गरीब तरीही 'श्रीमंत'!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2018 04:23 PM2018-02-03T16:23:52+5:302018-02-04T07:13:05+5:30

क्यूबातली लोकं तशी अभावात जगणारी. परिस्थितीनं गांजलेली असली तरी त्याचं रडगाणं मात्र ती गात नाहीत. आहे त्यात समाधान मानून नव्या मार्गाच्या शोधात उमेदीनं आपलं आयुष्य जगतात.

Poor even 'rich'! | गरीब तरीही 'श्रीमंत'!

गरीब तरीही 'श्रीमंत'!

Next

- अनघा दातार

क्यूबामध्ये फिरताना एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात आली. क्यूबा हा तसा गरीब देश आहे. तिथं फारसं श्रीमंत कोणीच नाही. सगळ्यांची परिस्थिती थोड्याफार फरकानं सारखीच. क्यूबामध्ये जाण्याआधी माझ्या मनात तिथल्या लोकांबद्दल ब-याच शंका होत्या. मुख्य मुद्दा सुरक्षेचा. त्याबद्दल मी जरा साशंकच होते; पण संपूर्ण ट्रिपमध्ये मला क्यूबन लोकांचा फारच चांगला अनुभव आला.
परिस्थितीनं अतिशय गरीब असली तरी मदतीला कायम तयार, तत्पर, फ्रेण्डली अशी ही लोकं. त्याचा अतिशय चांगला अनुभव आम्हाला तिथे आला. थोड्याच वेळात आपल्यातलं आणि त्यांच्यातलं अंतर कमी होतं.

क्यूबाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जवळ जवळ सर्वच क्यूबन लोकांच्या अंगात एक ºिहदम आहे. डान्स, म्युझिक त्यांच्या अंगात भिनलेलं आहे. क्यूबात कुठल्याही बारमध्ये, रेस्टॉरण्टमध्ये जा, नेहमीच लाइव्ह म्युझिक चालू असतं. हे कलाकार खरंच खूप छान गातात, सालसा करतात. बºयाच वेळा ते आपल्याला त्यांच्या गाण्याच्या सीडीज् विकत घ्यायची विनंती करतात; पण जर आपण एकदा नाही म्हटले तर परत परत मागे लागत नाहीत.
इतर कुठल्याही गरीब देशासारखेच इथले लोकही देश सोडून जाण्याची संधी शोधत असतात. त्यामुळे एखाद्या परदेशी व्यक्तीशी लग्न करणे हे बºयाच लोकांचं स्वप्न असतं. कारण तो एक सोप्पा मार्ग आहे देश सोडण्याचा.
क्यूबातली गरिबी आणि त्याबरोबरच तिथं सरकारची बरीच बंधनं असली तरी अलीकडे ही बंधनं सैल व्हायला लागली आहेत. क्यूबामध्ये आता सरकारनं प्रायव्हेट बिझनेस करायला परवानगी दिल्यामुळे बरेच लोक स्वत:चा व्यवसाय सुरू करू लागलेत. त्यामुळे हळूहळू त्यांची स्थिती सुधारते आहे. इतर सर्व लॅटिन, अमेरिकन देशांपेक्षा क्यूबन हा सर्वात सुरक्षित देश असला तरी पाकीटमार किंवा गंडवागंडवीचा थोडाफार अनुभवपण येतो.
रस्त्यानं तुम्ही जात असताना बºयाचवेळा ‘तुम्हाला एखाद्या चांगल्या बारमध्ये नेतो किंवा स्वस्तात सिगार मिळवून देतो’ असं सांगणारे बरेच जण भेटतात; पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जावे. कारण तो सगळा तुम्हाला महागातील महाग गोष्टी विकण्याचा ट्रॅप असतो. तेव्हा अशा काही छोट्या छोट्या गोष्टींपासून सावध राहावं लागतं.
मुलगी म्हणून तुम्हाला बºयाच कॉम्प्लिमेण्ट्सपण रस्त्यावरून जाताना मिळतात. पण त्यात वावगं काही नसतं. तो त्यांच्या कल्चरचा भाग आहे. एका महिला गाइडनी सांगितलं, की जर तिला तिच्या रोजच्या जाण्या-येण्याच्या वाटेत २-३ कॉम्प्लिमेण्ट्स नाही मिळाल्या तर तिला ती आज सुंदर दिसत नाहीये किंवा काहीतरी कमी आहे, असं वाटतं. जर स्पॅनिश बोलता येत असेल तर क्यूबात खरंच खूप चांगलं. त्यामुळे स्थानिक लोकांशी अजून छान कम्युनिकेशन करता येतं. मी राहत असलेल्या जवळ जवळ सर्वच घरांतील होस्ट्सना अजिबात इंग्लिश येत नव्हतं, त्यामुळे जरा कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम झाला; पण सर्वजण मनानी खूपच चांगले आणि हेल्पिंग होते. त्यामुळे खाणाखुणा आणि माझे थोडेफार स्पॅनिश शब्द आणि त्यांचे थोडेफार इंग्लिश शब्द यावर जमवलं. एका कासाच्या होस्टनं तर आमच्यासाठी सकाळी ब्रेकफास्टला एक मस्त फ्रूटची स्माइली फेस बनवलेली प्लेट दिली आमचा दिवस चांगला जावा म्हणून. क्यूबामध्ये जास्त करून आफ्रिकन आणि स्पॅनिश वंशाचे लोक राहतात. क्यूबामध्ये रेसीझम जवळ जवळ अस्तित्वात नाही. बरेच जण या दोन मिक्स कल्चरचे आहेत. अशा मिक्स पेरेण्ट्सच्या मुलांना ‘मुलातो’ असं म्हणतात.
कम्युनिस्ट देश असल्यानं सगळं सरकारच्या ताब्यात आहे; पण जेव्हा मी विचारलं, हे बदलावं असं वाटतं का? तेव्हा जवळ जवळ सगळ्यांचं म्हणणं होतं की, त्यांना कम्प्लिट चेंज नकोय. आता मिळत असलेल्या फ्री शिक्षण, मेडिकल या सुविधा तशाच राहाव्यात; पण इतर काही चांगले बदल असावे. फ्रीडम आॅफ वर्क, कामाचा योग्य मोबदला अशा काही गोष्टीत त्यांना बदल हवे आहेत.
तसं म्हटलं तर इथली लोकं तशी अभावात जगणारी. पण त्यांच्यातली एक गोष्ट मला खूप आवडली. स्वत: परिस्थितीनं गांजलेली असली, तरी त्याचं रडगाणं मात्र ती गात नाहीत. आहे त्यात खूश राहण्याचा त्यांचा स्वभाव आहे आणि तरीही आपल्यातले दोन घास इतरांना देण्याची तयारी.
अतिशय हेल्पिंग, फ्रेण्डली असं त्यांचं नेचर आहे. अडचणी सगळ्यांनाच आहेत, असतील; पण त्यावर आपल्यालाच मार्ग काढायचा आहे, पुढं जायचं आहे या उमेदीनं ते आपलं आयुष्य जगतात. आहे त्या गोष्टीत नवं शोधणारी आणि काहीतरी बदल घडेल या आशेवर जगणारी ही माणसं खरोखर वेगळी आणि प्रेमळ आहेत.
क्यूबा हा एक कम्युनिस्ट देश आहे. इकडे सगळे उद्योगधंदे हे सरकारच्या ताब्यात आहेत. त्यामुळे सर्वांना वेतनपण सारखेच आहे. डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक अशा सर्वांनाच साधारण सरासरी ३०-३५ डॉलर असे महिन्याला वेतन मिळते. फक्त पोलिसांना यापेक्षा जास्त पगार मिळतो. शेतकºयांनीसुद्धा उत्पादन केलेले सगळे सरकारला, सरकारनी ठरवलेल्या किमतीला विकावे लागते. पण नवीन राऊस कॅस्तोच्या काळात जरा हळूहळू बदल होत आहेत. सरकारने आता प्रायव्हेट बिझनेसना परवानगी दिली आहे, ही परवानगी जास्त करून सेवाक्षेत्रात आहे. त्यामुळे बरेचजण आता टुरिस्ट व्यवसायात येऊ लागले आहेत. टुरिस्ट गाइड, छोटी रेस्टॉरण्ट्स, कॉफी शॉप्स, एअर बी अ‍ॅण्ड बीसारखे घरातील काही खोल्या टुरिस्टना भाड्याने देणे असे व्यवसाय वाढू लागले आहेत. अर्थात यावर सरकारचं नियंत्रण आहे. सर्वांनाच हे करता येत नाही. त्यासाठी सरकारकडून एक लायसन्स लागतं. तरच असा व्यवसाय करता येतो. तंबाकू पिकवणाºया शेतकºयांनापण आता त्यांच्या उत्पादनाच्या ९० टक्के माल सरकारला ठरवलेल्या किमतीला विकावा लागतो; पण १० टक्के माल टुरिस्टना स्वत:च्या मनानं ठरवलेल्या किमतीला विकता येतो.
इकडे फारसं कोणी सरकारविरुद्ध खुलेपणानं बोलत नाही. इतकी वर्षं क्यूबन लोकांना देशाबाहेर जाण्यासाठीसुद्धा सरकारची परवानगी लागत असे, पण आता ही अट असलेला पासपोर्ट मिळतो आणि तो दर दोन वर्षांनी रिन्यू करायला लागतो. पण गंमत अशी की, हा पासपोर्ट काढायला साधारण ५०० डॉलर लागतात. आणि परत दोन वर्षांनी रिन्यू करताना तो होईलच याची खात्री नाही. तसेच महिना ३०-३५ डॉलर मिळवणारा ५०० डॉलर पासपोर्टसाठी कसे जमवणार, हा प्रश्नच आहे.
हे सगळं कसं आणि कधी बदलणार? आमच्या गाइडनं सांगितलं, परत एखादी क्रांती झाली तरच हे सगळं बदलू शकेल; पण तोपर्यंत आम्ही आपले रम पिऊन आणि सालसा डान्स करून सर्व विसरायचा प्रयत्न करतो. पण परिस्थिती कशीही असली तरी इथली लोकं मात्र हिमतीची आहेत. इतर लॅटीन अमेरिकन देशांपेक्षा अतिशय सेफ आणि बराच लो क्राइम रेट असलेला असा देश आहे. इथली माणसे खरंच खूप गोड आहेत. या सगळ्या लोकांच्या अंगात एक ºिहदम आहे, कला आहे. कुठल्याही रेस्टॉरण्टमध्ये जा, पबमध्ये जा, चौकात जा सगळीकडे मस्त लाइव्ह म्युझिक, सालसा चालू असते. क्यूबन कॉकटेल, सिगार आणि लाइव्ह म्युझिकचा आस्वाद घेत एखाद्या बार किंवा रेस्टॉरण्टमध्ये मस्त वेळ जातो.

शिक्षण आणि औषधपाणी सर्वांना मोफत!
क्यूबामध्ये शिक्षण आणि मेडिकल सर्व्हिसेस सर्वांना मोफत आहेत. अगदी युनिव्हर्सिटी, पीएच.डी. अशा कुठल्याही लेव्हलचं शिक्षण मोफत आहे. त्यामुळे लिटरसी रेट बराच जास्त आहे. अगदी छोट्यातल्या छोट्या खेड्यात, अगदी एक मूल जरी शाळेत येत असेल तर त्याच्यासाठीसुद्धा शिक्षक उपलब्ध आहे. प्रत्येक मुलाला नववीपर्यंत तरी शिक्षण घ्यावंच लागतं. प्रत्येकाला शाळेचा युनिफॉर्म घालावा लागतो आणि त्याचा रंग प्रत्येक ग्रेडसाठी वेगळा आहे. प्रायमरी स्कूलसाठी वेगळा रंग, मिडल स्कूलसाठी वेगळा रंग असं.

सुंदर देश, गप्पिष्ट माणसं!
क्यूबाची कंट्री साइड फारच सुंदर आहे. मला तर बºयाचवेळा भारतातल्या किनारपट्टीवरच्या गावांची आठवण झाली. आंबा, केळी, नारळ, जास्वंद, तगर अशी झाडे, फारशा यंत्राशिवाय शेतात राबणारे गरीब शेतकरी, हवानासारख्या मोठ्या शहरात गिचमिडीने एकाला एक लागून असणारी घरे, शेजाºयांशी बोलणारी, गप्पा मारत बसणारी माणसे, आरडा-ओरडा जोरात करणारी माणसे, रस्त्यावर मोठ्याने ओरडून मांस विकणारे फेरीवाले सगळं कसं एकदम जिवंत. जर्मनीच्या शिस्तीतून बाहेर पडून या मस्त जिवंत वातावरणात राहायला मला खरंच मजा आली.

ओल्ड क्लासिक अमेरिकन कार
क्यूबामध्ये अजूनही छोट्या गावात घोडागाडी, सायकल रिक्षा बघायला मिळतात. हवानामध्ये टुरिस्टची सर्वात आवडती टुर म्हणजे ओल्ड क्लासिक अमेरिकन कारमधून भटकंती. या कारमधून भटकताना खूप लोक दिसतात.
अशा ओल्ड क्लासिक अमेरिकन कार तिथे जागोजागी बघायला मिळतात. हवाना या शहराचे तीन प्रमुख भाग आहेत. त्यापैकी ओल्ड हवाना फारच अस्वच्छ आहे. पण सगळे टुरिस्ट अ‍ॅट्रॅक्शन तिथेच असल्याने ओल्ड हवानामध्ये राहणे सोपे होते. त्यामुळे पर्यटकही या जागेला पसंती देतात.

 

Web Title: Poor even 'rich'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.