मु.पो. हडोळती

By admin | Published: May 8, 2016 01:24 AM2016-05-08T01:24:16+5:302016-05-08T01:24:16+5:30

एक गाव बहुमताने दारूबंदी करते आणि अकरा वर्षानी आपलाच निर्णय बदलून दारूच्या दुकानाचे उद्घाटन करते. का? लातूर जिल्ह्यातून एक स्पेशल रिपोर्ट

P.po Hadoli | मु.पो. हडोळती

मु.पो. हडोळती

Next
>- गजानन दिवाण
 
एक गाव बहुमताने दारूबंदी करते आणि अकरा वर्षानी आपलाच निर्णय बदलून दारूच्या दुकानाचे उद्घाटन करते. का? लातूर जिल्ह्यातून एक स्पेशल रिपोर्ट
 
1962 पर्यंत 
 - गावात वतनदारी कायम होती. 
हळूहळू गाव बदलू लागले. समाजकारण कमी आणि राजकारण जास्त होऊ लागले. बिनविरोधचे खूळ आले. 
आपल्या कानाखालच्या माणसाला समोर करायचे, बिनविरोध निवडून आणायचे आणि सत्ता आपण गाजवायची, असे राजकारण सुरू झाले. 
गावातले चांगले लोक हळूहळू राजकारणापासून दूर जाऊ लागले.
 
2005 च्या आधी
-  गावात दारूची दोन दुकाने होती. एक दुकान मध्यवस्तीत बसस्टँडवर आणि दुसरे ग्रामपंचायतीच्याच इमारतीत. नोटीस दिल्यानंतर ग्रामपंचायतीतले दुकान गुंडाळले. 
 पोरीबाळींच्या त्रसाचे कारण ठरणारे बसस्टँडवरील दुकान गावातच दुस:या ठिकाणी नेण्याची विनंती गावक:यांनी केली; पण पैशाच्या जोरावर दुकानदाराची दंडेलशाही सुरू राहिली.
 
6 मे 2005
-  गावकरी इरेला पेटले. जीआर मागवला. महिलांचे मतदान घेतले. 
 या दिवशी गावाने 1629 विरुद्ध 118 अशा विक्रमी मतांनी उभी बाटली आडवी केली.
हडोळतीमध्ये दारूबंदी लागू झाली.
 
2005 ते 2015
-  दीडेक वर्ष दारूविना चांगले गेले. 
पुढे गोरगरीब पोरे चोरून बाटली-दोन बाटल्या विकू लागली. मग पुढा:यांनीच हा धंदा सुरू केला. बेकायदा दारूच्या व्यवहारात त्यांचे खिसे भरू लागले. ईष्र्या वाढली. 
 जो तो दारूच्या धंद्यात उतरला. जवळपास पन्नासेक घरांत दारू विकली जाऊ लागली. 
 बंदी नसताना 40 रुपयांना मिळणारी बाटली 70 रुपयांना मिळू लागली. फोनवर ऑर्डरी सुरू झाल्या. घराघरांत दारूविक्री वाढली. 
 पोलिसांनी अवैध दारूविक्री बंद केली नाहीच, तक्रारकत्र्यालाच त्रस देणो सुरू झाले. 
 मुले शाळेत कमी आणि खिशात बाटल्या घेऊन बसस्टँडवरच जास्त दिसू लागली. 
 दारू दुकान नसल्याने बाजार थंडावला अशी ओरडही सुरू झाली. व्यापारी वैतागले. बायका संतापल्या. लोक कंटाळले.
 
15 ऑगस्ट 2015
 - गावात ग्रामसभा झाली. ‘सोयीच्या’ महिलांनाच निरोप गेला. शंभरच्या आसपास महिला असतील. हात वर करून मतदान घेण्यात आले. 
 ग्रामसभेचा ठराव बहुमताने पास झाला : ‘गावातली दारूबंदी उठवा.’
 
1 एप्रिल 2016
-  गावच्या मुख्य रस्त्यावरच रीतसर थाटामाटात सरकारमान्य देशी दारूचे दुकान सुरू झाले. 
 गावात एक बारही आहे. तिथे थोडे प्रतिष्ठित नागरिक जातात. 
 1 एप्रिलपासून सगळ्यांचीच सोय झाली आहे. आता मरगळलेल्या व्यापारालाही बरकत येईल म्हणतात.

Web Title: P.po Hadoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.