रिस्टार्ट.. कोरोनाच्या आगेमागे जुनं पुसून नव्याने आयुष्य आखायला घेतलेल्या ‘न्यू-नॉर्मल’ लोकांचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 06:07 AM2020-09-06T06:07:00+5:302020-09-06T06:10:12+5:30
महानगरातले धावते आयुष्य मागे सोडून कलकलाटातून बाहेर पडण्याचा, गरजा कमी करून अधिकचा आनंद आणि हरवलेले स्वास्थ्य पुन्हा शोधण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का? तर तुमच्या त्या प्रवासाची कहाणी आम्हाला हवी आहे.
खूप प्रयत्नाने जमवलेली संसाराची घडी कोरोनाने
पार विस्कटून टाकल्यावर भिरभिरलेल्या तुमच्या घरात
खोलवर काही बदलले आहे का?
आपत्तीने कोलमडणार्या, प्रदूषणाने गुदमरलेल्या
शहरातून शक्य तर बाहेर पडावे, थोडे शांत जगावे,
असे तुम्हाला वाटू लागले आहे का?
शहरातली धावाधाव, जड झालेले ईएमआयचे ओझे,
गळ्याला सतत फास लावून असलेल्या डेडलाइन्स, कधीच पूर्ण न होणारी टार्गेट्स,
कितीही मिळाला तरी न पुरणारा पैसा,
कितीही ठरवले, तरी कधीच न मिळणारा वेळ,.
हे सगळे नकोसे होऊन तुम्ही आयुष्याची गाडी फास्ट लेनमधून काढून साध्या-सोप्या-आनंदी रस्त्यावरून नेऊ पाहाता आहात का?
महानगरातले धावते आयुष्य मागे सोडून
कलकलाटातून बाहेर पडण्याचा,
गरजा कमी करून अधिकचा आनंद आणि
हरवलेले स्वास्थ्य पुन्हा शोधण्याचा प्रयत्न
तुम्ही केला आहे का?
तुम्ही किंवा तुमचा एखादा मित्र-मैत्रीण, नातेवाईक, सहकारी.. यापैकी कुणी या नव्या मार्गावरून निघाले असेल,
तर त्यांच्या त्या प्रवासाची कहाणी आम्हाला हवी आहे.
शोधलेले मार्ग, आलेल्या अडचणी, न सुटलेले प्रश्न
हे सगळे हवे आहे.
या सगळ्या कहाण्या एकत्र करून आम्ही
विणतो आहोत एक गोधडी..
यावर्षीची दिवाळी अधिक ऊबदार व्हावी म्हणून
आणि अस्वस्थ अंधारात चाचपडत असलेल्यांपुढे
एक नवा पर्याय ठेवावा म्हणूनही!!!
तुमची कहाणी आमच्यापर्यंत पोहोचली, की
आमचे संपादकीय सहकारी तुमच्याशी संपर्क साधतील..मग आपण अधिक तपशिलात बोलूया!!!
आणि तुमच्या ‘रिस्टार्ट’ची गोष्ट सगळ्या जगापुढे मांडूया.
कुठे पाठवाल?
1. संगणकावर लिहिणार असाल तर युनिकोडमध्ये लिहून ओपन वर्ड फाइल पाठवा. हाताने लिहिणार असाल तर हस्तलिखित स्कॅन करा आणि आम्हाला ई-मेल करा किंवा व्हॉट्सअँपवर शेअर करा.
2. व्हॉइस क्लिप रेकॉर्ड करून थेट व्हॉट्सअँपवरही पाठवू शकता.
3. तुमचे पूर्ण नाव आणि संपर्काचा तपशील न विसरता द्या.
ई-मेल पत्ता : restart@lokmat.com
व्हॉट्सअँप नंबर- 9112050500
अंतिम मुदत 10 सप्टेंबर 2020