स्वाभिमानी ‘म्हातारे’!

By admin | Published: October 31, 2015 02:23 PM2015-10-31T14:23:11+5:302015-10-31T14:23:11+5:30

इथे सर्व काही उपलब्ध आहे. तुम्हाला ऐनवेळी मनुष्यबळ हवंय, माणसं सेवेला तत्पर आहेत. आर्थिक कुवत नाही, तुमचा प्रापंचिक खर्च परस्पर भागवला जाईल. आरोग्याचा प्रश्न आहे, विविध तपासण्या फुकट केल्या जातील. अगदीच इमर्जन्सी आहे, गळ्यातलं लॉकेट दाबा, दोन मिनिटांत अॅम्ब्युलन्स दारात हजर! एवढय़ा सा:या सुविधा, पण तरीही ‘नाइलाज’ तेव्हाच लोक त्यांचा वापर करतात!

Swabhimani 'Old'! | स्वाभिमानी ‘म्हातारे’!

स्वाभिमानी ‘म्हातारे’!

Next
>- दिलीप वि. चित्रे
 
सन सिटी सेंटर’ : वयोमर्यादेचं बंधन असलेली, खास ज्येष्ठ नागरिकांसाठी निर्माण केलेली ही वसाहत. मागे-पुढे चहूबाजूंनी जागा असलेली स्वतंत्र घरं, मधे कॉमन भिंत असलेली जोडघरं, दुमजली- तिमजली टाऊन हाऊसेस, अपार्टमेण्ट बिल्डिंग्ज अशा त:हेची विविध घरं, स्वतंत्र हॉस्पिटल, नर्सिग होम्स, दुतर्फा पाल्मची झाडं लावून सुशोभित केलेले रस्ते, गॉल्फ कार्ट्ससाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खास लेन्स. शॉपिंग सेंटर्समधून गॉल्फ कार्ट पार्किगसाठी स्वतंत्र जागांची सोय, कम्प्युटरपासृून शिवणकामार्पयत आणि डान्सपासून सुतारकामार्पयत विविध प्रकारच्या प्रवृत्तीचे क्लब्स. प्रत्येकाच्या आवडीचं काहीतरी असणारच ना? कंटाळा येणार कसा? आणि आला तर तो दोष कोणाचा?
आता आम्ही इथे जेव्हा ‘क्लब’ हा शब्द वापरतो तो काही फक्त करमणुकीच्या प्रवृत्तीचे अथवा साधनांचे क्लब्स यांनाच अनुलक्षून असतो असं नाही, तर स्वयंसेवी वृत्तीच्या रहिवाशांनी लोकांच्या मदतीसाठी स्वत:च निर्माण केलेल्या सुविधांचे क्लब्स! यात इन्कमटॅक्स फॉर्म्स भरण्याची मदत करण्यापासून ते अल्झायमर्सचा विकार असणा:या वृद्धांना औषधं आणून देणं, त्यासाठी ग्रोसरी शॉपिंग करणं, वृद्धावस्थेमुळे ड्रायव्हिंग करू न शकणा:या रहिवाशांना इच्छितस्थळी नेणं, पोचवणं, आणणं ही अत्यंत महत्त्वाची कामंही आनंदानं, कुठल्याही तक्रारीविना स्वेच्छेनं केली जातात.
खंत एकाच गोष्टीची, की अशा मदतीची आवश्यकता असूनही स्वाभिमानी वृत्तीच्या लोकांकडून ही मदत नाकारण्यात येते. आयुष्यभर कष्टाचं आणि परिपूर्णतेचं जिणं जगलेल्यांना अशी मदत स्वीकारण्यात कमीपणा वाटला तर त्यात गैर काहीच नाही.
आता कशा प्रकारच्या मदतीची किंवा साहायाची वृद्धांना आवश्यकता असते? इथल्या स्वयंसेवकांनी अशा गोष्टींची एक यादीच केली आहे. मायाळू वृत्तीचे स्वयंसेवक गरजूंना कुठल्याही प्रकारची मदत करायला सदैव तत्पर असतात. मदत मागायला कचरू नका, कमीपणा वाटू देऊ नका, लगेच ती मदत करण्यासाठीच आम्ही आहोत; असं आश्वासन या स्वयंसेवकांकडून रहिवाशांना मिळालेलं असतं. आर्थिक दुर्बलतेमुळे काहींना ‘कम्युनिटी असोसिएशन’च्या सभासदत्वाचे पैसे भरणं शक्य नसतं. अशांसाठी ‘हार्डशिप फंड’ नावाच्या निधीची निर्मिती झाली आहे. ‘मेरी पेट्रो’ नावाच्या स्त्रीने स्वत:च्या मृत्यूपूर्वी मृत्युपत्रत ‘सनसिटी सेंटर’च्या गरजू रहिवाशांसाठी, त्यांच्या औषधपाणी, अन्न-वस्त्र-निवारा या गरजांसाठी भरपूर रक्कम राखून ठेवली. तूर्तास जवळ जवळ दोनशे गरजू कुटुंबांना या रकमेतून मदत पुरवली जाते. ही दोनशे कुटुंबे म्हणजे सन सिटी सेंटरच्या एकंदर कुटुंबसंख्येच्या फक्त एक टक्का आहेत.
असोसिएशनला मिळणा:या रहिवाशांच्या वार्षिक देणग्यांमधून ‘इमजर्न्सी मेडिकल सव्र्हिस’चा सर्व खर्च भागवला जातो. रक्तदाबाच्या चाचण्या फुकट केल्या जातात. इमर्जन्सी स्क्वाडच्या चार अॅम्ब्युलन्स गाडय़ा सर्व मेडिकल उपकरणांसह सिद्ध असलेल्या अशा आहेत. त्यातील तीन गाडय़ांमध्ये ‘व्हील चेअर’ चढण्या- उतरण्याची सोय आहे.
अतिवृद्धांना गळ्यात घालायला एक लॉकेट दिले जाते. त्याला ‘मेडिकल अलर्ट इक्विपमेंट’ म्हणतात. सन सिटी सेंटरच्या ‘मेन्स क्लब’द्वारे ही ‘लाइफलाइन सव्र्हिस’ पुरवण्यात येते. इमजर्न्सीच्या वेळी ते लॉकेट गळ्यात घातलेल्या व्यक्तीने जर दाबले तर ताबडतोब मेसेज अॅम्ब्युलन्सला जातो व 2-3 मिनिटांच्या आत तुमच्या दारात अॅम्ब्युलन्स व मेडिकल हेल्थ हजर होते. ही सुविधा इथल्या रहिवाशांना असोसिएशनतर्फे अत्यंत स्वस्त दरात पुरवण्यात येते.
अशा उपलब्ध असणा:या कित्येक गोष्टींची, सोयींची यादी करायचं म्हटलं तर ती न संपणारी आहे.
‘सन सिटी सेंटर’च्या टेलिफोन डिरेक्टरीमध्ये अशा अनेक संस्था, मदतीसाठी तत्पर असणारे क्लब्स, त्यांचे चेअरमन, स्वयंसेवक अशांची भलीमोठी यादीच त्यांच्या टेलिफोन नंबर्ससह दिलेली आहे. इथल्या विविध चर्चेसमधूनसुद्धा कशात:हेची मदत उपलब्ध आहे याची माहिती दिलेली आहे.
डोरिस रॅगलॅण्ड नावाच्या अजून कार्यरत असलेल्या 95 वर्षाच्या महिलेनं 197क् साली ‘परोपकारी सेवा’ दलाची स्थापना केली. त्या कामात ती स्वत: आजही मग्न असून, सर्व कामाचं सूत्रसंचालन तिनं अजून स्वत:कडे साभांळलं आहे. सन सिटीच्या बाहेर, दूर असलेल्या डॉक्टर्स, हॉस्पिटल्समध्ये ने-आण करणं (मील्स ऑन व्हील्स)  (मी तयार केलेली मराठी संज्ञा म्हणजे ‘खाली चाक - वर स्वयंपाक’) या अन्न पुरवणा:या कार्याशी - संस्थेशी संबंधित राहून, सहभागी होऊन मदत करणं, विमेन्स क्लबद्वारा गरजूंना संबंधित राहून, सहभागी होऊन मदत करणं, विमेन्स क्लबद्वारा गरजूंना संध्याकाळचे जेवणं पुरवणं, अल्झायमर्सचे रुग्ण किंवा अन्य पेशंट्सची सेवा करणारे स्वयंसेवक यांच्या दैनंदिन कष्टातून तास- दोन तास तरी त्यांची सुटका करणं अशा अनेक प्रवृत्ती या परोपकारी कार्यातून साधल्या जातात.
‘सन सिटी सेंटर’ मधल्या विविध कार्याचे सूत्रसंचालन आणि नि:स्वार्थी वृत्तीनं ती कामं करणारे स्वयंसेवक. संस्था पाहणो, त्यांना भेटणो, त्यांच्याशी चर्चा करणो हा सगळाच एक नतमस्तक करायला लावणारा, आत्मपरीक्षणाची गरज निर्माण करणारा अनुभव आहे असं मला वाटतं.
 
(दीर्घकाळ अमेरिकेत वास्तव्याला असणारे ज्येष्ठ मराठी लेखक. ‘कुंपणापलीकडले शेत’ हा कथासंग्रह,  ‘अलिबाबाची हीच गुहा’ या सांगितिकेसह विदेशातील अनेक मराठी उपक्रम/संस्थांचे संपादक, 
संयोजक, संघटक)
 
dilip_chitre@hotmail.com

Web Title: Swabhimani 'Old'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.