रिस्टार्ट.. कोरोनाच्या आगेमागे जुनं पुसून नव्याने आयुष्य आखायला घेतलेल्या ‘न्यू-नॉर्मल’ लोकांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 06:05 AM2020-08-30T06:05:00+5:302020-08-30T06:05:13+5:30

महानगरातले धावते आयुष्य मागे सोडून  कलकलाटातून बाहेर पडण्याचा,  गरजा कमी करून अधिकचा आनंद आणि  हरवलेले स्वास्थ्य पुन्हा शोधण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का? महानगर सोडून छोट्या शहरात/गावात राहायला गेला आहात का? किंवा शहरातच राहून नवे आयुष्य आखायची धडपड सुरू केली आहे का?.. तर त्या प्रवासाची कहाणी आम्हाला हवी आहे...

Restart.. The search for ‘new-normal’ people who have begun to live a new life.. | रिस्टार्ट.. कोरोनाच्या आगेमागे जुनं पुसून नव्याने आयुष्य आखायला घेतलेल्या ‘न्यू-नॉर्मल’ लोकांचा शोध

रिस्टार्ट.. कोरोनाच्या आगेमागे जुनं पुसून नव्याने आयुष्य आखायला घेतलेल्या ‘न्यू-नॉर्मल’ लोकांचा शोध

Next
ठळक मुद्देतुमची कहाणी आमच्यापर्यंत पोहोचली, की  आमचे संपादकीय सहकारी तुमच्याशी संपर्क साधतील.. मग आपण अधिक तपशिलात बोलूया!!! आणि तुमच्या ‘रिस्टार्ट’ची गोष्ट सगळ्या जगापुढे मांडूया.

कोरोनाने पेकाटात लाथ घातल्यावर
भिरभिरलेल्या तुमच्या डोक्यात
नवीन चक्रे फिरू लागली आहेत का?
आपत्तीने कोलमडणार्‍या, प्रदुषणाने गुदमरलेल्या
शहरातून शक्य तर बाहेर पडावे, थोडे शांत जगावे,
असे तुम्हाला वाटू लागले आहे का?

शहरातली धावाधाव, जड झालेले इएमआयचे ओझे, 
गळ्याला सतत फास लावून असलेल्या डेडलाइन्स,
कधीच पूर्ण न होणारी टार्गेट्स, 
कितीही मिळाला तरी न पुरणारा पैसा,
कितीही ठरवले, तरी कधीच न मिळणारा वेळ,
एसीच्या गारव्यातसुद्धा उडून गेलेली झोप,
कधीच न थांबणारा डोक्यातला कलकलाट
आणि कोरोनासारख्या आपत्ती आल्या, तर
कधीही हे जग आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवील
ही नव्याने डोक्यात शिरलेली धास्ती.. 
हे सगळे नकोसे होऊन
तुम्ही आयुष्याची गाडी फास्ट लेनमधून काढून
साध्या-सोप्या-आनंदी रस्त्यावरून नेऊ पाहाता आहात का?

महानगरातले धावते आयुष्य मागे सोडून 
कलकलाटातून बाहेर पडण्याचा, 
गरजा कमी करून अधिकचा आनंद आणि 
हरवलेले स्वास्थ्य पुन्हा शोधण्याचा प्रयत्न 
तुम्ही केला आहे का?
महानगर सोडून छोट्या शहरात/गावात राहायला गेला आहात का?
किंवा शहरातच राहून नवे आयुष्य आखायची धडपड सुरू केली आहे का?
तुम्ही किंवा तुमचा एखादा मित्र-मैत्रीण, नातेवाईक, सहकारी.. 
यापैकी कुणी या नव्या मार्गावरून निघाले असेल,
तर त्यांच्या त्या प्रवासाची कहाणी आम्हाला हवी आहे. 
शोधलेले मार्ग, आलेल्या अडचणी, न सुटलेले प्रश्न
हे सगळे हवे आहे.
कदाचित असे काही करावे असे तुमच्या मनात घोळत असेल;
पण निर्णय घेण्याची हिंमत होत नसेल..
तुम्ही अशा ‘टू बी ऑर नॉट टू बी’ अवस्थेत घुटमळत असाल,
तर तुमचीही एक कहाणी आहेच की!!
- तीही आम्हाला पाठवा.

या सगळ्या कहाण्या एकत्र करून आम्ही
विणतो आहोत एक गोधडी..
यावर्षीची दिवाळी अधिक ऊबदार व्हावी म्हणून
आणि अस्वस्थ अंधारात चाचपडत असलेल्यांपुढे
एक नवा पर्याय ठेवावा म्हणूनही!!!

तुमची कहाणी आमच्यापर्यंत पोहोचली, की 
आमचे संपादकीय सहकारी तुमच्याशी संपर्क साधतील..
मग आपण अधिक तपशिलात बोलूया!!!
आणि तुमच्या ‘रिस्टार्ट’ची गोष्ट सगळ्या जगापुढे मांडूया.

कुठे पाठवाल?
1. संगणकावर लिहिणार असाल, तर युनिकोडमध्ये लिहून ओपन वर्ड फाइल पाठवा. हाताने लिहिणार असाल तर हस्तलिखित स्कॅन करा आणि आम्हाला ई-मेल करा किंवा व्हॉट्सअँपवर शेअर करा.
2. व्हॉइस क्लिप रेकॉर्ड करून थेट व्हॉट्सअँपवरही पाठवू शकता.
3. तुमचे पूर्ण नाव आणि संपर्काचा तपशील न विसरता द्या.
ई-मेल पत्ता : restart@lokmat.com

व्हॉट्सअँप नंबर : 9112050500
अंतिम मुदत : 10 सप्टेंबर 2020

Web Title: Restart.. The search for ‘new-normal’ people who have begun to live a new life..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.