अश्लीलतेला कायदेशीर आवर?
By admin | Published: September 26, 2015 02:31 PM2015-09-26T14:31:54+5:302015-09-26T14:31:54+5:30
अश्लीलतेचा प्रसार करणे हा आपल्याकडे मोठा अपराध आहे. त्यावर विविध कलमांद्वारे कायदेशीर कार्यवाहीची तरतूदही आहे. पण अश्लीलता पसरवणा:या वेबसाइट्स, त्यावरील व्हिडीओज बघण्यावर कायद्यानं पूर्ण बंदी आणणं हे आजही कठीणच आहे!
Next
- अॅड. प्रशांत माळी
अश्लीलता व नग्नता प्रदर्शित करणो यात भारतीय कायद्यानुसार मूलभूत फरक आहे. आजकाल कामक्रीडा करताना स्वत: या कार्याची मोबाइलद्वारा चित्रफीत बनवली जाते. तरुण जोडप्यांना याचे व्यसन लागल्याचे निदर्शनास येत आहे. या खासगी क्षणाची चित्रफीत मग दोन कारणांमुळे बाजारात किंवा इंटरनेटवर मोफत डाउनलोड करायला उपलब्ध होते. पहिले कारण म्हणजे जोडप्यांपैकी कोणी एकाने आपला मोबाइल त्यावरील डेटा डिलीट न करता विकला किंवा अनोळखी व्यक्तीला हस्तांतरित केला तर मग हा खासगी व्हिडीओही बाजारात व्हायरल होतो. दुसरे कारण म्हणजे जर या जोडप्यांमध्ये काही वादविवाद उत्पन्न झाला किंवा त्यांच्या वादामुळे तुटातूट झाली, निव्वळ ‘बदला घेणो’ या हेतूने हा खासगी व्हिडीओ इंटरनेटवर किंवा आणखी काही सोशल नेटवर्किंग साइट्स जसे व्हॉट्सअॅप, फेसबुकवर असलेल्या ग्रुपवर पसरवला जातो. या कृत्याला इंग्रजीमध्ये 1ी5ील्लॅी स्र1ल्ल असे म्हणतात. या काळ्या कृत्यामुळे जगभरात युवांचे जीवन उद्ध्वस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही देशांनी 1ी5ील्लॅी स्र1ल्ल साठी वेगळा कठोर कायदा अमलात आणला आहे.
अश्लीलता व पोर्नोग्राफी या शब्दांचे अर्थ व्यापक आहेत. फक्त ब्लू फिल्म्स किंवा पोर्नाेग्राफिक चित्र बघणो याही पलीकडे याची व्याप्ती आहे. या शब्दांची व्याख्या ही प्रत्येक देशाची वेगवेगळी आहे व ती समकालीन समाजाच्या नैतिक आदर्शावरून ठरवली जाते. अश्लीलता या शब्दामध्ये जो कोणी पुस्तके, मॅगझीन्स, फिल्म्स, नग्न चित्रीकरण, लैंगिक कामोद्दिपक किंवा वैयक्तिक भावना चाळवळतील असे अश्लील मेसेजेस आणि कोणत्याही प्रकारचे अश्लील रेकॉर्डिंग इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करेल त्याला अश्लीलता पसरवणो असे म्हणतात. आपल्याकडे अश्लीलतेच्या ब:याच केसेस आढळून येतील. अश्लीलतेचा प्रसार करणो हा भारतात मोठा अपराध आहे व त्यासाठी भारतीय दंड संहिता 1860 व माहिती तंत्रज्ञान कायदा 2क्क्क् तसेच विविध कलमांखाली कायदेशीर कार्यवाही होऊ शकते. माहिती तंत्रज्ञान कायदा 2क्क्क् खाली कलम 66, 67अ आणि 67ब खाली कायदेशीर कार्यवाही होऊन शिक्षा होऊ शकते. तंत्रज्ञानाच्या युगात अश्लीलता ही खूप वेगाने पसरत आहे व त्याचा सगळ्यात जास्त प्रभाव तरुण पिढीवर होताना दिसतो. कॉलेजमधील तरुण ब:याचदा जाणूनबुजून तरुणींचे अश्लील फोटो व व्हिडीओ रेकॉर्ड करतात व हेच व्हिडीओ पुढे व्हॉट्सअॅप व इतर सोशल नेटवर्किंग साइट्सवर व्हायरल करतात.
गेल्या आठवडय़ात कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने एक निकाल दिला. आरोपी हा अल्पवयीन शाळकरी मुलींना शिकवणीच्या नावाखाली लॉजमध्ये नेऊन त्यांच्यावर बलात्कार करत असे. त्याचबरोबर त्या कृत्याची व्हिडीओ क्लिप बनवत असे. या व्हिडीओचा एमएमएस बनवून आरोपी मित्रंमध्ये व्हायरल करत असे. आरोपी व्यवसायाने शिक्षक असून, 2 जुलै 2008 रोजी शाळेतील अल्पवयीन मुलीला प्रश्नपत्रिका व महत्त्वाच्या नोट्स देण्याचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. त्याच्या व्हिडीओ क्लिप्स बनवल्या व त्यातील काही क्लिप्स आपल्या मित्रंना प्रसारित केल्या. यातील एक व्हिडीओ क्लिप पीडित मुलीच्या चुलतभावाच्या मित्रकडे आली व तेथूनच हा सगळा गुन्हा उघडकीस आला.
पीडित व्यक्तीच्या घरच्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. न्यायालयाने या गुन्ह्यासाठी आरोपीला 13 वर्षे सक्तमजुरी व 20 हजार रुपये दंड व माहिती तंत्रज्ञान कायदा 2क्क्क् व कलम 67 खाली एक वर्ष शिक्षा दिली गेली. भारतात उच्च न्यायालयाने अनेकवेळा अश्लीलता व लैंगिक विचार चालविणा:या चित्रफितींचा प्रसार करणा:या वेबसाइट्सवर बंदी आणण्याचे आदेश दिले आहेत; परंतु त्या आदेशाचे पालन पूर्णपणो होताना दिसत नाही. त्याचे कारण आपल्याकडे दिसणा:या अश्लील वेबसाइट्सचे सव्र्हर भारतात नसतात व आपल्या कायद्याने त्यावर बंदी आणणो कठीण जाते. अशा प्रकारच्या कृत्यांवर पूर्णपणो बंदी आणणो ही अशक्य गोष्ट आहे. कारण भारतीय नागरिकांना संविधानाने दिलेला गोपनीयता अधिकार म्हणजेच right to privacy प्रमाणे कोणत्याही व्यक्तीने आपल्या घरी चार भिंतीच्या आत त्याच्या वैयक्तिक जीवनात काय करावे व संगणकावर काय पाहावे, हे त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असतो. पोर्नोग्राफी वेबसाइट्सवर जरी बंदी घालता आली नाही, तरी चाइल्ड पोर्नोग्राफी म्हणजेच 18 वर्षाखालील मुली व मुलांच्या अश्लीलता व लैंगिक विचार चालविणा:या चित्रफितींचा प्रसार करणा:या वेबसाइट्सवर बंदी घालता येते. भारतात 18 वर्षाखालील मुली व मुलांचे नग्न फोटो व चित्रफीत प्रदर्शित करणा:या वेबसाइट्सचा कुणी गूगलवर नुसता शोध जरी घेतला म्हणजेच असले चित्र किंवा चित्रफीत बघण्याचे तर सोडाच, अशा व्यक्तींना माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 कलम 67ब प्रमाणो गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला कारावास तसेच दंडही होऊ शकतो.
अश्लीलता पसरवण्याचा गुन्हा निश्चितच मोठा आहे आणि त्यासंदर्भातली शिक्षाही मोठी आहे. ‘गंमत’ म्हणूनही कोणी असले प्रकार व्हायरल करीत असेल तर त्याला मोठी शिक्षा होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने अशा गोष्टींपासून दूर राहताना स्वनियंत्रण राखणं आवश्यक आहे, मात्र त्याचवेळी यासंदर्भात असणा:या अनेक क्लिष्ट बाबींमुळे कायद्यानं अश्लीलतेवर पूर्ण बंदी आणणंही तितकंच कठीण आहे.
गुन्ह्याला शिक्षा काय?
ईलता पसरवणो हा भारतात मोठा गुन्हा आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा, 2क्क्क्च्या कलम 67खाली गुन्हा सिद्ध झाल्यास प्रथम गुन्ह्याच्या बाबतीत तीन वर्षार्पयत मुदतीच्या कोणत्याही प्रकारच्या कारावासाची शिक्षा आणि पाच लाख रुपयांर्पयत दंड आरोपीला होऊ शकतो. आरोपीने दुस:यांदा आणि त्यानंतरही अशाच प्रकारचा गुन्हा परत केला, तर पाच वर्षार्पयतचा कारावास आणि दहा लाख रुपयांर्पयत दंडाची शिक्षा आरोपीला होऊ शकते.
(लेखक ‘सायबर लॉ’ या
विषयातील तज्ञ आहेत.)
cyberlawconsulting@gmail.com