पटियाला

By admin | Published: March 19, 2016 02:25 PM2016-03-19T14:25:33+5:302016-03-19T14:25:33+5:30

स्वातंत्र्यपूर्व भारतातलं एक संस्थान. राजरजवाडय़ांचा दिमाखदार वारसा सांगणारं पंजाबमधलं आजचं एक शहर.

Patiala | पटियाला

पटियाला

Next
सुधारक ओलवे
 
स्वातंत्र्यपूर्व भारतातलं एक संस्थान. राजरजवाडय़ांचा दिमाखदार वारसा सांगणारं पंजाबमधलं आजचं एक शहर. कडाक्याची थंडी आणि उन्हाळ्यात टळटळीत ऊन. दूर नजर जाईल तिथर्पयत गव्हाची शेतं, कोठारच ते गव्हाचं! हिरवट पिवळी गव्हाची ती पठारं डोळ्यांचं पारणं फेडतात. हे पटियालाचं राज्य खरंतर निर्माण केलं दोन मित्रंनी. अलासिंग ब्रार, शीख जाट माणूस आणि दुसरा लखना कसाना, मुस्लीम धर्मीय. या दोघांनी 1721 मध्ये हे राज्य स्थापलं. काही लिखापढी नसताना केवळ रीत म्हणून पटियालाच्या महाराजपदी शीख व्यक्ती विराजमान झाली आणि सैन्याची सूत्रं अर्थात सेनापतिपद मुस्लीम धर्मी व्यक्तीकडे देण्यात आलं. शंभर वर्षे किंवा त्याहून अधिक काळ ही परंपरा पटियाला संस्थानानं जपली. एका फ्रेंच ट्रॅव्हल मॅगङिानसाठी शूट करायचं म्हणून मी 2क्13 साली पंजाबमध्ये फिरत होतो. त्या प्रवासात मला पंजाब ख:या अर्थानं भेटलं. तीन गोष्टींसाठी जगप्रसिद्ध असलेलं हे शहर, पगडी अर्थात जट्टी, परांदा (महिलांनी केसात बांधायची लांब रेशमी गोंडेवाली चमचमती रिबीन) आणि तिसरा अर्थातच पटियाला पेग! 
या प्रवासात आम्ही अनेक ऐतिहासिक किल्ले पाहिले, अनेक भग्न अवशेष एकेकाळच्या वैभवाच्या कहाण्या सांगत होते. सीश महालासारखे अद्भुत सुंदर महाल, भव्य किल्ल्यातली मोठमोठी दालनं राजांच्या, राण्यांच्या एकेकाळच्या अतिविलासी, अतीव श्रीमंत जगण्याची आणि वैभवी संस्थानांची याद म्हणून आता खंडहर होऊन पडलेत. पटियालाच कशाला, पंजाबात अनेक राजांनी राज्यं केली, पण महाराजा राजींदर सिंग आणि महाराजा भुपिंदर सिंग या पितापुत्रच्या जोडीनं केलेल्या राज्यकारभाराची सर दुस:या कुणास नाही. 1876 ते 1900 हा तो काळ. मात्र त्या काळाच्या फार पुढचा विचार करणारा अत्यंत उमदा आणि दिलदार असा राजा होता, महाराजा राजींदर! ब्रिटिश सरकारलाही त्यांच्याविषयी अतीव आदर होता. त्यांना ‘स्टार ऑफ इंडिया’ हा सन्मान देऊन इंग्रज सरकारने सन्मानित केलं होतं. राजींदर सिंग नुस्ते नावाचे महाराजा नव्हते. त्यांचा राजा म्हणून दरारा आणि शानच अशी होती की, लोकांना त्यांच्याविषयी आदर तर होताच, मात्र त्यांची जीवनशैलीही विस्मयकारक विलासी होती. पोलो, क्रिकेट, बिलीअर्ड्स यात त्यांचा हातखंडा होता. त्यांना 365 बायका होत्या अशा दंतकथाही सांगितल्या जातात. मला वाटतं, एखाद्या राजालाच परवडू शकतं, इतक्या जणींचा संसार सांभाळणं!!
असं म्हणतात की, भारतात ज्या माणसानं पहिली कार विकत घेतली ते हे महाराज. त्यांचे पुत्र महाराजा सर भुपिंदर सिंग यांनीही हा समृद्ध, श्रीमंत राजवारसा पुढे चालवला. पटियालाचे लोकप्रिय महाराज म्हणून त्यांची ओळख सांगितली जाते. मात्र राजारजवाडय़ांना असतो तसा अहंकार त्यांनाही होता आणि नुस्ता अहंकारच नाही तर स्वाभिमानही दुखावला गेल्यानं त्यांनी जे केलं, त्याचे किस्से अजून सांगितले जातात.
त्याकाळी अत्यंत प्रसिद्ध असलेली अति महागडी रोल्स रॉईस गाडी खरेदी करायला एकदा ते गेले होते. मात्र ‘ही गाडी तुम्हाला नाही परवडणार’ असं तिथल्या विक्रेत्यानं तोंडावर सांगितल्यानं ते खवळले आणि त्यांनी एक गाडीच नाही तर त्याचं अख्खं शोरूमच गाडय़ांसह खरेदी करून टाकलं. त्यांच्याकडे त्या काळी 2क् रोल्स रॉईस होत्या आणि आपल्या अपमानाची भरपाई म्हणून त्यांनी गावातला कचरा वाहून नेण्यासाठी या रोल्स रॉईसचा उपयोग केला. इतरांच्या नाकावर टिच्चून आपली श्रीमंती मिरवली. ही श्रीमंती खरंच अमर्याद होती. भारतात स्वत:च्या मालकीचं पहिलं विमानही त्यांनीच विकत घेतलं होतं. त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या क्रिकेट आणि पोलो टीम्स होत्या. उन्हाळ्यात गारवा हवा म्हणून त्यांनी हिमालयाच्या पायथ्याशी अनेक मोठे प्रासाद बांधले, क्रिकेटची मैदानं तयार केली. किला मुबारक या भव्य राजवाडय़ातून फिरताना हे सारं आठवत राहतं. या भिंती आजही साक्षीदार आहेत त्या राजसी वैभवाच्या असं वाटतं. अर्थात तशाही आता त्या सा:या वैभवी खुणा लाकडी कपाटांच्या काचांआड हारीनं मांडलेल्या दिसतात. या राजवाडय़ाचं आता संग्रहालयात रूपांतर करण्यात आलंय. आता इथं फक्त ‘पर्यटक’ येतात, वस्तू पाहतात. मात्र ती शान, राजांचा तो वावर, कचरा वाहून नेणा:या आलिशान गाडय़ा हे सारं आता काळाच्या उदरात गडप झालंय.
1947 नंतर हे संस्थानही भारतात विलीन झालं. मात्र अजूनही पर्यटकांना इथं येताच, राजांच्या सुरस कहाण्या ऐकू येतात.
पटियालाचे राजे अजून आहेतच, आठवणींत आणि त्यांच्या अजब गोष्टींत!!
 
(छायाचित्रणाच्या माध्यमातून समाजकार्याबद्दल पद्मश्री पुरस्कारप्राप्त छायाचित्रकार ‘लोकमत’ समूहाचे फोटो एडिटर आहेत.)

Web Title: Patiala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.