OSS

By admin | Published: January 31, 2016 12:01 PM2016-01-31T12:01:43+5:302016-01-31T12:01:43+5:30

रोज ठरावीक रतीब घालणा:या मालिकांना विटलेल्या, विदेशातले उत्तम सिनेमे, लघुपट पाहू इच्छिणा:या आणि त्यासाठी पायरसीला चटावलेल्या भारतीय प्रेक्षकांसाठी ऑनलाईन स्ट्रिमिंग सव्र्हिसेस मनोरंजनाच्या मसाल्याची नवी गुहाच उघडून देतील. त्यामुळे काय-काय बदलेल?अमेरिकन नेटप्लिक्सचं भारतात येणं, ही एका बदलाची सुरुवात असू शकते का?

OSS | OSS

OSS

Next
भारतीय मनोरंजनाची ‘चव’ बदलू शकणारा नवा घरपोच पर्याय 
 
- गणेश मतकरी
 
आज सकाळीच मी माझ्या एका मित्रला मेसेज केला, ‘‘तुझ्याकडे वायफाय कनेक्शन काय स्पीडचं आहे आणि तू नेटफ्लिक्स घेतलंस का?’’
त्यावर त्याचं उत्तर होतं, ‘वायफायचा स्पीड बरा आहे, पण नेटफ्लिक्स म्हणजे काय?’ 
माझा त्यावरचा प्रतिसाद या लेखात जाहीरपणो छापण्याजोगा नाही, पण त्यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. ती म्हणजे, नेटफ्लिक्स  म्हणताच समोरच्याला सारं काही कळेल, अशी अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही.
थोडक्यात सांगायचं, तर नेटफ्लिक्स ही ऑनलाईन स्ट्रीमिंग सव्र्हिस आहे, जी तुम्हाला हवे ते चित्रपट/ टीव्ही मालिका (अधिकृतपणो आणि उत्तम तांत्रिक दर्जा सांभाळून) घरबसल्या दाखवू शकते. म्हणजे   व्हर्चुअल लायब्ररीच. जगभरात मोठय़ा प्रमाणावर पसरलेल्या प्रेक्षकवर्गासाठी स्ट्रीमिंग हे नेटफ्लिक्सचं प्रमुख काम. पायरसीला चटावलेल्या भारतीय प्रेक्षकांसाठी त्यांची ओळख तीच.
आपल्याकडे टीव्ही पाहणारा प्रेक्षकवर्ग हा दोन गटांत विभागला गेलाय. आपला टीव्ही दाखवेल ते मुकाटय़ाने पाहणारा पहिला वर्ग आणि त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करणारा दुसरा वर्ग. पहिला वर्ग, हा प्रामुख्याने घरोघरच्या महिला वर्गाला प्राधान्य देऊन केलेल्या मालिकांच्या प्रसार आणि अंधानुकरणातून तयार होत गेलेला. नोकरदार पुरुष मंडळी हमखास घरी सापडण्याच्या काही इतर वेळा सोडल्या, तर घरचा टीव्ही हा गृहिणींच्या ताब्यात. त्यामुळे त्यांना काय आवडेल याभोवती आपला बराचसा टीव्ही फोकस होतो. गेली कित्येक वर्षे यावर सास-बहू मालिकांची सत्ता आहे. आपल्या हातातला चॅनल आणि त्याचा हक्काचा प्रेक्षकवर्ग असतानाही, या चॅनल्सनी नवं काही करण्याचे प्रयत्न न करता एकाच वर्तुळात फिरत राहणं पसंत केलंय.
एरवी अमेरिकेची नक्कल करण्याची आपल्याकडे प्रथाच आहे. मग तिथल्या आणि इंग्लंडमधल्या मालिका या इतक्या उत्तम प्रतीच्या असताना, आपला टीव्ही मात्र तेच जुनं दळण का घेऊन बसलाय? म्हणजे एकीकडे त्यांच्या मालिका हळूहळू सिनेमाच्या जवळ चालल्यात, आणि आपण मात्र दूरदर्शनवर तेरा भागांच्या मालिकांची सद्दी असताना जो दर्जा होता तेवढाही आज ठेवू शकलेलो नाही.
मघा म्हटलेल्यातला जो दुसरा वर्ग आहे, तो फक्त या देशाबाहेरच्या मालिका वा चित्रपट पाहतो. त्याला बहुधा बाकी मराठी-हिंदी टीव्हीवरचा खपाऊ माल सहन होत नाही आणि मग तो एखादं इंग्रजी चॅनल पाहायला लागतो. कालांतराने जाहिरातीचा मारा आणि आठवडय़ाने येणा:या भागातल्या घडामोडींना कथानकातल्या पुढल्या संदर्भासाठी लक्षात ठेवण्याचा त्रस टाळण्यासाठी तो या मालिका पाहणं बंद तरी करतो, किंवा टॉरन्ट्ससारख्या मार्गाने हे बाहेरचं सारं डाऊनलोड करून पाहायला लागतो, 
थोडक्यात काय, तर वाईट टीव्हीवर समाधानी असणारे, आणि चांगल्या टीव्हीच्या प्रतीक्षेत असूनही पायरसीवाचून दुसरा समाधानकारक पर्याय न उपलब्ध झालेले, असे दोन्ही प्रकारचे मुबलक प्रेक्षक आजच्या भारतात अस्तित्वात आहेत. भारतातलं स्ट्रीमिंग सव्र्हिसेसचं  आगमन हे अशा नेमक्या वेळी झालेलं आहे. चांगल्या टीव्हीच्या प्रसारातून, नेटप्लिक्ससारखी ऑनलाईन स्ट्रीमिंग सव्र्हिस पहिल्या वर्गाच्या प्रेक्षकाचं प्रमाण कमी करू शकते का, आणि अप्रत्यक्षपणो लोकल टीव्हीमध्ये काही सुधारणा घडवून आणू शकते का, हा खरा प्रश्न आहे.
पायरसीला मी सपोर्ट करणार नाही, पण तरीही एक लक्षात घ्यायला हवं, की जागतिक चित्रपटातला उत्तमोत्तम सिनेमा आपल्याकडे पोचवण्यात आणि तरुण पिढीतल्या अनेकांना त्याची गोडी लावण्यात डिव्हिडी पायरसी आणि टॉरन्ट्स, या दोन्हीचा महत्त्वाचा हात आहे. आता ही पायरसी म्हणजे शुक्रवारी थिएटरमधे लागलेला नवा बॉलिवूड सिनेमा शनिवारी रस्त्यावर विकायला ठेवणारी किंवा चित्रपट महोत्सवांमध्ये सिलेक्शनसाठी पाठवलेल्या कॉप्या अपलोड करणारी पायरसी नव्हे. ती कधीही निषिद्धच मानायला हवी! मात्र ज्या पायरसीने आपल्याकडे अन्य कोणत्याच वैध मार्गाने उपलब्धच न होणारं चांगलं काहीतरी आपल्यापर्यंत पोचवलं असेल, तर ती कायद्याने गैर असूनही लोकशिक्षण घडवणारी होती, असं म्हणायला मला काही वाटणार नाही. 
आता नवा पेच हा, की गेली काही वर्षे नेटवर फुकटात (म्हणजे नेटपॅकची किंमत सोडता) उपलब्ध असणारा उत्तम चित्रपट आणि परदेशी मालिका यांचा प्रचंड मोठा साठा स्ट्रीमिंग सव्र्हिसेसनी उपलब्ध केला तर त्यासाठी आपण पैसे मोजायला तयार आहोत, की अजूनही हे पैसे वाचवत आपण पायरसीच्याच मागे धावणार?
माङया  मते, हा प्रश्न नो ब्रेनर आहे. जर एखादी गोष्ट तुम्हाला योग्य, परवडण्याजोग्या किमतीत उपलब्ध होत असेल, तर ती फुकटात मिळवण्याच्या नादी लागू नये. यात मूळ आणि पायरेटेड यांच्या दर्जांमधला फरक वगैरे तांत्रिक बाबी सोडूनही एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे कलावंतांपर्यंत त्यांच्या कामाचा मोबदला पोचण्याचा! सिनेमा, लघुपट अगर टीव्ही मालिकांसारखी कलाकृती जेव्हा वैध मार्गाने उपलब्ध असते, तेव्हा तिच्या विक्रीच्या उत्पन्नातून येणारा काही एक भाग  निर्मात्यांपर्यंत पोचत असतो. ज्या क्षणी पायरसी होते, त्या क्षणी संबंधित निर्मात्याचं उत्पन्न बंद होतं. जर हे सातत्याने होत राहिलं, तर त्या व्यक्तीकडून होणारी निर्मिती घटत जाणार हे स्पष्ट आहे. हे लगेच जाणवणार नाही पण काही वर्षांनी त्याचे परिणाम दिसायला लागतील. त्यामुळे इन्टरनेटवर सारं मोफत उपलब्ध असतानाही जर कायदेशीर मार्ग उपलब्ध असेल तर तो जरूर स्वीकारावा. विदेशी मालाच्या चाहत्या प्रेक्षकाने डाऊनलोडिंग कमी करून ऑनलाईन स्ट्रीमिंग सव्र्हिसेसकडे का वळावं याचं हे एक चांगलं कारण मानता येईल.
नव्याने लोकप्रिय होऊ पाहाणा:या या ऑनलाईन स्ट्रीमिंग सव्र्हिसेसमुळे भारतीय प्रेक्षकांच्या मनोरंजन  ‘कंङयूम’ करण्याच्या पद्धतीत (म्हणजे चार घटका निवांत मनोरंजनासाठी टीव्ही/सिनेमे पाहण्याच्या पद्धतीत) वा त्यासाठीच्या आवडीनिवडीत काही बदल संभवतो का?
त्याच त्या रतिबाला विटून जे ऑलरेडी भारतीय टीव्हीकडे (न्यूज चॅनेल्स सोडून) दुर्लक्ष करतात, उदाहरणार्थ मी स्वत:, त्यांच्यासाठी तर ऑनलाईन स्ट्रीमिंग सव्र्हिस हे जवळपास वरदान म्हणायला हरकत नाही. पण हे थोडं कनविन्सिंग द कन्विन्स्ड सारखं आहे. ज्यांना मुळातच आपला टीव्ही टाकाऊ असल्याचं माहिती आहे, त्यांनी या नव्या पर्यायाकडे वळणं, हे फार आश्चर्यकारक नाही. 
 
अन्न, वस्त्र, निवारा आणि वायफाय
यू टय़ूबचं पुरेसं व्यसन लागलेल्या भारतात  व्हिडिओ स्ट्रीमिंग सव्र्हिसेस छोटय़ा प्रमाणावर या आधीही होत्याच. आता नेटफ्लिक्समुळे त्यांची चर्चा आणि वापर व्यापक होईल असं म्हटलं जातं. पण या सव्र्हिसेस वापरण्यासाठी लागणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरनेटचा स्पीड! त्याबाबतीत अजूनही आपण चाचपडत असलो, तरी थ्रीजीनंतर फोरजीच्या जमान्यात हा प्रश्न सुटल्याचा अनुभव आता फार विरळा नव्हे. खासकरून मोठी शहरं, ज्यामधे घराघरांत वायफाय असणं ही आता मूलभूत गरज बनलेली आहे तिथे तरी! ऑप्टिक फायबर केबल्ससारख्या अधिक अद्ययावत तंत्रज्ञानामुळे 1क् किंवा 2क् केबीपीएस स्पीडच्या गप्पा अशा ठिकाणी तर नक्कीच मारता येतात. इतरत्र कदाचित ही गती थोडी कमी असेल, पण सध्याचा आपला विकास सर्वच संगणकीय बाबतीत भलता तेजीत असल्याने लवकरच परिस्थिती समाधानकारक व्हावी. व्हिडिओ स्ट्रीमिंग सव्र्हिस थेट कॉम्प्युटवर येण्याचा अनुभव भारतीयांना दुर्मिळ वा अवघड नक्कीच नसेल. गेमिंग कन्सोल्स किंवा अॅपल टीव्हीसारखी स्ट्रीमिंग डिव्हायसेस असली, तर टीव्हीवर पाहणंही अशक्य नाही.
 
कडीकुलपाची  ‘सोय’
आपल्या टीव्हीवरच का, मोठय़ा पडद्यावरही सध्या सेन्सॉरशिपने धुमाकूळ घातलाय. सब घोडे बारा टक्के या नात्याने अर्थपूर्ण ते अर्थहीन या सर्वानाच कात्री लागते आणि रसिक कपाळाला हात लावून बसतात. खरं तर हा वेडेपणा आहे, कारण आज हाती संगणक असलेला लहान मुलगाही मनाला येईल ते कोणत्याही अडचणीशिवाय पाहू शकतो. सध्यातरी नेटफ्लिक्स सेन्सॉरशिपपासून मुक्त आहे, हा प्रेक्षकांचा मोठाच फायदा म्हणायला हवा. बहुतेक व्हिडिओ स्ट्रीमिंग सव्र्हिसेसमध्ये पालकांच्या नियंत्रणाची सोय असते, त्यामुळे तुम्ही फारच कडक पालक असाल, तर रेटिंगप्रमाणो  प्रौढांसाठी असणारे कार्यक्रम कडीकुलपात ठेवू शकताच.
 
 
आपला टीव्ही बदलेल?
 
पल्याकडल्या रतिबी मालिकांनी लोकांना लावलेली सर्वात वाईट सवय म्हणजे रोजच्या रोज एक नवा भाग पाहण्याचा अतिरेक. पूर्वी प्रेक्षकाला आठवडय़ाच्या उडीनंतर कथानक लक्षात ठेवायची सवय होती. आता मात्र एखाद्या ड्रगसारखी रोज ती विशिष्ट  वेळ झाली की त्याला ती अमुक मालिका पाहायला लागते. ती नसली तर तो प्रेक्षक बेचैन होऊन जातो. त्यात मुळातच यातल्या ब:याच मालिकांना धड कथानक नाही. (मराठीत अजिबातच नाही, हिंदीत क्वचित असणा:या  क्र ाईम, हॉरर वगैरे मालिकांना माफक कथानक असू शकतं.) त्यामुळे त्याच त्या कलावंतांनी, तसाच मेलोड्रामा करताना पाहणं हा या प्रेक्षकाचा डेली फिक्स झालेला आहे. (दर्जा नसणं, यात आपल्या मालिका करणा:यांचीही फार चूक नाही. परदेशी मालिकांचा एक सीझन, वर्षभरातले भाग, हे साधारण 10 ते 24 असतात. आपल्याकडे तेच जर वर्षभरात 200 च्या वर करावे लागले तर कसली सर्जनशीलता, न काय! वेठबिगारीच ही.) मला वाटलं होतं, की अनिल कपूरने जेव्हा 24 सारखी उत्तम मालिका हिंदीत आणली, आणि ब:यापैकी दर्जा सांभाळून आणली, तेव्हा तरी या प्रकारचे अधिक प्रयत्न दिसायला लागतील, पण तेव्हा काही हे झालं नाही. प्रतिसाद तेवढय़ापुरता राहिला, आणि भागांमधल्या अंतराने तो पुढे थोडाफार कमीच झाला. जर या प्रेक्षकांना खरंच काही उत्कंठावर्धक पाहायचं असेल आणि भागांमधली गॅप टाळून, सलग कथानक म्हणून पाहायचं असेल, तर ऑनलाईन स्ट्रीमिंग सव्र्हिस हा चांगला पर्याय आहे. कारण इथे संपूर्ण सीझन, झालेले सर्व भाग एकत्र दिसत असल्याने पाहाण्याचा अनुभव अधिक प्रभावी आहे. 
या अंतराचा प्रश्न हा काहीसा युनिवर्सल असावा. याबाबतीत नेटफ्लिक्सने अमेरिकेत केलेला एक प्रयोग आणि त्याला मिळालेलं यश भारतीय मालिकांच्या संदर्भात महत्त्वाचं आहे. इतर ठिकाणच्या मालिका दाखवण्याबरोबर जेव्हा नेटफ्लिक्सने आपलं नवं प्रोग्रॅमिंग बनवायला सुरुवात केली तेव्हा यावर चांगला उपाय शोधला. 2013 मधली दिग्दर्शक डेव्हिड फिंचरची निर्मिती असणारी आणि प्रमुख भूमिकेत केविन स्पेसीसारखा मोठा नट असणारी  ‘हाऊस ऑफ कार्ड्स’ मालिका जेव्हा नेटफ्लिक्सवर दिसली, तेव्हा त्यांनी अमेरिकन टीव्हीच्या रूढ प्रथेप्रमाणो आठवडय़ाला एक भाग रिलीज न करता आपल्या नेहमीच्या पूर्ण सीझन टाकण्याच्या पद्धतीला अनुसरून त्यातले सर्व, म्हणजे 13 भाग एकदम उपलब्ध करून दिले. नव्या निर्मितीसाठी हे काहीतरी अजब होतं, पण त्याला प्रतिसादही उत्तम मिळाला. 
ही सलग कथानक पाहायला मिळण्याची सवयदेखील अॅडिक्टीवच आहे, पण चांगल्या अर्थाने. 
अतिशय उत्तम दर्जा आणि सतत काही ना काही नवं, मधे वाट पाहायला न लागता दिसलं, तर टीव्हीकडून इतर कसली अपेक्षा ठेवायची! ही सवय जर आपल्या मालिकाप्रेमी लोकांमधेही पसरली, तर बदल नक्कीच संभवतो. असं झालं तर मग आपला आजचा टीव्हीही चाचपडताना आणि अखेर ऑनलाईन स्ट्रीमिंग सव्र्हिसेसच्या नव्या ‘आंतरराट्रीय’ स्पर्धेत टिकून 
राहण्यासाठी तरी  त्याच त्या गोष्टी दाखवण्याच्या दुष्टचक्रातून बाहेर येण्याचा प्रयत्न करताना दिसायला लागेल.
 
(देशी-विदेशी चित्रपटांचे अभ्यासक असलेले लेखक ख्यातनाम समीक्षक आहेत)
 

 

Web Title: OSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.