वेरूळच्या लेण्यांतला किरणोत्सव

By Admin | Published: March 19, 2016 02:51 PM2016-03-19T14:51:30+5:302016-03-19T14:51:30+5:30

वेरूळची विश्वकर्मा लेणी तिथल्या स्थापत्यशास्त्रमुळे तर जगप्रसिद्ध आहेच, पण दरवर्षी मार्च महिन्यात सायंकाळी दिसणारा किरणोत्सवही विलक्षणच. स्थापत्य प्रकाशयोजना आणि ऋतुचक्राचा सुसंवाद साधून प्राचीन भारतीयांनी घडविलेला हा वैज्ञानिक आविष्कार धर्मतत्त्वाच्या प्रसाराबरोबरच जीवनाची नवी दृष्टी देणारा आहे.

Ray break | वेरूळच्या लेण्यांतला किरणोत्सव

वेरूळच्या लेण्यांतला किरणोत्सव

googlenewsNext
>-प्रा.वि. ल. धारूरकर
 
प्राचीन भारतामध्ये लेणी कोरण्याची कला म्हणजे स्थापत्य व अभियांत्रिकीचा अजोड आविष्कार होता. स्टेला क्रेमरिश या विदुषीच्या मते प्राचीन भारतामध्ये 12क्क् लेण्या कोरण्यात आल्या. त्यापैकी 9क्क् लेण्या बौद्धधर्मीय, 200 लेण्या जैनधर्मीय आणि 100 लेण्या हिंदूधर्मीय होत्या. सबंध पहाड कोरून त्यामध्ये शैलगृहे उभारण्याची स्थापत्यकला भारतीयांनी शास्त्रीयपणो विकसित केली होती. या लेण्या कोरण्यासाठी अवजारांचा शास्त्रीयपणो उपयोग केला जात असे. काही औजारे मोठी, तर काही छोटी असत. शिवाय लेण्यांच्या उत्खननांचा शास्त्रीय आराखडा तयार केला जात असे. कलावंत, स्थपथी आणि धर्मगुरू यांच्यामध्ये अखंडपणो सुसंवाद असे. कोणते शिल्पपट निवडावयाचे आहे आणि मूर्ती विज्ञानाच्या आधारे या शिल्पपटांचा शास्त्रीय विकास कसा करावयाचा हे ठरविले जात असे. अशी लेणी कोरताना त्यामागे दिशासूत्र विचारात घेतले जात असे. वेरूळमधील 1 ते 12 या बौद्धलेण्या आहेत, तर 13 ते 29 या हिंदूधर्मीय लेण्या आहेत आणि 30 ते 34 या जैनधर्मीय लेण्या आहेत.
प्रस्तुत लेखात बौद्धधर्मीय समूहातील 10 क्रमांकाच्या लेणीवर प्रकाश टाकला आहे व त्यातील अनोख्या किरणोत्सव प्रक्रियेचे शास्त्रीय विश्लेषण केले आहे. 
विश्वकर्मा लेणी
लेणी क्रमांक 1क् ही वेरूळमधील विश्वकर्मा लेणी म्हणून ओळखली जाते. स्थानिक लोक या लेणी समूहास ‘सुतार की झोपडी’ असेही म्हणतात. त्याचे कारण असे की, ही 1क् क्रमांकाची लेणी वेरूळ समूहातील एकमेव चैत्यगृह आहे. चैत्य आणि विहार या दोन प्रगत स्थापत्य कलांपैकी चैत्य हा प्रकार म्हणजे मूळच्या लाकडी कलाकृतीचा पहाड प्रस्तरामधील आविष्कार होय. गजपृष्ठाकृती असे चैत्यगृह हे जणू लाकडी कलाकुसरीचा नमुना असते. त्यामध्ये मध्यवर्ती गर्भगृहामध्ये हीनयान काळात अर्धगोलाकृती चबुत:यामध्ये भगवान गौतम बुद्धांचे अवशेष ठेवले जात आणि प्रतीक पूजा केली जात असे. चैत्य गवाक्षातून पडणारा प्रकाश हा प्रज्ञाशील व करुणोचा नवा संदेश देत असे. पुढे महायान काळात गर्भगृहात प्रतीकाऐवजी प्रत्यक्ष भगवान गौतम बुद्धांची प्रतिमा कोरण्याची परंपरा सुरू झाली.
 
लेणी क्रमांक 10
वेरूळमधील लेणी क्रमांक 1क् विश्वकर्मा म्हणून ओळखले जाते. त्याचे अद्भुत रूप हे वैशिष्टय़पूर्ण असून, त्यामध्ये वैशिष्टय़पूर्ण चैत्यगृह कोरले आहे. कालदृष्टीने विचार करता अजिंठा लेणी वेरूळपेक्षा अगोदरची असून, ती वाकाटक काळात कोरण्यात आली. वेरूळची बौद्धलेणी ही नंतरच्या चालुक्य काळात कोरण्यात आली. अजिंठय़ातील लेणी क्रमांक 19 व 26 चा प्रभाव वेरूळच्या विश्वकर्मा लेणीवर पडलेला आहे. 
दरवर्षी मार्च महिन्यात वेरूळच्या 1क् क्रमांकाच्या लेणीत सायंकाळी 5 ते 5.15 च्या सुमारास किरणोत्सवाचा योग अनुभवता येतो. प्रत्यक्ष चैत्य गवाक्षातून पडणारी सूर्याची किरणो ही मूर्तीला सूर्यप्रकाशात न्हाऊन टाकतात. स्थापत्य प्रकाश योजना आणि ऋतुचक्राचा सुसंवाद साधून प्राचीन भारतीयांनी घडविलेला हा वैज्ञानिक आविष्कार धर्मतत्त्वाच्या प्रसाराबरोबरच जीवनाची नवी दृष्टी देणारा आहे.
लेण्यांचा कालावधी
स्थापत्य शैलीचा विचार करता या लेण्यांचा कालावधी हा इ.स. 7क्क् असा सांगितला जातो. प्रस्तुतच्या चैत्यगृहात असलेली लाकडी कलाकृतीची शिल्पातील आविष्कृती ही या कलेचा आत्मा आहे. प्राचीन भारतीय स्थापत्यतज्ज्ञ कलेचे माध्यम बदलून लाकडावरची कला ही शिल्पामध्येसुद्धा तेवढय़ाच अनुपम पद्धतीने प्रकट करीत असत. एरवी शिल्पामधील मूर्ती पाहण्यासाठी रिफ्लेक्टर किंवा परावर्तकांचा उपयोग केला जातो. अलीकडे काही लेण्यांमध्ये प्रत्यक्ष विद्युतप्रकाशाचीही योजना करण्यात आलेली आहे; परंतु लेणी क्रमांक 1क् मधील कला व स्थापत्याचे योजकत्व कशामध्ये असेल तर ते ऋतुचक्राशी स्थापत्याचे नाते जोडून चैत्यनाचा प्रकाश प्रत्यक्ष लेण्यामध्ये अनुभवण्यात आहे. अशी अभिव्यक्ती ही बौद्ध मूर्तिकलेतील अनुपम वैज्ञानिक अभिव्यक्तीचा एक आगळावेगळा आविष्कार होय. या लेणीमधील घटपल्लव शैलीतील स्तंभ हे तत्कालीन जीवनातील समृद्धीचे प्रतीक आहे. या शैलगृहातील स्तंभावरील नक्षीकाम, कलाकुसर या बाबी सूक्ष्म आणि तेवढय़ाच वैशिष्टय़पूर्ण आहेत. या विश्वकर्मा चैत्यगृहातील महात्मा गौतम बुद्धाची मूर्ती ही व्याख्यान मुद्रेत आहे. मूर्तीची उंची 3.3क् मीटर एवढी आहे. या मूर्तीच्या भोवती कोरण्यात आलेला बोधिवृक्ष वैशिष्टय़पूर्ण आणि प्रभावी आहे. या चैत्यगृहातील लाकडी कलाकुसरीचे शिल्प स्थापत्यातील अनुकरण वैशिष्टय़पूर्ण आहे. या स्तंभावरील कलाकृतीमध्ये नागकन्यांची रेखाटने आहेत. तसेच वादन, नर्तन आणि आनंदोत्सव करणा:या नृत्य समूहांची आणि वाद्यांची रेखाटने वैशिष्टय़पूर्ण आहेत. मानवी जीवनातील अनेक अष्टभयावर मात करून जीवनातील आनंदाला सामोरे जाताना बुद्धांचा संदेश कसा दिशादर्शक ठरतो हे या लेण्यातील पूरक रेखाटनांवरून स्पष्ट होते.
मौलिक संदेश
लेणी क्रमांक 10 हे विश्वकर्मा चैत्यगृह आहे. यातील भगवान गौतम बुद्धाच्या प्रतिमेवर मकर संक्रमणानंतर उत्तरायणात पडणा:या सूर्यकिरणांचा प्रभावी आविष्कार हे या लेण्याचे एक वैज्ञानिक वैशिष्टय़ होय. प्राचीन महामार्गावर कोरलेल्या या सर्व लेण्या लोकांना नैतिक आणि आध्यात्मिक शिक्षण देतात आणि त्यांचे जीवन बदलण्यासाठी नवी मूल्ये रुजवितात. जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यातील अनेक महत्त्वपूर्ण आणि तेवढय़ाच उपेक्षित अशा काही शिल्पपटांपैकी वेरूळमधील विश्वकर्मा लेण्यातील बुद्धमूर्ती होय. या किरणोत्सवाचा नवा वैज्ञानिक अर्थ असा आहे की, प्राचीन भारतीयांनी आपले लेणी समूह कोरताना ज्ञान, विज्ञान, संस्कृती आणि धर्मप्रसार यामध्ये अपूर्व समन्वय साधला आहे. धम्माचा नवा अर्थ सांगून नवी जीवनशैली प्रदान करणा:या महात्मा गौतम बुद्धाच्या व्याख्यान मुद्रेतील हे धम्मचिंतन प्रत्यक्ष किरणोत्सवाच्या रूपातून दरवर्षी अनुभवणा:या वेरूळमधील रसिक पर्यटकांच्या आनंदाचे वर्णन ते काय करावे. वेरूळमधीलकाही अशा मूर्ती वैज्ञानिक चमत्कारांचे केवळ मिथक स्वरूपात नव्हे,तर वैज्ञानिक दृष्टीने आकलन केले असता त्यांची उंची नव्याने समजू शकते.
 
वेरूळच्या 1क् क्रमांकाच्या लेणीत आरंभी एक छोटेखानी विहार आहे व त्यात आठ छोटी छोटी दालने आहेत.  मागील बाजूस चार असून, उजव्या बाजूस चार दालने आहेत. प्रारंभी प्रवेशाच्याच लगत उत्कृष्ट दर्शनिका होती. इतर विहारांसाठी वैभवशाली प्रभाव टाकण्याचा हा एक प्रयत्न होता. तथापि, या लेण्याचे खरे आकर्षण विहार नसून त्यातील विश्वकर्मा चैत्यालय गृह हे आहे. या चैत्यगृहातील भगवान बुद्धाच्या मूर्तीवर उत्तरायणाच्या काळात किरणोत्सवाचा वर्षातून एकदा आढळ होतो. हा अपूर्व योग अद्भुत मानला जातो. यापैकी चैत्य गवाक्षातून येणारी सूर्याची काही किरणो मूर्तीच्या चेह:यावर स्थिरावतात.
 
(लेखक युजीसी एमीरेट्स प्रोफेसर असून ‘अजिंठा व वेरूळमधील सांस्कृतिक जनसंवाद’ या विषयावर संशोधन करीत आहेत.)
vldharurkar@gmail.com

Web Title: Ray break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.