पुरोगामी
By admin | Published: April 23, 2016 01:13 PM2016-04-23T13:13:54+5:302016-04-23T13:13:54+5:30
‘कौतुक करून मारून टाकणो’ हे जे मराठी माणसांचे ताकदवान अस्त्र आहे त्याचा वापर करण्याची प्रक्रिया पद्धतशीरपणे फार पूर्वी सुरू झाली. त्याचे पक्व फळ आपल्याला निराशाजनक वातावरणात आज दिसते आहे.
Next
- सचिन कुंडलकर
जिथे पर्यायी विचार करणा:या लोकांची सतत खिल्ली उडवली जात असे अशा वातावरणामध्ये मी लहानपणी वाढलो. पर्यायी विचार करणारे लोक म्हणजे ज्यांना पर्यावरणाचे रक्षण करायचे आहे, ज्यांना स्त्रीवादाचा अभ्यास करायचा आहे, ज्यांना जातीपातींवर आधारलेली समाजाची घडी बदलायची आहे, ज्यांना अंधश्रद्धेविरोधी जागृती निर्माण करायची आहे असे आणि अशा प्रकारचा वेगळा विचार करणारे लोक. परंपरेने चालत आलेल्या गोष्टींकडे वेगळ्या नजरेने पाहणारे.
माङया लहानपणीच्या शहरातील बहुसंख्य समाज हा पुरोगामी लोकांची चेष्टा करणो, त्यांच्याविषयी नाराजी असणो आणि शक्यतो आपली मुलेबाळे अशा माणसांच्या नदी लागू नयेत याच्या काळजीत असायचा. शिक्षण, चांगल्या पगाराची नोकरी, वंशवृद्धी याच्यापलीकडे कुणी कसलाही विचार करायला उत्सुक नसे. सुरक्षित परंपरेत जगणारी माणसे सुखाने तुस्त झाली असली तरी घाबरलेली असत आणि कुणीही आपली जगण्याची सुरक्षित चाकोरी मोडून बाहेर पडू नये असे त्यांना वाटत असे. वेगळा विचार करणारा माणूस किंवा संस्था ही धोकादायक मानली जात असे. त्यामुळे कौतुक करून मारून टाकणो हे जे मराठी माणसांचे ताकदवान अस्त्र आहे त्याचा वापर अशा माणसांवर समाज करत असे. कुणी काही वेगळे करताना दिसला की त्याचे सत्कार, कौतुक वारेमाप करून त्याला महाराष्ट्रात संपवून टाकले जाते. त्यामुळे अनेक चांगल्या माणसांचे आमच्याकडे सत्कार, त्यांची व्याख्याने, त्यांच्यावर पेपरात रकाने असे सगळे होत असले तरी समाजजीवनात अशा माणसांची हेटाळणी केली जात असे.
याच मनोवृत्तीतून ऐंशी-नव्वदच्या दशकातील जुन्या पुण्यामध्ये समाजवादी, पर्यावरणवादी, स्त्रीमुक्तिवादी, गांधीवादी माणसांना आणि संस्थांना थोडे हिणवण्याची प्रवृत्ती होती. पुणो हे वेगवेगळ्या संस्थांनी गजबजलेले शहर असले तरी त्याचा चेहरा हा पारंपरिकच होता. जुना इतिहास खणत बसणो आणि आपण पूर्वी कसे वैभवशाली आणि बलवान होतो या असल्या विषयांवर काम करणा:या माणसे आणि संस्थांचे पुण्यात लाड होत.
अनिल अवचट या लेखकाने सर्वप्रथम मध्यमवर्गीय सामान्य वाचकापर्यंत जगण्याचे दुसरे उपलब्ध पर्याय मांडले. चाकोरीबाहेरचे आयुष्य जगणा:या अनेक माणसांची, संस्थांची आणि विचारांची ओळख त्यांच्या प्रांजळ, ख:या आणि रोचक लिखाणाने महाराष्ट्राला झाली. त्यावेळी महाराष्ट्रात छोटय़ा स्वतंत्र ग्रंथालयांचे (लायब्ररीज) जाळे होते आणि माणसे पुस्तके विकत घेत तसेच मोठय़ा प्रमाणात या ग्रंथालयांच्या मेंबरशिपमधून अनेक पुस्तके वाचायला घरी आणत. अनिल अवचटांची पुस्तके या ग्रंथालयांमार्फत महाराष्ट्रात प्रचंड पोचू लागली आणि त्यांच्या प्रवासप्रिय वृत्तीमुळे ते लोकांना सहजपणो भेटू लागले. आमच्या पिढीला नॉन फिक्शन लिखाणाची गोडी लावण्याचे मोठे काम त्यांच्या साहित्याने केले. तोपर्यंत कथा, कादंब:या आणि मराठी अश्रुप्रपाती नाटके हेच आमच्यासाठी साहित्याचे स्वरूप होते. मला आठवते त्याप्रमाणो आमच्या पिढीचा शालेय आदर्शवाद घडत असताना आम्ही मोठय़ा प्रमाणावर अवचटांच्या पुस्तकांनी भारावले गेले होतो. हा नव्वदीचा काळ अर्थव्यवस्थेच्या मुक्तीचा आणि प्रामुख्याने डिजिटल क्र ांतीचा काळ होता. आर्थिक आणि जातीय संक्र मणो मोठय़ा प्रमाणावर होत होती. उच्चवर्णीय समाजामध्ये आपापल्या मुलांना लवकरात लवकर शिकवून या देशाबाहेर काढणो हा एकमेव पर्याय होता. कारण आरक्षणामुळे सगळ्यांचे धाबे दणाणले होते. त्यामुळे देश सोडून अमेरिकेला जाणो आणि तिथे आपल्या बुद्धीचे आणि श्रमांचे चीज करून घेणो हा आमच्या पिढीचा अतिशय महत्त्वाचा कार्यक्र म होता. त्यामुळे वेगळे काही काम करण्याच्या विचाराने एका बाजूला भारावून जाणो आणि दुस:या बाजूला अमेरिकेला, इंग्लंडला किंवा कॅनडाला जाण्यासाठी शिक्षणाचे आणि नोकरीचे पर्याय शोधणो अशा तीव्र संभ्रमात आमची पिढी बराच काळ होती. आपण जे वाचतो, ज्या चांगल्या माणसांना भेटतो आणि त्यांच्या विचारांनी, कामांनी भारावून जातो ती माणसे आणि त्या संस्था आपले जगण्याचे प्रश्न कसे सोडवतील अशा चर्चा तरु ण पिढीच्या निर्णयप्रक्रि येत होत असत. मी स्वत: शालेय शिक्षण संपताना सोबतच्या मित्रंसोबात अनेक वेळा या चर्चा केल्या आहेत.
मेधा पाटकरांचे नर्मदा आंदोलन, आमटे कुटुंबीयांचे आनंदवन, अभय आणि राणी बंग यांचे गडचिरोलीत चालणारे काम, पुण्यातील ‘मिळून सा:याजणी’ ह्या मासिकाच्या सान्निध्यात जिवंत असलेली स्त्रीवादी विचारांची चळवळ, अवचट कुटुंबीयांचे व्यसनमुक्तीचे काम या आणि अशा अनेक छोटय़ा मोठय़ा चळवळी, आंदोलने, विचारप्रवाह आमच्यासमोर येत होते आणि आपण काहीतरी करून यापैकी कोणत्यातरी कामामध्ये स्वत:ला जोडून घेऊ , असे महाराष्ट्रात खूप तरु ण मुलामुलींना वाटत असे. प्रश्न होता तो या सगळ्या दिशेला आपल्याला नेईल किंवा मार्गदर्शन करेल असा कोणताही ओळखीचा चेहरा आणि व्यक्ती कुणाच्याच आजूबाजूला नव्हती. त्यामुळे अनेक वेळा मुलामुलींचे हे विचार म्हणजे फक्त त्यांची आदर्शवादी स्वप्ने राहत. पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे हे एकमेव जोडपे असे होते की जे दशकानुदशके सर्वसामान्य माणसाची या संस्थांशी आणि माणसांशी गाठ घालून देत होते. ते दोघे आमच्या वेळी सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रतून निवृत्त झाले होते आणि सगळ्या सामाजिक कामांना एका आखीव एनजीओसारखे स्वरूप यायला लागले होते.
महाराष्ट्रात समाजवादी पक्षाचे स्थान या काळात नगण्य असल्याने सामान्य माणसापर्यंत पोचण्याचा जो एक प्रवाही दृष्टिकोन असतो तो पर्यायी विचार करणा:या माणसांनी आणि संस्थांनी नव्वदीच्या दशकात गमावला होता. ग. प्र. प्रधान, एस. एम. जोशी या प्रभावी विचारवंतांच्या निवृत्तीनंतरचा हा काळ. आता या विचाराला आणि कार्यक्र माला राजकीय पाठबळ नव्हते आणि सामाजिक कामात नव्या पिढीचे रक्ताभिसरण नव्हते. जी माणसे होती ती मुख्यत: त्यांच्याच कुटुंबातील असत, ज्यांना पूर्वीपासून अशा विचारांची सवय किंवा वैचारिक सक्ती होती. त्यामुळे एकमेकांचे कौतुक करणो आणि एकमेकांना पाठिंबा देणो अशा मर्यादित आणि साचलेल्या स्वरूपात या संस्थांच्या कामाचा प्रसार नव्वदीत आणि त्यानंतरच्या काळात होत असे. या संस्थांनी चालवलेली अनेक उत्तम आणि सकस लिखाणाची मासिके ही फक्त त्यांचे विचार आधीच पटलेली माणसेच वाचत असत. नव्या तरु ण पिढीशी आवश्यक असणारी प्रवाही देवाणघेवाण या संस्थांकडून होत नव्हती आणि त्यामुळे पुण्यात पुरोगामी म्हणवून घेणा:या माणसांची छोटीछोटी बेटं तयार होऊ लागली होती. उन्हाळ्याच्या सुटय़ांत जाऊन शिबिरे करतात तितपतच नव्या तरु ण पिढीचा या संस्थांशी संबंध होता. साठ-सत्तर सालातला सामाजिक आदर्शवाद संपत चालल्याची घंटा वाजू लागली होती. पण बहुधा ती ऐकून स्वत:मध्ये काही बदल करावेत असे वातावरण दिसत नव्हते. त्यामुळे पर्यायी आणि सामाजिक क्षेत्रविषयी एक मोठी उदासीनता शहरी बुद्धिवादी वर्गात या काळामध्ये पसरली. आणि सामाजिक क्षेत्रत काम करणारी माणसे ही फक्त सत्कार करण्याच्या वस्तू झाल्या.
आदर मिळत असला तरी त्याचा अर्थ समाजाचा मनातून या गोष्टींना पाठिंबा असेल असा होत नाही. ही गोष्ट सार्वजनिक क्षेत्रत काम करणा:या माणसांना कळली होती असे दिसले नाही. महाराष्ट्रातील अनेक संस्थांना आता समाज बदलला आहे, समाजाचे प्रश्न बदलले आहेत याची जाणीव कधीही झाली नाही. आर्थिक वातावरणाचे भान काही केल्या आले नाही. गांधीवादी विचारसरणीतून उत्पन्न झालेला ग्रामसुधारणा आणि ग्रामीण समाजव्यवस्थापनाचा जुना एककलमी कार्यक्र म ही माणसे दोन हजार साल उजाडले तरी राबवत बसली. तीच ती दहा बारा माणसे एकमेकांची पाठराखण करत बसली. स्त्रीवादी विचारांची महाराष्ट्रातल्या स्त्रियांनीच मजेत कत्तल केली असे आज दिसते. बहुतेक संस्थांचे काम हे त्यांच्या सोयीच्या आणि सवयीच्या लांबच्या ग्रामीण भागात सुरू राहिले आणि शहरी भागातून या माणसांनी स्वत:ची दृश्यात्मकता नाहीशी केली. सामाजिक काम म्हणजे लांब गावात जाऊन काही माणसांना काहीतरी सतत शिकवणो. प्रश्न फक्त ग्रामीण समाजाला असतात. आपल्या रोजच्या जगण्याशी, आपल्या प्रश्नांशी या माणसांचा काही संबंध नसतो अशी जाणीव शहरी तरु ण वर्गात मोठय़ा प्रमाणात पसरली आणि ठरावीक सेलिब्रिटी माणसांची आत्मचरित्रे वाचणो यापलीकडे मराठी समाजाने यानंतरच्या काळात सामाजिक क्षेत्रशी संबंध ठेवला नाही.
आजच्या काळात पुरोगामी माणूस हा शब्द पद्धतशीरपणो चेष्टा करण्यासाठी आणि खिल्ली उडवण्यासाठी राजकीय हेतूने वापरला जातो तेव्हा मला वाईट वाटते. आणि असे का झाले असावे याचा महाराष्ट्राने विचार करायला हवा असे वाटते. ही प्रक्रिया पद्धतशीरपणो फार पूर्वी सुरू झाली. त्याचे पक्व फळ आपल्याला निराशाजनक वातावरणात आज दिसते आहे.
(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)
kundalkar@gmail.com