अकरावी प्रवेश प्रक्रियेनिमित्त...  " शून्य फेरी" चे महत्व 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 07:00 AM2019-06-16T07:00:00+5:302019-06-16T07:00:11+5:30

८ जूनला दहावीचा निकाल जाहीर झाला. त्याआधीपासूनच अकरावी प्रवेशाची धांदल सुरू झाली. पहिला फॉर्म भरलादेखील, आता दुसरा फॉर्म भरायचा आणि मग येते ती ‘शून्य फेरी’. काय असते ही शून्य फेरी?... 

The significance of the "zero-round" ... on the eleventh admission process | अकरावी प्रवेश प्रक्रियेनिमित्त...  " शून्य फेरी" चे महत्व 

अकरावी प्रवेश प्रक्रियेनिमित्त...  " शून्य फेरी" चे महत्व 

Next

ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा आहे, पण बायोलॉजी विषय नको आहे त्यांना शून्य फेरीत ‘बायफोकल’ या विषयाला आपल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये आरक्षण आणि गुणवत्तेनुसार प्रवेश घेता येतो.

- प्रा. रुपाली काळे 

...........

बायफोकल का घ्यायचे?
१. बायफोकलचे विषय उदाहरणार्थ संगणक, इलेक्ट्रॉनिक्स,  इलेक्ट्रिकल, सिव्हिल इत्यादीपैकी एका विषयाला प्रवेश घेता येतो. हा विषय पुढे इंजिनिअरिंगला घेणाºया विषयाचा किंवा इउअ, इ.रू. (कॉम्प्युुटर, इलेक्ट्रॉनिक्स) या कोर्सला प्रवेश घेताना मजबूत पाया ठरतो.
२. बायफोकल विषय २०० मार्कांचा आहे. १०० मार्कांचे प्रात्यक्षिक + १०० मार्कांची लेखी परीक्षा आहे. विषय २०० मार्कांचा असल्यामुळे विद्यार्थ्यांचा एका विषयाचा अभ्यास कमी होतो. हा विषय घेतला तर ११ वी, १२ वीला विद्यार्थ्यांना इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायफोकल विषय (एल्लॅ’्र२ँ+ढउट+उङ्मेस्र४३ी१ रू्रील्लूी ङ्म१ ए’ीू३१ङ्मल्ल्रू२ ी३ू) फक्त ५ विषयांचा अभ्यास करावा लागतो. दरवर्षी २०० पैकी २०० गुण मिळवणारे विद्यार्थी असतात.
३. बायफोकल विषयात १०० मार्कांचे प्रात्यक्षिक असल्याने एकूण टक्केवारी खूप चांगली वाढते.
४. अतिशय महत्त्वाचे म्हणजे, ऌरउ च्या बदलत्या अभ्यासक्रम आणि पेपर पॅटर्नमुळे खूप मुलांना केमिस्ट्री या विषयात ५० पेक्षा कमी गुण मिळत आहेत. त्यामुळे उएळ मध्ये चांगले गुण असूनसुद्धा त्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश घेता येत नाही. पण जर त्याचा बायफोकल विषय असेल तर केमिस्ट्रीऐवजी बायफोकलचे गुण गृहीत धरले जातात आणि इंजिनिअरिंग प्रवेशासाठी मार्ग खुला होतो. दरवर्षी बरीच मुले या पद्धतीने प्रवेश घेतात. हा नियम फक्त इंजिनिअरिंग प्रवेशासाठी लागू होतो.
५. बायफोकल विषय जास्त प्रमाणात प्रात्यक्षिकांवर आधारित असल्याने विषयाची सर्व तयारी कॉलेजमध्येच होते. या विषयाचा अतिरिक्त क्लास लावायची आवश्यकता भासत नाही.
६. जे विद्यार्थी खएए/ककळ चा अभ्यास करतात, त्यांना एका विषयाचा अभ्यास करायचा ताण कमी होतो.
७. तसेच ज्या विद्यार्थ्यांचा ळीूँल्ल्रूं’ हा विषय दहावीपर्यंत असतो, त्यांच्यासाठी बायफोकल प्रवेशात विशिष्ट आरक्षण आहे.
बायफोकल प्रवेश
४शून्य फेरीमध्ये प्रवेश घेतला की तुमचा सायन्स आणि बायफोकलचा प्रवेश निश्चित होतो आणि तुम्ही केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून निश्चिंत होऊन बाहेर पडता.
४शून्य फेरीनंतर उर्वरित जागांवर शासन आदेशानुसार प्रवेश होतात.
४इन हाऊस कोट्यातून बायफोकलला प्रवेश घेता येतो.
४व्यवस्थापन कोट्यातून बायफोकलला प्रवेश घेता येतो.
बायफोकल प्रवेशासाठी
आवश्यक कागदपत्रे 
४ररउ मार्कशीट (सत्यप्रत), झेरॉक्स
४शाळा सोडल्याचा दाखला (सत्यप्रत), झेरॉक्स
४जात प्रमाणपत्र (सत्यप्रत), झेरॉक्स
फक्त ढउट ग्रुप ठेवण्याची इच्छा असणाºया विद्यार्थ्यांनी नक्कीच ‘शून्य फेरी’चा  विचार करावा. ११ वी, १२ वी अभ्यासक्रमांत जास्त गुण मिळवण्याची संधी बायफोकल विषयामुळे मिळते आणि १२वी नंतरच्या अभ्यासक्रमाची थोडी तयारी होते.  
(लेखिका एमआयटी ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत.) 

Web Title: The significance of the "zero-round" ... on the eleventh admission process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.