भारतीय चित्रपटांचा प्रगल्भ अनुभव

By admin | Published: October 11, 2015 07:33 PM2015-10-11T19:33:39+5:302015-10-11T19:33:39+5:30

टोरांटो महोत्सवात ‘तलवार’ (इंग्रजी शीर्षक ‘गिल्टी’), लीना यादव लिखित-दिग्दर्शित हिंदी शीर्षक नसलेला अस्सल देशी सिनेमा ‘पार्चड्’ आणि पॅन नलीन लिखित-दिग्दर्शित ‘अँग्री इंडियन गॉडेसेस’ असे तीन भारतीय चित्रपट यावेळी होते.

The profound experience of Indian films | भारतीय चित्रपटांचा प्रगल्भ अनुभव

भारतीय चित्रपटांचा प्रगल्भ अनुभव

Next

अशोक राणे

टोरांटो महोत्सवात ‘तलवार’ (इंग्रजी शीर्षक ‘गिल्टी’), लीना यादव लिखित-दिग्दर्शित हिंदी शीर्षक नसलेला अस्सल देशी सिनेमा ‘पार्चड्’ आणि पॅन नलीन लिखित-दिग्दर्शित ‘अँग्री इंडियन गॉडेसेस’ असे तीन भारतीय चित्रपट यावेळी होते. तीनही चित्रपटांचं महोत्सवातल्या जगभरच्या सिनेरसिकांनी भरभरून स्वागत केलं. इतकं की, ‘अँग्री इंडियन गॉडेसेस’ला तर प्रेक्षक पसंतीचा पुरस्कार देण्यात आला. तीनही चित्रपटांच्या बाबतीत एक प्रतिक्रिया मात्र कॉमन म्हणावी अशी- हादरवून टाकणारे चित्रपट! 
हादरवून टाकण्याचा अनुभव देण्याची तीनही चित्रपटांची कारणो अर्थात वेगवेगळी होती. ‘तलवार’ने हादरवलं ते ज्या पद्धतीने दिल्ली-नोएडा येथील दुहेरी हत्त्याकांडाचं पोलीस यंत्रणोने तपासकार्य केलं ते आणि प्रसार माध्यमांचा अतिरेकीपणा! दोन्हीत एक दुवा समान होता आणि तो म्हणजे टोकाची असंवेदनशीलता! जाता जाता करावी एखादी गोष्ट असं पोलिसांचं हे प्रकरण हाताळणं. चित्रपटाचा सारा भर यावरच आहे. आणि त्यामुळेच या दुहेरी हत्त्याकांडासाठी गिल्टी ठरविल्या गेलेल्या तलवार पती-पत्नीवर अन्याय झालाय असा प्रश्न तो उपस्थित करतोय का असं काहींना, विशेषत: भारतीयांना वाटलं. परदेशी प्रेक्षकांना मात्र तसं वाटलं नाही. एक कारण म्हणजे त्यांना या प्रकरणाची तपशीलवार माहिती नाही. त्यामुळे त्यांचं लक्ष नेमकं या परिच्छेदाच्या आरंभी नोंदवलेल्या मुद्दय़ांकडेच गेलं आणि म्हणून मग त्यांना जपानचे थोर प्रतिभावंत दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांची सर्वकालिक श्रेष्ठ कलाकृती ‘राशोमान’ आठवली आणि तिच्याशी ‘नेमकं मग सत्य काय’ एवढय़ापुरती तुलना करावीशी वाटली. केवळ हे तलवार प्रकरणच नव्हे, तर आपल्याकडे अशी किती तरी प्रकरणं होतात की ज्यात आधी ढिसाळ पोलीस तपास, मग सीबीआयचा हस्तक्षेप, मग तपासकार्याला लागणारा विलंब आणि अखेर कोर्टात येणा:या उलटसुलट गोष्टी आणि या सर्व प्रक्रियेत माध्यमांचं सर्वस्वी उथळ आणि बेजबाबदार वागणं असं घडत असतं. तलवार प्रकरणात असंच काहीसं झालं. या दुहेरी हत्त्याकांडानंतर ज्या पद्धतीने पोलिसांनी प्राथमिक तपासकार्य केलं आणि निष्कर्ष काढण्याची घाई करीत चाजर्शीट तयार करीत आणलं त्याची खिल्ली उडविण्यात आली आहे. चित्रपटात ते रंजकपणो येतं. परंतु म्हणून मुळातच पोलिसांचं हास्यासद वागणं लपत नाही. असो.
घडलेले प्रसंग वेगवेगळ्या माणसांच्या नजरेतून वेगवेगळे दिसणं, त्यातून या प्रकरणातली गुंतागुंत आणि गूढता स्पष्ट करत नेणं आणि पुन्हा प्रेक्षकांचा गोंधळही उडणार नाही याची अगदी सहजपणो दक्षता घेणं हे पटकथाकार म्हणून खरोखरच मोठय़ा कौशल्याचं काम विशाल भारद्वाज यांनी नजाकतीनं आणि निगुतीनं केलंय. 
मेघना गुलजारच्या आजवरच्या दिग्दर्शक म्हणून वाटचालीत ‘तलवार’ निश्चितच मोलाची आणि गौरवास्पद भर घालतो. कोंकणा सेन आणि इरफान खान या दोघांबरोबरच इतरही सर्व कलाकारांनी आपल्या सहजसाध्या अभिनयाने या चित्रपटाला त्याचं असं मोल प्राप्त करून दिलंय. एक उत्तम, नव्हे एक प्रगल्भ चित्रपट पाहिल्याचं समाधान तर ‘तलवार’ देतोच, परंतु तो आपल्या ढिसाळ व्यवस्थेचं दर्शन घडवित अस्वस्थ करून टाकतो.
‘पार्चड्’ या लीना यादव लिखित-दिग्दर्शित चित्रपटाला हिंदी शीर्षकच नाही. एकूण चित्रपटाचा विषय, त्याची बेधडक, बिनधास्त मांडणी पाहता एरवीही आपल्या सेन्सॉर बोर्डाने त्रस दिला असता. आता तर बघायलाच नको. म्हणूनच बहुधा लीना यादव हिने सारं लक्ष जगभराच्या प्रेक्षकांवरच केंद्रित केलय. 
असं आहे काय या चित्रपटात.?
‘पार्चड्’ला राजस्थान-गुजरातच्या वाळवंटी प्रदेशाची पाश्र्वभूमी आहे. इथे चार स्त्रिया आहेत. नुकतीच तिशीत आलेली रानी, नुकतंच तिनं आपल्या सतरा वर्षाच्या मुलाचं लगA करून घरी आणलेली अल्पवयीन सून जानकी, रानीच्या मैत्रिणी लाजो आणि बिजली. स्त्रियांचे सारे भोग, त्यांची सारी फरफट याचं प्रतिनिधित्व करणा:या या चारचौघी. चित्रपटाच्या आरंभी गावपंचायतीसमोर चालणारा खटला दिसतो. लगA करून परगावात गेलेली या गावची पोर माहेरी परत येते तेव्हा पंचायत निर्णय देतं की मुलीनं मरेर्पयत सासरीच राहायला हवं. पोरगी आकांत करते. पंचायत ऐकतच नाही. तिच्या बापालाही दया येत नाही. सासरच्या माणसांबरोबर तिची रवानगी होताना ती आईला सांगण्याचा प्रयत्न करते की तिचा दीर आणि सासराही तिचा लैंगिक छळ करतात. परंतु आसवं गाळीत मुलीला तसंच पुढं ढकलण्याशिवाय आईलाही पर्याय नाही. ‘पुढे काय होईल?‘ या प्रश्नाचा वेध घेत चित्रपट पुढे सरकू लागतो.
पुरुषीपणाचा अर्क असलेल्या आपल्या बाहेरख्याली मुलाला घराबाहेर काढीत रानी आपल्या सुनेला तिच्या प्रियकराबरोबर नवं आयुष्य जगायला पाठवून देते. रानीच्या मुलाबरोबरचं आपलं लगA टाळण्यासाठी जानकीनं लगAाच्या आदल्या दिवशी आपले केस कापून बंडखोरी केली होती, परंतु ती दडपून तिचं लग्न लावून देण्यात आलं, परंतु आता तिची त्यातून सुटका खुद्द सासूनेच; रानीनेच केली, कारण तिच्याही वाटय़ाला मारझोड करणारा बाहेरख्याली नवराच आला होता. लाजो गुणी आहे. तिच्या अंगी कला आहे. त्यामुळे ती विणकामातून चांगला पैसा मिळवते आहे. परंतु तिचा रोजचा मार चुकत नाही. रोजच्या रोज लाथाबुक्क्यांनी तुडवणारा तिचा नवरा तिच्या पदरात मूल टाकू शकत नाही. त्यामुळे मग ती रानी आणि बिजलीच्या मदतीने डोंगरातल्या साधूला गाठून गर्भधारणा करून घेते. कारण मातृत्व हा स्त्री म्हणून तिचा हक्क आहे हे या तिघींना पटलेलं आहे. बिजली तर पुरुषांना चाळवणारी आणि त्यांची लैंगिक भूक भागवणारी वेश्याच आहे. परंतु वयाबरोबर तिला उतरती कळा लागताच तिच्या उरावर दुसरी तरुण पोरगी नाचवणा:या तिच्या मालकाचा आणि त्याच्या हस्तकाचा तिला राग आहे. तिच्यासाठी पागल होणारा पुरुष आता तिच्याकडे ढुंकून पहायलाही तयार नाही. स्त्री ही केवळ भोगवस्तू इतकंच तिचं मोल हे स्पष्टपणो अधोरेखित करणारी बिजलीही मग बंड करते.
चित्रपटात एक प्रसंग आहे. चौघीही जिवाची मौज करायला बाहेर पडतात. अक्षरश: बेभान होत मुक्तपणो जगतात. अचानक कुणी तरी एक शिवी हासडतं. त्या एकमेकींकडे पाहत विचारतात की सगळ्या शिव्या आईबहिणीवरून का? बापाभावावरुन का नाहीत? शतकानुशतके चालत आलेल्या या पुरुषीवृत्तीच्या शिव्यांचं रूपच त्या 
पालटून टाकतात आणि बेंबीच्या देठापासून शिव्या घालतात. काहीशा मोकळ्या 
होतात.
आणखी एका प्रसंगात रानी आणि लाजोला जानकी एकमेकींच्या मिठीत पाहते. परंतु त्यातून समलिंगी संभोगापेक्षा पुरुषांनी नाकारलेल्या स्त्रियांमध्ये निर्माण झालेल्या भावनिक पोकळीत आधार शोधणं आहे. परंतु हेसारं कळण्याची समज आणि एकूणच संवेदनशीलता आपल्या सेन्सॉरमध्ये कितपत असेल याची शंकाच आहे. लीना यादव हिने पटकथा आणि दिग्दर्शन या दोन्ही आघाडय़ांवर वावरताना आपण एका धाडसी विषयाला हात घालतो आहोत याचं पुरेपूर भान ठेवीत कमालीच्या संवेदनशीलतेने तो हाताळला आहे. आणि अर्थातच अपेक्षित परिणाम साधला आहे. रानीच्या भूमिकेतील तनिष्ठा चटर्जी आणि लाजो झालेली राधिका आपटे आणि एकूणच इतर सर्व कलाकारांची तिला चांगली साथ लाभली आहे. 
अँग्री इंडियन गॉडेसेस’ हा चित्रपट मात्र माझा पाहायचा राहिला. ‘रूम’ या चित्रपटाचा सहाचा शो संपवून मी पंधरा मिनिटांत थिएटरवर तो पाहण्यासाठी अक्षरश: धावतपळत पोचलो. भल्याथोरल्या रांगेत उभा राहिलो. परंतु माङयासकट दीडदोनशे लोकांना प्रवेशच मिळाला नाही. भारतीय चित्रपटांना मिळणारा असा ओसंडून वाहणारा प्रतिसाद बघूनच मी परतीच्या वाटेला 
लागलो.
 
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)
ashma1895@gmail.com

Web Title: The profound experience of Indian films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.