Social Media: सोशल मीडियावर मुलीच सैराट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 12:21 PM2022-08-28T12:21:11+5:302022-08-28T12:22:45+5:30
Social Media:शैक्षणिक धोरण आणि शिकवण्याच्या पद्धती यात काळानुरूप बदल केले जातात. इंटरनेटच्या शोधानंतर हळूहळू ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. कालांतराने मुलांच्या शालेय शिक्षणातही त्याचा प्रभावीपणे वापर होऊ लागला.
- गणेश देवकर
(मुख्य उपसंपादक)
शैक्षणिक धोरण आणि शिकवण्याच्या पद्धती यात काळानुरूप बदल केले जातात. इंटरनेटच्या शोधानंतर हळूहळू ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. कालांतराने मुलांच्या शालेय शिक्षणातही त्याचा प्रभावीपणे वापर होऊ लागला. कोरोना कालखंडात तर ऑनलाइन शिक्षण हा कळीचा मुद्दा बनला होता. या पार्श्वभूमीवर एकूणच सोशल मीडिया, त्याचा किशोरवयीन मुलांकडून होत असलेला वापर आणि त्यामुळे त्यांच्या सवयी आणि वर्तनात झालेला बदल याचा अभ्यास पीव्ह रिसर्च सेंटरने यावर्षी केला. त्यातून समोर आलेल्या निष्कर्षांची २०१४-१५ मध्ये केलेल्या सर्व्हेशी तुलना केली असता, विस्मयकारी गोष्टी समोर आल्या आहेत.
मुलींना आवडे टिकटॉक, मुले यूट्युबच्या प्रेमात
सर्व्हेमध्ये सामील असलेल्या मुलांमध्ये किशोरवयीनांमध्ये ऑनलाइन असणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे.
या वयोगटातील मुलींच्या तुलनेत मुलांना यूट्युब अधिक पसंत आहे. त्याखालोखाल मुलांना ट्विच, रेडिड आवडते. तर मुलींना मुलांपेक्षा टिकटॉक जवळचे वाटते. त्याखालोखाल मुलींची पसंती इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटला आहे.
५४% युजर्सना वाटते की ही सवय सुटणे केवळ अशक्य आहे. केवळ अशक्य आहे असे वाटणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा ४टक्के अधिक आहे. उर्वरित ४६% जणांमध्ये वाटते की ही सवय सुटू शकते. त्यातील ५१ टक्के मुलांना हे अगदी सोपे वाटते तर सोपे वाटणाऱ्या मुलींचे प्रमाण ४६% इतके आहे.
सतत ऑनलाइन असणे योग्य?
५५%
युजर्सना वाटते हे योग्य आहे.
३६%
युजर्सना वाटते की हा वेळ खूप अधिक आहे.
८%
युजर्सना वाटते की हा वेळच फार कमी आहे.
हा वेळ चुकीच्या कामासाठी वापरला जातो असे कुणालाच वाटत नाही.
पीव्ह रिसर्च सेंटरने केलेला सर्व्हे
कालावधी
१४ एप्रिल ते ४ मे २०२२
एकूण सहभागी - १,३१६
वयोगट - १३ ते १७