शिकारा.
By admin | Published: May 9, 2015 06:21 PM2015-05-09T18:21:25+5:302015-05-09T18:21:25+5:30
भूलोकीचा स्वर्ग, पण साधी जमीन तरी कुठे दिसत होती आणि कुठे होता तो स्वर्ग? सारं काही पाण्याखाली. महापुरात सगळंच वाहून गेलं होतं. पण स्वप्नांचा हा स्वर्ग आता ‘पाण्या’तून पुन्हा वर डोकावू लागला आहे.
Next
>
स्वर्गाची दोन रुपं दाखवणारी मुक्त सैर
- पवन देशपांडे
सात महिन्यांपूर्वीची गोष्ट. आमची घरं. संसाऱ स्वप्नं. सारंच बुडालेलं. आम्ही मात्र वाचलो. आमच्या या शिकारानं आम्हाला वाचवलं. पाण्यावर तरंगत ठेवलं. सहा-सात दिवस आणि सहा-सात रात्री आमचा संसार, आमची लेकरं या शिकारातच होती.’
- जेमतेम पाच फूट रुंद आणि पंधरा फूट लांब असलेला शिकारा चालवणारा मोहम्मद सप्टेंबर महिन्यातील महापुरात अनुभवलेल्या थरारक क्षणांची कहाणी सांगत होता.
लहानपणापासून शिकारा (दाल लेकमध्ये सैर करण्यासाठीची छोटी बोट) हेच त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं उत्पन्नाचं साधन. पण सप्टेंबरसारखी स्थिती उभ्या जन्मात त्यानं कधी अनुभवली नव्हती. त्याच्या भरल्या डोळ्यांतकाश्मीरचं लेणं असलेल्या दाल लेकचं प्रतिबिंब तरळलं. ओघळणारे थेंब मात्र त्यानं थोपवले.
जसं महापुरातून आपलं कुटुंब त्यानं वर आणलं, जगवलं; त्याच हिमतीने तो आता आलेल्या हलाखीच्या परिस्थितीचा सामना करायला सज्ज झालाय. सप्टेंबर 2क्14 हा महिना काश्मीर आणि त्याची राजधानी असलेल्या श्रीनगरसाठी महाभयंकर ठरला. ज्या नदीचा सा:या काश्मीरला गर्व आहे, ती जेहलम (या नदीचा उच्चार ङोलम असाही केला जातो़) दुथडी वाहिली. श्रीनगरचा सारा परिसर तिनं आपल्या कवेत घेतला.
मोहंमद सांगतो, महापुरामुळं आम्ही आता 2क् र्वष मागे गेलोय. जगणं कठीण झालंय.
काश्मीरच्या पर्यटनावर गेल्या सप्टेंबरपासूनच परिणाम झालाय. महापुरामुळे काश्मीर खो:याची मोठी हानी झाली़टीव्ही चॅनेल्स आणि वृत्तपत्रंतून दाखवलेलं भयावह चित्र अजूनही डोळ्यासमोरून न हटलेले पर्यटक दूर राहू लागले.
श्रीनगरला गेलो तो काळ होता ‘चिलई कालन’. हा काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होण्याचा 4क् दिवसांचा काळ. ह्या काळात जोरदार बर्फवृष्टी झाली की पुढचे सारे दिवस पर्यटकांनी गजबजतात. जोरदार थंडी पडते आणि पर्यटनासाठी पोषक वातावरण निर्माण होतं. पण यावेळेइतका कोरडा हिवाळा गेल्या 3क् वर्षात काश्मीरवासीयांनी पाहिला नव्हता. जो काळ जोरदार बफवृष्टीचा त्या काळात कडक ऊन, अशी स्थिती होती.
हिलाल. आमचा ड्रायव्हर. ज्यानं आम्हाला तब्बल तीन दिवस काश्मीर दाखवलं/समजावलं. तो सांगत होता. काश्मीरला येणारा पर्यटक म्हणजे आमच्यासाठी देव. महापुरादरम्यान श्रीनगरमध्ये अनेक पर्यटक अडकले. पण काश्मिरी जनतेनं पर्यटकांना वा:यावर सोडलं नाही. असं सांगताना हिलालची छाती अभिमानाने फुललेली होती.
सप्टेंबर 2क्14 पासून काश्मीरमध्ये येणा:या पर्यटकांची संख्या रोडावलीय. ही स्थिती बदलण्यासाठी जशी काश्मिरी जनता जीव तोडून प्रयत्न करतेय, तशाच काही पर्यटक कंपन्याही पुढे येत आहेत. पत्रकारांसाठी काश्मीरचा अभ्यासदौरा आयोजित केलेल्या मेक माय ट्रिपनेही यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. मेक माय ट्रिपने काश्मीरमधील तरुणांसाठी हॉस्पिटॅलिटीचं शिक्षण देण्याचं ठरवलं आहे. पर्यटकांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी तेथील हॉटेलांमधील प्रशिक्षित कर्मचारी असावेत, चांगले ड्रायव्हर्स असावेत, यासाठी आम्ही तसं प्रशिक्षण देण्याचं ठरवल असल्याचं मेक माय ट्रिपचे रणजित ओक सांगत होते. शिवाय काश्मीरमधील अर्थव्यवस्था ढासळू नये, यासाठी स्वस्तातल्या काश्मीर टूर्सही आयोजित करण्याचं ही त्यांनी ठरवलं आहे.
काश्मीरमध्ये लोक जातात तेच मुळात बर्फात खेळण्यासाठी. श्रीनगरपासून तास-दीड तासावर असलेला अन् बर्फानं माखला गेलेला गुलमर्ग डोळ्यांत सामावून घेणं हा जणू उर्वरित जग विसरण्याचा क्षण असतो. तिथल्या गोंडोलामधून सैर करणं, बर्फावरून स्किइंग करणं हा अविस्मरणीय अनुभव असतो. याशिवाय एक अनोखी भेट असते, ती म्हणजे प्रसिद्ध दल लेकमध्ये शिकारामधून सैर करणं. तसंच तेथील हाऊसबोटमध्ये राहणं हाही एक शाही अनुभव असतो. हाऊसबोट असते दल लेकमध्ये, मात्र त्यातील सोईसुविधा कोणत्याही थ्री स्टार हॉटेलपेक्षा कमी नसतात. याशिवाय श्रीनगरमधील मुघल गार्डन, चश्मेशाही, निशात बाग, शालिमार बाग हे काश्मीरचं सौंदर्य दाखवतं. दल लेकच्या बाजूला टेकडीवर असलेलं शंकराचार्य मंदिरावरून श्रीनगरच्या दोन्ही बाजू डोळ्यांत साठवून घेता येतात. हा काश्मीर आणि आपलेच असलेले काश्मिरी आपल्याला साद घालताहेत.. या, काश्मीर तुमची वाट बघतोय.
लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत
मुख्य उपसंपादक आहेत. )