तमाशा

By Admin | Published: April 23, 2016 12:58 PM2016-04-23T12:58:26+5:302016-04-23T12:58:26+5:30

इथं एरवी दिवसा, सूर्यप्रकाशात लोक जात नाहीत अशा अंधा:या दुनियेतही माझा कॅमेरा मला घेऊन गेला. त्यानं अशा दुर्दैवी माणसांना भेटवलं, ज्यांच्याविषयी समाजानं भलतेसलते गैरसमज करून ठेवलेत. काही वर्षापूर्वी असाच एक रात्रभराचा प्रवास करून मी पश्चिम महाराष्ट्रातल्या मोडनिंब गावात पोहचलो होतो. तिथल्या सागर आणि मंगल तमाशा थिएटर्सर्पयत..!

Spectacle | तमाशा

तमाशा

googlenewsNext
>- सुधारक ओलवे
 
इथं एरवी दिवसा, सूर्यप्रकाशात लोक जात नाहीत अशा अंधा:या दुनियेतही माझा कॅमेरा मला घेऊन गेला. त्यानं अशा दुर्दैवी माणसांना भेटवलं, ज्यांच्याविषयी समाजानं भलतेसलते गैरसमज करून ठेवलेत. काही वर्षापूर्वी असाच एक रात्रभराचा प्रवास करून मी पश्चिम महाराष्ट्रातल्या मोडनिंब गावात पोहचलो होतो. तिथल्या सागर आणि मंगल तमाशा थिएटर्सर्पयत..!
तरण्याताठय़ा मुली, त्यांच्या आया, लहानमोठी भावंडं यांच्यासह दहा माणसं एका चौकोनी तुकडय़ात दाटीवाटीनं राहत होती. देवादिकांचे आणि फिल्मस्टार्सचे फोटो दाटीवाटीनं भिंतींना चिकटले होते. आणि एका कोप:यात रंगीत टीव्ही, मोठय़ा डेकचे टेप हे सारं होतंच सोबतीला! कोल्हाटी समाजाच्या तमाशा कलाकारांचं हे घर. समाजातल्या सर्वसाधारण जगण्यापेक्षा अगदी वेगळं, वेगळ्याच चेह:यामोह:याचं. बायका लावणीवर थिरकणार  आणि पुरुष ढोलकी, तबला, पेटी वाजवत तडकत्या फडकत्या गाण्यांवर साथ करणार असा साधारण शिरस्ता.
1997 ची ही गोष्ट. लावणी नृत्यांगनांशी ‘खास’ संबंध असल्याचा आळ एका राजकीय नेत्यावर जाहीररित्या घेतला गेला होता. राज्यात या विषयाची बरीच चर्चा होती. अर्थात तो विषय पुढे थंडावला. पण यानिमित्तानं या माणसांचं, तमाशात काम करणा:या स्त्रियांचं आयुष्य समजून घ्यावं असं माङया कॅमे:याला वाटू लागलं.
माङो मित्र, सामाजिक कार्यकर्ते आणि सुधारणा चळवळीचे म्होरके अरुणकुमार मुसळे यांच्या सहकार्यानं तमाशातल्या महिलांचं फोटोशूट करायचं ठरवलं. या तमासगिरांना किमान न्याय्य हक्क मिळावेत, त्यांच्या जगण्याचे प्रश्न सुटावेत म्हणून अरुणकुमार मुसळे यांनी सलग कितीतरी वर्षे काम केले, या माणसांचं जगणं सोपं व्हावं म्हणून झगडा सुरूच ठेवला. त्यांच्या मदतीशिवाय हे फोटोशूट शक्यच नव्हतं.
फडावरची संध्याकाळ. नृत्यांगनांची रोजची धावपळ सुरू होते. चेह:यावर ठळक मेकअप, जड चमकिल्या साडय़ा, अंबाडय़ात गजरा माळून आणि पायात चाळ बांधून त्या थिएटरकडे निघतात. थिएटर म्हणजे तरी काय एकच दरवाजा आणि एकही खिडकी नसलेली एक जेमतेम मोठी खोली. लाकडाचं स्टेज, डीम लाइट, स्टेजला चिकटून काही तुटक्या पण मोठाल्या खुच्र्या आणि त्यापाठोपाठ बाकडय़ांची रांग. लावणी नृत्यांगना स्टेजवर आली की लोक शिट्टय़ा मारतात, फेटे उडवतात, आपल्या आवडीचं गाणं म्हण असा आग्रह धरत त्यासाठी नोटा पुढं करतात. एखादी परी आपल्यासमोर नाचतेय असं जमलेल्या पब्लिकला वाटत राहतं. तसंही त्या मैफलीच्या त्याच स्टार्स असतात.
पण जुन्या लावणीची, तिच्यातल्या अस्सल सादरीकरणाची लोकप्रियता गेल्या काही वर्षात घसरणीला लागली आहे. घरोघर टीव्ही चॅनल्स पोहचले आणि लावणीची पुरानी अदा त्यात झाकोळू लागली. खेडय़ापाडय़ात अजून तमाशाचं वेड आहे पण लावणीची अवस्था आणि लावणी करणा:या नृत्यांगनांची स्थिती दयनीय आहे. ‘घुंगरू’ गुलामगिरीचं प्रतीक बनले आहेत. चेह:यावरच्या मेकअपच्या भडक पुटांच्या मागे किती वेदना लपवल्या जातात. एक लोककला ज्या जपतात, जिवंत ठेवतात त्या नृत्यांगना खरंतर सांस्कृतिक आयकॉन्स ठरायला हव्यात. पण त्या स्वत:च गरीब आणि शोषणाच्या बळी ठरताहेत. तमासगीर म्हणून त्यांच्या वाटय़ाला दुसरं काही आयुष्यच येत नाही. फक्त नाचत राहणं, प्रत्यक्ष आयुष्यातही नाचायचं आणि नशीबही असं नाचवतच राहतं. जगण्याच्या एका भयाण वतरुळात त्या फक्त फिरत राहतात.
 
(छायाचित्रणाच्या माध्यमातून समाजकार्याबद्दल पद्मश्री पुरस्कारप्राप्त छायाचित्रकार ‘लोकमत’ समूहाचे फोटो एडिटर आहेत.)

Web Title: Spectacle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.