शाळेतली जादूू
By admin | Published: January 31, 2016 11:50 AM2016-01-31T11:50:49+5:302016-01-31T11:50:49+5:30
एरवीच्या कंटाळवाण्या, रटाळ प्राथमिक शाळा कात टाकतात, तेव्हा काय घडते, हे वाई तालुक्याने सिद्ध करून दाखवले आहे. इथल्या तब्बल 82 सरकारी शाळांना जणू जादूचा स्पर्श व्हावा, अशी झळाळी चढली आहे. राज्यभरातले शिक्षक या शाळा बघायला गटागटाने येतात. ही जादू घडवली आहे वाईचे गटशिक्षणाधिकारी एच. व्ही. जाधव यांनी!
Next
>- हेरंब कुलकर्णी
ज्ञानरचनावादाच्या आनंदी प्रयोगाची नांदी.
वाई तालुक्यातल्या निकमवाडीत पोहोचलो तेव्हा तिथल्या शाळेबाहेर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आलेल्या गाडय़ा उभ्या. चौकशी केली तेव्हा कळलं, की ही शाळा बघायला आलेल्या शिक्षकांची गर्दी आहे.
ही शाळा म्हटलं तर जिल्हा परिषदेच्या इतर शाळेसारखीच. नेहमीच्या साध्यासुध्या खोल्यांत भरणारी, पण खरा धक्का शाळेच्या आत गेल्यावर बसला. या शाळेत पहिलीत प्रवेश घेतलेल्या मुलांना शाळेत येऊन फक्त पाच महिने झाले आहेत, तरीही या मुलांनी ‘स्वित्ङरलड’ हा अवघड शब्द मला सहज लिहून दाखवला.
नंतर सुरू झाले गणित.
‘32 अब्ज 7 कोटी 16 हजार सातशे आठ’ ही संख्या पहिलीच्या विद्याथ्र्याने वाचून दाखवली! शाळांमधल्या लेखन-वाचनाची दारूण अवस्थाच पाहात आलेल्या माङयासारख्या शिक्षकासाठी हा अनुभव थक्क करणारा होता.
या विद्याथ्र्याना शिकवणा:या शिक्षकाचे नाव गणोश लोकरे. त्याने उचललेल्या ज्ञानरचनावादाच्या पद्धतीतून मुले किती वेगाने शिकू शकतात याचा हा वस्तुपाठ.
गणोश लोकरेच्या पेशीपेशीत शिक्षक आहे. त्याच्या अध्यापनाच्या सीडी बनवून गावोगावी दाखवाव्यात इतके ते अप्रतिम आहे. मोठय़ा प्रमाणात बनविलेले लेखन, वाचन, गणन साहित्य आणि गणोश लोकरे यांची शिकवण्याची रचनावादी पद्धत यातून निकमवाडीची शाळा बदलली आहे.
तिथून निघालो. कळंबे शाळा. मुली व्हरांडय़ात फरशीवर उडय़ा मारत होत्या. बघितलं तर त्यांचा अभ्यास चाललेला.. उडय़ा मारत! अपूर्णाक व संख्यारेषेची गणिते कठीण मानली जातात. म्हणून या शाळेत फरशीवर संख्यारेषा आखलेली. मुले मधल्या सुटीत त्यावर खेळत खेळत अभ्यास करतात. मुलांची सहकार्य भावना यातून वाढते. हुशार मुले मागे पडलेल्या मुलांना गटकार्यातून शिकवतात.
विजय दीक्षित या गणितवेडय़ा शिक्षकाच्या वर्गात गेलो. सहावीच्या मुलांनी 1क्क् अंकी संख्या वाचून दाखवली! मुलांनी माझी मुलाखत घेतली आणि त्याधारे माङयावर कविताही करून दाखवली. कवी असल्याचा माझा अहंकार गळून पडला !!! फळ्यावर लिहिलेले पूर्णांकयुक्त अपूर्णाकाचे गणित त्याच शाळेतील पहिलीच्या मुलीने सोडवून दाखविले.
एखाद्या तालुक्यात एखादी शाळा बेटासारखी आगळीवेगळी असेल तर तिचे कौतुक होणो स्वाभाविक आहे, पण जर एकाचवेळी एकदम 82 शाळा अशा बदलत असतील तर मग? विश्वास नाही बसत, पण वाई तालुक्यात फिरताना अशा बदलणा:या शाळा ठिकठिकाणी दिसतात.
तालुक्यांतील शाळांना भेटी दिल्यावर जाणवले की शिक्षकांचे फळ्यावर शिकवण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. मुले गटात बसून शिकतात. मुलांना शिकते करण्यासाठी प्रत्येक शिक्षक वेगवेगळे कल्पक उपक्रम राबवतो हे या पद्धतीचे वेगळेपण आहे. त्यामुळे मुलांना लिहायला, बेरीज-वजाबाकी करायला शिकवायचे उपक्रम शिक्षकागणिक वेगवेगळे असतात.
वाई तालुक्यातल्या 82 शाळा, पण प्रत्येक शाळेत उपक्रमाची एक वेगळीच समृद्धी जाणवते. गणित व भाषा विषयासाठी प्रत्येक शाळेत वेगवेगळे प्रयोग चालू आहेत. इंग्रजी विषयासाठी रोजच्या वापरातील 6क्क् शब्दांचा निरनिराळ्या प्रकारे वापर केला जातो. पाठय़क्रमातली संकल्पना एकच, पण विविध शैक्षणिक साहित्याच्या मदतीने विविध प्रकारे ती समजून घ्यायची!
रचनावादी पद्धतीने अध्यापन करण्यासाठी मॅचिंग सेट, पॅटर्न मेकिंग गेम, अबॅकस, टॅनग्रॅम, पझल्स, सापशिडी, व्यापार, वाचनकट्टा, स्वाध्याय कार्ड असे साहित्य शिक्षकांनी निर्माण केले आहे. त्या आधारे ते मुलांना शिकवतात. अर्थात, रोजच्या वापरातील वस्तूही त्यात आहेतच. या साहित्यामुळे स्वत: कृती करून सोडविलेले प्रश्न विद्याथ्र्याना एका नव्या संशोधनाचा आनंद प्राप्त करून देतात.
खरेतर प्रयोगशील शिक्षणात महाराष्ट्र आघाडीवर आहे, पण हे प्रयोग खासगी शाळांमध्ये प्रामुख्याने चालतात आणि म्हणूनच ते ‘बेटा’सारखे असतात. त्यांचे सार्वत्रिकरण होत नाही. सतत अभाव आणि अनास्थेशी झगडणो नशिबी आलेल्या सरकारी शाळांमध्ये हे प्रयोग ङिारपणो तर मुश्कीलच! वाईचा प्रयोग महत्वाचा आहे, तो म्हणूनच! शिक्षण क्षेत्रतील स्वयंसेवी संस्थांची प्रयोगशीलता आणि सरकारी शाळा जर एकत्र आले तर काय घडू शकते याचा वाई तालुका हा वस्तुपाठ ठरावा. वाई तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी एच. व्ही. जाधव यांनी अरुण किलरेस्कर यांच्या भारत विद्यालय या प्रयोगशील शाळेचा अभ्यास केला. प्रा. रमेश पानसे व अदिती नातू यांच्याकडून प्रेरणा घेत शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या. अशा एकूण 28 कार्यशाळा झाल्या. त्यातून हा बदल जन्माला आला आणि आज तो राज्यभरातल्या (सरकारी) शिक्षकांच्या औत्सुक्याचा विषय बनला आहे.
2क्14च्या मे महिन्यात तालुक्यातील सर्व शिक्षकांना नऊ दिवसांचे प्रशिक्षण दिले गेले. गटसंमेलनात शिक्षकांनी नव्या पद्धतीप्रमाणो आदर्श पाठ घेऊन दाखविले. लेखन, वाचनाची पूर्वतयारी कशी करायची याबाबत उपक्रम ठरविण्यात आले. गटशिक्षणाधिकारी जाधव यांनी एकाच वेळी सर्व तालुकाच या पद्धतीने बदलण्याचा संकल्प केला. त्यासाठी सतत शाळाभेटी करून शिक्षकांना मार्गदर्शन केले. यातून आज किमान 82 शाळा या लक्षणीय प्रयोगाने एकत्र जोडल्या गेल्या आहेत.
अर्थात हा सारा प्रवास सहजपणो झाला असे नाही, अनेक अडचणीही आल्या. तात्त्विक भूमिका कळली तरी वर्गात प्रत्यक्ष कार्यवाही कशी करावी हे कळत नव्हते. यंत्रणा प्रशिक्षित नव्हती. त्यातून मग इयत्तानिहाय ज्ञानरचनावाद पुस्तिकेची निर्मिती केली गेली. प्रत्येक गटसंमेलनात मार्गदर्शन व कृतीसत्रे सुरू झाली. आज वेगळे व चांगले काम करणा:या शिक्षकांचे कौतुक होत नाही अशी सार्वत्रिक तक्रार आहे. ज्ञानरचनावादाच्या आधारे उपक्रम राबविणा:या वाई तालुक्यातल्या प्रयोगशील शिक्षकांना लॅपटॉप, टॅब आणि अॅण्ड्रॉइड मोबाइल कौतुक म्हणून देण्यात आले.. हेही येथे नोंदवले पाहिजे.
वाई तालुक्यात फिरताना जयश्री ढगे, शोभा पवार, रामचंद्र टिके, सचिन काकडे, संतोष निकम, हेमंत खरे, शैलेश मोरे, तुकाराम पवार असे अनेक शिक्षक भेटले..
‘आता आम्ही ‘शिकवत नाही’, तर विद्याथ्र्यानी स्वत:च शिकावे यासाठी वातावरण, संधी, प्रेरणा देण्याचे काम करतो. भाषा विषयात पाठ व प्रश्नोत्तरे यातच आम्ही अडकलो होतो, पण आता मुलांच्या अभिव्यक्तीवर आम्ही लक्ष देतो. त्यांचा शब्दसंग्रह वाढवतो. उपक्रमातून शिकवतो.’- असे ते मोठय़ा अभिमानाने सांगत होते. मुलांना कंटाळवाण्या घोकंपट्टीत अडकवण्यापेक्षा स्वत: कृती करण्याची, प्रश्न विचारण्याची, अभिव्यक्त होण्याची संधी देणो किती जादूई असू शकते, हे या शिक्षकांनी अनुभवले आहे.
शिकण्याची ही ज्ञानरचनावादी पद्धती आज महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शेकडो शाळा अंमलात आणत आहेत, पण संपूर्ण तालुका या पद्धतीने विकसित करण्याचा हा ‘वाई पॅटर्न’ खूप महत्त्वाचा आहे. तर्कतीर्थाच्या विश्वकोशाची जन्मभूमी असलेली वाई नव्या काळात नव्या अर्थाने पुन्हा ‘ज्ञानपीठ’ बनते आहे. प्रयोगशील शाळा आणि सरकारी शाळा यांच्या एकत्रित प्रयोगाचा हा सेतु अतिशय महत्त्वाचा आणि म्हणूनच तो सर्वत्र उभा राहायला हवा.
(लेखक शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते
आणि प्रयोगशील शिक्षक आहेत.)
herambkulkarni1971@gmail.com