पाऊलखुणांचा नकाशा

By admin | Published: June 4, 2016 11:55 PM2016-06-04T23:55:37+5:302016-06-04T23:55:37+5:30

एखादी व्यक्ती जगभरात जिथे जिथे गेली, त्या ठिकाणांची टिंबं जगाच्या नकाशावर काढली आणि एका रेषेने ती जोडत नेली, तर पाऊलखुणांचा प्रवास समजतो.

Steps map | पाऊलखुणांचा नकाशा

पाऊलखुणांचा नकाशा

Next
>- ज्ञानेश्वर मुळे
 
एखादी व्यक्ती जगभरात जिथे जिथे गेली, 
त्या ठिकाणांची टिंबं 
जगाच्या नकाशावर काढली आणि 
एका रेषेने ती जोडत नेली, 
तर पाऊलखुणांचा प्रवास समजतो. 
पण या नकाशातले स्थानबिंदू आणि रेषा दोन्ही अशक्त, अस्पष्ट व धूसर असतील, तर मग अशा प्रवासाला काळाच्या संदर्भात अर्थपूर्ण मानता येत नाही.
- पण काही प्रवास मात्र ‘तसे’ असतात!
 
समजा मी तुम्हाला ‘हरिंदर सिंधू’ हे व्यक्तीचं नाव सांगितलं आणि तुमच्या कल्पनेने या अशा व्यक्तीची व्यक्तिरेखा पाच सहा ओळीत लिहायला सांगितली तर? मला कुणी हे नाव सांगितलं तर मी ही व्यक्ती शीख धर्मीय, पगडी घालणारी, मूळची पंजाबी, भांगडा नृत्य करणारी, पंजाबी भाषा बोलणारी, खाद्यसंस्कृतीत आनंद मानणारी पण कष्टाळू, मनमोकळी, पंजाबात शेती, इतरत्र व्यवसाय आणि अमेरिका-कॅनडात वास्तव्य असणारी अशी काहीशी व्यक्तिरेखा शब्दांकित करेन.
प्रत्यक्षात मात्र या नावाची व्यक्ती काल संध्याकाळीच मला भेटली. दिल्लीतील एका मोठय़ा हॉटेलात विदेश सचिवांनी दिल्लीस्थित इतर देशांच्या राजदूतांना आमंत्रित केले होते. माङया शेजारच्या खुर्चीवर साधारण पन्नाशीतलीे छोटय़ा केसांमधली पाश्चात्त्य कपडय़ातली गव्हाळ रंगाची स्त्री स्थानापन्न होती. मी माझा परिचय करून दिला. ती म्हणाली, ‘‘मी ऑस्ट्रेलियाची दिल्लीतील उच्चयुक्त हरिंदर सिंधू.’’ मी आनंदाने उद्गारलो, ‘‘भारतात तुमचं स्वागत असो.’’ हरिंदरचा प्रवास रोमांचक आहे. ती मूळची पंजाबची. ती म्हणजे तिचे आजोबा-आजी. 195क्च्या आसपास तिचे वडील सिंगापूरला गेले. तिथून हरिंदरच्या लहानपणी ते ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झाले. हरिंदरने अर्थशास्त्र व कायदा या विषयात शिक्षण घेतले आणि ऑस्ट्रेलियाच्या प्रशासकीय सेवेत प्रवेश करून सीरिया, रशिया इत्यादि देशांत सेवा बजावून प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयात सल्लागार म्हणून काम केलं. भारतीय चित्रपट व गाण्यांमुळे तिला हिंदी ब:यापैकी समजतं. ‘‘आणि कितपत बोलता येतं?’’ मान हलवत ती म्हणाली, ‘‘सध्या आमचे भारतीय कर्मचारी माझं हिंदी ठीक करतात. ‘मैं जाता हूँ’ म्हटलं की ‘मैं जाती हूॅँ’ म्हणायला लावतात.’’
हा संवाद सुरू असताना माझं मन एका समांतर विचारात गुंतलं होतं. ही हरिंदर भारतीय? सिंगापुरी? की ऑस्ट्रेलियन? बोलता बोलता आणखी एक गोष्ट बोलून गेली. तिच्यात मलेय-सिंगापुरी रक्तही आहे. शिवाय तिच्या नोकरीत मॉस्को व दमास्कसमध्येही तिचं वास्तव्य झालंय. 
तिच्या त्या प्रवासाचा वेध घेत मनातल्या नकाशावर टिंबं मारत गेलो. पंजाब-सिंगापूर-ऑस्ट्रेलिया-मॉस्को-दमास्कस-सिडनी-दिल्ली. मग ही सगळी टिंबं जोडली. तिच्या प्रवासाचा एक अनोखा नकाशा मला समोर दिसला.
रात्री झोपण्यापूर्वी मी तिचाच विचार करत असताना अमेरिकेतून फोन आला. माझा न्यूजर्सीतला मित्र आंचन होता.
‘‘उशिरा फोन केला, सॉरी. पण एक चांगली बातमी सांगायची होती. राहवलं नाही म्हणून फोन करतोय. संपूर्ण उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील सगळ्या भारतीयांमध्ये स्वत:चं व्यापारी जहाज असणारा मी आता पहिला भारतीय झालोय!’’ 
मग मी मनातल्या मनात आंचनच्या जीवनयात्रेचा नकाशा बनवायला घेतला. आंचनचं कुटुंब मूळचं मंगळूरचं. वडील सिंदीया शिपिंगमधल्या नोकरीच्या निमित्ताने मुंबईला आले. तिथं तो मराठी शाळेत शिकला. शाळेत मराठीत पहिला आला. मग त्याच्यातला समुद्रपक्षी त्याला सतावू लागला. त्याने एका जहाज कंपनीत नोकरी धरली. मग जगभर फिरला. न्यूजर्सीमध्ये स्वत:ची जहाज वाहतूक व इतर सेवांची कंपनी नोंदवली. जगभरातले अनेक सन्मान मिळाले. आता या मित्रने 6क्,क्क्क् टनांचं जहाज खरेदी केलंय आणि त्याला बायकोचं ‘नेहा’ हे नाव दिलं आहे.
 आंचनच्या प्रवासाचा नकाशा बनवला तर मंगळूर - मुंबई - इंग्लंड - कॅनडा - हाँगकाँग -सिंगापूर आणि जगातल्या सगळया समुद्रमार्गाचा उल्लेख करावा लागेल. नकाशावरचे बदलाचे बिंदू आणि नकाशातले सगळे बिंदू जोडून तयार होणारा प्रदेश यावरच एखाद्या व्यक्तीच्या कार्याची व्याप्ती व खोली समजायला मदत होते. थोडक्यात एखाद्या व्यक्तीच्या जीवनातल्या महत्त्वाच्या स्थानबिंदूंना जोडलं की त्या व्यक्तीच्या जीवनकार्यावर प्रकाश पाडता येतो. अर्थात हा निकष इतका साधा नाही. थोडं खोलात जाऊ या.
सुभाषचंद्र बोस. जन्म कटक (ओरिसा), शिक्षण कोलकाता, नंतर लंडनमध्ये आय.सी.एस.साठी, मग काँग्रेसच्या कामानिमित्त भारतभर, गुप्त वेशात अफगाणिस्तानमार्गे जर्मनी, तिथून मादागास्करमार्गे पूव्रेकडे जपानी पाणबुडीतून, त्यानंतर जपानसह पूव्रेच्या अनेक राष्ट्रांमध्ये (सिंगापूर, मलेशिया, ब्रrादेश, थायलंड) आणि शेवटी तैवानमध्ये मृत्यू. त्याआधी संपूर्ण युरोप पिंजून काढला आणि रशियालाही भेट दिली. अंदमानमध्ये सरकार स्थापन केलं. सुभाषचंद्रांच्या पदचिन्हांचा मागोवा घेतला तर आपोआप या माणसाच्या अपार कर्तृत्वाने मन प्रभावित झाल्याशिवाय राहवत नाही. त्यांनी भेट दिलेल्या स्थानबिंदूंना जोडलं तर लक्षात येतं या महापुरुषाने संपूर्ण जग ही आपली रंगभूमी मानली आणि अनेक प्रकारच्या भूमिका लिलया पार पाडल्या. इंग्रजी सत्तेला दहशत वाटावी अशी आणि गांधींसारख्या महामानवाला बुचकळ्यात पाडणारी अचाट ऊर्जा सुभाषचंद्रांकडे होती. गांधी -नेहरूंनाही आपल्या दीर्घ आयुष्यात जग असं पादाक्रांत करता आलं नाही.
आंबेडकर. त्यांच्या जीवनातले स्थानबिंदू जोडा आणि बघा केवढा चैतन्यमय नकाशा समोर येतो. महू, बडोदा, इंग्लंड, अमेरिका, भारतीय संविधान आणि दीक्षाभूमी. खडतर व न उल्लंघता येणारा एव्हरेस्ट जिंकणारा महामानव.
माणसाच्या जीवनप्रवासाचा नकाशा नेमका कशामुळे प्रभावी ठरतो याचा खुलासा आवश्यक आहे. माङो मित्र जोशीकाका सेवानिवृत्त झाल्यानंतर दरवर्षी जोशीकाकूंच्या बरोबर काही निवडक देशांना भेटी देतात. अमेरिकेतल्या आपल्या अपत्यांकडेही भारतात कडक उन्हाळा असताना दोन तीन महिने मुक्काम करतात. तिथे गेल्यानंतरही ही शहरं पाहा ती पाहा असं कुतूहल शमन केंद्र चालवतात. जोशी दांपत्याप्रमाणो आता तरुण पिढीतही जग पाहायला निघणा:यांची संख्या वाढते आहे. युरोप टूर, वर्ल्ड टूर, थायलंड, सिंगापूर अशा अनेक सहलींबरोबरच वाइल्ड लाइफ टूर, बीच टूर, अॅडव्हेंचर टूर अशा अनेक टुरटुरींवर जनता मोठय़ा प्रमाणात जाते. हे सारे अनुभव माणसाची दृष्टी विशाल व्हायला पूरक असतात. पण त्यामुळे जगाच्या किंवा देशाच्या नकाशावर पाऊलखुणा आपल्या उरतात का? या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर ‘नाही’ असं आहे.
पर्यटकांच्या किंवा व्यावसायिक वा नोकरीनिमित्त प्रवास करणा:यांच्या प्रवासाचा नकाशा स्थानबिंदू जोडून कुणालाही तयार करता येईल आणि मग शेकडो लोक जग जिंकल्याचा दावा करू शकतील. फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा ट्विटरवर छायाचित्र आणि इन्फ्रोग्राफिक्सच्या जोरावर किंवा जुन्या किल्ल्यांवर खडूने स्वत:चं नाव गिरवलं म्हणजे काळ प्रभावित होत नाही. काळाच्या वाळूवरती अशी पावलं काही क्षणात अस्पष्ट होत गायब होतात. त्या पावलांमध्ये अप्रतिम अद्वितीय असं काहीही नसतं. त्यामुळे नकाशा तयार केला आणि तो कितीतरी विशाल वाटला तरी स्थानबिंदू आणि रेषा दोन्ही अशक्त, अस्पष्ट व धूसर होतात की अशा प्रवासाला काळाच्या संदर्भात अर्थपूर्ण मानता येत नाही.
मग कोणत्या प्रवासांना सार्थक म्हणता येईल? स्थानबिंदू नेमके ठळक होण्यासाठी कोणती कसोटी असते? - त्याबद्दल पुढल्या लेखात!
 
(लेखक भारतीय परराष्ट्रसेवेतील 
वरिष्ठ अधिकारी आहेत.)

Web Title: Steps map

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.