प्रासंगिक: महिला क्रिकेटची बाउण्ड्री लाइन ओलांडताना...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 04:09 AM2019-05-01T04:09:45+5:302019-05-01T04:10:21+5:30

अनेक गोष्टी सध्या बदलताहेत. महिला क्रिकेटही त्यात आहेच. महिला क्रिकेटचा दर्जा सुधारतो आहे, महिला क्रिकेटस्टार जन्माला येत आहेत. बीसीआयने महिला क्रिकेट आयपीएलची घोषणाही नुकतीच केली आहे.

Relevant: When crossing the boundary line of women's cricket ... | प्रासंगिक: महिला क्रिकेटची बाउण्ड्री लाइन ओलांडताना...

प्रासंगिक: महिला क्रिकेटची बाउण्ड्री लाइन ओलांडताना...

Next

अनन्या भारद्वाज

पुरुषांच्या क्रिकेटची इंटरनॅशनल वनडे मॅच?
आणि अम्पायर कोण?
- महिला !
खरं नाही वाटत ना?..
अनेक गोष्टी सध्या बदलताहेत. महिला क्रिकेटही त्यात आहेच. महिला क्रिकेटचा दर्जा सुधारतो आहे, महिला क्रिकेटस्टार जन्माला येत आहेत. बीसीआयने महिला क्रिकेट आयपीएलची घोषणाही नुकतीच केली आहे.
काही गोष्टी वरकरणी खूप सोप्या साध्या दिसतात. प्रत्यक्षात ती एक क्रांतिकारी घटना असते. अशीच एक घटना गेल्या शनिवारी घडली आणि जगभरात तिची चर्चा झाली. एक फार मोठी बाउण्ड्री लाइन ओलांडून बायकांसाठी संधीचं नवीन फिल्ड तयार करण्याचं काम त्या घटनेनं केलं.
आणि त्याचा चेहरा ठरली क्लॅरी पोलोसॅक. हे नाव तुमच्या-आमच्या अजिबात परिचयाचं नाही. गेल्या आठवड्यात ते बातम्यांत झळकलं तेवढंच. मात्र बातम्यांच्या पलीकडची ही एक मोठी घटना आहे...
क्लॅरी पोलोसॅक. ही ३१ वर्षीय तरुणी. ऑस्ट्रेलियन. क्रिकेटवेडी. तिनं ‘मेन्स’ क्रिकेटमध्ये पहिल्यांदा वनडे मॅचमध्ये अम्पायर म्हणून काम पाहिलं. आयसीसीनं तिची पहिली महिला अम्पायर म्हणून निवड केली आणि नामिबियाविरुद्ध ओमान यांच्यात होणाऱ्या वनडे सामन्यात ती अम्पायर म्हणून मैदानात उतरली.
विशेष बघा, क्रिकेट आपले हातपाय पसरत थेट नामिबिया आणि ओमानपर्यंत पोहोचला आहे. तिथं क्रिकेटवेड पोहोचत आहे आणि दुसरीकडे त्याच खेळात पहिली महिला अम्पायर म्हणून मैदानात उतरते आहे.
ही माहितीच अत्यंत उमेद देणारी आहे. क्लॅरी म्हणते तशी खºया अर्थाने सीमारेषा भेदून नवा प्रवास सुरू करण्याची ही गोष्ट आहे.
क्लॅरी पोलोसॅक. ऑस्ट्रेलियाची. तिनं ऑस्ट्रेलियात घरगुती क्रिकेट स्पर्धात आजवर अनेकदा अम्पायर म्हणून काम पाहिलेलं आहे. महिलांच्या टी-२० वर्ल्डकप सेमी फायनलमध्येही ती अम्पायर होतीच. मात्र ‘पुरुषांच्या’ आणि तेही आंतरराष्ट्रीय, अतिप्रोफेशनल समजल्या जाणाºया सामन्यांत आजवर कुणी महिलेनं अम्पायर म्हणून काम करण्याची शक्यताच नव्हती. मात्र आयसीसीने क्लॅरीवर भरवसा ठेवला आणि पहिली महिला अम्पायर म्हणून तिनं आंतरराष्ट्रीय ‘मेन्स’ क्रिकेटमध्ये मैदानात पाऊल ठेवलं.
या ऐतिहासिक घोषणेनंतर क्लॅरी माध्यमांशी बोलताना म्हणाली की, ‘बायका क्रिकेट अम्पायर का होऊ शकत नाहीत? इट्स ऑल अबाउट ब्रेकिंग बॅरिअर्स. अ‍ॅण्ड क्रिएटिंग अवेअरनेस !’
- ब्रेकिंग बॅरिअर्स केवढा मोठा शब्द. नाही म्हणायला क्रिकेट हा सगळ्यांचा खेळ. सगळ्यांचा आवडता. मात्र आजही समज असा की, बायकांना काय कळतं क्रिकेट. त्यातही बायकांचं क्रिकेट म्हणजे तर भातुकली. ‘लडकी है, लगवग जाएगा !’ हीच भावना सर्वदूर असते. मुलींना क्रिकेट नाही तर क्रिकेटपटूच आवडतात हाच एक लोकप्रिय समज.
त्यात पुरुष क्रिकेट म्हणजे रफटफ. प्रोफेशनल. त्या स्तरावर महिला काय खेळणार? मुळात त्यांना क्रिकेटचं ग्राउंड तरी कळतं का, कुठं सिली पॉइंट आणि कुठं थर्डमॅन, कुठं गली आणि कुठं स्लिप हे तरी कोणाला कळतं असं समजणारे आणि तेच खरं असं मानणारेही काही कमी नाहीत. त्यामुळे पुरुषांच्या क्रिकेट जगात बायकांचं स्थान काय तर स्टेडिअममध्ये बसून किंवा घरात बसून सामने पाहणं. याउपर त्यांचा आणि क्रिकेटचा काही संबंधच नाही, असाच एक समज.
मात्र अशा तमाम गैरसमजांच्या बाउण्ड्री भेदत, तोडत आता महिलांनीही क्रिकेट नावाच्या या खेळात आपली जागा सांगायला सुरुवात केली आहे...
सोपं नाही ते...
जिथं क्रिकेटमध्येच बॉइज गेम आणि मेन्स गेम असा भेदभाव आजही आहे, क्षमता आणि गुणवत्ता या अर्थाने, तिथं बाईनं मैदानात उतरणं?
जरा अवघड आहे हा बदल.
सोशल मीडियात ज्या दिवशी ही बातमी झळकली त्या दिवशी अनेकांनी त्यावर टीका केली की, आता क्रिकेटमध्ये पण बायकांचं ऐकायचं का? टर उडवली गेली..
अर्थात स्वागत करणारेही होतेच.
म्हणून तर क्लॅरीचं हे अम्पायर म्हणून मैदानात उतरणं एक मोठी सीमारेषा ओलांडणंच आहे.
एका बदलाची सुरुवात आहे...

Web Title: Relevant: When crossing the boundary line of women's cricket ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.