थेट चंद्रावर जाऊन होणार रिसर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 06:02 AM2020-12-20T06:02:00+5:302020-12-20T06:05:06+5:30

चीनची नॅशनल स्पेस अँडमिनिस्ट्रेशन ही अवकाश संस्था चीनवर संशोधन तळ तयार करण्याचा विचार करीत आहे. त्यासाठीच चीनने चँग ई-५ हे अवकाश यान चंद्रावर पाठविले होते. हे यान चंद्रावरून सॅम्पल घेऊन परत आले आहे.

Research on moon by China | थेट चंद्रावर जाऊन होणार रिसर्च

थेट चंद्रावर जाऊन होणार रिसर्च

Next
ठळक मुद्देभविष्यात चँग ई-८ या मिशनद्वारे चंद्रावर संशोधन केंद्र सुरू करण्याचा चीनचा विचार आहे. विशेष म्हणजे बेस बनविण्यासाठी ३ डी प्रिंटिंगचा वापर करण्याचीही योजना आहे.

- पवन देशपांडे

चीन सध्या एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आहे. त्याचे कारण आहे चंद्र. चीनने चंद्रावर यान पाठवून तेथील ४.४ टन खडकांचे तुकडे परत पृथ्वीवर आणण्याची कमाल केली आहे. चीनची नॅशनल स्पेस अँडमिनिस्ट्रेशन ही अवकाश संस्था चीनवर संशोधन तळ तयार करण्याचा विचार करीत आहे. त्यासाठीच चीनने चँग ई-५ हे अवकाश यान चंद्रावर पाठविले होते. हे यान चंद्रावरून सॅम्पल घेऊन परत आले आहे. भविष्यातील चँग ई-८ या मिशनद्वारे चंद्रावर संशोधन केंद्र सुरू करण्याचा विचार आहे. विशेष म्हणजे बेस बनविण्यासाठी ३ डी प्रिंटिंगचा वापर करण्याचीही योजना आहे. हे सारं येत्या दहा वर्षांत अस्तित्वात आणण्याचा विचार आहे. यासाठी चीन इतर देशांचीही मदत घेणार आहे, तसेच तिथे संशोधनासाठी अवकाशवीरही पाठविणार आहे; पण यासाठी दहा वर्षे तयारी करावी लागणार आहे.

चंद्रावरून पृथ्वीवर सॅम्पल आणणारा चीन हा तिसरा देश; परंतु हे करताना चीनने आपली अवकाश संशोधन क्षमता सिद्ध केली आहे. आतापर्यंत चीनने तीन वेळा चंद्रावर स्वारी केली आहे आणि तिन्ही वेळा चीन यशस्वी ठरला आहे. असे आतापर्यंत कोणत्याही देशाला करता आलेले नाही.

आता येत्या काळात भारतही चंद्रावर स्वारी करणार आहे. त्याची तयारी केली जात आहे. भारताला यात किती यश येते ते पाहावे लागेल.

एलियन्स पृथ्वीवर आलेत काय?

गेल्या काही दिवसांपासून एलियन्सबाबत अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. एलियन्स म्हणजेच परग्रहवासी पृथ्वीवर आले आहेत आणि ते अमेरिका व इस्रायलला माहीत आहेत, अशीही चर्चा झाली; पण प्रत्यक्ष त्याचा कुठलाही पुरावा अद्याप मिळालेला आहे. एका अवकाश संशोधकाने असाही दावा केला की, ट्रम्प यांना याबाबत सर्वकाही कल्पना आहे. त्यांना एलियन्सचीही माहिती आहे.

या साऱ्या चर्चा होत असतानाच जगात वेगवेगळ्या ठिकाणी एक स्टीलचा स्तंभ अचानक रात्रीतून अभा राहिला असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याबद्दल अद्यापही कुतूहल कायम आहे. हे स्तंभ येतात कसे? ते लावते कोण? हे स्तंभ नाहीसे होतात कसे? हे प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि ते अद्यापही अनुत्तरित आहेत. त्यांचाही संबंध एलियन्सशी जोडला जात आहे.

अमेरिकेला एलियन्ससंदर्भात माहिती मिळालेली असल्याचा आरोप यापूर्वीही अनेकदा झालेला आहे; पण अमेरिकेच्या कोणत्याही संस्थेने त्यावर खुलासा केलेला नाही. अमेरिकेत एरिया ५१ म्हणून एक जागा आहे. तिथे अमेरिकेच्या सैन्यासंदर्भात संशोधन केले जाते, असे म्हणतात; पण या जागी एलियनसंदर्भात संशोधन होत असल्याचा संशय आतापर्यंत अनेकांनी व्यक्त केलेला आहे. सत्य काय, हे अद्यापही समोर आलेले नाही. अमेरिकेचे एलियन्सशी संबंध असल्याचा काही डेटा एडवर्ड स्नोडेन यांच्याही हाती लागला होता.

अमेरिका आणि एलियन्स यांच्यासंबंधाविषयी संशय घेतले जाऊ शकतील असे वक्तव्य नासाच्याच काही संशोधकांनीही मे महिन्यात केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार अमेरिका येत्या दहा वर्षांत एलियन्सचा शोध लावेल, असे त्यांनी म्हटले होते. याचा अर्थ एलियन्सबद्दल अमेरिकेच्या हाती काहीतरी लागलेले आहे आणि जगापासून ते लपवीत आहेत.

काय असेल ते...? येत्या काळात कळेलच.

(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत सहायक संपादक आहेत.)

Web Title: Research on moon by China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.