पनेलासो.

By admin | Published: May 14, 2016 12:56 PM2016-05-14T12:56:58+5:302016-05-14T12:56:58+5:30

मी नुकतेच ब्राझीलमध्ये राहायला आले होते. संध्याकाळच्या वेळी मध्येच अचानक भांडी एकमेकांवर आपटल्याचा आवाज यायचा. कधी कधी आपापल्या घरांत, इमारतींमध्ये अंधार करून, कधी दिवे मालवून, तर कधी दिवे चालू-बंद करून, हॉर्न वाजवून कलकलाट, गोंगाट केला जायचा. कधी हवा भरलेला बाहुला चौकात उभा करून येणारा-जाणारा त्याला बडवून जायचा. एरवी इथे रस्त्यावरही कधीच गोंधळ, कोलाहल दिसत नाही. सारे शांतताप्रिय. मग हा काय प्रकार? शोध घेतला, तेव्हा कळलं.

Panellaso | पनेलासो.

पनेलासो.

Next
>सार्वजनिक निषेधाची
समाजमान्य रीत
 
 
सुलक्षणा व:हाडकर
 
नवीन नवीन ब्राझीलमध्ये राहायला आले, तेव्हा संध्याकाळच्या वेळेस अचानक भांडी एकमेकांवर आपटल्याचा आवाज यायचा. चहाचे भांडे, तवा त्यांच्या झाकणासह एकमेकांवर  आपटला तर कसा आवाज येतो तसा आवाज. 
तुम्ही चर्चमध्ये असा, बागेत असा, बस स्टॉपवर असा हा आवाज येणारच.
एका ठरावीक दिवशी हे सर्व होत असे. आजही होत आहे. सगळीकडे अंधार होत असे. उंच उंच इमारतींमध्ये अंधार करून, कधी दिवे विझवून, लावून, चालू बंद करून, तर कधी हॉर्न वाजवून खूप गोंगाट कानावर पडायचा. एरवी इथे रस्त्यावर कुणी हॉर्न वाजवत नाही. परंतु काही ठरावीक वेळेस असा आवाज हमखास कानी येत असे. हा काय प्रकार आहे याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला, तेव्हा त्यामागील सामाजिक कारण समजले.
‘पनेलासो’ असे नाव असणा:या या कृतीचा खरा अर्थ होतो स्वयंपाकाची भांडी. इथे सार्वजनिक निदर्शने करण्याच्या पद्धतीला पनेलासो हे नाव दिलेय. मेटलची भांडी एकमेकांवर आपटून निषेध नोंदवण्याची ही पद्धत दक्षिण अमेरिकेतील म्हणायला हवी. याची सुरु वात चिली या देशात 1971 च्या सुमारास केली गेली. साल्वादोर अलेंदे या चिलीअन प्रेसिडेंटच्या विरोधात ही कृती सर्वप्रथम केली गेली. दक्षिण अमेरिकेतील पहिला मार्क्‍सवादी नेता, तोही निवडून आलेला. अशी ओळख असलेल्या या नेत्याला भांडय़ांच्या आवाजाला सामोरे जावे लागले होते.
त्यानंतर 2क्क्1 च्या सुमारास अर्जेटिनामध्ये प्रेसिडेंट फर्नादो देला रु वा यांच्या विरोधात महाभियोग चालविला होता, तेव्हा अशीच भांडी वाजली होती. स्पॅनिशमध्ये याला ‘कासेरोलाझो’ असे म्हणतात. आपण ‘कॅसरोल’ हा शब्द वापरतो त्यावरूनच हा शब्द आलाय. दक्षिण अमेरिकेतील स्पॅनिश भाषीय देशांमध्ये निदर्शनांची ही पद्धत वापरली गेली. आजही वापरली जातेय. यात आपला विरोध व्यक्त करण्यासाठी घराबाहेर जाण्याची गरज नाही, तर घरात राहून, बाल्कनीत येऊन किंवा खिडकी उघडून, एखादे पॅन किंवा  धातूचे भांडे घेऊन जोरजोराने एकमेकांवर आपटायचे. जास्तीत जास्त मोठा आवाज करायचा.
दक्षिण अमेरिकेप्रमाणो कॅनडामध्येही अशा पद्धतीने भांडी आपटली गेली होती. मध्यमवर्गीय आपला राग, संताप, निषेध व्यक्त करण्यासाठी याचा अवलंब करताना दिसून आली.
ब्राझीलमध्ये ही पद्धत ‘बुङिानोसोस’ म्हणून येते. यात हॉर्न वाजविला जातो. म्हणजे भांडय़ांच्या आवाजाबरोबर हॉर्न वाजवला जातो. सोशल नेटवर्किगच्या माध्यमातून केव्हा भांडी वाजवायची हे सांगितले जात होते. आता ब्राझीलमध्ये जेव्हा जेव्हा प्रेसिडेंट द्युमा भाषण करतात तेव्हा तेव्हा इथले नागरिक आपला असंतोष व्यक्त करतात. इथे सक्तीचे मतदान आहे. आताचे सरकार हे गरिबांचे समाजवादी सरकार मानले जाते. त्यामुळे ब्राझीलमधील उच्चवर्गीय तसेच मध्यमवर्गीय व्हाइट लोकसंख्या या सरकारवर नाराज आहेत. रविवारी मार्केटमध्ये जात असताना लुला दा सिल्वा यांचा बाहुला माङया घरासमोर रस्त्यावर उभा केला होता. तिथे कुणी एक जण भाषण करीत होता. पोलीस संरक्षण दिले गेले होते.
हा विभाग उच्चभ्रू म्हणून गणला जातो. परंतु इथे अगदी घराघरांतून लोक बाहेर पडले होते. लुला यांच्या हवा भरलेल्या बाहुल्याला ठोसे लगावत होते. या बाहुल्याला कैद्याचे कपडे घातले होते.
तिथल्या एका मुलीशी बोलत असताना ती म्हणाली, इथल्या मुख्य प्रसारमाध्यमांवर माझा विश्वास नाही. आम्ही आमची मते ब्लॉग्जवर, फेसबुकवर मांडतो. हे सरकार डाव्या विचारसरणीचे आहे. आम्ही उजव्या विचारसरणीचे आहोत. आम्ही 9क् टक्के आहोत. सध्याच्या सरकारच्या बाजूने फक्त दहा टक्के जनता आहे. 
मी भारतीय पत्रकार आहे असे समजल्यावर ती म्हणाली, माङो म्हणणो परदेशी प्रसारमाध्यमांमध्ये येणार नाही, कारण त्यांना ब्राझीलची गरिबी लोकांसमोर दाखवायची आहे. एकूणच अतोनात पैसे खाल्ल्याच्या तक्र ारी इथल्या सरकारबाबत पुढे येत आहेत. लोक मोठय़ा प्रमाणात एकत्र जमून मोर्चा आणत आहेत. ‘मेगा माग्निफिकासव’ म्हणजे असहकार चळवळ.
 मध्यंतरी अशाच एका चळवळीत इथले असंख्य नागरिक ब्राझीलमधील विविध शहरांत जमले होते. बिना लूटपाट, हिंसा आणि गैरमार्गाने आपले म्हणणो मांडण्यापेक्षा इथल्या नागरिकांनी शहरातील समुद्रकिना:यावर देशाचे ङोंडे घेऊन, कपडे घालून, एकत्र जमून आपला निषेध नोंदवला. लुला यांचे बाहुले मध्यभागी ठेवून त्यावर ठोसे लगावले.
निषेधासाठी एक गाणो कोरियोग्राफ करण्यात आले होते. त्यावर कशा पद्धतीने नृत्य करायचे हे यू-टय़ूबवर प्रत्यक्ष दाखविण्यात आले होते. फेसबुकवर या मोहिमेबद्दल सांगण्यात आले होते. अनेक सोसायटय़ांनी खासगी वाहनांची सोय केली होती. प्रत्यक्ष कोपकाबना येथील जगप्रसिद्ध किना:यावर रिओमधील जनता जमली होती. तिथे काहीजणांनी निषेधाच्या गाण्यावर एक सूर, एक ताल नृत्य केले. घोषणा दिल्या. बाहुल्यांना ठोसे लगावले. आणि मग बिअर पीत तो दिवस घालवला.
ब्राझीलमधील सध्याचे सरकार हे या न त्या कारणाने चर्चेत येतच आहे. मागल्या आठवडय़ात इथल्या एका नवीन मंत्र्याच्या बायकोने, जी आधी मिस बुम्बुम होती, स्वत:चे आणि मंत्रिमहोदयांचे अत्यंत दिलखेचक, मादक फोटो फेसबुकवर अपलोड केलेत. या फोटोंची दखल बीबीसीनेदेखील घेतली. नंतर त्या दोघांनी हे फोटो जुने असल्याचे सांगितले. परंतु या घटनेने पुन्हा सध्याचे सरकार चर्चेत आले.
कोणाहीबाबत निषेध नोंदवायचा असो, त्याबद्दल आपली नापसंती दर्शवायची असो नागरिक या पद्धतीने कृती करून आपलं विरोधी मत व्यक्त करतात. सार्वजनिक निषेधाच्या या मार्गातून आपल्याबाबतचा निषेध किती तीव्र आहे हेही त्या त्या लोकांना, सरकारला कळतं. निषेधाची ही रीत आता सार्वत्रिक झाली आहे.
(ब्राझीलमधील रिओ-दि-जानेरिओ येथे वास्तव्याला असलेल्या लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
sulakshana.varhadkar@gmail.com

Web Title: Panellaso

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.