सिध्दांत
By admin | Published: June 6, 2015 03:08 PM2015-06-06T15:08:09+5:302015-06-06T15:08:09+5:30
लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेआधी ऑफिसमध्ये नीट सांगितले आणि वरिष्ठांसह सर्वानीच पाठिंबा दिला. पुढे मग सगळेच सोपे होत गेले.
Next
>लिंगपरिवर्तन हा शब्द आजही ऐकताना थोडासा वेगळा वाटतो. निसर्गाने ज्या शरीरामध्ये जन्माला घातले ते शरीर बदलायचे कसे? कालर्पयत आपण ज्या व्यक्तीला पुरुष म्हणून पाहत होतो ती स्त्री कशी होऊ शकते?- असे प्रश्न मनामध्ये येतात. सिद्धांतने मात्र त्याचे मन ज्या शरीरासाठी तयार झाले होते, तेच शरीर निवडण्याचा निर्णय घेतला. सिध्दांत जन्माला आला आणि वाढला, तो मुलगी म्हणून! पाचवीमध्ये गेल्यावर त्याला मुलींबद्दल आकर्षण वाटू लागले. पुढे जाऊन आपल्याकडे जेव्हा सोशल मीडियाचा प्रसार झाला तेव्हा ऑकरुटवर त्याची काही लेस्बियन मैत्रिणींशी ओळख झाली आणि मुली आवडतात म्हणजे आपण लेस्बियन आहोत असा त्याचा समज झाला. पण, हा समज काही काळानंतर गळून पडला. आपण लेस्बियन नसून आणखी कोणीतरी वेगळे आहोत हे त्याला जाणवले. केवळ स्त्रियांबद्दल आपल्याला आकर्षण वाटत नाही तर आपण या शरीरात कम्फर्टेबल नाही हे त्याला समजले. त्यामुळे शेवटी त्याने मुलीच्या शरीरापासून मुक्ती मिळवण्याचा निर्णय घेतला.
- हे सोपे नव्हते. सिध्दांतची आई दीर्घ आजाराने अंथरुणाला खिळली होती. त्याने नीट विचार करून आपला प्राधान्यक्रम
ठरवला. आजारी आईची सेवा करताना दुसरे कुठलेही अडथळे मध्ये आणायचे नाहीत, असे ़ठरवले.
2011मध्ये आईचे निधन झाले. पुन्हा वर्षभर सिद्धांतने लिंगपरिवर्तनाच्या निर्णयावर विचार केला. निर्णय पक्का झाल्यावर मोठा भाऊ आणि वडिलांना हे सारे सांगितले. विरोधाची कल्पना होतीच, त्यामुळे त्याने सगळे नीट विचारपूर्वक आणि संयमाने हाताळले. शेवटी घरची संमती मिळाली. वैद्यकीय तपासण्यांनंतर 2012 पासून सिद्धांतने पुरुष संप्रेरकांचे औषध सुरु केले आणि 2013 मध्ये लिंगपरिवर्तनाच्या शस्त्रक्रियेद्वारे त्याला पुरुषाचे शरीर मिळाले.
गेली 14 वर्षे सिद्धांत एका खासगी कंपनीत नोकरी करतो आहे. लिंगबदलाचा निर्णय त्याने आपल्या वरिष्ठांना स्पष्टपणाने सांगितला. कोणताही आडपडदा न ठेवता त्याने मांडलेल्या भूमिकेमुळे सिध्दांतला वरिष्ठांचा पाठिंबा मिळाला. ‘तू जो आहेस ते तुला व्हायचे असेल तर तुला आमचा पूर्ण पाठिंबा आहे’ असे आश्वासन दिले आणि पूर्णपणो ते पाळलेदेखील. त्यामुळे कामाच्या ठिकाणी सिध्दांतला कुठल्याही अवघड परिस्थितीचा सामना करावा लागला नाही. विशेष म्हणजे त्याच्या ऑफिसमधील सहका:यांनी या नव्या सिद्धांतला मनापासून स्वीकारले. जुने सहकारी त्याला पूर्वीच्या मुलीच्या नावानेच हाक मारतात. सिद्धांतला या सर्वाबद्दल मनापासून प्रेम आणि आपुलकीही वाटते. शस्त्रक्रियेनंतरही सहका:यांनी स्वीकारल्याबद्दल तो आनंदी आहे. आता त्याचा पुढचा टप्पा आहे तो त्याच्या सर्व प्रमाणपत्रंवर लिंग आणि नाव बदलण्याचा. त्यामध्ये काही अडथळेही येत आहेत, कायदेशीर सल्ले व मार्गदर्शन घेऊन तो ते प्रश्न सोडवत आहे.
लिंगपरिवर्तित व्यक्तींच्या भावी आयुष्याबद्दल बोलताना सिध्दांत म्हणतो, मनोबी बंदोपाध्यायसारखी उदाहरणो म्हणजे सुरुवात आहे. आज अनेक व्यक्ती आपल्या जन्मत: मिळालेल्या शरीरामध्ये सहजगत्या वावरू शकत नाहीत. माङया ंओळखीतील अनेक व्यक्तींना लिंगपरिवर्तनाचा निर्णय घ्यायचा आहे. पण हा निर्णय सांगितल्यावर, अंमलात आणल्यावर आपल्या नोकरीवर परिणाम होईल असे त्यांना वाटते.
किंवा घरामध्येही आपल्याला विरोधाला सामोरे जावे लागेल अशी भीती वाटते. खरे पाहता याबाबत समाजात जागरुकता वाढीस लागली पाहिजे. गे, लेस्बीयन, ट्रान्सपर्सन, ट्रान्सजेण्डर्स या सर्व संज्ञांची व्यवस्थित माहिती सर्वाना द्यायला हवी. एखाद्या व्यक्तीला निसर्गदत्त शरीरासह जगणो अवघड वाटत असेल तर तो त्या व्यक्तीचा दोष नाही हे स्पष्टपणो सांगितले, समजावले जायला हवे. सत्यमेव जयते सारखे कार्यक्रम या शिक्षणासाठी उपयुक्त ठरतील आणि माध्यमांचीही जबाबदारी आहेच.
राखीव जागा
तृतीयपंथी आपल्या अधिकारांच्या संदर्भात आता जागृत होताहेत आणि नोक:या, स्पर्धा परीक्षांमध्येही आपल्याला राखीव जागा असाव्यात अशी त्यांची मागणी आहे. तृतीयपंथी स्वप्ना आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणा:या कार्यकत्या सृष्टी मदुराई यांनी मदुराई येथे नुकतंच धरणो आंदोलन केलं होतं. केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, बॅँक कर्मचारी भरती. इत्यादिंसाठीच्या स्पर्धापरीक्षांसाठीही तृतीयपंथीयांना राखीव जागा असाव्यात या मागणीसाठी ते अगदी उच्च न्यायायलयातही गेले होते. तामिळनाडू राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धेत ‘महिला उमेदवार’ म्हणून परीक्षा देण्याची मान्यता न्यायालयाने स्वप्नाला दिली होती आणि राज्य लोकसेवा आयोगाची चौथ्या वर्गाची परीक्षा उत्तीर्ण करणारी स्वप्ना ही पहिली तृतीयपंथी उमेदवार आहे.
‘लैंगिक अल्पसंख्य’
हा गट आता जागृत होतो आहे. काही प्रमाणात सामाजिक मान्यताही त्यांना मिळू लागली आहे. कलम 377 संदर्भात आता खुल्या न्यायालयात सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानेही नुकतीच सहमती दर्शवली आहे. तृतीयपंथीयांना ‘तिसरे लिंग’ म्हणून मान्यता मिळालेली आहे. अशा परिस्थितीत कलम 377च्या अस्तित्वामुळे समलिंगी संबंध ठेवणा:यांच्या संबंधांचे गुन्हेगारीकरण होणार असेल तर ते चुकीचे आहे आणि दोन सज्ञान व्यक्तींनी आपापसातील सहमतीने ठेवलेले लैंगिक संबंध म्हणजे गुन्हा ठरविणारा कायदा अतार्किक आहे असा युक्तिवाद आता केला जात आहे. आम्हाला शरीरसंबंध ठेवण्यास आणि विवाहास मान्यता मिळावी यासाठीचा त्यांचा लढा आता सुरू आहे.
‘जिती जितायी पॉलिटिक्स’
2003मध्ये तृतीयपंथीयांनी मध्य प्रदेशात ‘जिती जितायी पॉलिटिक्स’ (जेजेपी) हा आपला राजकीय पक्षही स्थापन केला. आपला निवडणूक जाहीरनामाही त्यांनी जाहीर केला आणि इतर राजकीय पक्षांपेक्षा आम्ही कसे वेगळे आहोत हेही त्यात स्पष्ट केलं.