ढाकणा वन्यप्राण्यांचे नंदनवन

By admin | Published: October 31, 2015 02:21 PM2015-10-31T14:21:25+5:302015-10-31T14:21:25+5:30

माझ्या तारुबंद्याच्या दिवसांत ढाकणा हे माङया कामाचं महत्त्वाचं केंद्र होतं. तिथं मी कामाच्या तपासणीसाठी, मजुरी देण्यासाठी वरेचवर जात असे

Paradise of Dhakana Wildlife | ढाकणा वन्यप्राण्यांचे नंदनवन

ढाकणा वन्यप्राण्यांचे नंदनवन

Next
>- प्रकाश ठोसरे
अनुवाद : अरविंद आपटे
 
माझ्या तारुबंद्याच्या दिवसांत ढाकणा हे माङया कामाचं महत्त्वाचं केंद्र होतं. तिथं मी कामाच्या तपासणीसाठी, मजुरी देण्यासाठी वरेचवर जात असे. माङया धारणीच्या दिवसांत आणि नंतरही व्याघ्र प्रकल्पाच्या दिवसांत ढाकणा मला नेहमीच आकर्षित करत राहिलं. ढाकण्याभोवतालचं सुंदर जंगल आणि वन्यप्राण्यांची अपवादात्मक दाटी या ढाकण्याच्या खास वैशिष्टय़ामुळे माझं मन नेहमीच तिथं ओढ घेई.  
उन्हाळ्यात गडगा नदी रोडावून काही डोह/ कुंडांपुरतं तिचं अस्तित्व उरत असे. विश्रमगृहाच्या विरुद्ध बाजूस असाच एक डोह होता. या डोहावर जवळपास सर्वच मोठाले प्राणी जमत. विशेषकरून भर उन्हाळ्यात, मे महिन्यात इतरत्र पाण्याचा तुटवडा झाल्यावर हा डोहच प्राण्यांचा एकमेव आधार असे. गवे स्वभावत: लाजाळू असल्याने विश्रमगृहाला वळसा घालून डोहावर जात. पण वाघ मात्र बेधडक विश्रमगृहाच्या आवारातूनच डोहावर घुसत. पाणवठय़ावर कधी कधी अस्वलंही दिसत.  
ढाकणा-आढाव रस्त्यावर ढाकण्यापासून तीन किलोमीटरवर सिद्धुकुंड (सिद्धू म्हणजे स्थानिक भाषेत दारू) नावाचं एक कुंड आहे. या कुंडातील पाण्याचा वापर वन्यप्राण्यांसोबतच काही उद्योगी मानवप्राणीही करत. फावल्या वेळात हातभट्टीचा धंदा करायला ही आदर्श जागा होती. सिद्धुकुंडात मासे भरपूर असत. वरिष्ठ अधिका:यांच्या दौ:यात या कुंडातले मासे हा जेवणाचा अविभाज्य भाग असे. वन्यप्राण्यांकरता जवळपास दुसरा पाणवठा नसल्याने त्यांचा ओढा या कुंडावर असे. त्यामुळे सूर्यास्तापूर्वी मासेमारी करणारे आपला गाशा गुंडाळत. तिथं अधिक काळ रेंगाळणं म्हणजे संकटाला आमंत्रणच! 
गो:या कातडीच्या एका महिलेनं 1930 च्या मध्यात असं संकट ओढवून घेतलं होतं. एक ब्रिटिश वनाधिकारी (बहुधा श्री. मेटलॅण्ड असावेत) आपल्या पत्नीसह ढाकण्याला कामानिमित्त मुक्कामी आले होते. हे कर्तव्यदक्ष अधिकारी दिवसाचे बारा-बारा तास मैदानी कामात गढलेले असत. वेळ घालवण्यासाठी त्यांची पत्नी मासेमारीच्या छंदाकडे वळल्या. जरा उन्हं कमी झाल्यावर त्या सिद्धुकुंडावर मासेमारीकरता जात. सोबत दहा वर्षांची एक कोरकू मुलगी असे. एके दिवशी सूर्यास्तानंतरही त्या कुंडावरच रेंगाळल्या. त्या सिद्धुकुंड सोडायच्या तयारीत असताना एक वाघीण तिच्या पिलासह येत असताना आडवी आली. बाईंना धाक दाखवण्यासाठी वाघिणीने धावून आल्यासारखं केलं. क्षणार्धात बाई मूच्र्छित झाल्या. त्या मुलीने एकदाही मागे न पाहता ढाकण्याला धाव घेतली आणि गावभर सांगत सुटली की गो:या मॅडमेला वाघानं खाल्लं. पटकन गावकरी गोळा झाले आणि त्यांनी कुंडाकडे धाव घेतली व मूच्र्छित मॅडमना घरी आणलं. 
एक प्रसंग आठवतो. माङया मित्रची, तसनीमच्या अम्मीजानना (हुक्कावाल्या) धारणीला यावं लागलं होतं व मला त्यांना चिखलद:याला सोडायचं होतं. मी जाणीवपूर्वक वाकडी वाट करून त्यांना ढाकणामार्गे न्यायचं ठरवलं. आम्ही ढाकणा-डोलार रस्त्याला लागल्या लागल्या नेहमीप्रमाणो वन्यप्राण्यांची परेड सुरू झाली. ते प्राणी पाहून मी सुखावत होतो. पण अम्मीजानची प्रतिक्रिया वेगळीच होती. दरवेळी एखादा प्राणी दिसला की त्या त्याच्या नावानं बोटं मोडत मला म्हणायच्या, ‘बेटा, तू नशीबवान आहेस, तुला धारणीसारख्या मोठय़ा जागी पोस्टिंग मिळालं. बिचारा माझा तसनीम, या प्राण्यांसोबत कसा काय राहत असेल.’ माझा चेहरा फोटो काढण्याजोगा झाला होता! 
या घटनेनंतर काही दिवसांनी अनिल देशमुख नावाचा नागपूरचा एक तरुण व्यावसायिक धारणीला चक्कर टाकून गेला. त्याच्या बहिणीसाठी स्थळ म्हणून मी कसा आहे याची चाचपणी होती. ही चाचपणी मूर्त स्वरूपात आली आणि दीप्तीशी माझा विवाह झाला. मी तिला घेऊन धारणीला आलो. एके दिवशी मी तिला सांगितलं की, संध्याकाळी आपल्याला एका खास फेरफटक्यासाठी जायचं आहे. तो मे महिना होता. संध्याकाळचे पाच वाजले. खास फेरफटक्यासाठी म्हणून लिपस्टिक, हाय हिल्स, गुलाबी साडी, त्याला मॅचिंग म्हणून मोठी हॅण्डबॅग कम पर्स असा खास सरंजाम करून दीप्ती तयार झाली होती. मी बघतच राहिलो. जास्त काही न बोलता आम्ही निघालो. ढाकणा-डोलार रस्त्याचा फेरफटका मारून चारएक तासांनी आम्ही परतल्यावर धुळीने माखलेले आमचे चेहरे ओळखण्यापलीकडले झाले होते. त्या नवविवाहितेचं मनोरंजन झालं असावं का? -विचारण्याचं धारिष्टय़ मी तरी केलं नाही!
 तिस:या प्रसंगात दीप्तीचा भाऊ अनिल, त्याची पत्नी आरती आणि त्यांची छोटी कन्यका पायल आम्हाला भेटायला धारणीला आले होते. मोठय़ा अभिमानाने मी या पाहुण्यांना ढाकणा विश्रमगृहात आणि नंतर ढाकणा-डोलार रस्त्यावर उघडय़ा जीपमध्ये घेऊन गेलो. आम्ही खूप सुदैवी होतो. (खरंच?) वाघ सोडला तर जवळपास सगळेच प्राणी हजेरी लावून गेले होते. पण दरवेळी प्राणी दिसला की आरती वहिनी डोळे गच्च मिटून घेत असत. माङया पत्नीकडून तो प्राणी दिसेनासा झाला आहे याची खात्री केल्याशिवाय डोळे उघडत नसत. अर्थात असे प्रसंग अपवादात्मकच. 
 ढाकणा-डोलार रस्त्यावर ढाकण्यापासून सात-आठ किलोमीटरवर सागवानाचं एक नवं रोपवन होतं. रस्त्याला लागून रोपवनात एक मोठं मोहाचं झाड होतं.  अस्वलांनाही मोहाची फुलं खूप आवडतात. असं म्हटंल जातं की, हे झाड दिवसा आदिवासींचं असतं व रात्री अस्वलांचं. एका रात्री मी तिथून जात असताना एक अस्वल ह्या झाडाखाली बघितलं होतं. मी थोडं अंतर पुढे गेलो आणि साधारणत: एका तासाने परत त्याच जागी आलो तर अस्वल महाशय जमिनीवर पडलेल्या मोहाच्या फुलांवर ताव मारत होते. रात्री पुन्हा त्या दिशेनं गेलो असताना पाहिलं तर अस्वलाला मोह चढली होती आणि तो मस्तपणो झुलत होता. 
    एके संध्याकाळी मी डोलारहून ढाकण्याला येत होतो. अध्र्या वाटेतच काळोख झाला होता. रस्त्यावर प्रणयात मग्न असलेल्या अस्वल युगुलाकडे आमचं अंधारात साफ दुर्लक्ष झालं होतं. आम्ही त्यांच्या जवळून जात असताना त्यांनी अचानक मोठी भयावह आरोळी मारली. सहसा वन्यप्राणी दिसल्यावर प्राणी नीट दिसावा म्हणून मी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगत असे. कोणी एवढी भयावह आरोळी मारली हे बघण्यासाठी मी गाडी न थांबवताच मागे वळून पाहिलं. आणि मी जे काही पाहिलं त्यानं माझं हृदय धडधडू लागलं. काळजाचं पाणी पाणी व्हावं असं जंगलातलं सर्वात भयावह दृश्य मी पाहत होतो. दोन्ही अस्वलं त्यांच्या मागच्या पायावर उभं राहून फार वेगाने आमचा पाठलाग करत होती, त्यांनी जवळजवळ आम्हाला पकडलच होतं. ताशी तब्बल 5क् किलोमीटर वेगानं शंभर मीटरपर्यंत त्यांनी आमचा पाठलाग केला होता. माझी खात्री आहे की जर का त्यावेळी हसनने ब्रेक मारला असता तर आमची धडगत नव्हती!
एकदा माङो बॉस सक्सेनासाहेब कुटुंबासह धारणीला आले होते. सहसा ते तारुबंद्याला मुक्काम करत. पण माङया आग्रहाखातर ते ढाकणा विश्रमगृहात उतरले. मी त्यांना वन्यप्राणी दाखवण्याची हमी दिली होती. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही बरंच फिरलो,पण काहीही दिसलं नाही. मला अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं. त्यांना वन्यप्राणी दाखवायचेच हा चंग बांधून चहापान झाल्यावर मी त्यांना दुस:या मार्गाने जाण्याबद्दल सुचवलं. 
आता त्यांनी चालकाची जागा घेतली. त्यांच्या शेजारी त्यांच्या पत्नी मुलगा अक्षदला मांडीवर घेऊन बसल्या. मी त्या उघडय़ा जीपमध्ये मागच्या बाजूला सर्चलाईट घेऊन, तर हसन एखादा प्राणी दिसतो का हे डोळे फाडून फाडून बघत बसला. साधारण तासाभराने आम्ही कुंड रस्त्यावर पोचलो. अचानक मला डावीकडे वीसएक मीटरवर एक मोठा बिबटय़ा दिसला. मोठय़ानं ओरडणं आम्ही साहेबांना जीप थांबवायला सांगितली. कारण 3913 ला इंटरनॅशनल ट्रॅक्टरचं इंजिन होतं. सक्सेनासाहेबांनी जेमतेम पंधरा-वीस सेकंद बिबटय़ा पाहिला असेल नसेल तोच माझी नजर एका सरळसोट सागवानाच्या झाडावर बसलेल्या दुस:या एका बिबटय़ावर पडली. हे झाड सौ. सक्सेनांपासून एखाद्या मीटरवरच होतं. मी सक्सेनासाहेबांना जीप सुरू करा असं सांगण्याआधीच बिबटय़ाची झाडावरची पकड सुटली आणि तो जीपच्या डाव्या चाकापाशी पडला आणि लगबगीने जंगलात घुसला. माङयाशिवाय कुणालाच हे दिसलं नव्हतं. त्यामुळे धाडकन आवाज कसला झाला याचं त्यांना आश्चर्य वाटत होतं. विश्रमगृहात परतल्यावर काय झालं ते मी सांगितलं, तेव्हा आम्ही सुखरूप आल्याबद्दल देवाचे आभार मानले.
एखाद्या ठिकाणाहून वन्यप्राणी अचानक नाहिसं होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे रानकुत्र्यांचं अस्तित्व. रानकुत्र्यांची टोळी प्राण्यांना तात्पुरतं स्थलांतर करायला, विशेषत: शाकाहारी प्राण्यांना, भाग पाडतात. एकदा मलाही अशीच खाली फेरी पडली होती पण शेवटी परतताना विश्रमगृहाजवळ बिबटय़ा दिसला. तो बिबटय़ाही क्षणार्धात अंधारात नाहीसा झाला. वैतागून मी जीप रिव्हर्स घेऊन माङया हातातल्या सर्चलाईटच्या उजेडात बिबटय़ा कुठे गेला ते शोधू लागलो. लवकरच मला जवळच्या शेतात चमकणा:या डोळ्यांची जोडी दिसली. वन्यप्राणीदशर्नाचा उपास घडला असल्यामुळे हा बिबटय़ा तरी नीट पाहावा म्हणून मी हसनला जीप शेतात घ्यायला सांगितलं. आता आम्हाला उघडय़ावरचा बिबटय़ा अगदी नीट दिसत होता. आमच्यापासून तो वीस मीटरवर डावीकडे होता. दहा सेकंदाकरता मी हेडलाईट्स व सर्चलाईट बंद केला. लाईट परत लावल्यावर बघतो तर बिबटय़ा गायब! आता तो आमच्या उजवीकडे चाळीस मीटरवर प्रकट झाला होता. मी परत दिवे बंद केले, चालू केले. परत तोच चमत्कार, आता तो डावीकडे होता. इतका धूर्तपणा आणि सावधपणा दुस:या कोणत्या प्राण्यात क्वचितच आढळतो. पुढे दहा वर्षांनी मी व्याघ्र प्रकल्पाचा वनसंरक्षक म्हणून मेळघाटमध्ये रुजू झालो तेव्हा असाच धूर्तपणाचा अनुभव कराकलच्या बाबतीत आला. त्याबद्दल पुढे कधीतरी.
 
(लेखक महाराष्ट्राचे सेवानिवृत्त प्रधान 
मुख्य वनसंरक्षक आहेत.)
 
pjthosre@hotmail.com

Web Title: Paradise of Dhakana Wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.