स्टुडण्ट व्हिसा

By admin | Published: August 12, 2016 05:35 PM2016-08-12T17:35:24+5:302016-08-12T18:24:17+5:30

स्टुडण्ट व्हिसासाठीची मुलाखत देताना अमेरिकन वकिलातीचे अधिकारी कशासंबंधी प्रश्न विचारतात?

Student visa | स्टुडण्ट व्हिसा

स्टुडण्ट व्हिसा

Next

परदेश प्रवास आणि तोही अमेरिकेचा प्रवास मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येऊन बरेच दिवस लोटले. शिक्षणापासून पर्यटन आणि नोकरीपर्यंत अनेक कारणांनी अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्यांच्या मार्गातला प्रमुख प्रश्न म्हणजे अमेरिकेचे प्रवेशपत्र : व्हिसा!
- याबाबतीतल्या प्रश्नांचे निराकरण करणारा हा विशेष पाक्षिक स्तंभ मुंबईतील अमेरिकन वकिलातीच्या सहकार्याने!
स्टुडंट व्हिसा मुलाखतीच्या दरम्यान वकिलातीतील अधिकारी तीन ‘पी’चा अंदाज घेत असतात. प्रिपरेशन (तयारी), प्लॅनिंग (नियोजन) आणि पर्पज (हेतू). त्या आधारे अर्ज केलेला उमेदवार स्टुडंट व्हिसासाठी पात्र आहे की नाही हे ठरवले जाते.

प्रिपरेशन (तयारी) : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पार्श्वभूमी हे यातले महत्त्वाचे मुद्दे. त्या आधारे संबंधित विद्यार्थ्याची अमेरिकेतील उच्च शिक्षणासाठीची तयारी आजमावली जाते. पदवीचं शिक्षण घ्यायला अमेरिकेत जायचं असेल तर भारतातली बारावीची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण असणं, रअळ, ॠटअळ किंवा ॠफए पूर्वपरीक्षांची तयारी पाहिली जाते. अमेरिकेत घ्यायच्या शिक्षणाशी उमेदवाराच्या भारतीय शिक्षणाचा, व्यावसायिक पार्श्वभूमीचा संबंध काय, हेही उमेदवाराला नेमकेपणाने सांगता यायला हवे.

प्लॅनिंग (नियोजन) : अमेरिकेतल्या शिक्षणासाठीचा खर्च आणि इतर अनुषंगिक गोष्टींचे नियोजन नेमकेपणाने केले आहे का, याची खात्री वकिलातीतील अधिकारी करत असतात. कोणते कॉलेज, कोणते विद्यापीठ, त्यात नेमका कोणता कोर्स याची शोधाशोध करण्यात, त्यासाठीची साधने आणि इतर सुविधांची व्यवस्था करण्यात उमेदवाराने कालापव्यय करू नये ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट! त्यामुळे उमेदवाराने त्याबाबतचे नियोजन किती नेमके केले आहे, याची कसून चाचपणी होते. म्हणूनच स्टुडंट व्हिसासाठी मुलाखतीला जाताना उमेदवाराकडे परदेशातल्या शिक्षणाच्या नियोजनाचा सविस्तर आराखडा तयार असायला हवा. यासोबतच अधिकाऱ्यांना उमेदवाराकडून परदेशातल्या शिक्षणासाठी केलेल्या आर्थिक नियोजनाचीही सविस्तर माहिती हवी असते. 

पर्पज (उद्देश) : अमेरिकेतल्या उच्च शिक्षणाचा उपयोग भविष्यातील व्यावसायिक वाटचालीसाठी कसा करणार, याबाबतही उमेदवाराकडे स्पष्टता असली पाहिजे. स्वत:च्या व्यावसायिक भविष्याचा आराखडा उमेदवाराकडे आहे का, याची चाचपणी केली जाते. या शिक्षणातून उमेदवार नेमकी कोणती व्यावसायिक, व्यक्तिगत कौशल्ये विकसित करू इच्छितो, हेही वकिलातीतील अधिकाऱ्यांना समजून घ्यायचं असतं. प्रिपरेशन, प्लॅनिंग आणि पर्पज या तिन्ही मुद्द्यांबाबतच्या प्रश्नांना नेमकी आणि प्रामाणिक उत्तरे देण्याची क्षमता हेच अमेरिकन स्टुडण्ट व्हिसा प्राप्त करण्याचं एकमेव गमक आहे. त्या आधारेच वकिलातीतील अधिकारी तुमची क्षमता जोखत असतात.

अधिक माहितीसाठी वेबसाइट :

http://www.ustraveldocs.com/in

व्हिसासंबंधी प्रश्न पाठवण्यासाठी ईमेल :
support-india@ustraveldocs.com

Web Title: Student visa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.