संशोधकाचा गुरु हरपला ...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 07:00 AM2019-12-08T07:00:00+5:302019-12-08T07:00:06+5:30

जगभरातील कला इतिहासात भारतातल्या अजिंठा लेण्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे  वॉल्टर स्पिंक यांचे नुकतेच निधन झाले. अजिंठा लेणी आणि वॉल्टर स्पिंक ही नावे मात्र येणाºया पिढ्या जोडूनच घेतील. त्यांना वाहिलेली ही स्मरणांजली...

Researcher's master Harpala ... | संशोधकाचा गुरु हरपला ...

संशोधकाचा गुरु हरपला ...

Next

सरला भिरूड- 
वॉल्टर स्पिंक यांच्या निधनाचे वृत्त ऐकून वाईट वाटले आणि अजिंठा परत एकदा त्यांच्याबरोबर बघण्याचे स्वप्न भंगले. मार्च २०१८ मध्ये दोन दिवसांच्या सेमिनारमध्ये मी सहभागी झाले होते. खूप उत्सुकता होती. कारण त्यांच्या विषयीची एक डाक्युमेंटरी बघितली होती. एकाच विषयावर आयुष्य घालवून कसे काम करतात? ही उत्सुकता होती.
जगभरातील कला इतिहासात भारतातल्या अजिंठा लेण्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे अमेरिकेतल्या मिशिगन विद्यापीठाचे माजी प्रा. डॉ. वॉल्टर स्पिंक (वय ९१) यांचे शनिवारी (२३ नोव्हेंबर) श्वसनविकाराने मिशिगन येथे निधन झाले. १९५४ पासून स्पिंक हे अजिंठा लेण्यांचा अभ्यास करत होते. दर वर्षी पावसाळा आणि हिवाळ्यात या अभ्यासासाठी लेण्यांच्या परिसरात मुक्कामी येत. अजिंठ्याचा अभ्यास करताना वाकाटक राजघराणे आणि सम्राट हरिषेणाचे राजकीय आणि सांस्कृतिक योगदान त्यांनी विस्तृतपणे मांडले. हे योगदान स्पष्ट करताना अजिंठा लेण्यांच्या दुसºया टप्प्याची निर्मिती अवघ्या १८ वर्र्षांंत झाली, असा क्रांतिकारी सिद्धांत त्यांनी संदर्भासहित मांडला. आज, त्याबद्दल अभ्यासकांमध्ये मतभिन्नता असली तरी त्याची तात्त्विक बैठक आणि संशोधन पद्धतीची दखल घेतल्याशिवाय आज अजिंठासंबंधित कोणताही अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हरिषेण आणि वाकाटक यांचे संदर्भ शोधतांना दशकुमारचरितसारखे साहित्यिक संदर्भ त्यांनी बघितले होते. राजकीय वंशावळ कशी बांधली? सातवाहन घराण्यातील राजांनंतर कुठले राजे आले? मिरांशीचे लिखाण, अमरावती येथील संबंध, अजिंठा वत्स्यगुल्म शाखेचा राज्यकत्यांनी कोरले. लेणी नंबर एक ही पर्शियन सांसानियन दुतावास पुलकेशीचा आहे.
लेणी कशा कोरल्या? किती वेळ लागला? लेणी कोरण्यासाठी कुणी आर्थिक सहाय्य केले? कुठले वाड़मयीन संदर्भ सापडतात? शिलालेखात उल्लेख आलेल्या व्यक्ती कोण? आणि इतर राजकीय, सांस्कृतिक प्रभाव काय होते, याचा अभ्यास त्यांनी केला.
वॉल्टर स्पिंक यांचा जन्म मिशिगन येथे १९२६ मध्ये झाला. हावर्ड विद्यापीठात आर्ट हिस्टरी या विषयावर पीएच.डी. करताना आंध्रप्रदेशातील अमरावती येथील लेणी हा विषय होता. १९५४ मध्ये पदवी संपादन केली. अजिंठा येथील भेटीत अजिंठ्याच्या प्रेमात पडले आणि सात खंड लिहिले. त्यापैकी सहा खंड २००५ पर्यंत लिहून झाले होते. ही पुस्तके अनेक संशोधन लेख आणि व्याख्याने, सेमिनार, अजिंठा येथे तर त्यांनी हजारो सेमीनार घेतली असतील. त्यापैकी २०१८ च्या मार्चमधील सेमिनारला मी गेले होते. तेथे काय शिकायला मिळाले, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सुरवातीला वाचन सर्वांनी केले आहे असे समजून त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या विवेचनानुसार लेणी केव्हा, कशी आणि का कोरली गेली? कुणी कोरली? या प्रश्नापासून तर धार्मिक प्रभाव आणि राजकीय संबंध यांचा ताळमेळ लावावा.
दोन महत्त्वाच्या बाबी समजावून सांगितल्या प्रात्यक्षिकासहीत लेणी कोरण्याची पद्धत आणि एकाच वेळी काम कसे चालत असे. सर्वात उत्सुकता जी अर्धवट राहिलेले लेणी होती ती कशी प्रॅक्टिकल होती आणि संपूर्ण लेणी कोरायची पद्धत त्यावरून समजून येते. तिथे त्यांची खुर्ची घेऊन जाणे शक्य नव्हते पण त्यांनी न्यायला लावून समजावून सांगितल्या. आतली शिल्पे एक एक निरीक्षण करून प्रश्न विचारा हा आग्रह कमाल होता. त्या शिल्पांवरून काळ आणि संस्कृती श्रद्धा कशा समजता येतात? रचना कशी बदलली? का बदलली? हे त्यांनी विशद केलं.
त्यामुळे दोनच दिवसांत वेगवेगळ्या दृष्टीने विचार करायला शिकले. खरं तर अजिंठा हा मोठा विषय आहे. लेण्यांची भौगोलिक स्थान आणि भूस्तराचा अभ्यास, लेण्यांंची रचना, शिल्पे, चित्रे, इतिहास, शिलालेख, भाषा आणि लिपी, कला आणि पुरातत्व, सामाजिक आर्थिक आणि राजकीय सांस्कृतिक अशा विविध अंगांनी अभ्यास करता येतो. हे त्यांनी दाखवून दिले. किती दगड बाहेर टाकला, त्याला किती दिवस लागले काम करण्याची पद्धत कशी होती इत्यादी बारीकसारीक बाबींचा विचार करुन समजून घेवून लिखाण झाले. लेणीत किती काळ वापरात होती हे कसे समजून घ्यायचे यासाठी ते मृत लेणी आणि जिवंत लेणी असा शब्दप्रयोग वापरत असत. म्हणजे लोक पुजाअर्चा, प्रार्थना करण्यासाठी येत की नाही हे कसे ओळखायचे? किती काळ वापरात होती? केव्हा ओसाड झाली? हे समजून घेण्यासाठी लेणीतील चित्रे ज्यांच्याखाली नावे कोरलेली आहेत किंवा कुठले चित्र कोरलेली आहेत त्यावरून अंदाज घेतला जसे की जातककथा आहे. त्या कथा कुठल्या काळातील बौद्ध साहित्यात आहे. किंवा शिल्पे जी नंतरच्या काळातील भिंतीत वरून ठेवलेली आहे जी मुख्य दगडाचा भाग नाही. सुटी खाचेत बसवली आहेत ती शिल्पे कुठल्या काळातील आहे तसेच खाली नाव कोरलेले आहे का? असल्यास लिपी आणि भाषा कुठली? अशा बारीकसारीक गोष्टींचा उलगडा झाला. वापरात नसलेल्या लेणी मृत का । म्हणायच्या? का वापरात नव्हत्या? मूर्ती वरून आणि तत्कालीन साहित्यात कुठल्या पंथाचा प्रभाव राहिला? राजे, मंत्री आणि भिक्षु यांच्या तील मैत्री यांचा प्रभाव स्थापत्यावर कसा पडतो? राजलेणीतील स्थापत्यावरून विलासी, समद्धी कशी दिसते?
त्यांच्या तोंडून सारखे हरीषेण हे नाव येत होते आणि हरिषेणाच्या प्रेमापोटी हा माणूस असे बोलतोय असे वाटणे स्वाभाविक होते. पण त्यांच्या लिखाणात असा लोभ दिसत नाही. तिथे फक्त एक अभ्यासकाचे नोंदी दिसतात. हरिषेणाला महान करण्यात त्यांचा सात आहे असे इतर अभ्यासक टीकाही करतात. पण स्पिंक सर अजिंठा लेणी अभ्यासात बाप माणूस होता. बापाला तोंडावर बोलायची भीती वाटते म्हणून मुल मागे कुरकुर करतात तशीच काहीशी अवस्था होती.त्यांना इतर कुठले पुरस्कार मिळाले नसतील पण अजिंठा लेणी आणि वॉल्टर स्पिंक ही नावे मात्र येणाऱ्या पिढ्या जोडूनच घेतील. अजिंठा लेणी अभ्यासकांना त्यांच्या कामाची पायरी ओलांडून मगच पढे लेणीत प्रवेश मिळेल एवढे मात्र नक्की..जॉन स्मिथ आणि पारो यांच्या प्रेमकहाणी इतकी ही प्रेमकथा रोचक नसेल पण रोमांचक जरूर आहे... आणि तीच खरी श्रद्धांजली ठरेल. (लेखिका साहित्य, संस्कृतीच्या अभ्यासक आहेत).

Web Title: Researcher's master Harpala ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.