झोळी दुबळीच..

By admin | Published: August 12, 2016 06:11 PM2016-08-12T18:11:26+5:302016-08-12T18:35:24+5:30

सावित्री नदीला आलेल्या पुरात महाडचा ब्रिटिशकालीन पूल कोसळला. पाण्यात पडलेल्या वाहनांचा शोध तर अजूनही सुरू आहे.

Piece .. | झोळी दुबळीच..

झोळी दुबळीच..

Next

 - अभिजित घोरपडे

सावित्री नदीला आलेल्या पुरात महाडचा ब्रिटिशकालीन पूल कोसळला.
पाण्यात पडलेल्या वाहनांचा शोध तर अजूनही सुरू आहे.
का कोसळला हा पूल? त्याला जबाबदार कोण?
यंत्रणेतील त्रुटी, बेफिकिरी की निसर्ग? 
एक नक्की,
‘यंत्रणेतील त्रुटी म्हणजे माणूस’ आणि ‘निसर्ग म्हणजे पाऊस’ 
यांच्यापैकीच कोणावर तरी ही जबाबदारी टाकावी लागेल. 
अनेकांनी ही जबाबदारी निसर्गावर ढकलण्याचा प्रयत्न केला.
पण त्यात तथ्य किती?



वित्री नदीला आलेला पूर आणि महाडजवळ कोसळलेला ब्रिटिशकालीन पूल.. 
या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हळहळला. त्यानिमित्तानं अनेक त्रुटी, चुका तर नव्यानं समोर आल्याच, पण जुने प्रश्नही नव्यानं उफाळून वर आले. या दुर्दैवी घटनेला नेमकं जबाबदार कोण?
यंत्रणेतील त्रुटी, बेफिकिरी की निसर्ग? याविषयीची चर्चा आणि वादविवादही चांगलेच रंगले आहेत.
यातला सर्वात (बे)जबाबदार घटक कोणता?
‘यंत्रणेतील त्रुटी म्हणजेच माणूस’ आणि ‘निसर्ग म्हणजे पाऊस’ यांच्यापैकी कोणावर तरी ही जबाबदारी टाकावी लागेल. अनेकांनी ही जबाबदारी मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसावर टाकण्याचा प्रयत्न केला. 
पण त्यात तथ्य किती?
जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, महाबळेश्वरमध्ये ‘त्या’ दोन दिवसांत (४८ तासांत) ८०० मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे पूल पडल्याचे सांगितले गेले. तिथे दोन दिवसांत ८०० मिलिमीटर पाऊस पडला, हे वास्तवच आहे. पण महाबळेश्वरला दोन दिवसांत इतका पाऊस पडणे ही अपवादात्मक घटना नाही. महाबळेश्वर येथे ११ आॅगस्ट २००८ या दिवशी २४ तासांत ४९१ मिलिमीटर इतकी उच्चांकी नोंद झाली आहे. आणि असा सलग दोन-चार दिवस पावसाचा जोर कायम राहणे हेही या ठिकाणासाठी नवे नाही. महाडजवळील पूल २ आॅगस्टच्या मध्यरात्री केव्हातरी पडला. आणि ८०० मिलिमीटर पावसाची नोंद आहे ती ३ आॅगस्टच्या सकाळी ८.३० पर्यंतची. म्हणजे मध्यरात्रीनंतर आठेक तास पडलेल्या पावसाचा पूल कोसळण्याशी संबंध नाही. तो पावसाचा आकडा ८०० मधून वजा करावा लागेल. याचा अर्थ सलग सहाशे-सातशे मिलिमीटरच्या पावसामुळे पूल पडत असेल, तर महाबळेश्वरात उगम पावणाऱ्या नद्यांवरील सर्वच पूल पडायला हवेत. असा बादरायण संबंध आपल्याला कसा लावता येईल?..

Web Title: Piece ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.