हिमाचलमधील टॅक्सी माफिया

By admin | Published: July 1, 2016 06:14 PM2016-07-01T18:14:52+5:302016-07-01T18:14:52+5:30

वर्षाचा कुठलाही काळ असो, हिमाचलात कायमच पर्यटकांचा सुकाळ. त्यातही रोहतांग पास फारच लोकप्रिय. त्यामुळेच टॅक्सी माफियांची तिथे कायमच मनमानी, पण हरित लवादाच्या एका निर्णयानंतर त्यांना मोकळे रानच मिळाले आहे

Taxi Mafia in Himachal | हिमाचलमधील टॅक्सी माफिया

हिमाचलमधील टॅक्सी माफिया

Next
>राहुल रनाळकर
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत शहर संपादक आहेत.)
 
वर्षाचा कुठलाही काळ असो, हिमाचलात कायमच पर्यटकांचा सुकाळ. त्यातही रोहतांग पास फारच लोकप्रिय. त्यामुळेच टॅक्सी माफियांची तिथे कायमच मनमानी, पण हरित लवादाच्या एका निर्णयानंतर त्यांना मोकळे रानच मिळाले आहे. सरकारी भाडे पाचशे रुपये, पण टॅक्सीचालक आकारतात पाच हजार रुपये!  ऑनलाइन परमिट, कागदपत्रंची जुळवाजुळव, ऑनलाइन पेमेंट करूनही रोहतांग पासला जाता येईल याची कोणतीच शाश्वती नाही.
 
हिमाचल प्रदेश हे राज्य पर्यटकांची गेल्या काही वर्षात पहिली पसंत ठरत आहे. दरवर्षी महाराष्ट्र, गुजरातसह दक्षिण भारतातील पर्यटक हजारोंच्या संख्येने हिमाचलमध्ये दाखल होतात. दहा दिवस राहिलात तरी पाहून होणार नाहीत, एवढी ठिकाणे हिमाचलमध्ये आहेत. हजारोंच्या संख्येने येणा-या या पर्यटकांची मात्र अनेकदा लूट होताना दिसते. यात सगळ्यात आघाडीवर कोणी असतील तर ते आहेत टॅक्सी ऑपरेटर्स. किंबहुना या ऑपरेटर्सचे आता गब्बर टॅक्सी माफिया बनले आहेत..
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या हिमाचलमधील टॅक्सी माफिया तसे जुनेच. पण अलीकडेच राष्ट्रीय हरित लवादाच्या एका निर्णयानंतर तर त्यांना मोकळे रानच मिळाले आहे. नेमका राष्ट्रीय हरित लवादाने असा कोणता निर्णय दिला आणि या टॅक्सी माफियांचा सुळसुळाट सुरू झाला, हे समजावून घेणो गरजेचे आहे. 
हिमाचलमध्ये गेलात आणि रोहतांग पासला गेला नाहीत, तर तुम्ही काहीच पाहिलं नाही, असं सर्वसाधारणपणो मानलं जातं. त्यामुळे शिमला, कुलू, मनाली येथे जाणारे बहुतांश सर्वच पर्यटक रोहतांग पासला हमखास जातात. वर्षभर या परिसराकडे पर्यटकांचा ओढा असतो. खासकरून मे-जून-जुलै आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हजारो पर्यटक हिमाचलकडे मोर्चा वळवतात. भर उन्हाळ्यातही रोहतांगचे दिवसाचे तपमान 3 ते 4 अंश आणि रात्रीचे तपमान उणो 4 ते 5 अंश सेल्सियस असते, तर इतर वेळी आल्हाददायी. त्यामुळे पर्यटकांची कायमच इथे पसंती असते. त्यात पर्यटनाच्या दृष्टीने काश्मीरचे कमी झालेले महत्त्व हिमाचलसाठी पूरक ठरले आहे. पर्यटकांसाठी हिमाचल म्हणजे सर्वात हवेहवेसे ठिकाण. त्यात राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या एका निर्णयानुसार रोहतांगला सर्व साहसी खेळांसह वाहनांना बंदी घालण्यात आली. या निर्णयानुसार कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक उपक्रमांना रोहतांग कायमचे बंद झाले. तथापि, हिमाचल प्रदेश सरकारने अपिलात जाऊन काही गोष्टींची सूट मिळवून घेतली. त्यानुसार रोहतांगचा साहसी खेळांचा मार्ग सुकर झाला. 6 एप्रिलर्पयत गुलाबा बॅरिअर्पयत वाहनांना परवानगी देण्यात आली. पण पर्यटनासाठी येणा:या वाहनांवर मोठय़ा प्रमाणात र्निबध आणण्यात आले. राष्ट्रीय हरित लवादाच्या ताज्या निर्णयानुसार सध्या 8क्क् पेट्रोल आणि 4क्क् डिङोल गाडय़ांना रोहतांगर्पयत परमिट देण्याचे मान्य करण्यात आले. पण हे परमिट ऑनलाइन देण्याचे सरकारने जाहीर केले आणि मोठीच गडबड झाली. 
म्हणजे ज्याप्रमाणे रेल्वेची तत्काळ तिकिटे सकाळी 10 वाजता काढणं सुरू होतं, तसंच परमिट देणं सुरू झालं. हे परमिट खुलं होण्याची वेळ रात्री 12 वाजता! म्हणजे तत्काळच्या तिकिटासाठी जशा इंटरनेटवर उडय़ा पडतात आणि अनेकदा संकेतस्थळ हँग होते, तशी स्थिती या ऑनलाइन परमिटची सुरुवातीच्याच काही दिवसांत झाली. बरं, एवढय़ावर हे प्रकरण संपत नाही. मनालीच्या मॉल रोड या मध्यवर्ती भागात असलेल्या स्टँडबाहेर जेवढे टूर ऑपरेटर आहेत, ते सगळेच रात्री 12 पूर्वी ऑनलाइन सज्ज होऊ लागले. एकदा का 12 चा ठोका पडला की त्यांची ऑनलाइन फॉर्म भरण्याची लगबग सुरू होते. त्यात अवघ्या काही मिनिटांत परमिट कोटा संपतो किंवा संकेतस्थळ तरी हॅक होते. जे पर्यटक ठरवून काही दिवसांसाठी मनाली आणि रोहतांगसाठी गेलेले आहेत त्यांची या प्रकारामुळे भलतीच तारांबळ उडते. यामुळे विनाकारण मुक्काम वाढवणो अनेक पर्यटकांना भाग पडते. काही पर्यटक स्वत: ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्या हाती सुरुवातीचे 2-3 दिवस तरी निराशाच येते. रोहतांगसाठी परमिट आवश्यक आहे, ते ऑनलाइन दिले जाते आणि त्यासाठी विशिष्ट कागदपत्रंची आवश्यकता आहे, याची कोणतीही माहिती हिमाचल सरकारने स्पष्ट केलेली नाही. त्याचे बॅनर्स, पोस्टर्स किंवा दर्शनी भागात कोणतीही माहिती लावलेली नाही. नेमका याचाच गैरफायदा टॅक्सी ऑपरेटर्स घेताना दिसतात. रोहतांगला जाण्याचे एका माणसाचे सरकारी भाडे अवघे 500 रुपये आहे. मात्र हिमाचलमधील स्थानिक टॅक्सी माफिया सध्या एका प्रवासासाठी सुमारे 4 ते 5 हजार रुपये भाडे आकारत आहेत. ऑनलाइन परमिट काढणे, त्यासाठी कागदपत्रंची जुळवाजुळव करणो, ऑनलाइन पेमेंट करणो एवढय़ा सगळ्या गोष्टी करूनही रोहतांग पासला जाऊ याची कोणतीही शाश्वती मिळत नाही. अनेकदा पेमेंट करून त्याचा काहीही उपयोग होत नाही. विशेष म्हणजे, ही ओरड आता मनालीतील टॅक्सी ऑपरेटर्स करू लागले आहेत. या सगळ्या प्रकारावर आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये यासाठी मनाली येथील प्रशासनाने एक नामी शक्कल काढली. किंबहुना ही आयडिया टॅक्सी ऑपरेटर्सच्या सल्ल्याने प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी राबवत असावेत. 
मनाली ते रोहतांग हे अंतर साधारणपणो 51 किलोमीटर आहे. रोहतांगपासून पुढे साधारण 64 किलोमीटर अंतरावर केलाँग व्हॅली आहे. रोहतांगर्पयतचेच अंतर कापायला साधारण तीन तासांचा अवधी लागतो. कारण रस्ते अतिशय लहान आणि अनेक ठिकाणी बॅरिकेट्स नसल्यामुळे धोका संभवतो. राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार रोहतांगला दिवसाला 800 पेट्रोल वाहने आणि 400 डिझेल वाहनांना परवानगी देण्यात येत आहे. तथापि, केलाँग व्हॅलीत जाण्याचा मार्ग रोहतांगवरूनच पुढे जातो. त्यामुळे केलॉँगला जाण्यासाठी स्थानिक प्रशासनाने स्वतंत्र परमिट देणं सुरू केलं आहे. पण त्यासाठी एक महत्त्वाची अट घालण्यात आली आहे. ती म्हणजे, रोहतांगहून यू टर्न घेऊन तुम्ही परत मनालीला येऊ शकत नाही. तुम्हाला केलाँगला जावंच लागेल. शिवाय त्याच दिवशी परत येता येणार नाही. केलाँगला मुक्काम करणं अत्यावश्यक करण्यात आलं. पर्यायी केलाँगर्पयत जाण्यासाठी टॅक्सी माफियांचे पुन्हा स्वतंत्र रॅकेट निर्माण झाले. केलॉँगसाठी परमिट घेऊन रोहतांगहून परत येताना आढळल्यास 5क् हजारांच्या दंडाची तरतूदही करण्यात आली. म्हणजेच याचा अर्थ असा की रोहतांगसाठी रोजचे 12क्क् परमिट देण्यात येत असले, तरी केलाँगसाठीच्या परमिटला संख्येचे सध्या कोणतेही बंधन नाही. थोडक्यात, राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयाला पाने पुसण्याचा हा प्रकार आहे. पर्यावरण रक्षणासाठी रोहतांगची ट्रॅफिक कमी करण्याचा निर्णय घेतला, त्याचा कोणताही उपयोग झालेला नसल्याचे यातून स्पष्ट होते. शिवाय केलॉँगच्या नावाखाली लूट करण्याचा नवा धंदा टॅक्सी ऑपरेटर्सला मिळाला. केलॉँगला जाण्याची आणि येण्याची तारीख एक असू शकत नाही. शिवाय हॉटेलचे बिल प्रसंगी चेकपोस्टवर दाखवणो आवश्यक करण्यात आले आहे. केलॉँगमध्ये मुक्काम करून परतत असल्याची खात्री पटल्याखेरीज बॅरिकेड्समधून वाहने पुढे सोडण्यात येत नाहीत. त्यामुळे हॉटेलचालकांशी टॅक्सी ऑपरेटर्सचे ‘हितसंबंधाचे’ जाळे तयार झाले आहे. सिझनमध्ये एखाद्या साध्या हॉटेलमध्येदेखील मुक्कामाचे दर साधारण दहा हजारांच्या घरात आहेत. मनालीला परतणो शक्य नसल्याने केलाँगला मुक्काम करण्याशिवाय पर्यटकांकडे कोणताही पर्याय नसतो. म्हणजे रोहतांगर्पयत जायचे झाल्यास टॅक्सीमध्ये चार जणांसाठी कमीतकमी 16 ते 20 हजार मोजावे लागतात. रोहतांगचे परमिट न मिळाल्यास पर्यटक केलाँगचे परमिट घेतात. त्यामुळे केलाँगला जाण्याचा अधिकचा खर्च, शिवाय मुक्कामाचे किमान 10 हजार रुपये असा भरुदड पर्यटकांना बसतो. केलाँगचे दिवसाचे तपमान उणो पाच अंश असल्याने मुलाबाळांना सोबत नेणा:या पर्यटकांची मोठीच पंचाईत होऊन बसते. हा सगळा प्रकार थांबून यात सुटसुटीतपणा येण्याची गरज आहे. 
 
बाइकस्वारांचा धुमाकूळ
रोहतांगला जाण्याची इच्छा आहे, पण परमिटअभावी जाऊ न शकलेल्यांसाठी सोलंग व्हॅलीचा एक पर्याय शिल्लक राहतो. पॅरा ग्लायडिंगसह रोपवे या साहसी खेळांची मजा येथे घेता येते. सोलंगला गेल्यावर एका ठिकाणाविषयीची माहिती मिळाली. या ठिकाणी गेल्यास बर्फात खेळू शकाल, असे सांगण्यात येते. सोलंग व्हॅलीपासून दोन किलोमीटर चालत गेल्यानंतर बाइकने सहा किलोमीटर नेण्यात येते. एका बाइकवर बाइकस्वारासह दोघे अर्थात ट्रिपल सीट घेऊन जाण्याचे 600 रुपये मोजावे लागतात. त्यात पुढच्या मार्गासाठी गाइड सोबत नेल्यास त्यांना किमान एक हजार रुपये देण्याशिवाय पर्याय नसतो. बाइकने सहा किलोमीटर सोडल्यानंतर पहाडांमधून साधारण 45 मिनिटे चालत गेल्यानंतर एक ग्लेशियर दिसून येते. या ग्लेशियरवर खेळण्याचा आनंद लुटता येतो. या सहा किलोमीटरच्या अंतरावर बाइकस्वार मात्र सुसाट वेगाने गाडय़ा तर पळवतातच, पण सुसाट पैसाही कमावतात.
 

Web Title: Taxi Mafia in Himachal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.