भाषाभ्यास...अनास्था का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:59 PM2018-10-20T12:59:26+5:302018-10-20T13:03:44+5:30

मध्यंतरी एक चित्रपट आला होता हिचकी, त्यामध्ये हिचकी म्हणजे न आवडणारी न जमणारी एखादी गोष्ट ही प्रतीकात्मक संकल्पना छानच ...

study of language | भाषाभ्यास...अनास्था का?

भाषाभ्यास...अनास्था का?

Next

मध्यंतरी एक चित्रपट आला होता हिचकी, त्यामध्ये हिचकी म्हणजे न आवडणारी न जमणारी एखादी गोष्ट ही प्रतीकात्मक संकल्पना छानच रंगविली होती. तसेच खालच्या वगार्तील मुलांना अभ्यासात रस निर्माण करून कसे शिकवता येईल याच्या मनोरंजक क्लृप्त्याही दाखविल्या होत्या. त्यावेळी माझ्या मनात सहजच प्रश्न निर्माण झाला की यामध्ये केवळ गणित आणि विज्ञानच विषयांचा ऊहापोह कसा? बरोबरच आहे ‘जो बिकता है वो दिखाते है’ अहो! प्रत्येकच विद्यार्थी विज्ञान आणि गणितातच पुढे कसे बरे जाऊ शकतो? परवा एका विद्यार्थ्याला घेऊन पालक आले त्यांनी त्याचे शाळेतील घटक चाचणीचे गुण सांगितले तर त्याला भाषा आणि समाजशास्त्र यामध्ये जवळपास ५०% ते ६०% गुण होते पण गणित आणि विज्ञानात मात्र १०% ते २०% एवढेच गुण होते. तो विद्यार्थी शाळेत आणि शिकवणी वगार्ला नियमित जातो. त्याला या दोन्ही विषयात गती असेल तर त्याने अभ्यास केला नाही तरी त्याला १०% गुण मिळायला नको का? पण खरा गंभीर प्रश्न पुढेच आहे तो म्हणजे त्याच्या आईच्या मतानुसार त्याला विज्ञान शाखेतच प्रवेश घ्यायचा आहे. अक्षरश: आपण किती वेड्यासारखे गर्दीच्या मागे फिरणार आहोत. होमी भाभा ही विज्ञानाची प्रतिष्ठित परीक्षा देणाऱ्या विद्याथ्यार्ला रघुनाथ माशेलकर, विजय भटकर कोण आहेत हे ठाऊक नाही. मला तरी वाटते की गणित विज्ञान शिकविणाºया शिक्षकांचे, वाचनाचे पाठ न देणाºया शिक्षकांचे दुर्दैव म्हटले पाहिजे अजून काय? या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची स्थिती कस्तुरी मृगसाराखीच झाली आहे ‘तूज आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी.‘
जुलै महिन्यात जरा सगळ्या महाविद्यालयातील प्रवेशाचा विचार केला की कळते अरे दिल्लीचे स्कूल आॅफ इकोनोमिक्स ९८% एवढ्या गुणांवर प्रवेश बंद झाले. अमार्त्य सेनसारखे दिग्गज लोक तिथे शिकले. एखाद्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला भाषा खूप छान येतात, त्यांचे वाचन खूप चांगले आहे, त्यांचा भावनिक भाग चांगला आहे. अहो पण नाही ना! ते काहीही असू देत पालकांच्या दृष्टीने त्याच्यासाठी दोनच करिअर या दुनियेत आहे ते म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनिअर .....सॉरी सॉरी इंजिनिअर नाही आयआयटी! जगाच्या पाठीवर तिसरं करिअर नाही, हे केलं नाही तर भविष्य अंधकारमय होऊन जाईल असे त्यांना वाटते. हेच करायचं म्हणता म्हणता त्याचे पाचवी पासून क्लासेस वगैरे सुरु होतात, त्या क्लासला इयत्ता बारावीपर्यंत जात राहतात आणि ‘याचसाठी केला होतं अट्टाहास’ असा तो निकालाचा दिवस जेव्हा उजाडतो तेव्हा कळतं ‘अरे देवा एकच मुलगा झाला का हो सर क्लीअर.....आता काय?’ ....कोणीतरी सांगतात एवढे आठ वर्षे (पाचवी ते बारावी) गेलेच की अजून एक द्यायला काय हरकत आहे करू द्या की रिपीट! पुन्हा ये रे माज्या मागल्या.....
आता याचा अजून एक गंभीर परिणाम आपल्याला भोगावा लागतो आहे, आयआयटी आपले काम नाही हे जेव्हा कळतंय तेव्हा आता ती संख्या रोडावते आहे मग चला आता मेडिकल करू कारण त्यामध्ये परिश्रमाने गुण मिळवता येतात म्हणजे हे असंच झालं की या सिनेमाचं तिकीट मिळालं नाही तर दुसरा बघू. शिवाय ते जुनिअर कॉलेजवाले त्यांच्या इथे इलेक्ट्रोनिक्स नाही म्हणून आपल्या मुलांना जनरल घ्यायला सांगतात. अकरावीतल्या विद्यार्थ्यांचे वय काय....त्यांच्या आजूबाजूचे वातावरण काय? सतत मोबाईलमध्ये डोकं खुपसलेला तो मुलगा पीसीएमबीशिवाय मराठी आणि इंग्रजी एवढ्या विषयांचा अभ्यास कसा करेल? त्यावर एक खूप छान स्पष्टीकरण असते ते म्हणजे नीट देणाºयांना फिजिक्समध्ये गणिताची मदत लागते. ठीक आहे! मग त्याला गणित शिकू द्या त्यासाठी गणित घेण्याची गरज काय? बरं मग पीसीएमवाल्यांनी जीवशास्त्र कशासाठी शिकायचं तर मग समजा त्याला जेइइ जमलं नाही तर असो..असा सारा खेळखंडोबा .
प्रत्येक मुल हे वेगळ आहे, त्याच्यामध्ये काहीतरी कमी अधिक आहे, हे शिक्षकाला पालकांना एकदा का कळल ना की त्या अधिक काहीतरीला फुंकर घाला आणि मग बघा विस्तव कसा मस्त पेट घेतो ते! त्याला बारावी विज्ञान किंवा नीट आणि जेईई जमलं नाही की मग आपण फर्गुसन महाविद्यालयाचा विचार करतोच की! मग आधीच इंग्रजी साहित्याचा अकरावीपासून अभ्यास त्याला करू द्या. इयत्ता दहावीत एक प्रतिष्ठित परीक्षा आहे. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा किती पालक आणि शिक्षक त्या परीक्षेची तयारी इयत्ता पाचवीपासून आपल्या मुलांकडून करून घेतात. त्याचे प्रमाण फार कमी आहे. त्याची तयारी पाचवीपासून करून घेतली तर शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र क्रांती होईल. काही शिक्षक तर मुलांना हेसुद्धा सांगतात ‘काय कामाची ती भाषा, समाजशास्त्र पासिंग गुण मिळाले तरी ठीक आहे. दहावी नंतर तुम्हाला बहुपर्यायी प्रश्नच येणार आहेत. ‘विद्यार्थी त्याने आळशी होतो. आठवीपासून त्याला दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरे लिहिणे कंटाळवाणे वाटते. तो बहुपर्यायी परीक्षेत बर्याचदा अंदाज बांधतो आणि ठोकतो उत्तर. एक शिक्षक म्हणून मी त्यांना मार्क्सवादी बनवतो आहे. विषयावर आंतरिक प्रेम करायला शिकवले पाहिजे.
आपण मुलांचा भावनिक मेंदू आपण चालूच दिला नाही.. हे माहित आहे का आपणास? अच्युत गोडबोले आयआयटी झाले पण भाषेच्या कृपेने उत्तम साहित्य लिहिले ना त्यांनी! समाजात डॉक्टर, इंजिनिअर म्हणून नाव कमवायचे आणि समाज शास्त्रच ठाऊक नाही? हे कधी कळणार. भाषा आणि समाजशास्त्र यासारख्या विषयाची आपल्याला हिचकी येत कामा नये. आपल्या पाल्याला, आपल्या विद्यार्थ्यांना ‘विषय कोणताही असू देत, त्यावर आंतरिक प्रेम कर. ज्यात आनंद मिळतो ती शक्ती, तो विषय ओळख’ ही शिकवण देण्याची गरज आहे.
आठ समंदर अपना अम्बर
खोज ले अब तू अपने दम पर
फूँक मारके धूल झाड़ ले
छोड़ छाड़ के सारे छप्पर
खोल दे पर रटी रटाई सारी
छोडो भी दुनियादारी
बाघी तेवर जो तेरे बोलेंगे सब अनारी
सबको मनाने की तेरी नहीं जिÞम्मेदारी
ऊँचे आसमानो पे लिख दे तू हिस्सेदारी!

- सीमा बक्षी

Web Title: study of language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.