रंगमंच - नाट्यशिबिर, कार्यशाळा, अभिनय वर्ग !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 05:45 PM2018-10-06T17:45:52+5:302018-10-06T18:00:56+5:30

आपला चिमुकला वा चिमुकली खूप स्मार्ट आहे आणि वय वर्षे आठ किंवा नऊ असूनही ‘नटसम्राट’मधील स्वगत कशी धाडधाड म्हणतो, असं मार्केटिंग करणारे पालक कार्यशाळा सुरू होण्याच्या दिवशीच प्रश्न करतात....

rangmanch - Natyashibir, workshop, acting class! | रंगमंच - नाट्यशिबिर, कार्यशाळा, अभिनय वर्ग !

रंगमंच - नाट्यशिबिर, कार्यशाळा, अभिनय वर्ग !

googlenewsNext
ठळक मुद्देस्वत:च्या मर्यादा याची जाणीव झाली तरी मला वाटतं प्रशिक्षण घेण्याचा उद्देश सफल

- योगेश सोमण - 
अभिनयाच्या कार्यशाळा ही अगदीच पहिली पायरी असते आणि त्याच्याकडे तेवढ्याच मर्यादेत बघावं. एकदिवसीय कार्यशाळा किंवा अभिनय प्रशिक्षणाची फ्री सेमिनार्स याच्यात काही अर्थ नसतो. दिवसभरात जेमतेम जो लेक्चर देतो, त्याच्याशी ओळख होते आणि आपल्या आजूबाजूला बसलेल्या होतकरू कलाकारांशी परिचय होतो इतकंच. मला स्वत:ला असं वाटतं कार्यशाळा किमान तीन महिन्यांची असावी आणि रोजचे तीन ते चार तास कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी काम करावं. अशा तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीत घेतलेल्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना म्हणजे होऊ घातलेल्या अभिनेता-अभिनेत्रींना आपल्याला अभिनय जमणार आहे की नाही किंवा अभिनय साध्य करायला खूप मेहनत घ्यावी लागते किंवा आपल्या स्वत:च्या मर्यादा याची जाणीव झाली तरी मला वाटतं प्रशिक्षण घेण्याचा उद्देश सफल होईल. कार्यशाळेत सहभागी होताना उमेदवार स्वत:विषयी खूप भ्रामक कल्पना घेऊन आलेले असतात. कुठेतरी मिळालेलं बक्षीस, घरच्यांनी आणि मित्रमंडळींनी आपण करत असलेल्या नकलांचं केलेलं वारेमाप कौतुक असल्या हळकुंडांनी पिवळे झालेले उमेदवार कार्यशाळेच्या पहिल्याच दिवशी प्रश्न टाकतात, आॅडिशन कशी द्यायची? किंवा आपला चिमुकला वा चिमुकली खूप स्मार्ट आहे आणि वय वर्षे आठ किंवा नऊ असूनही ‘नटसम्राट’मधील स्वगत कशी धाडधाड म्हणतो, असं मार्केटिंग करणारे पालक कार्यशाळा सुरू होण्याच्या दिवशीच प्रश्न करतात, तुमच्याकडून काय संधी मिळणार? किंवा साधारण पंचावन्नव्या वर्षी रिटायर्डमेंट घेऊन जुने शौक पूर्ण करायला आलेले हौशी नट, त्यांना कार्यशाळेतील एक्सरसाईजपेक्षा शिकवायला येणाऱ्या सेलिब्रेटीशी गप्पा मारण्यात आणि नंतर सेल्फी घेण्यातच जास्त इंटरेस्ट असतो. अशा अनेक अपेक्षा घेऊन फिरणारे नवोदित, त्यांचे पालक मग अनेक फसव्या जाहिरातींना फसतात, उदा. ‘आमच्या आगामी चित्रपटात संधी’, ‘फोटोसेशन करून दिले जाईल तसेच विविध आॅडिशनमध्ये संधी’, शिवाय कार्यशाळेच्या जाहिरातीवर अनेक मालिका, चित्रपटातील सेलिब्रिटींचे फोटो असतात आणि अशा कार्यशाळेची फीदेखील भरघोस असते. मंडळी भुलतात, कार्यशाळेत सहभागी होतात. चार-दोन आॅडिशनला जाऊन नापास होऊनदेखील येतात आणि त्यांचा भ्रमनिरास होतो. मला असं वाटतं, अभिनय कार्यशाळांमधून रंगकर्मींना स्वत:लाच ऐकायला आणि बघायला शिकवलं पाहिजे. आरशात भांग पाडायला आणि लिपस्टिक लावायला रोज बघत असतील तसं नव्हे, तर आरशाशिवाय स्वत:च चालणं, उभं राहणं, बसणं हे बघायला शिकवलं गेलं पाहिजे. यासाठी पाय दुखेस्तोवर काही बेसिक हालचाली कार्यशाळेत सतत करून घेतल्या गेल्या पाहिजेत. आवाजाची पट्टी आणि आवाजाची फेक यात काय फरक आहे, हे समजावून पाच मिनिटांत सांगता येतं,.... 
    (क्रमश:)
(लेखक प्रसिद्ध रंगकर्मी आहेत.)

Web Title: rangmanch - Natyashibir, workshop, acting class!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.