच साऱ्या घडामोडींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा उलगडत गेली जबरी कहाणी.
‘पुणे-बेंगलोर हायवे’ सातारा जिल्ह्यातून गेलेला. शिरवळ ते कऱ्हाड.. तब्बल सव्वाशे किलोमीटरचं अंतर. या रस्त्यावर पंचवीसपेक्षाही छोटी-मोठी गावं वसलेली. ‘पाचशे मीटर अंतर’ नियमाचा सर्वाधिक फटका छोट्या गावांनाच बसला; कारण यांची लांबी-रुंदीच ओढून-ताणून तीनशे-चारशे मीटरची. त्यामुळे शिरवळ, खंडाळा, भुर्इंज, नागठाणे अन् उंब्रज गावातल्या साऱ्याच दारू दुकानांना थोड्याच दिवसांत जळमटं लागली. कुलूपबंद दरवाजांना गंज चढला.
..पण ही ‘पाचशे मीटर’ची लक्ष्मणरेषा आखताना शासकीय यंत्रणेची पुरती दमछाक झाली. ‘हायवे’पासून पाचशे मीटरचं अंतर वहिवाटीच्या रस्त्यानं मोजायचं होतं. हवाई अंतरानुसार सरळ रेषेत नव्हे. ‘सुप्रीम कोर्टाचा आदेश कोणत्याही परिस्थितीत पाळावाच लागणार’ हे जेव्हा स्पष्ट झालं, तेव्हा डिसेंबर महिन्यापासूनच राज्य उत्पादन शुल्क विभागाची मंडळी कामाला लागली.
या खात्याच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर ‘लोकमत’ला सांगत होत्या, ‘जिल्ह्यात दारू दुकानं सव्वासहाशे. आमच्याकडे माणसं फक्त सात. त्यामुळे या साऱ्या दुकानांचं अंतर मोजताना खूप त्रास झाला. मुळात जिल्ह्यात नॅशनल हायवे कुठला अन् स्टेट हायवे कुठला, हेच परफेक्ट माहीत नव्हतं. मग आम्ही पीडब्ल्यूडीवाल्यांशी संपर्क साधला. त्यांच्याकडून नकाशे अन् माहिती मागवली. नंतर आम्ही अंतर मोजण्याचं टेप घेऊन कामाला लागलो.’
‘एक्साइज’चे सब-इन्स्पेक्टर सतीश काळभोर गेल्या तीन महिन्यांतील कसरत आठवताना अजूनही कासावीस होत होते, ‘रोज सकाळी लवकर उठायचं. सोबतीला पीडब्ल्यूडीचा एक कर्मचारी. बारवर पोहोचलो की त्यांचाही एक माणूस आमच्यासोबत यायचा. मग तीस मीटरचा टेप घेऊन सारे रस्ते पालथे घालत निघायचं. ड्रेनेज-ब्रिनेज काहीही बघायचं नाही. धुळीनं भरलेल्या हातांनीच शेवटी कागदावर अंतराची नोंदकरायची. बारवाल्याच्या सह्या घ्यायच्या अन् पुढं निघायचं. सलग तीन महिने सारे कामधंदे सोडून आम्ही हीच ड्यूटी रोज करत बसलो होतो बघाऽऽ.’
या खात्याचं उत्पन्न एका झटक्यात ऐंशी टक्क्यानं कमी झालंय. सातारा जिल्ह्यात ‘एकच प्याला’मधून वर्षाकाठी किती महसुली उत्पन्न राज्य शासनाला मिळायचं, माहितंय? तब्बल सहाशे पन्नास कोटी! म्हणजे रोज पावणेदोन कोटींचा टॅक्स तळीरामांच्या खिशातून मोजला जायचा. आता केवळ ‘कर’ एवढा असेल तर ‘बार’वाल्यांची उलाढाल किती असायची?
त्याचाही शोध घेतला तेव्हा अक्षरश: डोळे विस्फारण्याची वेळ आली. या जिल्ह्यात रोज पंचवीस हजार लिटर विदेशी मद्य फस्त केलं जातं. चौदा हजार लिटर देशी दारू रोज पोटात गुडूप होते, तर साडेबारा हजार लिटर बिअर लोकांना ‘थंडगार’ बनविते. अबबऽऽ
..साडेसहाशे कोटींचं टारगेट असणाऱ्या या जिल्ह्यातील ब्याऐंशी टक्के दारू दुकानं सध्या पुरती अडगळीत गेलीत, कारण दक्षिण-उत्तर भारताला जोडणारा हायवे याच जिल्ह्यातून गेलेला. महाड-पंढरपूर, गुहागर-विजापूर अन् भोर-

बनावट दारूच्या विरोधात ग्रामरक्षक दल : हेरंब कुलकर्णी 
४‘दारूबंदी’ चळवळीतील कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनीही बनावट दारूविक्रीचा धोका बरोबर ओळखलाय. एक तारखेपासून ‘ड्राय हायवे’च्या निमित्तानं काय चांगलं अन् काय वाईट घडलं, याचा धांडोळा घेताना ते ‘लोकमत’ला सांगत होते, ‘हायवेलगतच्या ज्या-ज्या छोट्या गावात शंभर टक्के दारू दुकानं बंद झालीयंत, तिथं पिऊन रस्त्यावर पडणाऱ्यांची संस्कृती जवळपास नष्ट झालीय. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे अधूनमधून दारूची चव चाखू पाहणाऱ्या तरुणांची या विळख्यातून कायमची सुटका झालीय. मात्र, काही मोठ्या गावांमध्ये बारमधला जुना स्टॉक संपविण्यासाठी बेकायदेशीर अड्डे उभारले जाताहेत. तसंच बनावट दारूविक्रीसाठी रस्त्यावरच्या ढाब्यांचाही वापर केला जातोय. हे बंद करण्यासाठी गावोगावी ग्रामरक्षक दलाची स्थापना करणं, अत्यंत गरजेचं बनलंय.’

Web Title: "Oli-suki" on the dry highway!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.