आपुलकीचा गोतावळा!

By admin | Published: October 3, 2015 10:15 PM2015-10-03T22:15:32+5:302015-10-03T22:15:32+5:30

‘इथे कोण राहायला येणार?’ म्हणून अगोदर सर्वानीच ‘सन सिटी’ वसाहतीच्या नावानं बोटं मोडली होती, पण ही घरं पाहायला पहिल्याच आठवडय़ात लाखाहून अधिक लोकांनी हजेरी लावली.

The passion of affection! | आपुलकीचा गोतावळा!

आपुलकीचा गोतावळा!

Next
>- दिलीप वि. चित्रे
 
‘इथे कोण राहायला येणार?’ 
म्हणून अगोदर सर्वानीच ‘सन सिटी’
वसाहतीच्या नावानं बोटं मोडली होती,
पण ही घरं पाहायला पहिल्याच आठवडय़ात लाखाहून अधिक 
लोकांनी हजेरी लावली.
अल्पावधीत ही घरं लोकप्रियही झाली.
अर्थात हे सारं एका रात्रीत घडलं नाही.
तिथल्या रहिवाशांचं एकमेकांवरचं प्रेम,
शेजारधर्म आणि अडल्यानडल्याला
‘घरचं माणूस’ समजून तत्काळ मदत,
या गोष्टींमुळे ते एक ‘कुटुंब’च झालं.
 
स्वयंसेवी वृत्तीनं काम करण्याची आस असलेल्या लोकांनी निर्माण झालेल्या ‘सन सिटी सेंटर’ या वसाहतीची आणि इथल्या शेकडो विविध क्लब्सची निर्मिती व लोकप्रियता या गोष्टी काही एका रात्रीत घडलेल्या नाहीत. सर्वसाधारणपणो पारंपरिक संकल्पनेवर आधारित असलेल्या, ज्येष्ठ नागरिकांसाठी निर्माण झालेल्या यापूर्वीच्या सर्वच योजनांच्या दिशांना ‘सन सिटी सेंटर’ने जबरदस्त धक्का दिला. त्या सपशेल उलटय़ा-पालटय़ा करून टाकल्या. 
सर्वप्रथम अॅरिझोना राज्यात सुरू झालेल्या या वसाहतीच्या सहा मॉडेल होम्सचे उद्घाटन ऊी’ 6ीु नावाच्या द्रष्टय़ाने जेव्हा जानेवारी 1, 196क् रोजी केले तेव्हा ती घरे पाहण्यासाठी हजारो मोटारींची रांग लागली आणि अशा वसाहतीत कोण राहायला येणार? असं म्हणणा:या तज्ज्ञांनी आश्चर्याने तोंडात बोटं घातली. पहिल्या आठवडय़ातच जवळ जवळ एक लाखांहून अधिक लोकांनी ती घरं पाहण्यासाठी म्हणून आपली हजेरी लावली. एवढंच नाही तर त्याच दिवशी जवळजवळ 237 घरे विकली गेल्याच्या सह्या लोकांनी आपापल्या करारपत्रंवर केल्या. ‘सन सिटी सेंटर’ला मिळालेली ही अनपेक्षित आणि जबरदस्त लोकप्रियता कंपनीने आधी नियोजित केलेल्या 17क्क् घरांच्या बांधकामाऐवजी 2क्क्क् घरांच्या विक्रीस कारणीभूत ठरली. 
1 जानेवारी 196क् या उद्घाटनाच्या दिवसापूर्वी महिनाभर या वसाहतीचे नावसुद्धा काय असावे हे ठरले नव्हते. परंतु राष्ट्रीय पातळीवर एक स्पर्धा ठेवण्यात आली आणि त्यात आलेल्या हजारो नामांकनांमधून ‘डेल वेब’नं स्वत: या नावाची निवड केली. 
‘सन सिटी’च्या अॅरिझोनामधील प्राथमिक यशामुळे संपूर्ण देशाचे लक्ष तिकडे वेधले गेले. नियतकालिके, वर्तमानपत्रे, टेलिव्हिजन शोज् वगैरे सर्वच माध्यमांतून ‘सन सिटी’बद्दल चर्चा व्हायला लागली. 1962 च्या ‘टाइम’ मॅगङिानच्या मुखपृष्ठावर ‘डेल वेब’चा फोटो छापला गेला. ‘सन सिटी’बद्दल होणा:या विधायक जाहिरातींच्या वर्षावामुळे या वसाहतीची लोकप्रियता प्रचंड वाढीस लागली आणि डेल वेबने कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडामध्येसुद्धा अशा वसाहती उभारण्याची योजना केली. परंतु तोंडातोंडी झालेल्या चर्चेमुळे त्या लोकप्रियतेनं उच्चांक गाठला. 196क् च्या आधी आलेली कुटुंबं व नंतरची यांची मैत्री / नाती जुळली आणि इथल्या जीवनशैलीची, राहणीमानाची वर्णनं त्यांनी आपापल्या मित्र-मैत्रिणींना सांगता सांगता ‘सन सिटी’चा गोतावळा विस्तारत चालला. 
मैत्री, सामाजिक बांधिलकी, करमणूक आणि मौज, आनंद या गोष्टी तेव्हा आणि आत्ताही या वसाहतीची प्रमुख उद्दिष्टं ठरली. आपापल्या आवडी-निवडींच्या असंख्य कला आणि समाजाभिमुख कार्ये यांच्या क्लब्सची स्थापना झाली. शेजारी-पाजारी, मित्र-मैत्रिणी आदि एखाद्या विशेष प्रसंगी, सणवार, कौटुंबिक आनंद साजरा करण्यासाठी ‘रिक्रेएशन सेंटर’मध्ये एकत्र जमू लागले. 
अशा त:हेच्या फक्त ज्येष्ठांसाठी निर्माण केलेल्या वसाहतीच्या संकल्पनेच्या विरोधात जरी अनेक जण होते तरी ‘डेल वेब’ मात्र आपल्या निर्णयाबद्दल खंबीर होता. त्याला आपल्या संकल्पनेच्या भविष्यातील यशाची खात्रीच होती. अन्य वसाहतींमध्ये सुरुवातीला जशी येथे अमुक होईल, तमुक मिळेल अशी फोल वचनबाजी केली जाते व प्रत्यक्षात कधीच येत नाही, तशा सर्व सुविधा, सोयी, शॉपिंग सेंटर्स, थिएटर वगैरेंचे बांधकाम डेल वेबने घरांचे बांधकाम सुरू करण्यापूर्वीच पूर्ण केले होते. 
‘ना नफा, ना तोटा’ या धोरणावर आधारित ‘द सन सिटी कम्युनिटी असोसिएशन’ची निर्मिती करण्यात आली. स्वस्त सभासदत्वाच्या दरात संस्थेच्या कार्यकारी समितीकडून रहिवाशांना विविध सोयी, करमणुकीची साधनं आणि योजना उपलब्ध करण्यात येऊ लागल्या. विविध सोयी-सुखसोयींपलीकडे अन्य कशासाठीही इथल्या रहिवाशांना सन सिटीबाहेर पडण्याची वेळ येऊ नये, असे डेल बेबचे स्वप्न होते आणि त्यासाठी तो धडपडत होता. ‘सन सिटी’ ही एक स्वयंपूर्ण वसाहत असावी असे तो मानत होता. शॉपिंग सेंटर्स, उपाहारगृहे, डॉक्टर्स, हॉस्पिटल, नर्सिग होम, चर्च, अन्य आवश्यक उद्योगधंदे, दुकाने यांच्यासाठी त्याने कित्येक एकरांची जमीन राखून ठेवली होती. 1966 साली फ्लोरिडातल्या सन सिटीच्या रहिवाशांसाठी जवळच हॉस्पिटल असावे या कल्पनेच्या फेरतपासणीसाठी एक समिती योजण्यात आली. त्यासाठी देणग्या जमवण्याची सुरुवात झाली. त्याचा उच्चांक गाठला तो जेम्स बोसवेल नावाच्या धनिकाने त्याकाळी दिलेल्या 1.2 मिलियन डॉलर्सच्या देणगीने. सध्याच्या सन सिटीच्या जमिनीचा मालकही तोच होता. 1969 मध्ये हॉस्पिटलच्या पायाभरणीच्या कामाला सुरुवात झाली. 
आज इतक्या वर्षानंतरसुद्धा ‘सन-सिटी’ स्वयंसेवकांच्या कामानं समृद्ध असलेल्या लक्षणांसाठी सुप्रसिद्ध आहे. या गावाला म्युनिसिपालिटीसारखी कुठलीही यंत्रणा नाही.
बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची निवड सभासद रहिवाशांकडूनच केली जाते आणि त्या बोर्डाकडून अन्य विविध समित्या, करमणूक केंद्रे, आर्ट क्लब्स इत्यादिंचे व त्यांच्या नियमांचे नियंत्रण केले जाते. बदलत्या काळाप्रमाणो निर्माण होणा:या गरजांचे जे प्रश्न असतील ते रहिवाशांकडून ताबडतोब सोडवले जातात. त्यावर उत्तरं शोधण्याची धडपड होते. रस्ते स्वच्छ, चकचकीत ठेवले जातात. योजनापूर्वक केलेल्या लॅण्डस्केपिंगमुळे गावाच्या सौंदर्यात भर पडते. गावातल्या पोलिसांच्या गाडय़ा सतत गस्त घालीत असल्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण असते. रहिवाशांना तो मानसिक आधार असतो. रहिवाशांच्या दैनंदिन आरोग्याच्या रक्षणासाठी उभारलेल्या स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमामुळे वैद्यकीय उपचारांच्या खर्चात प्रचंड मोठय़ा प्रमाणात बचत होते. 
अॅरिझोना राज्यात फिनिक्स शहरात सुरू झालेल्या या वसाहतीच्या कामानं आणि नंतर कॅलिफोर्निया व फ्लोरिडात सुरू झालेल्या या वसाहतीच्या कामानं अनेकांना नोक:या मिळवून दिल्या, राज्याची आर्थिक भरभराट झाली आणि लोकांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाला.
‘सन अॅण्ड फन’ या गोष्टींच्या आकर्षणामुळे जरी सन सिटीच्या लोकप्रियतेत भर पडली असली, तरी त्या लोकप्रियतेची खरी शक्ती आहे ती रहिवाशांच्या एकमेकांवरील प्रेमामुळे, शेजारधर्म पालनाच्या कर्तव्यामुळे आणि आपली जबाबदारी पार पाडण्याच्या निष्ठावान जाणिवेमुळे..स्व
 
तिस:या पिढीतील ‘नव-ज्येष्ठांची’
सन सिटीकडे वाटचाल!
नुकतीच, 2-3 वर्षापूर्वी फ्लोरिडामधील सन-सिटी सेंटरला 5क् वर्षे पूर्ण झाली. इथली प्रतिष्ठा आणि सुखसोयी या कारणांमुळे अमेरिकेतील अनेक राज्यांमधल्या ज्येष्ठ नागरिकांना आकर्षित केले आहे. मुलं पक्ष्यांप्रमाणो घरटय़ाबाहेर पडल्यानंतर ‘एम्टी नेस्टर्स’ म्हणून जगणा:यांचे डोळे सन सिटीकडे न लागले तरच नवल. सन सिटीची निर्मिती झाल्यापासून आता तिस:या पिढीचे ‘नव-ज्येष्ठ’ सन सिटीच्या दिशेनं ङोपावू लागले आहेत. निवृत्तीच्या वयाकडे वाटचाल करत असलेल्या ‘बेबी बुमर्स’च्या जनतेची नजर आता पारंपरिक वृत्तीने निवृत्तीनंतरची वर्षे व्यतीत करण्यापेक्षा सन सिटी सेंटरमधल्या जीवनशैलीवर स्थिरावली आहे.
 
(दीर्घकाळ अमेरिकेत वास्तव्याला असणारे ज्येष्ठ मराठी लेखक. ‘कुंपणापलीकडले शेत’ हा कथासंग्रह,  ‘अलिबाबाची हीच गुहा’ या सांगीतिकेसह विदेशातील अनेक मराठी उपक्रम/संस्थांचे संपादक, 
संयोजक, संघटक)

Web Title: The passion of affection!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.