काही पहिलेवहिले विलक्षण अनुभव मेळघाट डायरी

By admin | Published: November 8, 2015 05:56 PM2015-11-08T17:56:58+5:302015-11-08T17:56:58+5:30

मी छोटा साहेब म्हणून जेव्हा धारणीला रुजू झालो तेव्हा माङयाकरता स्वतंत्र जीप नव्हती. त्यामुळे सुरुवातीला मी 5432 क्रमांकाच्या ट्रकमधून फिरत असे

Some first-hand experience is the Melghat Diary | काही पहिलेवहिले विलक्षण अनुभव मेळघाट डायरी

काही पहिलेवहिले विलक्षण अनुभव मेळघाट डायरी

Next

मी छोटा साहेब म्हणून जेव्हा धारणीला रुजू झालो तेव्हा माङयाकरता स्वतंत्र जीप नव्हती. त्यामुळे सुरुवातीला मी 5432 क्रमांकाच्या ट्रकमधून फिरत असे. मोहमद अब्दुल सत्तार नावाचा एक दयाळू चालक हा ट्रक चालवत असे आणि तो मला आनंदाने दौ:यावर घेऊन जात असे. सत्तार ट्रकमध्ये माल भरेपर्यंत मी माङो तपासणीचे काम उरकत असे. आम्ही रिकाम्या हाताने (ट्रकने) जात असू आणि भरल्या हाताने गोगलगाईच्या वेगाने परतत असू. त्याकाळी अधिका:यांकरता क्वचितच जीप्स असत. माङया कामाची व्याप्ती पाहून माङया बॉसने 12क्1 क्रमांकाची खिळखिळी झालेली जीप माङया  दिमतीला पाठवली होती. ढाकणा-डोलार रस्त्यानं जाताना झालेल्या गव्याच्या भेटीची हकिकत कळल्यावर त्यांनी त्यांचे अधिकार वापरून माङयाकरता नवी कोरी महिंद्रा जीप (3913) पाठवली. ही फोर व्हील ड्राइव्ह डिङोल जीप होती आणि तिचं छप्पर कापडी होतं. आठवडय़ाभरात तसनीमलाही नवी जीप (3866) मिळाली. धारणीसारख्या छोटय़ा गावात नवी कोरी जीप येणो हा चर्चेचा विषय झाला होता. पहिली संधी मिळताच मी पहिल्यावहिल्या फेरीला निघालो. 

नवी कोरी जीप असल्याने कोणी रक्षक न घेता मी एकटय़ानेच जायचं ठरवलं. अर्थात सोबत हसन नावाचा नवा ड्रायव्हर होताच. (या हसनशी अजूनही मी संपर्कात असतो.) शुभारंभाच्या या फेरीसाठी माङया डोळ्यापुढे तारुबंदा रेंज आली, जिथं मी नुकताच एक छान काळ व्यतीत केला होता. तसेच तिथे प्राणीही भरपूर होते. तारुबंद्याचं सोमजी पटेलचं घर हा माझा पहिला स्टॉप होता. तिथं एक कप काळा चहा (त्याकाळी मेळघाटात दूध म्हणजे दुर्मीळ चीज होती) घेऊन आम्ही जीपचं स्वागत केलं. त्यानंतर मी कुंडच्या दिशेने निघालो. कुंडच्या अलीकडच्या बाजूस असलेल्या साखरी विहीरवर आम्ही पोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. पाणी असणा:या ठिकाणाहून आम्हाला नदी ओलांडायची होती. पाण्याच्या तळाशी नदीत मोठाले गोटे होते. जीप फोर व्हील ड्राइव्ह आणि नवी आहे या गोष्टीवर विसंबून मी निर्धास्तपणो काळजीपूर्वक गाडी पाण्यात घातली. अध्र्या रस्त्यात गेल्यावर अॅक्सल गोटय़ाला थटलं आणि त्यावर चढलं. त्यामुळे मागची चाकं वर उचलली गेली. गाडी बाहेर काढण्यासाठी मी जेव्हा अॅक्सलेटर वाढवला तेव्हा मागची चाकं फक्त जागच्या जागी पाण्यात आरामात फिरली, गाडी सरकायचं काही नाव घेईना. खरं तर अशा कठीण परिस्थितीसाठीच फोर व्हील ड्राइव्हची रचना केलेली असते. पण जेव्हा फोर व्हील काम करेनासं झालं तेव्हा माझी घोर निराशा झाली. जीप एकही इंच मागे पुढे झाली नाही. आम्ही फार अडचणीत सापडलो होतो. त्यातच मला लांबून अस्वलाचं ओरडणं ऐकू आलं, पाठोपाठ सांबराचा धोक्याचा इशाराही ऐकू आला. याचा अर्थ स्पष्ट होता, कुठेतरी जवळपास हिंस्र श्वापद होतं. क्षणाक्षणानं काळोख वाढत चालला होता आणि आमची जीप पाणवठय़ाच्या मधोमध फसली होती. थोडय़ा वेळातच पाण्यासाठी वन्यप्राण्यांची तिथं रीघ लागणार होती. मोठा बाका प्रसंग उद्भवला होता.
 मला आता काळजी वाटू लागली होती. ते पाहून माङया सोबतच्या हसनमधला सुपरमॅन आता जागृत झाला होता. त्यानं पटकन त्याचा शर्ट उतरवला आणि जीपच्या खाली दिसेनासा झाला.  ‘डर लगे तो गाना गाना’ या फिल्मी गाण्याचं अनुकरण करून मी भीती आणि वन्यप्राणी घालवण्यासाठी मोठय़ामोठय़ानं गाऊ लागलो. हसनने पाण्यात जॅक लावला आणि तो त्रसदायक गोटा काढून टाकला. जीपच्या मागच्या चाकांना जमिनीचा स्पर्श झाला आणि जीप पाण्यातून बाहेर पडली. एव्हाना पूर्ण काळोख झाला होता. अशी अविस्मरणीय ठरली 3913 ची पहिलीवहिली फेरी!
पहिल्यावहिल्या अशा अडचणीतून 3913 सावरली आणि मेळघाटच्या रस्त्यांना सरावली. एके संध्याकाळी मला गुप्त बातमी कळली की मध्य प्रदेशातले चोरटी तोड करणारे तस्कर हद्दीवरच्या भोकरबर्डी या गावाजवळून महाराष्ट्राच्या जंगलात घुसले आहेत. मी काळजीपूर्वक काही निवडक धाडसी तरुणांची निवड केली. या गटाचा नायक होते शिरोडकर नावाचे वनक्षेत्रपाल आणि बाकी सगळे साथीदार तरुण वनरक्षक होते. रात्रीचं जेवण उरकून आम्ही दहाच्या सुमारास धारणीहून आमच्या पहिल्यावहिल्या नाकाबंदीसाठी निघालो. त्या कडाक्याच्या थंडीतल्या काळोख्या रात्री आम्ही आमच्या ठिकाणावर पोचलो तेव्हा मध्यरात्र झाली होती. ही जागा मध्य प्रदेश हद्दीपासून दोन किलोमीटरवर होती. या ठिकाणी रस्ता अरुंद झाला असल्याने चोरटय़ांना मुद्देमालासकट पकडणं आम्हाला सोपं जाणार होतं. पहाटे तीनच्या सुमारास लाकडांनी भरलेल्या बैलगाडय़ा येत असल्याचा आवाज (भरलेल्या गाडीचा आवाज कमी असतो) आम्ही ऐकला. त्या पुरेशा जवळ आल्यावर आम्ही त्यांच्यावर तुटून पडलो. मौल्यवान सागवानाने भरलेल्या पाच बैलगाडय़ा आमच्या ताब्यात आल्या. हा जवळपास अर्धा ट्रक माल होता. अंधाराचा फायदा घेऊन एक चोरटा पळून गेला. हा आता त्याच्या गावात जाऊन अजून फौजफाटा घेऊन येईल या विचाराने आम्ही पटकन प्रथम गुन्हा रिपोर्ट जारी केला आणि हाती आलेले तस्कर, मुद्देमालासह धारणीकडे रवाना झालो. 
प्रत्येक बैलगाडीसोबत मी एक वनरक्षक तैनात केला होता. शिरोडकर आणि मी 3913 मध्ये बसून या वरातीचं निरीक्षण करत होतो. सकाळी उजाडता उजाडता आम्ही धारणीत पोचलो. आमच्या मिरवणुकीचं धारणीत जोरदार स्वागत झालं. मला नंतर अशी बातमी कळली की पळून गेलेला तो तस्कर 2क्क् जणांचा सशस्र जमाव घेऊन आमचा पाठलाग करत आला होता, पण आम्ही वेळीच तिथून निघाल्याने थोडक्यात बचावलो. हा माझा आणि 3913  चा पहिलावहिला नाकाबंदीचा अनुभव होता. या नाकाबंदीत आणखी एक नवाकोरा अनुभव गाठीशी जमा झाला, त्याकरता आणखी थोडं विस्तृतपणो सांगणं आवश्यक आहे. 
आमची नाकाबंदी चालू असताना आम्ही 3913 रस्त्यापासून शंभरएक मीटरवर दडवून ठेवली होती. आम्ही रस्त्याच्या बाजूला दोन गटांत बसलो होतो. एका गटात पाच वनरक्षक होते आणि दुस:या गटात वनक्षेत्रपाल शिरोडकर आणि अस्मादिक छोटे साहेब होते. वनरक्षक आमच्यापासून शंभर- सव्वाशे मीटरवर असतील आणि शिरोडकर माङयापासून दहा मीटरवर होते. कडाक्याची थंडी असल्याने आम्ही स्वत:ला घोंगडीत गुरफटून घेतलं होतं. शिरोडकरांनी मला नंतर सांगितल्यानुसार त्यांना त्यांच्यासमोर कसला तरी आवाज ऐकू आला होता. मिट्ट अंधारामुळे त्यांना काही दिसू शकलं नाही. त्यामुळे त्यांनी टॉर्च लावला. एक वाघ मीटरभर अंतरावरून त्यांच्याकडे चौकस दृष्टीने बघतो आहे हे पाहून त्यांना दरदरून घाम फुटला. ते दृश्य मी अगदी जवळून पाहत होतो. माझं हृदयही जोराने धडधडू लागलं होतं. पण सुदैवाने लवकरच त्या वाघाची उत्सुकता शमली. थोडा वेळ रेंगाळून तो जिथून आला त्या जंगलात निघून गेला. मी पटकन जाऊन शिरोडकरला कवेत घेतलं. तो भीतीने अक्षरश: थरथर कापत होता, दात कडकड वाजत होते. एवढय़ा जवळून मरणाचं दर्शन झाल्यावर कोणाचीही हीच अवस्था झाली असती. मी त्याला माङया फ्लास्कमधली कपभर कॉफी दिली आणि आमची नाकाबंदी चालूच राहिली. शिरोडकरांवर एवढा दुर्धर प्रसंग ओढावला असल्याची आमच्या दुस:या गटाला गंधवार्ताही नव्हती. 
एके सकाळी मी तापी नदीच्या काठाने मध्य प्रदेशच्या हद्दीवरून जात होतो. इतक्यात मला चार आदिवासी मुली गावाकडे धावत जाताना दिसल्या. निश्चितच त्या भांबावल्या होत्या. जीप थांबवून मी त्यांना प्रकार काय आहे हे विचारलं. त्या मुलींच्या तोंडातून कसेबसे शब्द फुटले,   ‘साहेब व. व. वाघ, आमच्या मागं वाघ लागलाया’ आणि परत तशाच धावत सुटल्या. मी त्याच रस्त्याने पुढे जात राहिलो आणि दोनशे मीटरवर खरंच एक वाघ माङया जीपच्या दिशेने येताना दिसला. तो आमच्या दिशेने येतच राहिला आणि जीपपासून पाच मीटरवर येऊन थांबला. 
आणि नंतर सरळ जंगलात निघून गेला.  या  घटनाक्रमाने मी बुचकळ्यात पडलो आणि उत्सुकता शमवण्यासाठी मी गावात गेलो. गावच्या मुखियाने चटकन त्या मुलींना येण्याचं फर्मान सोडलं. त्या मुली आधी काही सांगायला तयार नव्हत्या. मग एकीनं तोंड उघडलं, नंतर सांगू लागल्या की त्या सकाळी नदीवर धुणं धुवायला गेल्या होत्या. त्यांचं काम अध्र्यावर आलं तेव्हा त्यांच्यातल्या एकीला पन्नास मीटरवर त्यांच्या मागे नदीतल्या उथळ पाण्यात वाघ बसलेला दिसला. प्रथम तिला एकदम धक्का बसला. त्यातून ती सावरली आणि तिच्या एक गोष्ट लक्षात आली की रानकुत्र्यांच्या एका मोठय़ा टोळक्याने वाघाचा पाठलाग करत त्याला नदीपर्यंत आणलं आहे. त्या गांजलेल्या वाघाची हालत धाडसी मुलींच्या लक्षात आली. रानकुत्र्यांची एक मोठी टोळी वाघाला ठार करायला पुरेशी असते हे तिलाही माहीत होतं. त्यामुळे रानकुत्री नाहीशी होईपर्यंत तिने बाकीच्या मुलींना तिथंच थांबायला सांगितलं. रानकुत्री निघून गेल्यावर मग त्या मुलींनी त्वरेने तिथून काढता पाय घेतला. पण तो घाबरलेला, कृतज्ञ वाघ मुलींपासून ठरावीक अंतर राखून त्यांच्या मागोमाग चालतच राहिला. अशा प्रकारे घाबरलेल्या वाघाला माणसाचं अस्तित्व जास्त सुरक्षित वाटतं ही सर्वमान्य गोष्ट आहे. त्या आदिवासी मुलींनी घाबरलेल्या वाघाला वाचवण्यासाठी केलेली धाडसी कृती आणि त्या कृतज्ञ वाघाला सलाम केल्याशिवाय मला राहवलं नाही. 

Web Title: Some first-hand experience is the Melghat Diary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.