मुक्काम पनवेल
By admin | Published: October 24, 2015 07:20 PM2015-10-24T19:20:41+5:302015-10-24T19:20:41+5:30
डान्सबार बंदीला स्थगिती मिळाल्याच्या बातमीनंतर हा छनछनाट आता पुन्हा सुरू होणार का, याबद्दलच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेलमध्ये तर या चर्चेला काळजीची किनारही आहे. ..का?
Next
>डान्सबारच्या उधळ्या, बेफिकीर छनछनाटाने काळवंडलेल्या बेचकीतल्या गावात..
ओंकार करंबेळकर
2004 च्या निवडणुकांची धामधूम. डान्सबार विरोधात विधानसभेत आवाज उठविणारे शेकापचे नेते विवेक पाटील प्रचारासाठी एका गावात गेले होते. तेवढय़ात गावातील एका तरुणाचे नुकतेच निधन झाल्याचे समजले. आलाच आहात तर दोन मिनिटे हाक मारून या अशी विनंती काही कार्यकत्र्यानी केली. त्याच्या घराकडे निघणार तोच कोणीतरी कानात कुजबुजले, अहो त्या मुलाला सगळे नाद होते, सगळे छंद करायचा. इतकेच काय तो रोज पनवेललाही जायचा. निवडणुकीच्या धामधुमीत आणि घाईगडबडीतदेखील हे शब्द विवेक पाटील यांच्या डोक्यात घर करून राहिले. दोन-तीन दशका पनवेलची ओळख डान्सबारचे गाव म्हणून सर्वाच्या मनात ठासून भरल्याचे त्यांना जाणवले.
सांस्कृतिक ठेवा जपणा:या शहराची अशी ओळख झालेली पाहून आजही अनेकांना मनापासून वाईट वाटते. मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणा:या पनवेल शहराने गेल्या काही वर्षामध्ये झपाटय़ाने कात टाकली. मात्र शहरीकरणाबरोबर चंगळवादाच्या रूपाने डान्सबारसारखी नकोशी अपत्येही शहराला भेट मिळाली. दुर्दैवाने डान्सबार हीच शहराची ओळख व्हावी इतके ते पसरत गेले. सामान्य पनवेलकराला आजही ते दहा वर्षापूर्वीचे दिवस आठवतात. डान्सबार म्हणजेच पनवेल ही ओळख त्यांच्या मनात सलते, खुपते. त्याबद्दल ते राग, दु:खही व्यक्त करतात आणि हतबलताही..