दक्षिण आफ्रिका..

By admin | Published: January 23, 2016 02:45 PM2016-01-23T14:45:48+5:302016-01-23T14:45:48+5:30

'वर्ल्ड इन वन कण्ट्री’. अर्थात एका देशात सारं जग सामावलेला देश, अशी या देशाची ओळख. इथला विलक्षण देखणा निसर्ग नजरेचं पारणं फेडतो.

South Africa | दक्षिण आफ्रिका..

दक्षिण आफ्रिका..

Next
>- सुधारक ओलवे
 
'वर्ल्ड इन वन कण्ट्री’. अर्थात एका देशात सारं जग सामावलेला देश, अशी या देशाची ओळख. इथला विलक्षण देखणा निसर्ग नजरेचं पारणं फेडतो. इथली सुंदर शहरं, प्राचीन नीटस समुद्रकिनारे, बुशवेल्ड या भागातल्या जंगलसफारी आणि या सा:यांसोबत भेटणारी दक्षिण आफ्रिकी माणसं. सारंच अविस्मरणीय!
दक्षिण आफ्रिका पर्यटन विभागाच्या आमंत्रणानुसार मी दोन आठवडे दक्षिण आफ्रिकेच्या दौ:यावर गेलो होते. भारतासह नेदरलॅण्ड, चीन, जपानमधल्या काही निवडक पत्रकारांना त्यांनी या दौ:यासाठी निमंत्रित केलं होतं. त्या पत्रकारांमध्ये मी एकटा फोटोजर्नलिस्ट होतो.
कुणाही फोटोग्राफरसाठी आनंदाची आणि फोटोग्राफीची नितांतसुंदर पर्वणी म्हणजे ही दक्षिण आफ्रिकी सफर. नजर गोठवून टाकणारी लांबच लांब हिरवी पठारं, काही उभी सळसळती झाडं, दूर उभे पर्वत आणि प्राण्यांच्या मुक्त संचारानं बहरलेली जंगलं.  लख्ख सोनसळी उन्हात कुठंतरी उभे मरकॅट दिसतात. मरकॅट नावाचे हे प्राणी आपल्याकडच्या मुंगसांच्याच जातकुळीतले. मजेत ऊन खात बसलेले दिसतात. उंच वाढल्या कंबरेएवढय़ा झुडपांतून, गवतातून आफ्रिकन गेंडे हळूहळू चालत जातात. आणि कुठं आफ्रिकन हत्तींचं सारं कुटुंबच फिरायला निघालेलं दिसतं. एकाच रेषेत, एकाच तालात ते आपली डोकी हलवतात आणि त्या तालावर सगळ्यांच्या सोंडी एका रेषेत झुलतात. सगळ्यात चपळ, तरतरीत असा जंगलचा राजा सिंह मस्त उन्हात, त्याच्याच तंद्रीत पहुडलेला दिसतो. त्या सिंहाला हात लावून पाहणं, त्याच्या नुस्तं जवळ जाणं हासुद्धा थ्रिलिंग अनुभव असतो!
 निसर्गाचं ते परमवैभव कायमचं माङया मनात घर करून बसलंय. एक फोटोग्राफर म्हणून तर तो अनुभव विलक्षण होताच, पण या भूतलाचा एक नागरिक म्हणूनही ही ‘सफर’ कायम मनात आनंद फुलवत राहील.
त्या आनंदाचीच ही काही चित्रं!!

Web Title: South Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.