टॅक्सी!
By admin | Published: October 17, 2015 03:04 PM2015-10-17T15:04:36+5:302015-10-17T15:04:36+5:30
‘बंदिवासा’त असतानाही जाफर पनाहीने चित्रपट बनवले आणि सिनेमाला प्रेमपत्रही लिहिलं. त्याचं नाव. टॅक्सी
Next
>अशोक राणो
तुम्ही फिल्ममेकर आहात आणि तुम्हाला आदेश देण्यात आलाय की तुम्ही इथून पुढे फिल्म्सच बनवायच्या नाहीत काय कराल तुम्ही?
जाफर पनाहीने यावर उपाय शोधला. तो टॅक्सी ड्रायव्हर बनला.. त्याने फिल्म केली. तिचं नाव टॅक्सी! एखाद्या सिनेमावर लिहिताना त्याची थोडीफार कथा सांगावीच लागते. परंतु ‘टॅक्सी’च्या कथेपेक्षा तिच्या निर्मितीची कथाच रसभरीत आहे. विलक्षण सूर आणि चमत्कारिक. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय प्रेरणादायक. इराणीयन नवसिनेमाचा एक प्रणोता, जगप्रसिद्ध प्रतिभाशाली दिग्दर्शक जाफर पनाहीवर साक्षात इराणीयन सरकारनेच अशी बंदी घातली. वीस वर्षे त्याने सिनेमा करायचा नाही. दुस:यांसाठीही पटकथा लिहायची नाही. तीन वर्षापूर्वी ही बंदी जारी करण्यात आली तेव्हा जाफर पनाहीने नुकतीच पन्नाशी ओलांडली होती. म्हणजे तो सत्तर वर्षाचा होईतो त्याने चित्रपट करायचे नाहीत. परंतु या बंदीला गनिमीकाव्याने धुडकावत त्याने गेल्या तीन वर्षात तीन सिनेमे केलेसुद्धा! आणि अजूनही तो बंदीवासातच आहे. सहा वर्षे त्याला इराणच्या बाहेर पडता येणार नाही. दोनच कारणांनी अपवाद होऊ शकेल. एक मेडिकल ट्रिटमेंट आणि दुसरं हज यात्र! इराणच्या बाहेर पडण्यासाठी त्याला या दोन्ही कारणांची अजून तरी गरज पडलेली नाही आणि तो इराणच्या बाहेर पडलाही. त्याचे हे तीनही सिनेमे जगाची सैर करताहेत. त्याअर्थाने जाफर पनाही बंदिवासात राहूनही जगभर हिंडतोय.
बर्लिनच्या यंदाच्या महोत्सवात ‘टॅक्सी’चा वर्ल्ड प्रीमियर झाला. त्याला सवरेत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. तो स्वीकारण्यासाठी त्याला येता यावं म्हणून महोत्सवाच्या संचालकांनी इराण सरकारला तशी विनंती केली आणि अर्थातच त्यांनी ती धुडकावली. याच चित्रपटात त्याच्या बरोबर भूमिका करणा:या त्याच्या भाचीने - हना सैदीने तो स्वीकारला. या यशाबद्दल इराण सरकारच्या ‘टॅक्सी’ला पुरस्कार देऊन महोत्सव इराणविषयी गैरसमज पसरवतंय असंही फटकारलं. पुरस्कार जाहीर होताच पनाहीची प्रतिक्रिया मात्र विलक्षण स्फूर्तिदायक होती. तो म्हणाला,
मला चित्रपट बनविण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. कारण जेवढं मला कोणी कोंडीत पकडत बाहेरचं जग पाहू देणार नाही, तेवढी मला माङया आत पाहायची संधी अधिक मिळेल आणि माङया या अवकाशात माङया सजर्नशीलतेला अधिक धुमारे फुटतील.
आणि याचा प्रत्यय ‘टॅक्सी’ आणि त्याआधीचे ‘धीस इज नॉट फिल्म’ आणि ‘क्लोज्ड कर्टन्स’ पुरेपूर देतात.
पहिले दोन चित्रपट त्याने अतिशय गुप्तता पाळत नजरकैदेत असलेल्या आपल्या घरात आणि शेजारच्या घरात केले, तर ‘टॅक्सी’साठी तो स्वत:च टॅक्सी ड्रायव्हर बनला आणि सबंध चित्रपटभर टॅक्सी चालवीत जवळपास संपूर्ण तेहरान फिरला. ‘धीस इज नॉट अ फिल्म’ अवघ्या दोन लाख रुपयांत साध्या डिजिटल कॅमे:याने आणि आय फोनने त्याने केला. मोजताबा मिर्तमास्ब या आपल्या दिग्दर्शक मित्रच्या मदतीने केलेल्या या चित्रपटात प्रमुख भूमिकेत स्वत: पनाही आहे. नजरकैदेतल्या घरात बसून तो कुणाकुणाशी त्याच्या कोर्ट केसविषयी फोनवर बोलतोय, शेजा:यांशी बोलतोय, टीव्हीवरच्या बातम्या पाहतोय, आपल्या जुन्या सिनेमांबद्दल बोलतोय, अटक व्हायच्या आधी करायला घेतलेल्या चित्रपटांच्या शूटिंगबद्दल बोलतोय. काही सिनेमातील विशिष्ट दृश्यांबद्दल बोलताना लहानपणी तो चोरून सिनेमा पाहून आल्यानंतर आपल्या बहिणींना त्याबद्दल जसं सांगायचा ती सारी उत्कटता, असोशी त्याच्यात आहे. या चित्रपटात हे सारं आहे. त्यामुळे ‘डॉक्युमेंटरी फीचर’ असं या चित्रपटाचं स्वरूप आहे. 2क्11 च्या कान महोत्सवाला अवघे दहा दिवस राहिले असताना ‘धीस इज नॉट अ फिल्म’ अचानक तिथे प्रकटला. यूएसबीत ही फिल्म लोड करून केकमध्ये लपवून ती इराणच्या बाहेर काढण्यात आली आणि कानर्पयत आणि मग इतरत्रही नेण्यात आली. ऑस्करसाठी सवरेत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचरसाठी तिला नामांकन लाभलं होतं.
कंबोङिाआ पार्तोवी याच्यासह दिग्दर्शित केलेल्या ‘क्लोज्ड कर्टन्स’ (परदे) ला 2क्13 च्या बर्लिन महोत्सवात सवरेत्कृष्ट चित्रपटाचा रौप्य पुरस्कार लाभला होता. त्यात हे दोघे दिग्दर्शक आणि युनिटच्या लोकांनीच वेगवेगळ्या भूमिका केल्या होत्या. पोलीस ज्यांच्या शोधात आहेत असे दोन तथाकथित गुन्हेगार कॅस्पियन समुद्राच्या किना:यावरील एका घरात लपून बसतात आणि पोलिसांच्या नजरेस पडू नये म्हणून कायम पडदे पाडून ठेवतात आणि आपापल्या करायच्या गोष्टी करत राहतात अशी उपहासात्मक कथा होती.
बर्लिनला पुरस्कार मिळाल्यानंतर जाफर पनाहीने इराण सरकारला विनंती केली ‘टॅक्सी’ देशात प्रदर्शित करण्यास परवानगी देण्यात यावी. ती मान्य झाली नाही. परंतु हा चित्रपट केवळ आंतरराष्ट्रीय महोत्सवातच नाही तर जगात जिथे जिथे प्रदर्शित झाला तिथे तुफान गर्दी खेचतोय. एकटय़ा इटलीत अवघ्या तीन आठवडय़ात त्याने सहा लाख डॉलरचा व्यवसाय केला. ऑस्ट्रियात लाखभर मिळविले. हा लेख लिहितो त्याने विविध देशांत मिळून दहा लाख डॉलरच्या वर कमाई केली. आणि त्याचा निर्मिती खर्च अक्षरश: किरकोळ म्हणावा असा होता. तो कसा ते पुढे येईलच. मी बर्लिनला होतो. मी कानला होतो. परंतु दोन्ही ठिकाणी खूप प्रयत्न करूनही ही ‘टॅक्सी’ मला पकडता आली नाही, ती मी परवा टोरांटो महोत्सवात गाठली. महोत्सवात आम्ही इतके सारे चित्रपट केवढी तरी धावपळ करून पाहतो आणि तरीही एखादा राहतो. थोडीशी हळहळ वाटते. परंतु मला एक गोष्ट पक्केपणाने माहीत आहे आणि ती म्हणजे. देअर इज ऑलवेज अ नेक्स्ट टाइम..!
तेहरानच्या रस्त्यावरून जाणारी टॅक्सी दिसते. ड्रायव्हर असतो दस्तुरखद्द जाफर पनाही! टॅक्सी ड्रायव्हर म्हणून तो सराईत नाही हे प्रथमदर्शनीच कळतं. कारण तो ‘आपण नीट रस्ते माहीत नाही म्हणून कावतात. सत्तरीची आई आणि तिची चाळिशीची लेक हातात एक भलंमोठं काचेचं पात्र घेऊन येतात. त्यात गोल्ड फिशची जोडी आहे आणि त्यांना दूर कुठेतरी असलेल्या तळ्यात सोडायचं आहे. नवख्या टॅक्सी ड्रायव्हरने अचानक ब्रेक दाबल्यामुळे कोचे पात्र फुटतं. टॅक्सीत पाणी आणि तडफडणारे मासे. गाडी मध्येच थांबवून ड्रायव्हर एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ते मासे टाकून मायलेकींकडे देतो. कारण दोघी त्याला नकोजीव करून टाकतात. दुसरी एक टॅक्सी थांबवून तो दोघींना त्यात बसवून स्वत:ची सुटका करून घेतो. नंतर कधीतरी एक तरुण स्त्री आणि पुरुष टॅक्सीत येतात. ती आधुनिक विचारांच, तो पारंपरिक. त्याच्या नजरेस टॅक्सीत पुढे बसवलेला कॅमेरा दिसतो. तो त्याबद्दल विचारतो. ड्रायव्हर म्हणतो, तो माङया सुरक्षिततेसाठी आहे. ही फिल्म शूट करण्यासाठी जागोजागी लावलेल्या कॅमे:यांपैकी एक कॅमेरा आपल्याला दिसतो. ती स्त्री म्हणते, कुणी जन्माने चोर, गुन्हेगार असत नाही. त्या पुरुषाचं एकच मत गुन्हेगाराला जबर शासन व्हायलाच पाहिजे. देहांत शासन हवं की नको यावर दोघांत घनघोर चर्चा होते. ही दोघं गेल्यावर वाटेत एक तरुण स्त्री रडारड करीत, हातवारे करीत ही टॅक्सी थांबवते. दोघं मिळून रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या तिच्या नव:याला टॅक्सीत घालतात. लवकरात लवकर टॅक्सी हॉस्पिटलला ने असं ती बजावते, तर तिचा नवरा आपला मोबाइल ड्रायव्हरच्या हाती देत आपली शेवटची इच्छा रेकॉर्ड करायला सांगतो. गाडी चालवत हा रेकॉडिंग करतो. त्याची इच्छा असते की याचं काही बरंवाईट झालं तर त्याची सारी मालमत्ता बायकोला मिळावी. त्याच्या भावांना छदाम मिळता कामा नये. हॉस्पिटल येताच घाईघाईत स्ट्रेचरवरून त्याला नेलं जातं. टॅक्सी निघते. आता ड्रायव्हर आपल्या भाचीला शाळेतून घेतो. ती म्हणते तिला शाळेचा प्रोजेक्ट म्हणून फिल्म करायची आहे आणि आपल्या या जगप्रसिद्ध दिग्दर्शक काकाने मदत करावी. ‘फिल्ममेकिंग म्हणजे काय’ हे शिकविताना तिला सांगितलं गेलंय की, तुमच्या सिनेमात सरकारचा रोष होईल असं काही असता कामा नये आणि ती सर्व थरातल्या प्रेक्षकांना पाहता येईल अशी असावी. एवढय़ात पनाहीच्या लक्षात येतं की त्या जखमी माणसाची इच्छा रेकॉर्ड केलेला मोबाइल गाडीतच आहे. तो गाडी पुन्हा हॉस्पिटलकडे घेतो. तिथे अस्वस्थपणो फिरणारी ती बाई दिसते. हा मोबाइल देतो. तिचा जीव भांडय़ात पडतो. कशासाठी. ? पनाही तो प्रश्न सोबत घेऊन पुढे निघतो. त्याच्या टॅक्सीत मग एक व्हिडीओ लायब्ररी चालवणारा माणूस येतो. त्याला घरोघर कॅसेट नेऊन द्यायच्या असतात. तो अर्थातच पनाहीला ओळखतो आणि एका जगप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या डोळ्यादेखत पायरेटेड कॅसेट त्याच्या ग्राहकांना देतो म्हणून ओशाळतो. त्या अपराधी भावनेतून पनाहीला वुडी अॅलनच्या नव्याको:या कॅसेट देण्याचं मान्य करतो.
असे एकामागून एक येणारे पॅसेंजर आणि त्यांचं मोकळेपणाने व्यक्त होणं आणि त्या सा:या प्रवासात दिसत राहणारं तेहरान शहर यातून इराणचं सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक-पर्यावरण दिसत राहतात. थेटपणो भाष्य कुठेच येत नाही परंतु ते होतच राहतं.
मी जाफर पनाहीला 2क्क् साली माँट्रियल चित्रपट महोत्सवात कैरोच्या माङया एका समीक्षक मित्रसह भेटलो होतो. तेव्हा मी त्याला विचारलं होतं की तुङया चित्रपटांवर सत्ताधा:यांची एवढी करडी नर का असते तेव्हा मिस्किलसं हसत तो म्हणाला होता.
मलाही कळत नाही. खरं तर मला जे दिसतं तेच मी माङया चित्रपटातून मांडतो. त्याच्या त्या मिस्किल प्रतिक्रियेचा अर्थ ‘टॅक्सी’ पाहताना स्पष्टपणो जाणवतो. सरकारची बंदी आपल्या गनिमी काव्याने धुडकावत जाफर पनाही जेव्हा ‘धीस इज नॉट अ फिल्म’, द क्लोज्ड कर्टन्स’ आणि ‘टॅक्सी’ सारखे चित्रपट बनवतो तेव्हा तो केवळ त्याची सिनेमा या कलम माध्यमावरची निष्ठाच व्यक्त करीत नाही, तर चित्रपटाचा एक नवाच प्रकार जन्माला घालून ते माध्यम समृद्ध करतो. बर्लिन महोत्सवात सवरेत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ज्या ज्युरींनी दिला त्या ज्युरीचे अध्यक्ष दारेन अॅरोनोस्फी यांनी फार सुंदर शब्दात ‘टॅक्सी’चं, जाफर पनाहीचं आणि माध्यम निष्ठेचं नेमकं वर्णन केलंय. ते म्हणतात,
‘‘हा चित्रपट म्हणजे जाफर पनाहीने सिनेमाला लिहिलेलं प्रेमपत्र आहे. ज्यात त्याचं कला माध्यमाविषयीचं, त्याच्या समाजाविषयीचं, त्याच्या देशाविषयीचं आणि त्याच्या प्रेक्षकांविषयीचं प्रेम आहे.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)
ashma1895@gmail.com